Login

Love ... Sky is not the limit 27

समीर आज्ञा

Love… Sky is not the limit 

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेचा उद्देश कुठलीही चुकीची माहिती पसरवणे, सामाजिक मूल्यांना ठेस पोहचवणे नाही. कथा मूळ उद्देश फक्त मनोरंजन करणे आहे. धन्यवाद! 

भाग 27

कथा आतापर्यंत : 

आज्ञा एक कॉलेजमध्ये जाणारी १९ वर्षीय तरुणी, तिला डॉ समीर वर प्रेम होते. पण डॉ समीर मात्र तिच्यावर प्रेम करत नाही. आज्ञा मात्र समीर चा पिच्छा सोडत नाही. त्याच्या बहिणी सोबत मैत्री करून ती हळूहळू त्याच्या घरात प्रवेश मिळवते. त्याच्या घरात सुद्धा ती सगळ्यांची आवडती बनते. पण समीरने मात्र अजूनही तिचे प्रेम स्वीकारले नाहीये. डॉ राज हा समीर चा मित्र, जो कधी कधी दोघांमध्ये पिसला जातो, पण एकाही क्षणाचा आनंद घेणे तो सोडत नाही. 

     

       एक दिवस आज्ञा बाहेरून घरी जातांना आज्ञा वर काही गुंडे हल्ला करतात. समीर तिला त्यांच्या पासून वाचवतो. तिला बरीच दुखापत झाली असल्यामुळे तो तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येत तिच्यावर उपचार सुरू करतो.

आता पुढे..

"या आयटेमला तुम्ही कसं काय झेलता?"..

राजच्या फोनची बीप वाजली.

"जसे तुम्ही तिच्या भावाला झेलता."

आज्ञाच्या फोनची बीप वाजली.

"ते किती स्वीट आहे.".

राजच्या फोनची बीप वाजली.

"ती खूप क्यूट आहे."

आज्ञाच्या फोनची बीप वाजली.

"मग माझं पार्सल आणून सोडा इथे, आणि आपलं पार्सल घेऊन जा,खूप वैतागून सोडले आहे."

राजच्या फोनची बीप वाजली.

     ते मेसेजेस वाचून राजला खूप हसू आले होते. तो आपले काम आटोपून आज्ञाच्या रूममध्ये गेला. तिथला नजरा बघून त्याने डोक्यावर हात मारला. 

      सायली आज्ञाच्या शेजारी एका खुर्चीवर बसून काहीतरी पुस्तक वाचत होती. आणि आज्ञाने एक उशी आपल्या कानावर, चेहऱ्यावर दाबून धरली होती. पण सायलीचे मोठमोठ्याने पुस्तक वाचणे सुरू होते. 

"हॅलो गर्ल्स!" राज आतमध्ये येत म्हणाला. 

"हुश्श!!" राजचा आवाज ऐकून आज्ञाने आपल्या चेहऱ्यावरून उशी बाजूला केली. सायली पण त्याच्याकडे बघत होती.  

"हे, हाय डॉक्टर राज! या या या.. लवकर आतमध्ये या..आपलं ग्रँड वेलकम आहे." आज्ञा झोपल्या झोपल्या हात जोडत म्हणाली. 

"आज्ञा, आता कसं वाटतेय?" राज.

"मेंदू दुखत आहे." आज्ञा.

"डोकं दुखत आहे काय?" राज.

"नाही हो, हा माझा इवलासा मेंदू, तो दुखतोय, या मॅडम दुखावत आहेत. तुमचा नाही दुखत का हो?" आज्ञा. 

"काय?" सायली. 

राजने डोक्यावर हात मारून घेतला. 

"म्हणजे, हे डोक्याचे डॉक्टर आहे ना.. सतत डोक्याची कामं करत असतील. म्हणून विचारले." आज्ञा. 

"मी अधून मधून लव्ह साँग्ज ऐकत असतो, त्यामुळे रिलॅक्स होतं. बेसिकली माझं टॉनिकच आहे ते." तो रिलॅक्स (हात, मान तानत) होण्याचे नाटक करत सायलीकडे मागे वळत बघत, तिला हळूच डोळा मारत म्हणाला. 

सायलीने त्याच्याकडे बघत मोठे डोळे केले. आज्ञाला खूप हसू येत होते. 

"बरं, ते जाऊ द्या. तुमचा मेंदू का दुखत आहे?" राज.

"किती तो माझ्यावर अत्याचार सुरू आहे. दुखावणाऱ्यांनाच विचारा?" आज्ञा सायलीकडे इशारा करत म्हणाली. 

