प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७२

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७२


मागील भाग

थोड्याच वेळात ते तिघेही तयार होऊन सार्थकसह खाली आले. पण तिथे इतर मुली दिसतच नव्हत्या. हे त्यांनी नोट केलेलं. तेवढ्यात मागून मितल आली.

" सर तुम्हाला व्यवस्थित जमलं ना. आणि सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही तुम्हाला मदत करायचं ते...शीट" मितल कृणालजवळ येत म्हणाली. पण त्याचं लक्ष कुठे होतं तिच्या बोलण्याकडे... तो तर तिला पाहताच क्लीन बोल्ड झालेला.

लिंबू कलरची नऊवारी काष्ठा, साडीला हिरव्या रंगाचा काठ, त्यावर कानात आणि गळ्यात मोत्यांचे दागिने तिच्या मोत्यासारख्या कांतीवर उठून दिसत होते. 


आता पुढे...


कृणाल एकटक तिला न्याहाळत होता. आजूबाजूच्या जगाचा जणू विसरच पडलेला त्याला... सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या. पण मितलला मात्र ऑकवर्ड वाटत होतं हे सगळं... पटकन तिथून पळून जावंसं वाटलं पण कृणालचं बोलणं ऐकल्याशिवाय तिचाही पाय निघत नव्हता तिथून. तिने एकवार त्याच्याकडे बघितलं. आकाशी रंगाचा सदरा आणि खाली धोतर, दरवेळी जेलने स्पाईस स्टाईलने सेट केलेले केस आज जरा पसरट विंचरलेले, ट्रीम केलेली बिअर्ड, गोल चेहरा आणि बारीक डोळे जे तो हसत नसला तरी हसल्यासारखेच दाखवायचे. ती त्याच्या डोळ्यात हरवली.

" अहं... ऑर्डर ऑर्डर. तुम्हाला ही जी eye competition खेळायचीय ना ती तिकडे बाजूला जिथे कुणी नसेल तिथे..." शशांक घसा खाकरत म्हणाला. तसं ते दोघेही दचकून भानावर आले.

" अम्म. सॉरी. तर मी काय म्हणत होतो ? मितल तू कशासाठी आलीस इथे..." कृणाल अडखळत बोलला. तसं एकच हशा पिकला. मितल तर काही नाही अशा अर्थी मान हलवत तिथून दुसरीकडे गेली.

" Krunal you are not in the court. Look at surrounding..." दिग्विजय त्याला आठवण करून देत म्हणाला.

" हो ते कळलं शशांकने ऑर्डर ऑर्डर अशी acting केल्यावर... Thanks for this " कृणाल उवाच.

" आम्ही त्यासाठीच आहोत, तुला दरवेळी आठवण करून द्यायला की बाबा हे तुझं लग्न नाहीये " शशांक हसत म्हणाला. तसं दिग्विजय पण हसला.

" पुरे पुरे... तुमची पण वेळ येईलच तोपर्यंत वाट पहा. " कृणाल त्यांच्यावर कटाक्ष टाकत म्हणाला.

" दरवेळी काय हा एक ते एकच डायलॉग फेकतोस ? कुठे आहे ती वेळ नि कधी येणार हे आमच्याशिवाय इतर कुणी ठरवू शकत नाही. आणि तसंही ते घोंगडं तुमचं दोघांचं भिजत पडलंय, फिरून फिरून माझ्यावर का घसरताय " दिग्विजय म्हणाला तसं त्या दोघांनीही खुन्नस देत त्याच्याकडे बघितलं. ती वेळ येऊदे फक्त मग तुला सुट्टी नाही, अशा आविर्भावात त्या दोघांनी त्याला चॅलेंज दिलं. अर्थातच दिग्विजयनेही ते बरोबर ओळखलं. पण नेहमीप्रमाणे who cares असे भाव होते त्याच्या चेहऱ्यावर...

तेवढ्यात तिथे मुलींची रूबाबात एंन्ट्री झाली. सौम्या,आलिशा, मितल नऊवारी साडीवर फेटा आणि गॉगल लावत तिथे आल्या. त्यांच्या हातात प्रतिकात्मक तलवारीही होत्या. ते बघून हे दोघे जागेवरच स्तब्ध झाले.
सौम्याने लाल रंगाची काष्ठा नेसलेली आणि त्यावर हिरवा काठ होता. तर आलिशाने जांभळ्या रंगाची काष्ठा घातलेली... त्यावर पारंपरिक दागिनेही होते. त्या तिघी एकसाथ पोज देऊन फोटो काढत होत्या.

" अरेरे,भाई कुठेय त्याला घेऊन चला बॉईज... आज हम भी पीछे नहीं हटेंगे. " शशांकने फर्मान सोडलं. आणि तोच मागून करण सार्थकसोबत येत होता. तसे तेही त्याच्यासोबत गेले.

