प्रेम! एका अनामिक वळणावरचं. पर्व-२. भाग-५

एक चतुर राजकारणी आणि एका ध्येयवेड्या मुलीची ही अनोखी प्रेमकहाणी.
भाग-५

दिग्विजय सकाळी मुंबईत उतरल्यावर त्याने गौरवीला मेसेज टाकला. त्यानंतर तो शशांकसह त्याच्या फार्म हाऊसवर गेला. कारण मुंबईत आता मीडिया काही पिच्छा सोडणार नाही हे माहित होतं त्याला... तिथे त्या दोघांनी फ्रेश होऊन नाष्टा केला. आणि दिग्विजयने शशांकला त्याच्यासह त्यांच्या फ्लॅटवर चलण्यास सांगितलं. तो कधी आला नव्हताच त्यांच्या तिथल्या घरी. आणि थोडावेळ काहीसं रिलॅक्स होऊन ते दोघे गौरवी दिग्विजयच्या फ्लॅटवर जायला निघाले. खरं तर दिग्विजय खूप एक्सायटेड झालेला जवळपास एक महिन्यानंतर तो गौरवी आणि सौम्याला भेटणार होता. गौरवी त्याच्याएवढ्याच वयाची... खूप समांतर होतं दोघांमध्ये की एकमेकांना बोलण्यासाठी त्यांना शब्दांच्या कुबड्या कधी बाळगाव्या लागल्या नाहीत. त्या दोघांचं सगळंच अगदी सम असायचं. त्याप्रमाणे तर ते दोघे होतेच समदुःखी, समविचारी आणि खूप काही... व्यक्त अव्यक्त या दरीच्या पलीकडे जाऊन लहानपणापासून त्यांनी जगापासून दूर राहून त्यांचं विश्व साकारलेल. पण त्यांच्या या विश्वात त्यांचं स्वताचं स्थान नखाइतकंही नव्हतं. सर्वकाही होतं ते फक्त सौम्या साठी आणि सत्य, अहिंसा पत्करत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी साकारलेलं... सौम्या त्या दोघांपेक्षा सहा वर्षांनी लहान होती. दहा वर्षापूर्वी ती त्यांच्या आयुष्यात एखाद्या परीकथेतल्या देवदुताप्रमाणे आलेली... तिचं हरवलेलं बालपण तिला पून्हा मिळवून देण्यात ते दोघे यशस्वी झालेले. पण तिला मात्र त्या दोघांना आनंदात पहायचं होतं, त्यांना मनापासून हसताना पहायचं होतं त्यासाठी ती नेहमीच झटायची. पण ते दोघे स्वताच्या बाबतीत दगडाच्या काळजाचे होते. तिच्या आनंदात ते त्यांचा आनंद अनुभवायचे. नियतीने कायमचं त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं त्यांचं बालपण ते तिच्यात पहायचे. अशा प्रकारे हे तीनही जीव एकमेकांचे कुणीच नसले तरी प्रत्यक्ष नात्यापेक्षाही गहिरं नातं त्यांच्यात तयार झालेलं... आणि त्या नात्याला जो तो त्यांच्या सोयीप्रमाणे नाव द्यायचा प्रयत्न करायचे. पण त्यांचं नातं सोलमेट या अफाट एकरूपतेलाही छेद देणारं किंबहुना त्याहुन विशाल होतं....

