Login

लव कल्लोळ - ५

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ - ५

आज सकाळीच ग्रीन वेव्ह कंपनीची मिटिंग होते आणि त्यात प्रिझम कम्युनिकेशन सोबत भागीदारी केल्यानंतर पुढील कामकाजासाठी याच ऑफिसमध्ये कामकाजाला जागा ठरवून दिली जाते आणि त्यासाठी एक टिम सुद्धा रिकरूट करायचे ठरवले जाते. शर्विलला कॉर्डिनेटर म्हणून नेमले जाते व त्याच्या पध्दतीने त्याला स्टाफ सिलेक्शन तसेच कामकाज करायला मुभा दिली जाते. झालेला निर्णय प्रिझम कंपनीला कळवला जातो आणि त्यांनादेखील एक कॉर्डिनेटर नेमायला सांगून कामकाजाला सुरुवात करावी असे सांगितले जाते.

प्रिझम कंपनीतर्फे तनयाला कॉर्डिनेटर नेमून तिला ग्रीन वेव्ह कंपनीच्या डेक्कनला असलेल्या मेन ऑफिसमधून दुसऱ्या दिवसापासून काम चालू करण्यास सांगितले जाते. हा निर्णय झाल्यानंतर शर्विल आणि तनया दोघेही एकमेकांना मेसेज करून बातमी सांगतात आणि एकमेकांचे अभिनंदन करतात. दोघेही आता एकत्र काम करणार म्हणून आज दोघेही खूप खुश असतात. शर्विल तनयाला उद्या सकाळी ऑफिसमध्ये येण्यासाठी इन्व्हाईट करतो आणि नवीन जागेचा सेटअप पाहून स्टाफला काही सूचना देतो. सर्व मॅनेज करून ऑफिसबॉयला बोलावून एक काम सांगतो आणि मग घरी जातो.

सकाळी ११ वाजता ग्रीन वेव्ह कंपनीच्या ऑफिसमध्ये तनयाची एन्ट्री होते. ती गाडीतून उतरत असतानाच शर्विलला कॉल करते आणि आल्याचे सांगते तसा शर्विल तिला रिसिव्ह करण्यासाठी पोर्चमध्ये जातो. खांद्यावर मोकळे सोडलेले बरगंडी रंगाचे केस, फिक्कट लाल रंगाची लिपस्टिक, व्हाइट कलरचा लेडीज शॉर्ट शर्ट, ब्लॅक स्कर्ट, पम्स हिल, ब्लॅक गॉगल, हातामध्ये ब्लॅक बॅग अशी समोरून तनयाला चालत येताना पाहून शर्विल तिच्याकडे एकटक पाहत बसतो. तनया त्याच्या अगदी जवळ येते तसा तो भानावर येत तिला वेलकम करत म्हणतो....
"वेलकम न्यू पार्टनर.... ग्लॅड टू सी यु हिअर."

"थँक्स शर्विल... प्लिज डोन्ट बी अ फॉर्मल" तनया हसत उत्तरते

दोघेही गप्पा मारत मारत ऑफिसच्या मुख्य भागात येतात तसे सर्व एम्प्लॉयी ठरवल्याप्रमाणे उभे राहून टाळ्या वाजवत तनयाचे स्वागत करतात. सगळीकडून वेलकम मॅम चे आवाज तिच्या कानी येतात. ऑफिसबॉय पुढे येऊन शर्विलच्या हातात गुलाबांच्या फुलांचा मोठा बुके ठेवतो. तो बुके शर्विल तनयाच्या हातात देत "वेलकम तनया मॅम" असे म्हणतो. अचानक झालेल्या अश्या स्वागताने तनया फार खुश होते. शर्विल आणि सर्व स्टाफ मेंबरला उद्देशून बोलू लागते.
"थँक यु ऑल सो मच फॉर ग्रँड वेलकमिंग मी. होप वुई ऑल डू अ ग्रेट जॉब टुगेदर."

शर्विल तनयासाठी ठरवलेल्या डाव्या बाजुच्या केबिनच्या दिशेने तिला घेऊन जातो. दरवाजा उघडताच समोर उत्तम प्रकारची मांडणी केलेले केबीन असते. त्या टेबलावर एक बुके आणि एक लहान थैली असते. तनया सर्व न्याहाळत पुढे जाते तसे शर्विल तिला म्हणतो...
"या मॅडम बसा... ही तुमचीच केबीन आहे. आता इथूनच काम करून आपल्याला जग मुठीत करायचं आहे. आय होप यु लाईक धिस अरेंजमेंट."

तनया सर्व न्याहाळत खुर्चीजवळ जाऊन उभे राहते आणि टेबलावर ठेवलेल्या बुकेला हळुवारपणे स्पर्श करते. त्यानंतर ठेवलेली थैली हातात घेऊन उघडते तर त्यात चॉकलेट्स असतात. ते पाहून एकदम उडी मारत शर्विलला म्हणते...
"शर्विल... तू प्लॅन केलेस हे सर्व वेलकम वगैरे? सो स्वीट ऑफ यु; ही फुले चॉकलेट्स सुद्धा... किती स्पेशल फिल होतंय आज मला. थँक यु सो मच..."

