प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७९

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-७९


दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच जण जरा आरामात उठलेले. पंधरा दिवस लग्नाची धावपळ करून बरेच थकले असल्यामुळे आज जरा निवांत वातावरण चालू होतं. सकाळचे नऊ वाजून गेलेले... नानी, माधवी , मनोहरराव, दादासाहेब आणि वसंतराव आपापलं आवरून चहा साठी डायनिंग टेबलवर बसलेले..

" भाऊजी अजून जरा वेळ आराम करायचा होता ना. " नानी वसंतरावांना म्हणाल्या.

" आराम हराम आहे बघा आपल्यासाठी... कितीही ठरवलं तरी असं जास्त वेळ झोपून राहुच वाटत नाही. आळस येतो. मग बरंय आपलं हेच सकाळी उठून फक्कड चहा घेतला की तरतरी येईल. " वसंतराव म्हणाले. त्यांना दादासाहेब आणि मनोहररावांनीही दुजोरा दिला.

" खरंय बघा. आता चहा घेऊन बागेत मस्त फेरफटका मारेन मी. तुम्हीही महिला मंडळ जास्त लोड घेऊ नका. पूजा संध्याकाळी आहे मग दुपारपर्यंत निवांत रहा. किंवा बैठे काही काम असतील ती करा. " मनोहरराव म्हणाले.

" हो हो. तसंही आपली हुज्जत घालणारी मंडळी अजून उठली नाहीत. आणि आपले नवदांपत्य पण..." माधवी म्हणाली.

" अरे हो खरंच की... कांता अगं गौरवीला बोलवतेस का जरा... " नानी कांता मावशींना आवाज देत म्हणाल्या.

" अहो वहिनी असूदे आरामात येऊदे त्यांना... परत आहेच की सगळं... " वसंतराव नानींना म्हणाले. तेवढ्यात आतून कांता मावशी आल्या.

" गौरवी ताई सकाळीच उठल्यात त्यांच्या नेहमीच्या वेळेला. आणि दिग्विजय दादा पण... सकाळी मी आवरून आले तेव्हा ते दोघे इथे कॉफी पित बसलेले. आता स्टडी रूममध्ये आहेत ते. " कांता मावशींनी सांगितलं. तसं दादासाहेब सोडून सगळे आश्चर्यचकित झाले.


" हे दोघे तर वेळेलाही मागे टाकतात. याबाबतीत जयवंत तुझीच सावली पडली बघ त्यांच्यावर.. " वसंतराव म्हणाले.

" वेळेचे गुलाम म्हणतात त्यांना बाकी काय.. " नानींनी टोमणा मारलाच शेवटी.

" हम्म आता कसं खर्या अर्थाने दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतंय.. " दादासाहेब उवाच. यावर नानींनी नाक मुरडलं.

" काहीही म्हणा बरं का पण नानी तुमचा attitude एक नंबर आहे. " माधवी मिश्कीलपणे म्हणाली. यावर सगळेच गालातल्या गालात हसले. पण नानींनी फक्त दादासाहेबांनाच लूक दिला.

" काय अगं माधवी तू पण ना.. ती आपली चंगळमंगळ गॅन्ग अजून साखरझोपेत आहे म्हणून जरा कुठं शांत वातावरण राहील वाटलेलं. पण आपण त्यावरचे निघालो. " नानी  हसत म्हणाल्या आणि सगळेच एकसुरात हसले.

" अहं अहं..,... " तेवढ्यात तिथे मागून आवाज आला. तसं सगळ्यांनी तिकडे बघितलं. तर गौरवी दिग्विजय हाताची घडी घालून हसत उभारले होते.

" अरे गौरवी दिग्विजय तुम्ही तिथे काय उभारला, या बसा आमच्यासोबत.. " वसंतराव त्यांना बोलवत म्हणाले.

" नानी येऊ ना आम्ही ?" दिग्विजयने हसत नानींना विचारलं. बहुतेक आताचा नानींचा टोमणा त्यांनी ऐकलेला..

" नाही म्हणून चालणार आहे का थोडीच " नानी उवाच. तसं सगळेच हसले. आणि ते दोघे त्यांच्यासोबत येऊन बसले.


" अं मग पूजा संध्याकाळी आहे तर मग दुपारच्या जेवणाचा काय बेत करायचा. " माधवीने विचारलं.

" जे करायचं ते गौरवी करेल. नवी सूनबाई. आणि हो तिला मदतीला दिग्विजय असेलच. त्यामुळे आपण काही नाही करायचं. " नानी म्हणाल्या खरं. पण यावर दादासाहेब आणि गौरवी दिग्विजय वगळता सगळ्यांच्या चेहर्यावर विस्मयकारक भाव होते.

" खरंच की उपहासाने म्हणताय ?" माधवीने न समजून विचारलं. मनोहरराव आणि वसंतरावांचाही तोच होरा होता.

