प्रेम! एका अनामिक वळणावरचं.. भाग-८१

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -८१

मागील भाग.

गौरवी दिग्विजयने केलेल्या थालीपीठची टेस्ट घेतल्यावर सगळेच इम्प्रेस झालेले...
करणने पण हटके compliment दिली. त्यानंतर कृणाल आणि मितलनेही तारीफ केली. आता शशांक तेवढा बाकी होता...

" थालीपीठ सोबत माणसंही मस्त बनवता तुम्ही दोघे... आणि तरी आमच्या वाट्याला मात्र काय आलं तर ते spoiled cake " शशांक उवाच. आणि वातावरण टाईट...


आता पुढे...

ये शशांक है के बिना टॉन्ट के मानता ही नहीं... त्याने असं म्हणताच गप बसेल ती सौम्या कसली. आणि त्यालाही तेच तर हवं होतं.

" बंदर क्या जाने अदरक का स्वाद... " सौम्या पण खांदे उडवत उपहासाने म्हणाली. तसं सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.

त्यानंतर शशांक परत काही बोलणार तितक्यात सार्थकने पटकन पुढे होत थालीपीठचा मोठा घास शशांकच्या तोंडात कोंबला.

" ऊऊऊ भा___ईउ... " शशांक सार्थककडे नाराजीने बघत बोलत होता. पण त्याला बोलताच येत नव्हतं.

" अरे शशी तोंडातला घास संपव आधी आणि मग बोल. नाहीतर ठसका लागेल. " सार्थक त्याला समजावत म्हणाला. आणि मनात त्याला हुश्श झालं. कारण हे दोघे कधी कुठे सुरू होतील याचा काही नेम नसायचा. यावर सौम्या फिदीफिदी हसत होती. शशांकने तिला परत बघून घेईल असा धमकीवजा इशारा केला. तिने नाक उडवलं.

आलिशा त्या दोघांचे इशारे पाहत होती.

" क्या होगा इन दोनों का... देख रहे हो ना G & D , तुम्हारे बिना कोई कैसे संभाल सकता है इस आफत को... " आलिशा डोक्याला हात लावत म्हणाली.

" आलिशा तू माझ्या साईडने आहेस ना नक्की ?" सौम्याने तिला टोकलं.

" अरे बाबा तुम्हारे लिये ही बोल रही हू, ताकि इसका कोई अच्छा impact आ जाये इसलिए.. वरना कब तक सहेंगे हम लोग भी..." आलिशा चिंता व्यक्त करत म्हणाली. पण तिच्या बोलण्याचा टोन नेहमीसारखा सीधी बात नो बकवास असाच होता.

" काय लावलंय हे, माझ्या साईडने तुझ्या साईडने... इथे काय युद्ध करायचं आहे असं एकमेकांच्या बाजूने वगैरे करून. आज शेवटचा दिवस आपल्या सर्वांचा एकत्र, निदान आज तरी खेळीमेळीने वागा जरा... " सार्थकने प्रेमळ शब्दांत ऐकवलं सगळ्यांना...

" बोला संत सार्थक बाबा की जय.... " करण हात जोडत म्हणाला. तसं सगळेच हसले.

" तू तर गप्पच बस . आणि चला आता बाहेर सगळे... " सार्थक म्हणाला.

" हा आम्हाला पाठव आणि तू इथेच मुक्काम ठोक हं... " सौम्या म्हणाली.

" नाही मेळावा घेईल तो आपल्याला काय.. घर त्याचं आहे. " कृणाल काहीतरी बोलला. पण शशांक त्याला अजून काहीतरी खुणावत होता. पण गौरवी दिग्विजय मात्र या सगळ्या ड्रामेबाजीत जास्त involve न होता त्यांची तयारी करत होते.

इकडे बाहेर हॉलमध्ये नानी आणि माधवी आलेल्या तेव्हा तिथे डायनिंग टेबलवर मघाशी यांचा दंगा येत होता. पण आता सगळं सामसुम होतं मग हे सगळे गेले कुठे असा प्रश्न त्या दोघींना पडलेला.