सार्थक अगदी राजबिंडा दिसत होता. त्याला घोड्यावर चढताना दिग्विजयने त्याच्या बलदंड खांद्यावर घेऊन त्याला अलगद वर बसण्यास मदत केली. सार्थकने त्याआधी दिग्विजयला कडकडून मिठी मारलेली. आणि करणने जोरात शिट्टी वाजवली तेव्हा एकच कल्ला झाला. आणि सुरू झाला डीजेचा आवाज. त्यावर सगळेच थिरकले. गाणी सुरु होताच तिकडून मुलीही आल्या.

मेरे यार की शादी है..... या गाण्यावर करणने तर सुरूवातीलाच माहोल तयार केला. त्याला साथ द्यायला कृणालही सरसावला. दोघे भन्नाट डान्स करत होते. त्यानंतर जब वी मेटमधलं नगाडा नगाडा  गाणं सुरू झालं तेव्हा सौम्या आलिशाही पुढे सरसावल्या. त्यांनी मितलला बळेच ओढलं आणि नाचताना कृणालच्या दिशेने हळूच ढकललं. बिचारी मितल त्यांच्या मध्ये अडकलेली. ती फक्त टाळ्या वाजवत चीअर अप करत होती. तोच कृणालने तिचा हात धरत तिला सोप्या वाटतील अशा स्टेप्स मध्ये दोघे नाचायला लागले. एकामागून एक गाणे चालू होते. करणने शशांक आणि दिग्विजयलाही मध्ये ओढलं. सगळेच जोशात आले होते आता...

मैने मारी एंन्ट्रीया जो दिल में बजी घंटियां.... हे गाणं लागताच सौम्या आलिशासह मुलींनी चांगलीच आघाडी घेतली. तरी त्यातही करण, शशांक आणि कृणाल हटले नाहीत. बेभान होऊन नाचत होते सगळे. तोच दिग्विजय मात्र फोन आल्याचा बहाणा करत तिथून सटकला आणि बाजूला जाऊन उभारला. एकावर एक गाणे लागत होते. आणि यांचा उत्साह अजून वाढतच चाललेला... करणने तर हाईटच केली. लोळून लोळून नाचत होता तो, ते बघून कृणालही त्याला साथ देत होता. शशांक मात्र विचित्रपणे बघत होता त्यांच्याकडे... कदाचित हा असा डान्स पहिल्यांदाच बघत होता तो.

" हा कसला डान्स. असं का नाचताय वेड्यासारखे..." शशांकने करणला विचारलंच.

" नागीण डान्स म्हणतात भावा याला... ये तू पण कर मजा येतेय. " करण कपाळावरचा घाम टिपत बोलला. ते ऐकून शशांकही हसत हसत त्यांच्यासोबत नाचायला लागला.

कसं वाटेल हे किंवा छान नाही वाटणार, मला नाही करायचे असे येडे चाळे.... हे आणि यासारखे अनेक विचार मनातच दाबत शशांकही थिरकत होता. अधूनमधून त्याची सौम्याशी हलकी झटापट होत होती. पण या सगळ्याकडे दूर्लक्ष करत मनसोक्त नाचत होते सगळे... सार्थकला मात्र हे बघून कोणे आनंद होत होता. तो ओरडत टाळ्या शिट्या वाजवत होता. तोच करणचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याने सार्थकला चक्क खांद्यावर उचलून घेत नाचायला लागला. त्यानंतर सगळे नाचत थिरकत लॉनमधल्या मांडवाजवळ आले. आणि आता डॉ नेनेंसह मनोहरराव माधवी, नानी, दादासाहेब आणि वसंतरावही त्यांच्यात सामील झाले.  थोडा वेळ झाला. आता सार्थकला खाली उतरायचं होतं. कारण करण बराच वेळ नाचत होता त्यामुळे त्याला त्याची काळजी वाटत होती. अखेर सार्थकच्या म्हणण्यानुसार करणने त्याला खाली उतरवलं. आणि आता सार्थकही जरावेळ नाचून दिग्विजय शेजारी येऊन उभारला.

" अरे दिग्विजय तू का असा लांब उभा, तू पण नाच ना. आयुष्यात केव्हातरीच मिळते ही संधी..." सार्थक त्याला म्हणाला.

" हम्म. सुरूवातीला घेतला हा आनंद मी... आणि आता यांना असं नाचताना बघायचा आनंद घेतोय. " दिग्विजय हसत म्हणाला. तसं सार्थकही हसला.

तेवढ्यात दिग्विजयचा फोन वाजला. त्याने रिसिव्ह करून काही सुचना दिल्या आणि फोन ठेवला. कदाचित तो इथल्या सिक्यूरिटी बाबत अधिक सजग होता हे सार्थकने ओळखलं. आणि त्याचं लक्ष सहज दिग्विजयच्या मोबाईलकडे गेलं. त्याच्या वॉलपेपरवर कालचा हळदीतला तो दिग्विजयच्या कानात काहीतरी सांगितल्यानंतर ते दोघे हसत असतानाचा तोच फोटो होता. दिग्विजयला कळलं सार्थक कुठे बघतोय ते. आणि त्यानंतर त्यांची नजरानजर झाली. दिग्विजयचे मूक डोळे त्याला बरंच काही सांगत होते. कदाचित गौरवीने आजवर अनेक भाव लपवलेही असतील पण तेच भाव दिग्विजयच्या डोळ्यात स्पष्टपणे परावर्तित व्हायचे. आणि दिग्विजयनेही गौरवीच्या आधीच सार्थकला मनोमन स्वीकारलं होतं. त्यामुळे त्या दोघांचा जो बॉन्ड होता तो अनोखा होता. आणि त्या दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. ते शशांकने बघितलं. आणि तो नाचता नाचता बोलला,

" इकडे आपण नाचण्यात दंग आहोत आणि तिकडे जीजा आणि सालेसाहेबांचं प्रेम ऊतू जातंय... " शशांक म्हणाला तसं सगळ्यांनी तिकडे बघितलं. आणि आता त्यांनी तिकडे मोर्चा वळवला.

" ओये होये, हम भी तो है यहा पे लेकिन सालें की तो बात ही अलग है...." आलिशा ओरडली. तसं त्या दोघांनी बाजूला होत त्यांच्याकडे बघितलं.

" मग साली साहिबा आपकी भी कोई ख्वाहिश हो तो बताईयेगा..." सार्थक तिला म्हणाला. तसं ती पळत पुढे आली.

" तिची ख्वाहिश एवढीच असणार की तिच्यासाठी एखादा असाच पार्टनर मिळो बरोबर ना " सौम्या म्हणाली.

" ओय चुप कर. यही मौका है बहन अपने जीजा को लूटने का " आलिशा हसत म्हणाली.

" हा हा. सार्थक आमची नेक दे मगच आम्ही तुला आत मांडवात जाऊ देऊ. " सौम्या ठुमक्यात म्हणाली. मितलनेही तिला दुजोरा दिला.

" नेक ती काय तुमची नेक तुमच्याजवळच तर आहे. " कृणाल नेक म्हणजे मानेकडे इशारा करत त्यांना चिडवत म्हणाला. यावर मुलींनी अजूनच गोंधळ केला.

" अरे शांत व्हा बाबांनो. मी तुम्हाला माझं क्रेडिट कार्डच देतो. मग तर झालं. " सार्थक म्हणाला. आणि त्याने लगेच खिशातून काढून त्यांना ते दिलंही. ते बघून सगळेच खुश झाले.

" काय यार भाई इतक्या सहज क्रेडिट कार्ड काढून त्यांच्या हातावर ठेवलं तू... " शशांक पुटपुटला.

" हो ना. अरे सार्थक नवरदेव आहेस तू... थोडा भाव खायचा असतो. अडून बसायचं असतं. निदान इथे तरी तुझा सो कॉल्ड संत बिहेवेअर बाजूला ठेवायचा होता." करण म्हणाला. ते बघून दिग्विजयने यांचं काही होऊ शकत नाही अशा अर्थी मान हलवली

पण सार्थकला याबाबत तसूभरही फरक पडला नव्हता. कारण त्याला माहित होतं मुली प्रत्येक वेळी नेक घ्यायच्या बहाण्याने त्यांची अडवणूक करणार... आणि त्याला यात कसलाही व्यत्यय नको होता. त्यामुळे त्याने आताच डायरेक्ट क्रेडिट कार्ड देऊन आपली वाट क्लिअर केली होती. आता तो गौरवीला पाहण्यासाठी आतूर झालेला... त्याचे डोळे आणि विचार सगळंच त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या या नवीन प्रारंभासाठी उत्सुक झालेलं.


क्रमशः

Sorry guys, मी खूप लवकर भाग संपवतेय. कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप विचार करून लिहितेय. खरं तर हा लग्नाचा एकच एपिसोड लिहायचा होता पण ते खूप घाईत संपवतेय असं वाटलं असतं.

आता पुढच्या भागात सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो बहुप्रतिक्षित लग्न सोहळा पुढील भागात तुमच्या आमच्या साक्षीने पार पडेल. तर सर्वांनी आपल्या लाडक्या जोडप्याला शुभाशिर्वाद द्यायला विसरू नका. तुमची यावरील प्रतिक्रिया पण महत्वाची आहे बरं का...

©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all