विचार करत करत त्यांची गाडी कधी पार्किंगमध्ये येऊन पोहोचली त्याला कळलंच नाही. तो आठवणींच्या उमाळ्यातून बाहेर येत स्थिरस्थावर झाला. आणि शशांकसह जायला निघाला. त्यांच्या फ्लोअरवर येताच शशांकचा फोन रिंग झाला. तसं तो कानाला लावून दिग्विजयसोबत चालत होता. अखेर दिग्विजय त्याच्या फ्लॅटसमोर येऊन उभारला. डोअर बेल वाजवताना त्याचं लक्ष त्याच्याखाली असलेल्या नेम प्लेटकडे गेलं. अॅड. गौरवी सपकाळ, दिग्विजय जगताप आणि खाली सौम्या असं नाव लिहिलेलं. आणि सौम्याच्या नावासमोर तिने छोटासा भालूचा स्टिकर लावलेला. ते बघून तो हलकेच हसला. आणि रिंग वाजवली. तोच त्याचा हात खाली येतो की नाही तोवर समोरून दार उघडलं गेलं. आणि समोर एक मुलगी येऊन उभारली. फेन्ट यलो कलरचा cropped टी शर्ट, गुडघ्यापर्यंत चे शॉर्टस्, खांद्यावर तरळणारे छोटेसे केस समोर हेअरबेल्ट लावून मोकळे सोडलेले, कानात त्याच रंगाचे टॉप्स, टपोरे काळे डोळे, गोबरे गाल आणि चेहऱ्यावर मोठीच्या मोठी हॅप्पी स्माईल अशा एकूण फेसमधून समोर सौम्या उभी होती. त्याने एका क्षणात स्कॅनिंग प्रमाणे तिला न्याहाळलं. तिला समोर बघून शशांकचंही लक्ष तिच्याकडे गेलं. ती मात्र अजूनही त्या दोघांना न्याहाळत होती. किती खुश झालेली इतक्या दिवसांनंतर दिग्विजय ला समोर बघून हे तिच्याकडे पाहताच कळत होतं. शशांक मात्र थोडासा ओशाळला. त्याने हळूच दिग्विजय ला खुणावलं आपण करेक्ट अॅड्रेसवरच आलोय ना म्हणून . आणि तेवढ्यात सौम्या मागून गौरवी आली. उंच, सडपातळ, ताठर बाण्याची आणि चेहऱ्यावरून तितकीच स्मार्ट आणि निर्विकार होती ती... अगदी दिग्विजय प्रमाणेच. शशांकने त्यांचे जुळणारे facts लगेच ओळखले. तिने डोळ्यांनीच हसून त्यांना प्रतिसाद दिला आणि सौम्याला सावरत पूर्ण दार उघडून त्या दोघांना आत घेतलं.

" Awww... Dadu I am so so so happy. After a long time.... " ते दोघे आत येऊन सोफ्यावर बसताच सौम्या दिग्विजय जवळ जात त्याला आनंदाने बिलगली. त्यालाही तितकाच आनंद झालेला. पण तिच्याप्रमाणे सगळं काही बोलता यायचं नाही त्याला. तो शांतपणे तिच्या डोक्यावरून व पाठीवरून हात फिरवत होता. आणि हलकेच तिचे गाल ओढले. तेवढ्यात गौरवी पाणी घेऊन आली. आणि सौम्याचं लक्ष शशांक कडे गेलं. तसं तिने अंदाज लावत त्याची ओळख करून घेतली.

त्यानंतर त्या तिघांचं बोलणं चालू होतं. सौम्याची कंटीन्यू बडबड दिग्विजय खूप दिवसांनी एंन्जॉय करत होता. पण शशांकसाठी हे सगळं नवीन होतं. आणि सौम्याने तिच्या रेसिपीचा शिकार यावेळी पहिल्यांदाच आलेल्या शशांकवर ट्राय केला. म्हणजे त्याने तो स्वताहूनच ओढवून घेतला. त्यामुळे मात्र त्या दोघांत या एका गोष्टीवरून अढी तयार होण्याची जणू ही नांदीच होती. त्यानंतर थोड्या वेळाने कृणाल म्हणजेच गौरवीचा सहायक वकिल आणि त्या सगळ्यांचा मित्र त्यांना येऊन जॉईन झाला. महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून शशांक आणि कृणाल तिथून पाचच्या सुमारास निघाले.

गौरवी, दिग्विजय आणि सौम्या हॉलमध्ये एकत्र बसलेले असताना गौरवीला काहीतरी आठवलं तसं तिने दिग्विजयला खुणावलं.

" सौम्या गौरवी चला तयार होऊन या, आपण निघतोय..." दिग्विजय म्हणाला. पण सौम्याला कळलं नाही कुठे जायचं बोलतोय तो ते...