" खरंच सांगतेय मी. त्या दोघांना व्यवस्थित जेवण बनवता येतं. मालविका नंतर दुसऱ्या कुणी बनवलेलं ते खातच नव्हते. मग त्यांचं तेच बनवून खायचे लंडनला होते तेव्हा पर्यंत.,. परत सौम्या आल्यानंतर जरा जबाबदारी वाढली मग त्यानंतर कांताला मीच पाठवलं. नाहीतर ते स्वता करून खायचे नेहमी. " नानींनी सांगितलं तसं त्यांचे डोळे विस्फारले.

" अरे वा म्हणजे हेही गुण आहेत तुमच्यात... " वसंतराव कौतुकाने म्हणाले.

" आणि हो सार्थकला पण छान स्वयंपाक बनवता येतो. नाही म्हणजे आता परत आम्ही नसलो की एकमेकांच्या सोबतीने करायला बरं नाही का... " मनोहरराव म्हणाले. तसं सगळेच हसले.

" अरे पण कुठे आहेत कुठे आपले नवरदेव आणि त्यांचे करवले, करवल्या.... दहा वाजले अजून पत्ता नाही." वसंतराव म्हणाले.

" शशांक आणि कृणाल जिममध्ये आहेत. बाकीचे झोपेच्या अधीन असतील. येतील परत... " मनोहरराव म्हणाले.

" बरं ते जाऊदे, पण गौरवी तू आता नक्की काय बनवणार. म्हणजे मेन्यू तुला सांगू का? " माधवीने विचारलं.

" As usual नेहमीप्रमाणे... आणि स्वीटही असेलच. अजून काही? " गौरवी म्हणाली.

" हो बरोबर आहे. " माधवी म्हणाली.

" अजून पाऊण तासाने आम्ही तयारीला लागतो. नका काळजी करू. आणि हो नानी तुझं काही सजेशन? " गौरवी उवाच.

" माझं काय बाई... फक्त तुम्ही जसं खाता त्या पद्धतीने करू नका. प्रमाणात कर सगळं. आणि गोडाचं ____" नानी पुढे बोलतच होत्या तेवढ्यात दिग्विजयने त्यांना मधातच अडवलं.


" नानी पोचल्या भावना. तुला वेस्टर्न पद्धतीचं काही दिसणार नाही आजच्या मेन्यू मध्ये... फाईन? " दिग्विजय म्हणाला.

" बरं बाबा. तुम्ही म्हणता तसं. पण आज खूप दिवसांनी तुमच्या हातचं खायला मिळणारे... त्यासाठी मी खूप खूश आहे. नाहीतर नेहमी असे तसे हातात सापडत नाही तुम्ही तीन तिघाडे लोक्स " नानी अगेन. तोच दिग्विजयने दादासाहेबांना स्टडी रूममध्ये चलण्याचा इशारा केला.

" फिरून फिरून गाडी आमच्यावरच येतेय. तर मग चला आम्ही येतो तुमचं चालूदे. नाहीतर इथे टोमणे खाऊनच पोट भरेल मग जेवणाला पोटात जागाच उरणार नाही. " दादासाहेब मिश्कीलीत म्हणाले. आणि खुर्चीवरून उठत जायला निघाले.


नानी यावर काही बोलणार तोच त्या तिघांनी तिथून काढता पाय घेतला.


तासाभराने...

सार्थक नुकताच झोपेतून उठून आळस देत होता. तेवढ्यात तिथे करण आला. तसं सार्थकने त्याच्याकडे वळून बघितलं.


" Good morning.... " सार्थक हसत म्हणाला. त्याच्या चेहर्यावर एक विलक्षण हसू तरळलेलं.

" हे नक्की काय होतं ?" करण म्हणाला.

" ऐकू नाही आलं का तुला ? " सार्थक उवाच.

" नाही ते ऐकू आलं. पण हे नक्की माझ्यासाठीच होतं ना. नाही म्हणजे मागच्या वेळी एकदा असंच तू झोपेतून उठल्यावर काय करत होतास आठवतंय ना?" करण हसत म्हणाला.

" झाला सुरू तुझा पांचटपणा ? " सार्थक

" हो ते तर होणारच. कारण तू विसरू नये म्हणून तुला आठवण करून दिली. हाच तर माझा रोल आहे ना तुझ्या आयुष्यात as a bestiii म्हणून... " करण जीभ चावत म्हणाला. सार्थकने कपाळावर हात मारून घेतला.

" तू नाही सुधरणार. चल सरक बाजूला मला आवरून घेऊदे आधी किती वाजलेत बघूदे... " असं म्हणत त्याने घड्याळात बघितलं तर दहा वाजलेले. ते बघून त्याची भंबेरीच उडाली.

