शीर्षक -2
विषय - ती नाही कमवत पण..?
रमा हॉस्पिटलला पोहचते, तिची आई समोरच बसलेली असते, " अगं आई बाबा कसे आहेत..? डॉक्टर काय म्हणाले..? रमा आल्या आल्या प्रश्न करते.
" डॉक्टर सांगतात बाबांना हृदय विकाराचा झटका आला आहे, तब्येत जरा नाजुक आहे.. " आणि आई रडु लागते.
ती आईला जवळ घेते, तिला शांत करते..
डॉक्टर बाहेर येतात, " डॉक्टर अहो बाबा, तब्येत कशी आहे.. आम्ही भेटु शकतो का त्यांना.. "
" नाही आता नाही, ते आय सी यु मध्ये आहेत त्यांची तब्येत बघु आणि नंतर ठरवू. तुम्ही पुढची प्रोसिजर काउंटर वरून करुन घ्या.. " डॉक्टर बोलतात.
आणि डॉक्टर एवढं बोलुन निघुन जातात.
रमा काउंटर वर जाते, काही फॉर्म भरून देते तेवढ्यात तिला आशु चा कॉल येतो.
" काय गं काय झालं बाबांना..? मि आता मॅसेज पहिला सॉरी मिटिंग मध्ये होतो त्यामुळे कॉल घ्यायला जमलं नाही.. " आशु समोरून बोलतो.
" काय गं काय झालं बाबांना..? मि आता मॅसेज पहिला सॉरी मिटिंग मध्ये होतो त्यामुळे कॉल घ्यायला जमलं नाही.. " आशु समोरून बोलतो.
आशु चा आवाज ऐकुन रमाला रडु येतं, " बाबांना हृदय विकाराचा झटका आला आहे, आय सी यु मध्ये आहेत. तब्येत नाजुक आहे काही सांगता येणार नाही स्पष्ट डॉक्टर बोलले आहेत.. "
" बरं तु काळजी करू नकोस होईल सगळं नीट.. मि लवकरच तिथे पोहचतो.. " आशु तिला धीर देतो.
" मॅडम तुम्हाला काही पैशाची अमाऊंट भरावी लागेल.. " काउंटर वरील मुलगी तिला बोलते.
" अमाऊंट किती..? "
" आधी पन्नास हजार.. "
हे ऐकुन रमाला घाम फुटतो, " इतके आणणार कुठून, आणि आईकडे इतके नसतील.. " ती स्वतःशिच पुटपुटते.
" बरं मि संध्याकाळ पर्यँत भरते चालेल ना..?" ती विनवणी करते.
आणि हे ती आशु च्या कानावर घालायचे ठरवते, आशु नक्कीच मदत करेल. कारणं त्याने लग्नात असं वचन दिलं होतं आणि त्याच्या आईच्या वेळेस मि सुद्धा माझे दागिने ठेवले होते.. तिला खात्री होती.
ती आशु यायची वाट पाहते.
ती आशु यायची वाट पाहते.
" काय गं भरलास फॉर्म आणि पैसे वगरे किती भरायचे काही सांगितलं का..? "
रमा आधी गप्पचं राहते, पुन्हा आई तिला विचारते.
" आधी पन्नास हजार भरा बोलले आहेत, पण तु काळजी करू नकोस आशु आहेत ना ते करतील की.. तु फक्त बाबांची काळजी घे. " रमा आईला धीर देते...
" आधी पन्नास हजार भरा बोलले आहेत, पण तु काळजी करू नकोस आशु आहेत ना ते करतील की.. तु फक्त बाबांची काळजी घे. " रमा आईला धीर देते...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा