प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७०

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-७०


नानींनी मितलला सांगून त्या तिघांना स्टेजवर बोलवायला सांगितलं. त्यानुसार मितल जराशी घाबरतच त्या तिघांना बोलवायला गेली. आणि ते नाही म्हणणार असं अपेक्षित असताना ते तिघेही लगेच जायला निघाले.

ते तिघे तिथे आले तसं त्यांना जाणवलं की काही नजरा अनपेक्षितपणे अवाक् होऊन त्यांच्याकडे बघतायत. दिग्विजयने नानीला डोळ्यांनीच विचारलं आता पुढे काय म्हणून...

" हे बघ इथे ये, हे असं आंब्यांच्या पानांवर दोन्ही हातांनी ती ताटातली ओली हळद घ्यायची आणि त्यांच्या गालावर, हातावर, पायावर लावायची. " नानींनी त्याला सांगितलं. तसं तो पुढे सरसावला.

त्या दोघांसमोर पाय गुडघ्यात वाकवून तो खाली बसला आणि नानींनी सांगितलं त्याप्रमाणे त्याने ती हळद घेतली आणि त्याने ती गौरवीला लावणार तोच तो थांबला. त्याच्या मनात अचानक काहीतरी आलं. त्याने काळजीने गौरवीकडे बघितलं. त्याला काय वाटतंय हे एव्हाना गौरवीसह सार्थकलाही कळालं होतं. सार्थकने डोळ्यांनीच त्याला 'डोन्ट वरी सगळं फाईन आहे काही नाही होणार' असं सांगितलं. ते बघून त्याने हलकं स्मित केलं.

" काय अरे इतका कसला विचार करतोयस, आता मुहूर्त काढायचाय का याचा पण वेगळा? " नानींनी त्याला टोकलं.

" बहुतेक नानी तो विचार करत असेल की आधी कुणाला हळद लावायची ते.. कारण तू ते नाही सांगितलं ना त्याला..." सौम्या अंदाज बांधत म्हणाली.

तेवढ्यात तिथे स्टेजवर दादासाहेब आणि वसंतरावांचं आगमन झालं. दादासाहेबांनी आताचे गौरवी, दिग्विजय आणि सार्थकचे एक्सप्रेशन अचूक टिपले होते. हे ऐकून नानी काही बोलणार तितक्यात दादासाहेबांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला.

" त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे. " दादासाहेब तिथे येत म्हणाले. यावर नानींनी त्यांच्याकडे प्रश्नार्थकपणे बघितलं.

" तुला नाही कळणार ते जाऊदे. दिग्विजय तू लाव हळद. " दादासाहेब असं म्हणताच नानींनी नाक मुरडलं. तसं लगेच हशा पिकला.

दिग्विजयने त्या दोघांनाही हळद लावली. पण सगळ्यांचं लक्ष त्याच्या कृतीकडे होतं. त्याच्या चेहऱ्यावरचे हळवे भाव स्पष्ट दिसत असतानाही कुणाचं तिकडे लक्षच नाही गेलं. ते फक्त सार्थक,गौरवी आणि दादासाहेबांनी पाहिलेलं. सार्थकने त्याच्या कानात काहीतरी सांगताच तो मनमोकळं हसलेला आणि तोच क्षण कॅमेरामनने अचूक टिपलेला...

आता कृणाल हळद लावायला पुढे आला.

" आता हळद लावतोय तसं पुढच्या वेळी लावूनही घे बरं का... " नानी बोलल्याच शेवटी. तो फक्त हसला यावर. मितलला तर कुठे तोंड लपवू कळत नव्हतं.

" अगं नानी एवढं सोपं नाही ते, अजून पुढची बरीच लढाई लढायचीय त्याला. " सौम्या पण बोलली. तसं कृणालने मान उचलून तिच्याकडे बघितलं.

" का आता कुठे घोडं अडलंय. " नानी न समजून म्हणाल्या.

" सौम्याला सगळ्यांच्याच लग्नाची खूप ओढ लागलेली दिसतेय. यातून एक वेगळा निष्कर्षही निघतो. ते म्हणजे एकेक करून सगळ्यांचं झालं की मग आम्ही मोकळे... " कृणालने शशांक आणि सौम्याकडे आळीपाळीने बघत टोमणा मारला.

त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष इतका वेळ तिथे शांत उभारलेल्या शशांककडे गेलं.

" काय यार हा मला खपवायला बसलाय का ? झालं आता घसरणार सगळे माझ्यावर. त्यात ते हळद..कृणाल तुला तर बघून घेईन मी " त्याने कृणालला खुन्नस देत दिग्विजय च्या कानात पुटपुटला.

" तो तर कोर्टात जजेसना पण टोमणा मारायचा चान्स सोडत नाही. आणि तुला सुट्टी देतोय होय तो " दिग्विजय उवाच.

"  शशांक तू कधी आलास इथे, आणि एवढा शांत कसा काय. मघाशी तर फार हास्यवायू झालेला ना तुम्हाला तिथे बसून ?" नानींनी शशांकचं नाव घेऊन त्या तिघांनाही टोमणा लगावला.

" शादी के लड्डू खाये तो भी पछताये और ना खाये तो भी पछताये. यहा शादी एक हो रही है और होनेवाली शादीयां दो मिल जुल रही है..." आलिशाने मध्ये बोलत मसालेदार कमेंट टाकली. यावर सगळेच हसले.

" लग्न म्हटलं की असंच असतं. नवरा नवरी पेक्षा करवल्यांचीच जास्त मजा असते. " वसंतराव म्हणाले. दादासाहेबांनीही त्यांना दुजोरा दिला.

" मजा? सिरियसली मोठे बाबा ? " शशांक आश्चर्याने म्हणाला.

" यात एवढं आश्र्चर्यचकित होण्यासारखं काय आहे शशी... ही जी तुमची खेचाखेची चालूय ती मजाच तर आहे. " वसंतराव हसत म्हणाले.

" हो पण हीच तर खर्या अर्थाने सजा ठरतेय आमच्या तल्लफ प्रेमींवर... पेशन्स की भी कोई हद होती है ना दिग्विजय बाबू. " कृणालने आता शशांक आणि दिग्विजयलाही खेचलं. मघाशीचे त्यांचे सगळे टोमणे तो रिटर्न पास करत होता. अॅडव्होकेट बाबू रॉक्स.

" घे आता तुझी पण सुट्टी रद्द केली वकिल बाबूने... " शशांक दिग्विजयच्या कानात खुसपुसला.

" दिग्विजय तर अजून किती दिवस नॉट आऊट राहणारे, तो पण क्लीन बोल्ड होईलच एक ना एक दिवस. पण फक्त त्यात तिसऱ्या पंचांचा निर्णय निर्णायक ठरेल. " डॉ नेने आता तिथे येत म्हणाले तसं सगळेच बुचकळ्यात पडले.

" काय रे संदीप, हे काय आता नवीन तिसरा पंच वगैरे ?" नानींनी विचारलं.

" ते अजून अनधिकृत आहे म्हणून निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय असं म्हणायचं असेल नेने अंकलना..." कृणाल उवाच. यावर डॉ नेनेंनीही हसून दुजोरा दिला.

" अबे सांस तो लेने दे, लगातार बुलेट चला रहा है साला" ले शशांक अॅन्ड दिग्विजय इन देअर माईन्ड...

" विषय तुझा आहे आणि खपवतोय दुसऱ्याच्या नावावर...  सो कॉल्ड अनधिकृत काय नि तिसरा पंच काय ? it's none of my business" दिग्विजयने हात वर केले.

"राईट दिग्विजय. याचं आधीच घोंगडं भिजत पडलंय ते निस्तरायचं होत नाही याला आणि हा चाललाय आमचे निर्णय द्यायला .." शशांक बॅक...

" उलटा चोर कोतवाल को डांटे." कृणालने बारीक नजरेने बघितलं त्यांच्याकडे.