" तू परवा जे art exhibition चे पासेस आणले होते ना तिथेच जातोय आपण आता. जा पटकन तयार होऊन ये. डिनर बाहेरच करून येऊया. " तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून दिग्विजय म्हणाला तसं ती एकदम खुश होत उड्या मारत आत गेली. आणि थोड्या वेळाने तिघेही बाहेर गेले. आज खूप दिवसांनी एंन्जॉय करत होती सौम्या. हसत खेळत बागडत होती ते बघून त्या दोघांना बरं वाटत होतं. कारण सौम्या नावाचा एकच तर सुखद किनारा होता त्यांच्या अंधारलेल्या जगात...

रात्री घरी आल्यावर सौम्या झोपताच तिला तिच्या बेडरूममध्ये सोडून ते दोघे हॉलमध्ये येऊन बसले. खूप दिवसांनी असा एकांत मिळालेला त्यांना... आणि अशा वेळी हमखास तिसरा जोडीदार ठरलेला असायचा तो म्हणजे वाईनचा ग्लास... दोघेही शांतच होते. पण मनात वेगळंच काही घरंगळत होतं दोघांच्याही.

" गौरवी तो रात्रीचा incident आणि आज कृणाल ज्या माणसाबद्दल बोलत होता त्याबद्दल काय माहिती आहे तुला.." दिग्विजय ने विचारलं.

" काहीच नाही. पहिल्यांदाच पाहिलं त्याला अचानक तिथे. पण तो मला शोधायचा प्रयत्न करतोय त्यावरून भविष्यात आणखी बरीच माहिती समजेल असं वाटतंय.. because he's another kind of person. या शुष्क माणूसकीच्या जगात एखादा मायाळू माणूस कसा काय असू शकतो... I can't believe" गौरवी विचारांती म्हणाली.

" असतात काही, ज्यांना या विखारी जगाचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. स्वभावाला औषध नाही. आणि माणूसकी वरून आठवलं, त्यादिवशी मी जयपूरला निघालो होतो तेव्हा एअरपोर्टवर मलाही एक मुलगी भेटली माणूसकी नावाचा धडा शिकविण्यासाठी... Huhhh but it's none of our business. " दिग्विजय म्हणाला तसं गौरवीने वळून त्याच्याकडे बघितलं. तिला काय म्हणायचंय त्याला समजलं आणि त्याने त्यादिवशी एअरपोर्टवर घडलेला वृत्तांत तिला ऐकवला.

" ओहहह. पण दिग्विजय दीक्षित आंटींनी नक्कीच तिला काहीतरी हिंट दिलीच असणार तुला ओळखण्याची. मग जसा तो मला शोधतोय तसं तीही एक दिवस तुला शोधून काढेल असं नाही वाटत का ?" गौरवी जराशा मिश्किल टोनमध्ये म्हणाली. तसा तो गुढ हसला.

" तितकी महत्त्वाकांक्षा नाही दिसली तिच्यात... So I am sure तिने प्रयत्न जरी केला तरी ती नाही शोधू शकणार मला... " दिग्विजय वाईनचा सिप घेत म्हणाला. पण त्याला कुठे माहित होतं की नियतीच्या मनात काय आहे ते....

" आणि त्यांनी आपल्याला शोधू नये हेच त्यांच्यासाठी बेटर असेल. या जगातलं एखादं दुसरं आयुष्य ह्या विखारी जीवनाच्या सान्निध्यात येण्यापेक्षा आनंदात राहूदे. " गौरवी त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणाली. आणि त्यांना पून्हा त्यांच्या खर्या आयुष्याची प्रचिती आली. सर्वच बाबतीत अजिंक्य होते ते दोघे, पण नियतीने जन्मतः दिलेली ठेच जी कधीच पुसली जाणार नव्हती. कर्तबगारी, हुशारी ते ज्याला जन्मदात्यांनी नाकारलं त्यांना कसला आलाय शौर्याचा अभिमान किंवा कसला अस्तित्वाचा हक्क... एवढंच त्यांना ठाऊक होतं.