" काय ग माधवी ही चांडाळचौकडी अचानक कुठे गेली. तरीच मी मघाशी म्हणलेलं ना तुला की त्यांचा आवाज ऐकू येईनासा झालाय... " नानी माधवीला म्हणाल्या.

" हो ना. तिकडे बाहेर बागेत पण दिसत नाहीयेत. मागच्या बाजूला तर गेले नसतील ना? " माधवी गार्डनच्या दिशेने डोकावत म्हणाल्या.

" जाऊदे तेवढीच शांतता. चल गौरवी दिग्विजयची तयारी कुठवर आलीय ते बघू. जेवणाची वेळ होईल आता... " असं म्हणत त्या दोघी किचनमध्ये जायला निघाल्या. आणि तिथे येताच त्यांनी बघितलं की ही सगळी जत्रा इथे भरलीय ते...

" काय चाललंय आणि तुम्ही सगळे का गर्दी करून उभे आहात किचनमध्ये... " आल्या आल्या नानींनी त्यांना फटकारलं.

" काही नाही ते आम्ही जेवण कसं झालंय ते टेस्ट करायला आलेलो... " सौम्या पचकली. सार्थकने तिच्याकडे बारीक नजरेने बघितलं. कारण त्याला मुद्दाम आत पाठवून त्याची मजा बघण्यासाठी ते सगळे इथे आलेले हे खरं कारण असून सौम्याने सरळ थाप मारलेली. आणि बाकीचेही तिच्या हो ला हो करत होते.

" हो का मग केली ना टेस्ट बिस्ट, चला मग आता बाहेर व्हा. थोड्या वेळाने जेवायचंच आहे. आम्हालाही पाहुदे सगळं व्यवस्थित केलंय का ते. म्हणजे काही राहिलं असेल तर करता येईल. " माधवी पदर खोचत म्हणाल्या. नानींनीही त्यांना दुजोरा दिला. तसं सगळे एकेक करत जायला निघाले. शशांक आणि सार्थक सगळ्यांच्या शेवटी होते. तेवढ्यात नानी म्हणाल्या.

" काय रे शशांक तुझं तोंड का असं टम्म झालंय. हिरमुसल्यासारखा पण दिसतोय. बरं वाटतंय ना तुला... " नानींनी विचारलं.

" काय झालं शशी.. " माधवीनेही विचारलं. तेवढ्यात बाहेर जाता जाता कृणाल ते ऐकून परत आत डोकावला.

" काही नाही जस्ट चील. फक्त त्याला ना मागे एकदा सौम्याने बनवलेली डिश आठवली. जी त्याला खूपच आवडलेली. आता गौरवी दिग्विजय पण तसंच बनवत असतील म्हणून त्याने खाल्ली पण ती टेस्ट काही ओरच होती असं वाटतंय त्याला... " कृणाल हसू आवरत म्हणाला.

" अरे वा म्हणजे सौम्याही सुगरण आहे वाटतं, मला माहितच नव्हतं. " माधवी आनंदाने म्हणाल्या. आणि शशांकला ठसका लागला. पण कृणालचा sarcasm त्यांना कळला नव्हता. कारण रियालिटी पासून त्या अजून अनभिज्ञ होत्या. दुसरीकडे नानींना मात्र जे कळायचं ते बरोबर कळलेलं.

" तू चक्क सौम्याने बनवलेलं खाल्लं. किती अफाट सहनशक्ती आहे रे तुझ्याकडे, नाहीतर मला वासही सहन होत नाही. पण जाऊदे यासाठी तिला बिचारीला दोष नको देऊ यासाठी. कारण या दोघांनीच तिला स्वता सारखं नीट शिकवलं नाहीये. " नानींनी अखेर गौरवी दिग्विजयला घेरलंच मध्ये... आता कुठे माधवीला कृणालच्या बोलण्याचा अर्थ लागलेला.

आणि दुसरीकडे फिरून फिरून नानीची चावी आमच्याकडेच येते अशा अर्विभावात ते दोघे नानीकडे बघत होते. सार्थकने मात्र मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ही सगळी चांडाळ चौकडी इथून घालवून नानी परत त्यांचेच सूर गात होते इथे येऊन...

