प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-८२

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...

भाग-८२

संध्याकाळ होत आलेली... पूजेची मांडणी सुरू होती. नानी तिथेच पाटावर सगळं काही व्यवस्थित मांडून ठेवत होत्या. तर माधवी आणि आलिशा त्यांना हवं नको ते सगळं आणून देत होत्या. मितल बाहेर मोठी रांगोळी काढत होती. सौम्याही तिला मदत करत होती. दिग्विजय, शशांक फुलांच्या माळा वगैरे लावत होते. तर करण सार्थकसोबत त्याला आवरायला मदत करत होता. कृणालचा मात्र मितलसमोरून पायच निघत नव्हता. ती रांगोळी रेखाटण्यात मग्न आणि हा तिला पाहण्यात तेवढाच मग्न... शशांकचं तिकडे लक्ष गेलं.

" ओ वकिल बाबू, अजून किती वेळ असाच मेणाचा पुतळा बनून बसणारेस? ये जरा ती चिकटपट्टी दे मला. " शशांक सिडीवर चढून त्याला हाक मारत होता. आणि ते तिथल्या सगळ्यांना ऐकू गेलं. तसं सगळेच हसले.

" एक सोडून दोन कान आहेत मला, हळू बोललं असतं तरी ऐकू आलं असतं.. " कृणाल तिथून चिकटपट्टी घेत म्हणाला.

" अय्यो कान पण आहेत होय तुला... बरं झालं सांगितलं. नाहीतर इथून उतरल्यावर मी तर तुला पुतळा समजून त्या मदर्स वॅक्स म्यूझियम मध्येच नेऊन टाकणार होतो. " शशांक त्याला चिडवत म्हणाला.

" तुला चिकटपट्टी हवी होती ना, घे हे. आणि चिपकव तुझं तोंड एकदाचं " कृणाल रिटर्न्स.

" कृणाल जरा इकडे पण दे चिकटपट्टी... " दिग्विजय म्हणाला.

" आता दिग्विजयला पण देताना हेच बोलशील का? " शशांक हसत म्हणाला.

" नोप. तोंड चिकटवायची गरज तुला आहे. त्याला नाही. " वकिल बाबू आले ना फॉर्मात...

" आता मला असं वाटतंय ही चिकटपट्टी तुमच्या दोघांनाही तितकीच गरजेची आहे. " दिग्विजय म्हणाला. तसं कृणालने त्याच्याकडे नाटकी रागात बघितलं. तर शशांक खिदळत होता.

" अरे मितल वो डिजाईन सोमी निकालेगी. तू उपर जा अब गौरवी को वो वाली साडी पहनाने में हेल्प कर. " आलिशा तिथे येत मितलला म्हणाली. तसं मितल उठली.

" हो हो जाते. आणि सौम्या इथलं झालं की तिथे आत पाटाभोवती पण रांगोळी काढायची आहे. तोपर्यंत मी येतेच पण तरी उशीर नको व्हायला म्हणून... " मितल जाता जाता सौम्याला म्हणाली. आणि ती जातच होती तेवढ्यात कृणालने मुद्दाम तिला हलकेच धक्का मारला.

" क्यूं वकिल बाबू जरा धीरे धीरे... सूरज ढल गया है, अब वॅक्स पिघल नहीं जायेगा. " आलिशा कृणालला म्हणाली.

" खरं तर वितळू नये म्हणून फ्रीजमध्ये च ठेवायला हवं ना. तसं काही करूया का... " मितल पण आलिशाला म्हणाली. आणि ते सगळ्यांनी ऐकलं. कृणाल मात्र रागाने बघत होता तिच्याकडे तिने असं म्हणताच...

" अरे ये तो सिर्फ तुम ही कर सकती हो. इसमें पुछनेवाली ऐसी क्या बात है... " आलिशा हसत म्हणाली. शशांक तर पोटावर हात ठेवून हसत होता.

" येंय पोरगी शिकली प्रगती झाली.... वा वा. " सौम्या पण टाळ्या वाजवत म्हणाली.

" मितल यांच्यात राहुन बिघडतेय तू... " कृणाल तिच्या कानाजवळ जात म्हणाला.

" नाही. ते आपलं असंच मज्जा.... " मितल हळूच लाजत म्हणाली.

" हा आता खूप मजा सुचतेय ना, परत सजा पण मिळणार तुला... "कृणाल नाक फुगवत म्हणाला.

" परतचं परत बघू हं. पण आतासाठी मी सॉरी अजिबात बोलणार नाही. " मितल तोंडावर हात ठेवून म्हणाली.

" चल मग पळ इथून... " कृणाल म्हणाला तसं ती हसत वर पळत गेली. ती गेल्यावर तोही स्वताशीच हसला.


" नाईस ब्लशिंग वकिल बाबू, चलो अब अंदर जाके वो बनानाज के पत्ते लाके यहा ऐसे लगाओ. " आलिशा कृणालला म्हणाली.

" हा हा लावतो. लेकिन इसका बाद में करारा जवाब मिलेगा. ते पण व्याजासकट.. " कृणाल त्या सगळ्यांकडे बघत म्हणाला आणि आत गेला.