"आज्ञा, फालतू नाटकं नाही करायची हा? तिची दोन दिवसांनी परीक्षा आहे. तिचा काहीच अभ्यास झाला नाहीये. पेपरमध्ये थोडं तरी लिहिता यावं. मी तिला फक्त महत्वाचे पॉइंट्स वाचून दाखवत आहे." सायली. 

"अगं, मी हॉस्पिटलाइज्ड आहे ना?" आज्ञा बिचारा चेहरा करत म्हणाली. 

"युनिव्हर्सिटीमध्ये तुझे सासरेच बसलेय, नाही का?" सायली. 

"ओह.. सासऱ्यांवर नको जाऊ.." आज्ञा राज एकसाथ म्हणाले. 

"हा?" सायली डोळे मोठे करत दोघांकडे आळीपाळीने बघत होती. 

आज्ञा आणि राज एकमेकांकडे तर कधी सायलीकडे बघत होते. 

"तुम्ही दोघं तर असे शॉक झालात, जसे तुमचे सासरे एकच आहेत?" सायली. 

"ही ही ही.." आज्ञा आपली बत्तिशी दाखवत होती. राजने डोक्यावर हात मारून घेतला. 

"सायंटिस्ट, आपल्याकडे एक सायंटिस्ट पुरेसा आहे की नाही..? आधीच लोकं पागल झाली आहेत, मी जर टॉप केले तर जीव देतील." आज्ञा हसत म्हणाली आणि राजकडे बिचाऱ्या चेहऱ्याने बघत, इशारा करत तिला घेऊन जा म्हणून खुणावत होती. 

ते बघून राजला खूप हसू येत होते, पण सायलीला बघून त्याने कंट्रोल केले. 

"सायली, ते मला…मला ते…." राजला पुढे काय कारण सांगावे सुचत नव्हते. 

"काय? आणि आज्ञा ते काही नाही, मी थोडे पॉइंट्स वाचते, तुला फक्त ऐकायचे आहे." सायली परत चेअरवर पालखट घालत बसली.

"अरे यार…इतकाच हीचा भाऊ पण चीपकु असता तर.." आज्ञा स्वतःशीच म्हणाली.  

"मला मेंदू बद्दल काही माहिती हवी आहे.." राज. 

"मी झूलॉजी शिकतेय.. आणि डॉक्टरला माझ्याकडून माहिती हवी आहे?" सायली अजब नजरेने त्याच्याकडे बघत होती. 

"हे भगवान! अगं त्यांचा मानवाच्या मेंदूवर खूप रिसर्च झाला म्हणून आता त्यांना प्राण्यांच्या मेंदूवर रिसर्च करायचा असेल. जा ना एवढयाने विचारात आहेत तर सांग की. योग्य ठिकाणी तुझ्या ज्ञानाचा वापर होईल.. " आज्ञा.  

"हा, प्लीज!" राज. 

सायली राज रूमच्या बाहेर जायला निघाले..

"डॉ राज.." आज्ञाने आवाज दिला. 

"ते….ते… डॉक्ट…" आज्ञा.

"काय?" राज कळून पण न कळल्यासारखा करत होता. 

आज्ञा सायलीकडे बघत, एका हाताने चेहऱ्यावर मिशी पिळण्याची अक्टिंग करत सायलीचा भाऊ समीर असे खुणावत होती. 

"मिशिवाला?" राज. 

"कोण मिशिवाला? तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे काय?" सायली. 

आज्ञाने डोक्यावर हात मारला. 

"मिशीवाले, स्टेटस्कोपवाले, इंजक्शनवाले असे कोणाला पण पाठवू नका, मी आराम करतेय." आज्ञा नाटकी रागवत डोक्यावरून चादर घेऊन झोपली. 

सायली आणि राज, राजच्या केबिनमध्ये निघून आले. 

"आज्ञा जवळ बसले होते, तर तुला बघावले नाही ना? लगेच आला बोलावून घ्यायला. काय तर म्हणे प्राण्यांच्या मेंदू बद्दल जाणून घ्यायचं.." सायली. 

"अगं माझी गोडूली, किती ती चीडचीड…" राज तिचे गाल ओढत म्हणाला. 

"ती एकतर अभ्यास करत नाही, त्यात मी थोडी मदत करत होते, तर तू आला आपला मध्येच.." सायली. 

"तुझ्या मदतीने जेवढे येते तेवढे सुद्धा विसरली असती..." राज हळूच पुटपुटला.

"काय?" सायली..

"कुठं काय? काही नाही.." राज.

"नाही, तू काय तरी म्हणाला होता.." सायली. 