" बापरे इतका उशीर झालाय. आणि तू टाईमपास काय करत बसलाय माझ्याशी. जरा लवकर येऊन मला उठवायचं होतं ना. काही कामाचा नाही तू. फक्त बेस्टी म्हणून मिरवायला  तेवढा पुढे असतो. " सार्थक ब्लॅन्केटची घडी घालत घाईतच बोलत होता. करण मात्र तोंडावर हात ठेवून हसत होता.

" पण आता तो रोल माझा नाही वहिनीचा आहे. " करण अगेन.

" फार शहाणा आहेस जा आता निघ. मी आलोच अंघोळ करून. " असं म्हणत सार्थक टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेला.

" अरे सार्थक फक्त अंघोळ करून तसाच येशील. कपडे घालायला विसरू नकोस बरं का... " करण बाहेरूनच म्हणाला.

" करण तू आता जातो की इथून साबण फेकून मारू तुला ?" सार्थक आतून ओरडला.

" नाही नाही ते साबण तुझ्याकडेच ठेव अंघोळ होईपर्यंत. मी जातो " असं म्हणत हसतच करण तिथून निघाला.

थोड्या वेळाने सार्थक त्याचं आवरून बाहेर आला. तेव्हा त्याने जाताना सहज गौरवीच्या रूमकडे बघितलं. रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता म्हणजे ती तिथे नसेल. असं समजून तो खाली आला. तिथे सगळे जण नुकतेच येऊन ब्रेक फास्ट साठी बसले होते. पण त्याची नजर फक्त गौरवीला शोधत होती. त्याने भिरभिर सगळीकडे बघितलं. पण ती आणि दिग्विजय कुठेच नव्हते. गार्डनमध्ये पण नव्हते. स्टडी रूममध्ये पण त्याने डोकावून पाहिलं पण तिथे दादासाहेबांसोबत त्याचे बाबा आणि मोठे बाबा बसलेले दिसत होते.

" सार्थक काय झालं तुझं काही हरवलंय का, जे तू सगळीकडे शोधतोयस... " सौम्याचा भाबडा प्रश्न.

" शशांक कैसा होगा रे तेरा. ये बात तो हमको हजम ही नही हुयी. " आलिशाने सौम्याच्या भाबडेपणावरून शशांकला टॉन्ट मारला.

" जावे त्याच्या वंशा कळे..." शशांकने मात्र यावेळी सौम्याला चिडवण्याऐवजी आलिशालाच रिटर्न टॉन्ट दिला.

" आयें साले, क्या साला बनेगा रे तू  दिग्विजय का !!" आलिशा परत चिडवत म्हणाली.

" मी सार्थकला विचारलं आणि त्यावरून तुम्ही दोघे का सुरू झालात ?" सौम्या त्यांना ठेक्यात म्हणाली.

" नाहीतर काय, इथे परिस्थिती काय आहे. माझ्या मित्राचा इथे होश उडालाय. आणि यांची टोलवाटोलवी चालूय. " करण पण म्हणाला.

" अरे पण करण, सार्थकता काहीही करून किचनमध्ये पाठवायला हवंय. तो दि लाच शोधत असणार नक्की... प्लीज काहीतरी निमित्त काढ ना. " सौम्या करणला म्हणाली. तसं आलिशा आणि शशांक आळीपाळीने त्या दोघांची प्लॅनिंग बघत परत एकमेकांकडे बघत होते. भाई ये तो हमारे सोच के आगे निकले. असेच एक्सप्रेशन होते त्या दोघांच्या चेहर्यावर...

" देख रहो हो शशांक, हमें लगा था ये बेमालूम थे... लेकिन उनकी इसी हैसियत से तो हम ही बेमालूम रह चुके. " आलिशा शशांकच्या कानात खुसपुसली. आलिशा आणि तिचे वन लाइनर्स स्टेटमेंट always on next level...

" सही पकडी हो. " शशांक म्हणाला. तेवढ्यात कृणाल तिथे टपकलाच.

" जोर का झटका हाय जोरों से लगा... हायें. " कृणाल त्यांच्याजवळ येत नाटकीपणे म्हणाला. तसं त्या सगळ्यांनीच त्याला एकत्रच लूक दिला. अचानक काय झालं म्हणून त्याने एकदा शेजारी उभारलेल्या मितल कडे बघितलं. तर तीही त्याच्याकडे डोळे वर करून बघत होती. तेवढ्यात त्याचं लक्ष सार्थक कडे गेलं.

" अरे सार्थक, तुझं ज्यूस ना फ्रीजमध्ये ठेवलंय, ते तू घे हं. की कांता मावशींना सांगू.. एक मिनिट... " कृणाल शक्कल लढवत म्हणाला.

" अरे नाही. एवढ्या साठी त्यांना कशाला त्रास. मी घेतो तसंही किचन कुठे दहा मैल लांब आहे. आलोच. " असं म्हणत सार्थक निघाला.


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all