" चल पळ, चोर तो चोर वरून शिरजोर. आम्ही दोघे अजून नॉट आऊट आहोत. तूच रन आऊट झालाय. आणि आता निर्णय दोन्ही घरच्यांकडून राखून ठेवलाय. Decision pending बरोबर ना कृणाल? आणि तिसरा नि___" शशांक पुढे बोलतच होता की कृणालने त्याच्या तोंडावर हात ठेवला.
सगळे जण हसत त्यांची मस्ती एंन्जॉय करत होते.

" झालं तुमचं, तर मला एक सांगा हा तिसरा पंच नेमकं आहे कोण ?" नानींचा भाबडा प्रश्न.

" मी आहे, आता यावर अजून काही बोलायचंय?" दादासाहेब म्हणाले. नानींनी खुन्नस दिली त्यांना..

" अरे पोरांनो हळदीची मजा काही वेगळीच असते. पण इथे तुम्ही तर फक्त तोंडाचेच फटाके फोडताय. आम्ही तर हळदीची होळी खेळायचो. हो की नाही जयवंत..." वसंतराव म्हणाले. दादासाहेबांनीही त्यांना अनुमोदन दिलं यावर.

" हो ना. पण मला असं वाटतंय सगळी अरसिक पोरं आपल्याच कुटूंबात जन्माला आलीत की काय... एक धड नीट नाही. नुसते च्याव च्याव करण्यात पटाईत. " नानी म्हणाल्या.

" नाही हं नानी, फक्त पोरंच आहेत अरसिक पोरी तर नाहीत ना. आलिशा बरोबर ना ?" सौम्या बोलली. तसं आलिशाला काहीतरी सुचलं आणि तिने मघाशी लपवून ठेवलेली हळदीची वाटी सार्थक गौरवीच्या पाटामधून बाहेर काढली. ते मितलनेही बघितलं. दिग्विजयच्या नजरेतून हे मघाशीही सुटलं नव्हतं आणि आताही...

" मितल तुझी हळद लावायची राहिलीय ना, चल लावून घे. " सौम्याने मितलला काहीतरी सांगून समोर पाठवलं.

मितलने त्या दोघांना हळद लावली. आणि उठताना ती कृणालच्या बाजूला जाऊन उभारली.

" चला आता सार्थक गौरवी, सगळ्यांची हळद लावून झालीय तुम्ही एकमेकांना लावा. " माधवी म्हणाली.

" नाही अगं आई, शशी राहिलाय. शशी ये ना अरे फक्त लावायची आहे हळद. " सार्थक म्हणाला. तसं शशांक जरासं सावधगिरीने आला आणि त्याने हळद लावली. पण सौम्याला काहीतरी वेगळंच वाटलं यावरून की शशांक हळदीला घाबरत असेल किंवा त्याला आवडत नसेल.

दुसरीकडे आलिशा मितलला खुणावत होती की हळदीने भरलेला तिचा हात कृणालच्या चेहऱ्यावरून फिरव म्हणून. पण आमची लाजाळू मितल, आधीच सगळ्यांनी तिला एवढं चिडवलेलं त्यामुळे ती दबकत होती. हे कृणालने नोटिस केलेलं. आणि मग कृणालनेच तिचे हळदीने भरलेले हात हातात घेऊन त्याच्या गालावरून फिरवले. तेव्हा सगळ्यांचं एकसाथ लक्ष तिकडे गेलं. आणि सगळ्यांनी एकच गोंधळ केला. कृणालने तिच्या तळहातावरची हळद त्याच्या हातावर घेतली आणि तिचेही गाल पिवळे केले. आलिशाने शिट्टी वाजवली. भावी जोडपं म्हणून ज्येष्ठ मंडळींनीही दाद दिली.