" फक्त तुम्हालाच कळल्या माझ्या भावना. आता इथून पुढे माझा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा असेल. दोस्त दोस्त ना रहे अब... " शशांक त्या दोघांकडे बघत नाटकीपणे म्हणाला. तसं नानींनी त्याला हाय फाय दिलं.

" बरं ते मघाशी तुम्ही जेवणाची तयारी कशी झालीय ते बघायला आलेलात ना. आणि त्यासाठीच इथली गर्दी पांगवली. तर मग चल शशी बाहेर जाऊया. त्यांना पाहुदे. हो ना कृणाल. " असं म्हणत सार्थकने थेट नानींच्या हातात तुरी देत त्या दोघांना घेऊन बाहेर गेला. ते बघून गौरवी आणि दिग्विजय गालातल्या गालात खुदकन हसले. आणि लगेच आवरतं घेतलं.

त्यानंतर त्या दोघींनी सगळं बघितलं. प्रमाण, मर्यादा वगैरे सगळं पाहिलं. कुठेच कशाची कमी पडली नव्हती.

" सगळं काही व्यवस्थित आहे. पण गोड शिरा करायला हवा होता. " नानी म्हणाल्या.

" नानी ही स्वीट काजू करी आहे. ते खीर असते ना तसं... " दिग्विजय म्हणाला.

" हो, म्हणजे दिसायला ती सुपसारखी दिसत असली तरी टेस्ट गोडच असेल. हवं तर तुम्ही दोघी टेस्ट करून बघा. " गौरवी म्हणाली. आणि त्या दोघांनी लगेच बाऊल मध्ये त्या दोघींसाठी तो पदार्थ काढून त्यांना चाखायला दिला.

" वाह किती मस्त लागतेय. हे तर शिरा किंवा खीरीपेक्षाही छान आहे. " माधवी भारावून म्हणाल्या.

" हम्म जमलंय जमलंय. नाहीतर मला वाटलेलं ते विदेशी पद्धतीचं काही बनवलंय की काय. छान छान. चला मग पानं वाढायला घेऊया. तुम्ही दोघे जावा फ्रेश वगैरे होऊन या. आम्ही वाढतो. " नानी म्हणाल्या. तसं दोघांनी एकमेकांकडे बघितलं.

" नो नानी. तुम्ही सगळ्यांना बोलवा तोपर्यंत आम्ही हे serve करतो. आणि मग फ्रेश व्हायला जातो. " ते दोघे एकत्र म्हणाले. तसं नानी नाही म्हणू शकल्या नाहीत.

त्यानंतर नानींनी सर्वांना जेवायला बोलावलं. सगळे एकेक करत येऊन बसले. तोवर गौरवी दिग्विजयने सगळं बाहेर आणलं. सगळे जण खूप एक्सायटेड होते त्या दोघांच्या हातचं जेवण्यासाठी... त्या दोघांनी वाढलं आणि ते वर फ्रेश व्हायला म्हणून निघून गेले.

चपाती, पालकपनीर, व्हेज पुलाव, कोशिंबीर, स्वीट काजू करी, डाळीचं घट्ट वरण आणि कडी भात... असा सगळा मेन्यू होता. तोच गौरवी दिग्विजय फ्रेश होऊन आले. माधवीने त्यांना पानं वाढली. पण गौरवीने माधवीलाही बसायला सांगितलं. आणि दिग्विजयला इशारा केला. तसं तो आत जाऊन एका झाकलेल्या पसरट अशा डब्यात काहीतरी घेऊन आला.

" आता त्यात काय आहे, सगळं तर आणलंय ना... " नानींनी विचारलं.

" घे मग तूच बघ किती महत्वाचं राहिलेलं ते... " असं म्हणत दिग्विजयने तो डबा नानीकडे दिला. आणि त्यांनी उत्सुकतेपोटी तो उघडला. आणि भारावूनच गेल्या. सगळे जण कुतूहलाने त्यांच्याकडे बघत होते.

