प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-८०

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग - ८०


कृणालने सार्थकला काहीतरी कारण सांगून आत तर पाठवलं. पण सार्थक मात्र स्वताच्याच तंद्रीत होता. त्याला वाटत होतं कदाचित ते दोघे काहीतरी कामानिमित्त सकाळी सकाळी बाहेर गेले नसतील ना.. थोडाही आराम करता येत नाही का त्यांना, जगातली सगळी महत्वाची कामं काय फक्त या दोघांच्याच वाट्याला येतात काय? तो मनातच जरासा चरफडत किचनमध्ये शिरला. आणि आत आल्यावर फ्रीज कुठेय ते बघून त्या दिशेने जाणार तितक्यात समोरचं दृश्य बघून तो स्तब्धच झाला.


गौरवीने नुकताच चपातीसाठी पीठाचा dough तयार केलेला आणि त्यावरून ती हात फिरवत होती. तर दुसरीकडे दिग्विजयने गॅसवर तवा ठेवत गॅस मध्यम केला. आणि पोळपाट लाटणं घेऊन ते पुसत होता. सार्थक त्यांना अचानक तेही या सिच्यूएशनमध्ये बघून थक्क झालेला. गौरवीने पिस्ता कलरचा सलवार सुट घातलेला आणि त्यावर डार्क ग्रीन कलरचा दुपट्टा एका खांद्यावरून सोडत दुसऱ्या बाजूला कमरेजवळ घेत बांधलेला. केस व्यवस्थित मागे पोनी टेलमध्ये एकत्र बांधलेले. कपाळावर छोटीशी खड्याची टिकली होती. गळ्यात सोनसाखळीचं मिनी मंगळसुत्र होतं. तर हातातला हिरवा चुडा तिने जरा कमी केलेला. ठेवायला पाच सहा बांगड्या ठेवल्या असल्या तरी तिला ओझं होतच असणार म्हणून तिने त्या मागे कोपरा पर्यंत सरकावलेल्या.... तर दिग्विजयने चेक्सचा शर्ट आणि फेन्ट ब्लू कलरची जीन्स घातलेली. दोघांच्याही गळ्यात किचन पेटीकोट ( apron) होते. आणि ते आज जे काम करतायत त्यात अगदी सरस असल्याप्रमाणे तिथे वावरत होते. नाहीतर नॉर्मली काही दिवस किचनपासून लांब राहिलं तर अचानक काम करताना गडबड किंवा कन्फ्यूज अवस्था होते कुणाचीही... पण ते दोघे याही स्टेजमध्ये नेहमीप्रमाणेच cool and calm होते. सार्थक अतीव प्रेमाने आणि तितक्याच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत त्यांचं निरीक्षण करत होता.

तर दुसरीकडे सार्थकच्या येण्याची चाहुल लागताच त्या दोघांचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. आणि त्याच्या एक्सप्रेशन्स वरून तो मनातून किती सरप्राईज आणि आनंदी झालाय हेही त्यांना कळत होतं. ते बघून ते दोघेही गालातल्या गालात हसले. पाच एक मिनिटे झाली पण सार्थक तसाच स्टेच्यू बनून उभा होता. ते दोघेही त्याला भानावर आणण्याच्या मूडमध्ये नव्हतेच जणू. कारण तो अजून किती वेळ असा उभा राहतो ते बघायचं होतं त्यांना. दिग्विजय चपाती लाटत होता तर गौरवी चपाती भाजत होती. शिवाय dough चे मध्यम आकाराचे गोळे करून दिग्विजयला देत होती.

" गौरवी आता बस झालं हं मस्करी. त्यात बाहेरच्या टवाळखोरांनी मुद्दाम त्याला आत पाठवलंय वाटतं. आता तेही येऊन अजून चिडवतील त्याला. आणि हे मला चालणार नाही. " दिग्विजय बारीक तोंड करत म्हणाला.

" ओहहह मग तुमच्या लाडक्या तपस्वींची तपस्या तुम्हालाच भंग करावी लागेल सालेसाहब. " गौरवी मिश्कीलपणे हसत म्हणाली. तसं दिग्विजयने तिच्याकडे बघितलं. आणि तो परत सार्थकला म्हणाला,

" अम्म सार्थक तुला काही हवंय. " दिग्विजय सार्थकला म्हणाला. तसं सार्थक हडबडला.

" हो मी हा ते अम्म..." सार्थकला आता आठवत नव्हतं की तो इथे नेमका कशासाठी आलेला ते...

" हा मी ते तुम्हा दोघांना शोधत इथे आलेलो सहज आपलं... आणि तुम्हांला पहिल्यांदाच या रोलमध्ये बघून सरप्राईज झालो. " तो हसत त्या दोघांकडे बघत म्हणाला.

" हम्म we know that. पण आम्ही किचनमध्ये आहोत ही कल्पना आली कुठून.. " गौरवी सार्थकची खेचत म्हणाली. तसं दिग्विजय आणि सार्थक एकत्रच तिच्याकडे बघत होते. ती मात्र हसत होती.

" ते काय आहे ना, हे आपलं नवीन घर काचेचं आहे त्यामुळे.... " सार्थक म्हणाला खरा पण नेहमीसारखा आज त्याला टोमणा मारणं जमलंच नव्हतं म्हणून तोंडात येईल ते बोलून टाकलं त्याने. हे त्या दोघांच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.