"अगं त्यात काय एवढे... तुझा आजचा पहिला दिवस ना आणि आपल्या पार्टनरशिपचा देखील शुभारंभ म्हणून जरा आपले... कुछ मिठा हो जाए" शर्विल

"मला खूप आवडले स्वागत खरचं... मी पप्पांना फोन करून सांगणार आहे आणि आत्ता माझ्यातर्फे सर्व स्टाफला ट्रीट पण देणार आहे. कोणालातरी बोलव ना... सर्वांसाठी बाहेरून मागवते मी काहीतरी" तनया

"त्याची काही आवश्यकता नाही तनया, पुन्हा कधीतरी दे तू. आज तुझा पहिलाच दिवस आहे. तुला ऑफिस सुपरवाईजर सुयश थोडी माहिती देईल त्यानंतर आपण दुपारी कॉन्फरन्स हॉलमध्ये भेटुयात माझ्या टिमने आपल्या कामासाठी एक पीपीटी तयार केलेली आहे ती पाहुयात आणि त्याबाबत चर्चा करूयात. आता मी जातो आणि सुयशला पाठवून देतो." शर्विल

"पाहिले तर तू ऑफिसबॉयला आत पाठवून दे... माझे इतके छान वेलकम केल्याबद्दल सर्वांना पेस्ट्री तरी मागवते आणि दुसरे म्हणजे तुझी केबीन कुठे आहे?" तनया

"ओके एज यु विश... काही लागले तर सुयशला सांग तो तुला सर्व प्रकारची माहिती देईल आणि मी पण आहेच. माझी केबीन उजव्या बाजूला सर्वात शेवटी आहे. चल भेटुयात दुपारी." असे म्हणत शर्विल त्याच्या केबीनकडे जातो.

सुयश दरवाजा नॉक करत तनयाच्या केबीनमध्ये येतो आणि स्वतःची ओळख करून देतो. बाहेर जाऊन तनयाने सांगितली ट्रीटची ऑर्डर ऑफिसबॉयला देतो आणि पुन्हा आत येऊन तनयाला सर्व माहिती देतो. त्यानंतर दुपारी कॉन्फरन्स हॉलमध्ये मिटिंगला येण्यासाठी शर्विल तनयाला फोन करतो. तनया सुयश सोबत निघते, तसे सर्व स्टाफ पुन्हा तनयाला "थँक्स फॉर ट्रीट" असा आवाज देऊन सांगतात. तनया सुद्धा सर्वांना थम दाखवत पुढे जाते. तनयाने शर्विलला सुद्धा पेस्ट्री पाठवलेली असल्याने तो देखील आत गेल्यावर "पेस्ट्री खूप स्वीट होती" असे बोलतो. यावर तनया उगाच लाजते.

मिटिंगमध्ये बिझिनेस ग्रोथसाठी केलेल्या प्लॅनचे प्रेझेन्टेशन पाहून त्यावर बरीच चर्चा होते. यासाठी एक नवीन सेक्शन काढायचे असे शर्विल ठरवतो त्या सेक्शनचे नाव स्ट्रॅटेजी सेक्शन असे ठेवून ते सेक्शन बिझिनेस ग्रोथ होण्यासाठी प्लॅन्स व मार्केटवर लक्ष ठेऊन त्याप्रमाणे आपल्या कंपनीची स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आणि रोज शर्विल आणि तनया या दोघांना त्याबाबत अपडेट देणार. तसेच प्रत्येक महिन्याला केलेल्या कामाबाबत मिटिंग घेऊन मासिक अहवाल सादर करणार. यासाठी आधीच ठरल्याप्रमाणे नवीन स्टाफ यांची रिकरूटमेंट करण्याचे ठरते. शर्विल तशी व्हॅकेन्सी असलेली जाहिरात प्रेसमध्ये द्यायला सांगतो आणि मिटिंग संपते.

शर्विल घरी गेल्यानंतर आई त्याला आठवण करून देते की,
"उद्या आपल्याला केतकी राजेशिर्केंच्या घरी जायचे आहे, तू आणि डॅडी लवकर या घरी"

शर्विल नाखुशीनेच मान हलवून उत्तर देतो
"हो चार-पाच वाजेपर्यंत येईल आम्ही"

आजचा पहिला दिवस संपवून तनया घरी जाते आणि डॅडींना दिवसभराचे सर्व अपडेट देते. शर्विलसोबत आज काम केल्यामुळे ती त्याच्याच विचारात बेडरूममध्ये येते आणि त्याला आजच्या वेलकमसाठी थँक्स करण्यासाठी मेसेज पाठवते. शर्विलचा मूड एवढा बरा नसल्याने तो तोकडाच रिप्लाय करतो आणि मग दोघेही झोपी जातात.

****************************

कशी असेल राजेशिर्केंची मुलगी? शर्विलला ती आवडेल का? की तनयाकडे अजून तो आकर्षीत होईल? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय)
पुणे

🎭 Series Post

View all