"हो कधी म्हणेल तू? असे म्हणालो होतो." राज.

"कशासाठी हो?" सायली. 

"जसे काय तुला कळलंच नाही, मी काय म्हणतोय?" राज तिच्यावर नजर रोखत म्हणाला. 

"तू परत सुरू झाला? तुला बोर नाही का होत, तेच तेच विचारायला आणि नकार ऐकायला?" सायली गालात हसू दाबत बोलत होती. 

"तुझा नकार पण मला होकारच वाटतो, मेरी जान…" राज परत लाडात येत बोलत होता. 

"I guess, तुला जो मेंदूचा अभ्यास करायचा होता, तो झाला आहे. तर मी निघते आता." सायली. 

"अरे नाही नाही, कुठे झाला? आपल्या दोघांच्या डोक्यांच्या ताराच जुळावायच्यात.." राज.

तिने डोक्यावर हात मारला.

"बोलना कधी होकार देशील..?" राज.

"आज पेशंट नाही वाटतं?" सायली. 

"माझे सगळे काम आटोपले आहे. बोल आता, विषय भरकटवू नको." राज.

"तू जेव्हा असा धीर गंभीर, शांत , समजदार होशील तेव्हा.." सायली. 

"हेकडे भाऊ बहिण… या दोघांपेक्षा तर माझ्या क्रश चांगल्या होत्या. ती सीनिअर तर खूप भारी होती. पण नाही, तिथे हिच्या भावाला माझे सुख पहावले गेले नाही, अन् इथे ही बाय..माझ्या प्रेमाचे दुश्मन.." तो स्वतःशीच पुटपुटला. 

"काय म्हणाला?" सायली. 

"जातो मी मठात…" राज वाकडं तोंड करत म्हणाला. 

     ते ऐकून, त्यात राजचा तो बिचारा पपी फेस बघून सायली खळखळून हसायला लागली. 

"जैसी भी है, अपनी हैं….किती क्यूट दिसते हसतांना. पण नाही, हसणार नाही, जसे काही हसण्यावर टॅक्सच लागतात ." तो तिला बघत होता. 

"आज दादा दिसत नाहीये?" सायली. 

"त्याची आज एक इंपॉर्टन्ट सर्जरी आहे. तो असिस्ट करतोय." राज..

"बरं ठीक आहे. निघते आता.." सायली. 

"थोड्या वेळ थांब." राज. 

"नको, अभ्यास आहे." सायली.

"आज जाने की जिद ना करो.." राज गाणं म्हणतच होता की बाहेर पावसाला सुरुवात झाली. 

"परफेक्ट!" राज. 

"पाऊस..?" सायलीच्या कपाळावर आठ्या पडल्या. 

"एक ब्लॅक कॉफी.. आणि एक नॉर्मल कॉफी विथ दोन स्पून शुगर.." सायलीकडे बघत फोनवर ऑर्डर दिली. "आणि हो थोड्या वेळसाठी हॉस्पिटल लॉक आहे." तो बत्तिशी दाखवत म्हणाला.  

"काय हे, मी शुगर घेते काय?" सायली. 

"म्हणूनच तर कडू आहेस." राज.

"काय? मी कडू?" सायली.

"टेस्ट कुठे केलीय?" राज.

"राज?" 

"सयु!" 

"राज?"

"Okay! गंमत होती. तू कडू असलीस तरी मी गोड करून घेईल..म्हणूनच तर एक्स्ट्रा साखर घेतो." 

"राज, आता तू मार खाशील!" 

"हाये..तेवढाच तुझा स्पर्श!" राज स्वप्नवत म्हणाला. 

"ओह गॉड! कुठे फसले? बाहेर पाऊस, अन् इकडे हा बरसतोय.." सायली. 

"मौसम हैं सुहाना, प्यार करणे को मिला है बहाना… I loved it.. गॉड जी, तुस्सी ग्रेट हो!" राज वरती बघत किस करत होता. 

________

"इथे अचानक एवढी सेक्युरिटी का वाढवली?" आज्ञा नर्सला विचारत होती. 

"ते एका माफिया डॉनची हार्ट सर्जरी आहे, म्हणून." नर्स.

"आणि ही सर्जरी डॉक्टर समीर करत असणार, राईट?" आज्ञा. 

"हो." नर्स. 

"काय करू यांचं मी? कितीदा सांगितले आहे, अशा डेंजर केसेस नका घेत जाऊ.. पण हे डॉक्टर समीर, कोणाच्या बापाला ऐकत नाही." आज्ञा स्वतःशीच बोलत होती. 

*****

क्रमशः