" बाय द वे गौरवी, शशांकचं मुंबईत येणं खूप महत्वाचं आहे. त्याला प्रमोशनचं लेटर मिळेलच दोन दिवसांत... I am really proud of him. He deserves to lead Mumbai police department. " दिग्विजय अभिमानाने म्हणाला. गौरवीनेही अनुमोदन दिलं त्याला... शशांक मनोहर म्हणजेच एक धडाडीचा पोलिस अधिकारी. जो सध्या नागपुरात त्याची ड्यूटी सांभाळत होता. आणि महामुनीसारख्या स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्याला नेस्तनाबूत करण्यासाठी गौरवीसोबत महत्वाची भूमिका बजावणारा शशांक त्यांना वर्षभरापूर्वी एका केसदरम्यान भेटलेला. विचारसरणी लगेच जुळून आल्यामुळे तो त्यांच्यासोबत न राहून त्यांच्यातलाच व्हायला वेळ लागला नव्हता. शशांकचा कणखर बाणा, गौरवीची शत्रूच्या अंगणात घुसून त्याला पराजित करण्याची खिलाडूवृत्ती, कृणालचे वैचारिक फासे आणि या सगळ्यामागे असायची ती दिग्विजयची अचूक strategy...

तेवढ्यात दिग्विजय चा फोन वाजला. टेबलवर ठेवलेल्या मोबाईल मध्ये नीलचं नाव बघताच त्याने फोन कानाला न लावता स्पीकरवर टाकला.

" बोल नील..." दिग्विजय म्हणाला.

" दिग्विजय दादा, उद्या एका न्यूज चॅनल वर तुमचा लाईव्ह इंटरव्ह्यू आहे दुपारी बारा वाजता. " नील जरासं दबकत म्हणाला.

" यासाठी फोन नाही केलाय तू, come on the point. " त्याच्या आवाजावरून दिग्विजय ने ओळखलेलं तो नक्कीच काहीतरी महत्त्वाचं सांगायचं ट्राय करतोय पण कसं आणि कोणत्या शब्दांत सांगावं त्याला कळत नव्हतं ते ओळखून दिग्विजय बोलला. गौरवी हे सगळं ऐकत होती.

" ते मला काही वेळापूर्वी आलिशा मॅडमचा फोन आलेला तुम्ही फोन रिसिव्ह करत नाही त्यामुळे मला कॉल केलेला त्यांनी... आपण त्यांच्या न्यूज चॅनलवर इंटरव्ह्यू द्यायला नकार दिला त्यामुळे त्या रागात होत्या. मग मग म्हणून____" नीलला पुढे काय बोलावं सुचत नव्हतं. त्यामुळे तो एकदमच शांत झाला.

" Hmm I know. Don't worry champ. उद्या ठरलेल्या वेळी ठरलेल्या न्यूज चॅनल वरच मुलाखत होईल. बाकी गोष्टींकडे लक्ष नको देऊ कोण काय म्हणेल ते... उशिर झालाय बराच. Sleep well. " एवढं बोलून दिग्विजयने फोन ठेवला. आणि एक हताश सुस्कारा सोडला.

" दिग्विजय अजून किती दिवस टाळणार आहोत आपण तिला. यामुळे ती अजूनच खोलात जाईल. चुकतेय आलिशा आणि आपण समजावूही शकत नाही तिला... पण जेव्हा तिला तिची चुक कळेल ना तेव्हा आपल्यालाच सावरावं लागणारे तिला. " गौरवी एकटक समोर बघत म्हणाली.

" हम्म. मीही त्याच दिवसाची वाट बघतोय. कारण आता ती समजावण्यापलीकडे निघून गेलीय फारच. होप सो तिला एक ना एक दिवस हे उमगेल. " दिग्विजय निर्विकारपणे म्हणाला. आणि थोडा वेळ तिथेच थांबून पहाट होत आल्यावर तो तिथून पक्ष कार्यालयात गेला. आणि गौरवी तिचं काम करत बसली. सारं जग निद्रेत असताना त्या दोघांचा अथक प्रवाह मात्र यावेळी जास्त कार्यारूढ असायचा. झोपण्यासाठी चैन नव्हताच त्यांना. तसंही मनात एवढं साठलेलं वादळ त्यांना समाधानाने झोप येण्यास अनुकूलही नव्हतं.