प्रेम! एका अनामिक वळणावरचं. पर्व २. भाग-2

एक राजकारणी आणि एका ध्येयवेड्या मुलीची ही अजब प्रेमकहाणी.
भाग-२



रात्री एक वाजता पूर्णा आपल्या बहिणीसह घरी आली. त्यांना यायला बराच उशीर झाल्यामुळे घरचे सगळे काळजीने चुर झालेले...

" आलात बाईसाहेब या, लै मोठा पराक्रम करून आलात ना गोव्याला जाऊन तीर मारून आलात. इकडे आम्ही बसलोय उठता बसता तुमची काळजी करत. एकतर तू आहेच आधीपासून हाफमॅड.. त्यात सवय नसताना घरच्यांना सोडून मैत्रिणींबरोबर गेलेली. " ती घरी येताच तिच्या आजीची नेहमीची बडबड सुरु झाली.

" अगं आजी आता आलीय ना घरी सुखरूप. मग तिला बसू तर दे आधी..." पूजा आजीला समजावत म्हणाली.

" तिच्याजागी तू असतीस तर आम्ही निर्धास्त राहिलो असतो ग, पण ही म्हणजे ना बापरे जाऊदे आता तोंड धूवून जेवा दोघी जणी आणि झोपा." अखेर आजीने नमतं घेतलं. तसं तिला हुश्श झालं.

" पूर्णा अगं एक मिनिट, हे हाताला काय लागलंय तुझ्या??" पूर्णा आतमध्ये जाताना ते बॅन्डेज लावलेलं बघून तिची आई काळजीने म्हणाली. तसं सगळे परत जागीच थांबले आणि तिला विचारायला लागले.

देवा आता काय थाप मारू इथून कलटी मारण्यासाठी तूच सांग रे बा... तिने मनोमन देवाला विनवलं.

" काही नाही आई, ते एका मुलीला धडकले ना मग तिचं ब्रेसलेट खरचटलं. आणि ती डॉक्टर होती त्यामुळे तिच्याकडे असलेल्या first aid box मधून तिने बॅन्डेज पण करून दिलं. " मनात येईल ते ती बोलून गेली. आणि आता आजीची परत उलटतपासणी होईल या वैतागाने कुणी काही बोलणार इतक्यात आत पळून गेली.

" बघितलंस किशोर, ही पोरगी थापा मारण्यात किती पटाईत आहे ते " आजी पूर्णाच्या बाबांना म्हणाली. तर ते गालातल्या गालात हसत होते.

" लागलं असेल ना खरंच. यात का थाप मारेल ती, कुणाशी मारामारी तर नसेल केली तिने. त्यामुळे आता जास्त विचार करू नको आणि झोप उशिर झालाय बराच. " पूजा आजीला बोलली आणि सगळे झोपायला निघुन गेले.

त्यानंतर सर्वांना शांत झोप लागली पण पूर्णा मात्र अजून जागीच होती हातावर लावलेल्या त्या बॅन्डेजकडे बघत... कोण असतील बरं ते, जास्त वयाने मोठे तर वाटत नव्हते. तरणेताठे दिसत होते. कोण असेल मग ? एखादा क्रिकेटर किंवा सेलिब्रिटी ? आता विचार करून माझ्या डोक्याचा कुर्मा होईल. त्यापेक्षा झोपते मी.. उद्या सकाळी न्यूजपेपर वाचते नक्की... असं म्हणत ती झोपून गेली.


त्याच रात्री राजस्थान मध्ये मात्र राजकीय भूकंप आलेला... सत्ताधारी पक्षाला धूळ चारत विरोधी पक्षाने बाजी मारलेली.. पण सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच बहुमतातील आमदार फोडून घोडेबाजार रचला गेला होता.

सत्ता मिळवण्यासाठी व आमदारांना विरोधकांच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं. पण तरी एका नेत्याच्या समर्थक आमदारांनी बंड करून विरोधी पक्षाशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले. तेव्हा त्या नेत्याचं बंड शमवण्यासाठी मध्यरात्री तातडीने वरिष्ठांनी बैठक बोलावलेली. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयवंतराव जगतापांसह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्या नेत्याचं बंड शमवून घोडेबाजार टाळण्यासाठी कोण समंजस व्यक्तिमत्व हा तिढा सोडवेल असा यक्षप्रश्न तेथील सर्व नेत्यांसमोर पडलेला. यावर एका नेत्याने मध्येच प्रश्न केला की या महत्त्वाच्या बैठकीला राजस्थान प्रभारी दिग्विजय जगताप का गैरहजर आहेत... सगळ्यांचं लक्ष जयवंतराव काय उत्तर देतात त्याकडे लागलं होतं. पण ते फक्त गुढ हसले. यावर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तेवढ्यात टीव्हीवर " राजस्थान मधील राजकीय तिढा सोडवून घोडेबाजार रोखण्यात सत्ताधारी पक्षाला यश! "

"राजस्थान प्रभारी व पक्षाचे युवा नेते दिग्विजय जगतापांनी बजावली महत्वाची भूमिका"

" सर्व आमदार एकत्र असून त्यांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे."

या आणि यासारख्या अनेक आशयाच्या बातम्या रातोरात प्रसारित होत होत्या. हे सगळं बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. व त्यांनी यासाठी जयवंतरावांची माफी मागितली.