थोड्या वेळाने भटजी आले आणि काही वेळातच पुजेसाठी सार्थक गौरवीला बोलावलं. सार्थकने फक्त सोवळं नेसलेलं... ते मरून रंगाचं होतं. आणि त्यावर त्याच रंगाची शाल त्याच्या गळ्यात होती. तर त्याच्यानंतर गौरवीही आली. तिने बदामी कलरची पैठणी घातलेली. बाकी तिचा तोच ग्लो अजूनही झळाळत होता. सार्थकने फक्त एकदाच ती येताना तिच्याकडे हळूच डोळे भरून बघून घेतलं. कारण परत पूजेवेळी ती शेजारी असली तरी भटजी आणि सर्वांसमोर ते त्याच्या लौकिकाला शोभणारं नव्हतं असा विचार त्याने केलेला. आणि त्यावरून ही टवाळखोर पिछा पुरवणार असंही त्याला वाटत होतं. त्यामुळे तो एखाद्या अतिसभ्य म्हणजेच आपल्या नॉर्मल भाषेत "अरसिक" प्रमाणे बसलेला. Sarthak being sarthak.

त्यानंतर गौरवी त्याच्या शेजारी येऊन बसली. आणि पुजेला सुरूवात झाली. भटजी मंत्र उच्चारत त्यांना सर्व काही करायला सांगत होते. सार्थक ते सांगतील तसं करत होता. त्यावेळी गौरवीचा हात त्याच्या हातावर होता. ( म्हणजे ते पूजा करताना असतो तसा) तिचा तोच थंड स्पर्श त्याला वेडावत होता. तिला हे जेव्हा कळलं तेव्हा तिने त्याचा हात दाबला. आणि हलकेच हसली. कारण तो awkward झालेला खूप... तिचा हा पॉझिटिव्ह vibe त्याला खूप काही सांगून गेला. त्यानंतर तो जरा मोकळा झाला होता.


तिकडे पूजा चालू होती. सगळे जण जमिनीवर अंथरलेल्या कारपेटवर मांडी घालून हात जोडून पूजा पाहत होते. त्यात आपली ही टोळी मागे बसलेली. शशांक कृणाल आणि दिग्विजय एकमेकांकडे बघत होते. हे अजून किती वेळ चालणार असा प्रश्न त्यांच्या चेहर्यावर उमटलेला... मग काय झाली चालू यांची खुसूरपुसूर...

" दिग्विजय ऐक ना.. आज ते कपल twinning नाही केलं ना त्यांनी. म्हणजे साखरपुडा, हळदी, लग्न सगळीकडे दोघांचे सेम रंगाचे constume होते. आणि आज कलर वेगवेगळा आहे.. ?" शशांकने नवीन विषय मांडला त्यांच्या चुगली बुथवर...

" नो आयडिया. बट हे कपलचं twinning करायची परंपरा आताची आहे की जुनी काय माहित..कारण हे सगळं लेडिज टीमच्याच कोट्यात फिक्स होतं. " दिग्विजय पण मिश्कीलपणे म्हणाला.

" अरे हे हल्लीचंच फॅड आहे. सौम्या डिझायनर आहे तर तिला याबद्दल चांगली माहिती असेल. मागणी तसा पुरवठा मग काय मोठी माणसं काय नाही म्हणणार यांच्या सो कॉल्ड ट्रेन्डिंग ला... " कृणाल उवाच. तसं दिग्विजय आणि शशांक पण इकडे तिकडे बघत तोंड दाबून हसले.

" काय काय ट्रेन्ड आणतात बाबा. पण जे twins असतात त्यांनी करायला हवं असतं ना हे twinning an all.  बट हे कपलचंच twinning यात काय लॉजिक आहे भाई. " शशांक डोकं खाजवत म्हणाला.

" आता प्रत्येक घरात काय जुळे जन्माला थोडीच येतात. मग हौस म्हणून काही करतात. मग हे लगेच सगळीकडे forward होतं. आणि तसंही लेडिज म्हणजे fast forwarding system. एकही सिक्रेट ठेवता येत नाही त्यांना... " कृणाल दात काढत म्हणाला. पण यावरून दिग्विजयला वेगळंच काहीतरी आठवलं.

महाभारतात कर्णाचं सत्य कुंतीने पांडवांपासून लपवून ठेवल्याने  त्यांच्याकडून भावाची हत्या घडली. परत हे कळल्यावर युधिष्ठिर ने अखंड स्त्री जातीला शाप दिला की ती यापुढे कोणतंच रहस्य तिच्या पोटात लपवून ठेवणार नाही. आणि म्हणूनच मुलींच्या पोटात काहीच सिक्रेट राहत नाही. हे त्याने पूर्णा कुणाला तरी सांगताना ऐकलेलं आठवलं. या फक्त काल्पनिक गुजगोष्टी पण असू शकतील. पण ती महाभारतातली प्रत्येक गोष्ट किती सिरियसली घेते यामुळे त्याला मनोमन हसू आलं. त्याला तिच्या कर्णप्रेमाचं अप्रूप वाटायचं. निव्वळ वेडेपणा वाटायचा त्याला तिचा हा... पण काही का असेना ती मात्र तिचंच खरं करत तिचं कर्णप्रेम अबाधित ठेवायची किंबहुना अजूनही ठेवलंय.