" जाऊदेत सार्थक, तू ब्रेकफास्ट कर स्पेशल माझ्या हातचा... Wait पॅन गरम आहे तर मी लगेच थालीपीठ बनवतो. Just five minutes ha. " असं म्हणत दिग्विजयने लगेच लाटलेली चपाती गौरवीकडे देत लाटणंही तिच्याकडेच दिलं. आणि तो थालीपीठसाठी लागणारं मिश्रण गोळा करत होता. तर गौरवी ते सगळं एकजीव करत होती. पाहता पाहता त्यांनी दोघांनी मिळून थालीपीठ तयारही केलं. ते तयार होताच गौरवीने डिशमध्ये ते serve केलं आणि दिग्विजयने सॉससोबत सार्थक समोर आणून दिलं. सार्थक अगदी कौतुकाने त्यांच्याकडे बघत होता. त्यानंतर ते दोघे परत चपाती करायला लागले.

सार्थकने पहिला घास खाल्ला. आणि अगदी तृप्त झाल्याप्रमाणे त्याने आनंदाने दिग्विजयकडे बघितलं. यावरून त्याला ते किती आवडलं असेल हे त्या दोघांना दिसत होतं.

" अरे यार सुपर्ब... माईंड ब्लोईंग... अजून शब्द सुचत नाहीयेत मला. तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक बनवता येतो हे मी याआधी गौरवीकडून ऐकलेलं. पण आज प्रत्यक्ष खाऊन असं वाटतंय की तुम्ही प्रोफेशनल शेफ तर नाहीयेत ना... " सार्थक हर्षभराने म्हणाला.

" असं कसं आम्ही शेफ झालो तर बाकी शेफच्या पोटावर पाय येईल. " दिग्विजय हसत म्हणाला. तोच सार्थक जागेवरून उठला आणि त्याने त्या थालीपीठचा घास त्या दोघांसमोर धरला. यावर त्यांनी कानकुच केली.

" मी विचारलं नाहीये, सांगितलंय ओके... " सार्थक त्यांची हुबेहूब नक्कल करत म्हणाला. तसं त्यांनी तो घास खाल्ला. आणि त्यांना माईची आठवण आली. ते दोघे लहान असताना ती सेम असंच थालीपीठ बनवायची. जे त्यांना आवडायचं नाही, पण तिच्या साठी खावं लागायचं. आताही हे थालीपीठ अगदी तसंच लागत होतं. त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. माई गेल्यानंतर कदाचित पहिल्यांदा त्यांनी सार्थकमुळे ते खाल्लेलं. त्यांना नकळत असं वाटत होतं की सार्थकच्या रूपाने माईच त्यांना आग्रह करत खाऊ घालतेय...


दुसरीकडे बराच वेळ झाला तरी सार्थक अजून बाहेर आलाच नाही हे बघून ही टवाळखोर गॅन्ग ते आत काय करताय हे बघण्यासाठी किचनचा कानोसा घेत हळूच वाकून आत बघायला लागली. तर आत यांचं हे ऊतू चाललेलं प्रेम बघून आता सरप्राईज व्हायची वेळ त्यांच्यावर आलेली.

" ये क्या देख रहा हूं मै... मला तर आतापर्यंत वाईनच्या पेगशिवाय काहीच बनवून नाही दिलं तुम्ही दोघांनी. आणि आज भाईला मात्र स्पेशल थालीपीठ ?" शशांक आत येत म्हणाला. तसे बाकीचेही एकामागून एक किचनमध्ये शिरले.

" त्यासाठी तुला त्यांचा जीजा बनावं लागेल. याशिवाय काही पर्याय नाही. " कृणालने टाचणी लावली.

" अरे शशी हे घे खा. मस्त झालंय बघ किती... तुम्ही पण खा.. या. मी एकटा थोडीच खाणारे तुम्हाला सोडून. " असं म्हणत सार्थकने स्वताच्या हाताने सगळ्यांना घास भरवला.

" एकदम fantastic.. इन दोनों के हात का खाना पहली बार नहीं... लेकिन ये बनाया हुआ डिश तो पहली बार खा रही हूं मै... बढिया.. " आलिशा कौतुक करत म्हणाली.

" हो ना आलिशा सेम मी पण.. कदाचित सार्थकमुळे आपल्याला हा नवीन पदार्थ खायला मिळाला. " सौम्या पण म्हणाली.

" खरंच मस्त टेस्ट लागतेय. सॉरी सार्थक मला तू केलेलं काहीही डोळे झाकून खायला आवडतं. पण आज तुझाही ससा झालाय यामुळे " करण पण हटके compliment देत म्हणाला. तसं सगळेच हसले. कृणाल आणि मितलनेही तारीफ केली. आता शशांक तेवढा बाकी होता...

" थालीपीठ सोबत माणसंही मस्त बनवता तुम्ही दोघे... आणि तरी आमच्या वाट्याला मात्र काय आलं ते spoiled cake " शशांक उवाच. आणि वातावरण टाईट...


क्रमशः
उर्वरित पुढील भागात...


🎭 Series Post

View all