" अय्या..तुम्ही दोघांनी आठवणीने बनवल्या ना? आणि तुम्हांला जमल्या पण... " नानी अगदी आश्चर्यचकित होत म्हणाल्या. कारण शिऱ्याच्या पोळ्या म्हणजे त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ.... आणि आज त्या दोघांना स्वयंपाक करायला सांगताना त्यांना गोड म्हणून हेच करायला सुचवायचं होतं. पण आपली आवड कशाला सर्वांवर लादायची म्हणून त्या काहीच बोलल्या नव्हत्या. आणि हे त्या दोघांना बरोबर माहित होतं. त्यामुळे त्यांनी सर्वात आधीच त्या करून तो डबा बाजूला ठेवून दिलेला...


" नानी असं काय स्पेशल आहे त्यात आम्हाला पण सांग ना. " सौम्या म्हणाली.

" ती आनंदाने एवढी वेडी झालीय, ती नाही सांगणार. हा पण मी आणि गौरवीही नाही सांगणार बरं का. सर्वांना वाढतो तुम्हीच ओळखा. " दिग्विजय म्हणाला. असं म्हणत त्याने आणि गौरवीने सगळ्यांच्या ताटात एकेक पोळी वाढली.

" अरे ही तर शिऱ्याची पोळी. कोणतंही शुभकार्य घरात असलं तर त्याची सुरुवात या पोळीचा गोड घास मोडूनच करतात. " वसंतराव म्हणाले.

" हम्म, आणि आताही जेवणाची सुरूवात सर्वांनी इथूनच करायची. चला मग सगळे सुरू करा. " दादासाहेब असं म्हणताच सगळे एक्सायटेडली त्या पोळीचा घास मोडत होते. पण नानी मात्र हर्षोल्हासाने अजूनही त्या ताटातल्या पोळीकडे तशाच एकटक बघत होत्या.

" अहं अहं काय मग शालिनी करतेय ना सुरूवात... की फक्त बघूनच पोट भरलं. " दादासाहेब मिश्कीलपणे म्हणाले. तसं सगळेच गालातल्या गालात हसत होते.

" Actually ती विचार करत असेल. किंवा ते आतापर्यंत होतं की सगळं मुहूर्त वगैरे बघून. मग तसं ती यासाठीही तेच डिसाईड करत असेल. " दिग्विजय पण मिश्किलीत म्हणाला.

" हा मग दिग्विजय, ती डिसाईड करेपर्यंत सूर्य बाय करून निघून जायचा. मग आता आपल्यालाच करायला हवं inauguration. काय दादासाहेब " गौरवी पण म्हणाली. तसं दादासाहेबांनी लगेचच त्यांच्या लाडक्या शिलेदारांना ग्रीन सिग्नल दिला. तसं ते दोघेही उठून नानी जवळ आले आणि तिच्या ताटातल्या पोळीचा घास मोडत नानींना खाऊ घातला. आणि नानी खुदकन हसल्या.

नानींचे डोळे डबडबले होते. त्यांनी दोघांनाही प्रेमाने आपल्या आपल्या जवळ घेतलं. नानींना शिऱ्याची पोळी खूप आवडते हे त्यांची मैत्रिण मालविकाला चांगलं ठाऊक होतं. म्हणून ती कोणतं शुभकार्य असलं नसलं तरी प्रेमाने त्यांच्यासाठी ही पोळी बनवायची. आणि आज गौरवी दिग्विजयने अगदी तशीच पोळी केलेली. योगायोग किंवा आणखी काही, पण चवही हुबेहूब तशीच वाटत होती. त्यामुळे नानी मालविका च्या आठवणीने व्याकूळ झालेल्या... त्यांनी त्या दोघांच्या गालावर हलकेच गाल टेकवले..आणि तो मोमेंट आलिशाने तिच्या फोनमध्ये त्यांचं लक्ष नसताना candid क्लिक केला. दादासाहेब समाधानाने हसत होते. त्यांच्या चेहर्यावरचं विलक्षण हसू, स्मित, समाधान मागच्या आठवडाभरात नेहमीपेक्षा अधिक त्वेषाने झळकत होतं. हे सार्थकने आवर्जून नोट केलेलं.

त्यानंतर सर्वांनी एकत्रच गौरवी दिग्विजयने बनवलेल्या परिपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतला. सगळ्यांचेच चेहरे आनंदाने खुलले होते.


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all