शशांकही नुकतंच त्या दोघांना हळद लावून उठलेला तोच बेसावध असलेल्या शशांकला मागून येऊन सौम्याने हळद फासली. त्याला बिचार्याला आधी कळलंच नाही नेमकं काय झालं ते. आणि जेव्हा कळलं तेव्हा त्याचा पूर्ण चेहरा हळदीने माखलेला. त्याने सौम्याकडे वळून बघेपर्यंत तिने दिग्विजयकडे मोर्चा वळवलेला. दिग्विजय ने तिचे हात वरचेवर पकडलेले, तेवढ्यात शशांकने मागून येऊन तिला त्याच्याकडे वळवलं. आणि हळदीचा हात तिच्या कपाळापासून ते पूर्ण चेहऱ्यावरून फिरवला. सौम्या मात्र शॉक लागल्याप्रमाणे एका जागीच उभारलेली स्टेच्यूसारखी...

" अय कार्टून, मागून येण्यापेक्षा समोरून येऊन लावली असतीस तर at least तुझं नाक तरी वाचलं असतं पिवळं होण्यावाचून... Not my fault.." शशांक हळूच म्हणाला. आणि निघून गेला. तरी ती मात्र जागीच उभी होती. दिग्विजयने येऊन तिचा चेहरा हलकेच रूमालाने पुसला आणि तिला भानावर आणलं.

" काय म्हणालास समोरून येऊन लावायचं होतं, थांब आता बघच तू..." असं म्हणत सौम्या त्याच्यामागे धावली.  शशांक पुढे पळत हसत होता.

सगळे जण हसत ते सगळं बघत होते. तेवढ्यात माधवीने मनोहररावांना जरा ऐकता का म्हणत बोलवलं आणि हळद लावली. आता दादासाहेब नानींकडे बघत होते, आता ही हळद लावण्यासाठी कोणती नवीन युक्ती वापरते ते...

" मला काही असलं आवडत नाही. पण हीच एक संधी असते नवर्यावर कुरघोडी करायची. म्हणून मी पण संधीचं सोनं करून घेते. " असं म्हणत नानींनी दादासाहेबांसमोर जात त्यांच्या पांढर्या सदऱ्यावर हळदीचे दोन्ही हात टेकवले. व गालावरून हलकेच दोन बोटं फिरवली. दादासाहेबांनीही नानींच्या हातातली हळद घेऊन एक हात त्यांच्या गालावरून फिरवला.

त्यानंतर सगळेच एकमेकांना हळद लावण्यात गुंतलेले असताना दिग्विजय मात्र हसत त्यांच्याकडे बघून एंन्जॉय करत होता. आता सगळ्यांचेच चेहरे हळदीने माखलेले होते. आणि दिग्विजय एकटाच काय तो अपवाद होता. कृणाल आणि शशांक त्याला हळद लावण्यासाठी आलेले मात्र त्याने त्यांना रोखलेलं. शेवटी सार्थकने त्याला आपल्याकडे बोलावून घेतलं.

" दिग्विजय असं समज ती स्वता तुला हळद लावतेय. " असं म्हणत सार्थकने त्याच्या गालावरून हलकेच दोन बोटे फिरवली. त्याने स्मित केलं. त्यानंतर सगळ्यांनीच दिग्विजय वर आक्रमण केलं. त्या हळदीमधून त्याला चंदनाचा गंध येत होता. कारण हळदी मध्ये नानींनी मालविकाचा तसंच गौरवी दिग्विजय ला आवडणारा चंदनाचा अत्तर मिसळलेला. मघाशी त्या दोघांना हळद लावताना हे इतकं जाणवलं नव्हतं त्याला. पण आता ती हळद चेहऱ्यावर असल्यामुळे तो सुगंध स्पष्टपणे फील होत होता. जणू त्यांची माई म्हणजेच मालविका सपकाळच त्यांच्या गालावरून हात फिरवतेय असं वाटत होतं त्याला... आणि सगळ्यात शेवटी सार्थक गौरवीनेही एकमेकांना हळद लावली. सगळेच खुश होते.

आणि अशा प्रकारे सार्थक गौरवीचा हळदी समारंभ मोठ्या हर्षोल्हासात पार पडला.

आता आतुरता लग्नाची...

क्रमशः

काय मग कसा वाटला हळदी समारंभ, तुम्ही पण एंन्जॉय केलं ना... ?
©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all