" हो रे पण आपल्याकडे तर आहेत ना जुळे.. पण तरी तुम्ही कधी असं कलर किंवा कपड्यांचं twinning नाही केलं. काय दिग्विजय? " शशांक म्हणाला तसं दिग्विजयने त्याच्याकडे बघितलं.

" Because it's none of our business " दिग्विजय हसत म्हणाला. तसं ते दोघेही हसले.

" आणि तसंही हे असलं कलर वरून twinning ची काय गरज आहे भाई तुम्हाला... तुमचं सगळंच तर सेम आहे. फक्त लास्ट नेम सोडून. आणि मजा म्हणजे यामुळेच लोक तुम्हांला तुम्ही दोघं जुळे नसूही शकतात असं बोलतात. हाहाहा " कृणाल हसत म्हणाला.


" हा पण अरे बायको सोबत तर नक्की करावं लागेल त्याला असं त्याच्या लग्नात.. बरोबर ना दिग्विजय बाबू. "शशांक त्याला चिमटा काढत म्हणाला.

" शुऊऊऊ. हळू बोला जरा. " दिग्विजय शशांकचं तोंड दाबत म्हणाला.

" पण शशांक आज तू पण तुझ्या फ्यूचर लाईफ पार्टनर सोबत twinning केलंय बरोबर ना ?" कृणाल म्हणाला. तसं शशांक चपापला. दिग्विजय च्याही आता कृणाल बोलल्यामुळे लक्षात आलं.

शशांकने डार्क पर्पल रंगाचा कुर्ता घातलेला. आणि सौम्यानेही त्याच रंगाचा खणाच्या साडी पासून तयार केलेला लाच्छा घातलेला...

" हम्म वकिल बाबू बरोबर पुरावा सादर केला. आता यामुळे आरोपी नक्कीच पकडला जाणार. " दिग्विजय कृणालला म्हणाला.

" एएए. असं काही नाहीये. हा फक्त योगायोग आहे. बाकी काही नाही. " शशांक गडबडीने म्हणाला.

" काय म्हणता पॉलिटिकल बाबू, उलट तपासणी सुरू करायची का ? आणि शशांक तसं तर तू मघाशी आधी तुझा फेवरेट स्काय ब्लू कलरचा कुर्ता घातलेला ना. मग परत हे चेंज कसं केलं तू आ आ ?" कृणाल बोलला.

" हाहा चल अपने बाप को मत सिखा. तू तुझा विषय सांभाळ. " शशांक

" माझा विषय फिक्स आहे. And I have experience. But whats about you. एटीकेटी किंवा फेल होण्याचे पण चान्सेस आहेत. भाई जरा बचके.. " कृणाल त्याची खेचायचा एकही चान्स सोडत नव्हता. मग काय मघाशीचाच व्याजासकट परतावा करत होता. एवढं सोपं नसतं वकिलाला कोंडीत पकडणं.

" कृणाल थंड घे जरा. तुझा विषय फिक्स असला तरी परीक्षा झाली नाहीये अजून. मग त्यानंतरच पास की फेल निकाल लागणारे तुझा. " दिग्विजय कृणालला म्हणाला.

" हो ना. पण तुझं बरंय ना परीक्षा ना अभ्यास. डायरेक्ट मागच्या दाराने ढकलपास. " शशांक म्हणाला. तसं कृणालने त्याला साथ दिली.

" क्या चलरा तुम लोगों का चटरपटर... ?" आलिशा त्यांच्याकडे वाकून बघत म्हणाली.

" काय नाही. तिकडे समोर बघ, नाहीतर बाकीच्यांचं पण लक्ष जाईल. " शशांक म्हणाला.

" हा आया बडा सामने देख करके... क्या बवाल कर रहे हो सच बताना. " आलिशा पण त्यांच्याकडे सरकत म्हणाली. तिलाही बोर होत होतं नुसतं बसून...

" हा आम्ही सांगतो तुला, आणि तू सांग सगळ्या गावाला. " कृणाल उवाच. आलिशा सोबतचा पण रिवेंज बाकी होता ना त्याचा...

" एक बात ध्यान से सुन कृणाल. तू सबका बदला तो ले लेगा. लेकिन तुम्हारी मितू डार्लिंग को छोडके. तो हम भी उसके पीछे रहेंगे. क्या उखाड लेगा बोल... " आलिशाने डायरेक्ट वर्मावरच घाव घातला. दिग्विजय आणि शशांकला हसू आवरता आवरत नव्हतं.

" माझी आई आता गप बस. वाटलंच तर परत आपण एखादं मैदान बुक करू मग तिथे हवं तेवढं एकमेकांच्या पाठी लाठ्या घेऊन धावा. पण आता जर आपण इथे पकडलो तर काही खैर नाही. " शशांक त्या दोघांना गप बसवत म्हणाला. तसं ते सगळेच हसले. आणि तोंडावर हात ठेवत समोर बघायला लागले.


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all