राजकारणी हा एक प्रकारचा योद्धा असतो. थांबून किंवा चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी रणांगणात उतरून ज्या त्या राजकीय आणि जनमताच्या आवेगावरून प्रत्यक्ष कृती करून ठोस भूमिका बजावणारा इथे नेहमीच वरचढ ठरतो. आणि त्या नेत्याचं स्थान नेहमीच जनतेसाठी आदर्श असतं... जयवंतरावांच्या धड्यातील हेच राजकीय मूल्य त्यांचे चिरंजीव दिग्विजय जगतापांनी आज यशस्वीरित्या आजमावून पाहिलेलं. सगळ्यांच्या डोळ्यात आणि वाणीत फक्त दिग्विजय जगताप हेच स्वर उमटत होते.


दूसरीकडे एका आलिशान रिसॉर्टमध्ये पोहोचताच त्याने सर्व सुरक्षिततेची खातरजमा करून त्याच्या रूममध्ये आला. टीव्ही किंवा मोबाईल चालू करून सर्वांकडून होत असलेला त्याचा जयजयकार बघण्यात त्याला काहीच इंटरेस्ट नव्हता. त्याने लगेच एक नंबर डायल केला. पहिल्याच रिंगमध्ये पलीकडून फोन रिसिव्ह झाला. आणि एक करारी रोखठोक आवाज कानावर पडताच तो स्थिरावला. तर ती होती अॅड गौरवी सपकाळ. आणि सौम्या म्हणजे त्या दोघांचं शेंडेफळ.. या तिघांचं एकमेकांशी काय नातं होतं याचा थांगपत्ता आजपर्यंत नियतीलाही संभ्रमात टाकत आलेला... ते एकमेकांसाठी होते ते फक्त सोलमेट. या एका नावात त्यांचं विशाल नातं मावणार नाही इतकं ते गहिरं होतं.

" सौम्या झोपली?" त्याने पलीकडच्या व्यक्तीला विचारलं.

" येस. तू गेलाय याची भणक तिला अजून लागली नाही. आता उद्या ठराविक वेळी फ्री रहा. आणि बोल तिच्याशी.. " ती पलीकडून म्हणाली. आणि दोघेही किंचित हसले.

" हो. आणि राजस्थान नंतर येत्या महिन्याभरात महाराष्ट्रात पण स्वपक्षातल्या नेत्याचा आक्रोश धुमसणार आहे. Get ready for this. अखेर विजय सत्याचाच होईल. " तो विजयी हास्य ठेवत म्हणाला.

" Undoubtedly,.. justice and only justice, shall always be our motto. " गौरवी म्हणाली. आणि त्या दोघांनी मोजकं बोलून फोन ठेवला.

त्यानंतर तो बाल्कनीत जाऊन उभारला. त्या खुल्या आकाशात काळोख सर्वत्र पसरला होता. मध्येच कुठेतरी चांदण्या चमचमत होत्या. पण त्याचं लक्ष फक्त त्या काळोखाकडे... अंधार आणि शांतता अतिप्रिय होत्या त्याला. एक प्रकारे त्याच्या जगण्याच्या अविभाज्य गोष्टीच... जगणं म्हणजे माणूस ओळखणं असं प्रत्येक जण म्हणायचा. पण त्याच्या मते जगणं म्हणजे माणूस साकारणं होय. माणूस, माणूस माणूसकी यावरून आज एअरपोर्ट वर घडलेली घटना त्याला आठवली. त्याने लगेच मोबाईल घेतला आणि आलेले सगळे मेसेज चेक करू लागला. अखेर तो मेसेज त्याला सापडला. ते बघताच हायसं वाटलं त्याला... त्याने लगेच रिप्लाय दिला.  आणि तेवढ्यात पलीकडून त्याच व्यक्तीचा पून्हा मेसेज आला. " Can I call?" आणि तो मेसेज होता डॉ लीना दीक्षित यांचा... त्याच्या ओळखीच्या डॉक्टर पैकी एक असलेल्या आणि त्याचे मानद अंकल डॉ नेनेंच्या त्या बहिण होत्या.  त्याने तो मेसेज वाचताच दुसऱ्या क्षणाला स्वताहून कॉल केला.

" अजून झोपला नाही आहात तुम्ही? It's too let..." तो बोलला.

" नाही. नाईट शिफ्ट वर आहे. बाय द वे पण तुझं आज स्पेशल अभिनंदन!!" त्या म्हणाल्या. त्याला हे आवडणार नाही हे माहित असूनही त्या मुद्दाम म्हणाल्या.

" पोचल्या भावना. आणि मी तुमच्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करतो. तुम्ही वेळेवर आलात सो... आणि होप सो की माझी ओळख अनाकलनीय ठेवली असेल तुम्ही." तो आत्मीयतेने म्हणाला.

" हो हो कळलं. थॅन्क्यु म्हणणार नाहीस तू माहितीय मला.. पण असो तुझ्या वतीने तिने आभार मानलेत माझे तुझ्यासाठी सॉरी पण बोललीय. "

" I don't care about that...  तो किस्सा तिथेच सोडून आलोय मी. ठेवतो मी. " असं बोलून त्याने फोन ठेवला. कारण आता त्या या विषयावर अजून पाणी लावत बसणार हे कदाचित माहित होतं त्याला... तिकडे पलीकडे मात्र डॉ दीक्षित फोन ठेवल्यावर हसत होत्या.

इकडे तो मात्र पून्हा बेफिकीरपणे त्या काळोखाकडे टक लावून बघत बसला. तसे ते शब्द अचानक कानावर येऊन आदळले. माणूसकी नावाची गोष्ट आहे की नाही.... हम्म माणूसकी ? it's none of my business. तो स्वताशीच उद्गारला.


क्रमशः

🎭 Series Post

View all