प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७४

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७४


सार्थक गौरवीने वरमाला घातल्यानंतर सप्तपदी घेत होते. सगळेच खूश होते. ज्येष्ठ मंडळी कौतूकाने त्यांच्याकडे बघत समोरच्या खुर्चीवर बसलेले. आणि आपली ही चिल्लर कम तरूण गॅन्ग पण त्यांच्यासोबत बसलेली. आलिशा आणि सौम्याचं सेल्फी घेणं फोटो व्हिडिओ बनवणं चालू होतं. तर त्यांच्या शेजारीच मितल आणि कृणाल समोरच्या सार्थक गौरवीच्या जागी स्वताला कल्पत होते. मध्येच त्यांचं बोलणं कोपरखळ्या मारणं चालू होतं. तर त्यांच्या मागे दिग्विजय, शशांक आणि करण बसलेले. करणने थोडेफार ग्रुप सेल्फी काढले. आणि गरम होत असल्याने तो काहीतरी थंड घेऊन येतो म्हणून गेला. तोच दिग्विजय आणि शशांकची खुसूरफुसूर सुरू झाली.

" यार दिग्विजय, आयुष्यात पहिल्यांदाच मला बॅचलर असल्याचा पश्चात्ताप होतोय. " शशांक म्हणाला. तसं दिग्विजयला हसू आवरलं नाही.

" आणि जरी बॅचलर नसता तरी असं काय विशेष केलं असतं तू ?" दिग्विजय मिश्कीलपणे म्हणाला.

" तेच जे कृणाल अजूनही करू शकत नाहीये.... " शशांक खट्याळपणे म्हणाला. तसं दिग्विजयने कपाळावर हात मारून घेतला. तेवढ्यात तिथे करण आला.

" काय म्हणाला, काय करू शकला नाही कृणाल ?" करणने गमतीने विचारलं. कारण त्याने त्याचं शेवटचं वाक्य ऐकलेलं.

" लग्न रे लग्न.." शशांक कसंबसं सावरत म्हणाला.

" ओहहह बरं हा... पण मला काहीतरी वेगळंच वाटलेलं आधी. पण तरी भावना पोचल्या हं शशांक बाबू." करण त्याला चिडवत म्हणाला तसं ते तिघेही हसले.

" तूच रे तूच भावा... " शशांक त्याला टाळी देत हसला.

" आता भावा बोलतच आहेस तर तेवढी वहिनी पण शोध तुझ्यासाठी..." करण गुगली टाकत म्हणाला.

" अॉ भाई तुम्ही तर कॉर्पोरेट वाले लोक... आणि तुमच्यावर चक्क मुलगी शोधायची वेळ यावी ? कारण तुमच्या मागे लाईनी असतात मुलींच्या तर " शशांक उवाच.

" ते फक्त कामासाठी असतं रे कॉर्पोरेटचं कॉर्पोरेट पुरतं. नाहीतर आमचं दुःख आम्हालाच माहित.... मी तर ठरवलं होतं सार्थकच्या लग्नात त्याच्याच करवली सोबत सेट होईल असं... पण इथे तर दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही. " करण अगदी सहज हसत म्हणाला. याचं दिग्विजय आणि शशांकला आश्र्चर्य वाटत होतं.

" मग करण तू एक टीचर वाईफ डिजर्व करतो. कारण तुला खरंच खूप गोष्टी शिकायला मदत होईल सार्थक नसताना..." दिग्विजय पण मिश्कील अंदाजात म्हणाला. पण टीचर वरून त्याला तिची आठवण आली. आणि तो स्वताशीच हसला.

" असं वाटतंय दिग्विजय बाबू तुम्ही तुमच्यासाठी एखादी टीचरच निवडणार किंवा already निवडलीय as a life partner... खरं का..." करण अगदी त्याच्या मनातलं ओळखत म्हणाला. यावर शशांकनेही त्याला कोपरखळी मारली.

" Nohh that's for you." दिग्विजय नाकारत म्हणाला. पण त्यांना समजायचं ते समजलं होतं.

" जाऊदे करण त्याचं काय, तो तर लग्न झालं तरी मान्य करणार नाही की तो आपटलाय ते... आपण आपलं बघूया. आणि तू म्हणालास ना की भाईची एखादी करवली पटवेन तर तुझ्यासाठी फक्त आता एकच suitable आहे. बाकी सगळ्या कुठे ना कुठे तरी सेट आहेत म्हणजे आज ना उद्या होतील." शशांक हसत म्हणाला. यावर दिग्विजयने टपली मारली त्याला...

" हो ते कळलं मला सकाळीच. पण तो निर्णय मी सार्थकवर सोपवलाय. लव गुरु आहे तो आपला... पण तुला हवी ती मदत करणार हं मी...तू बोल फक्त. कुठे अडलंय तुझं ते..." करण म्हणाला.

" तूच रे भाऊ तूच. बघितलंस का दिग्विजय नाहीतरी तू " शशांक नाटकीपणे म्हणाला.

" बरं. All the best. " दिग्विजय म्हणाला. तसं शशांकने खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे बघितलं. दिग्विजयने डोळे मिचकावले. आणि करण त्या दोघांची खेचाखेची बघून हसत होता.

" काय रे पोरांनो काय चाललंय तुमचं गुलूगुलू... जरा बघा समोरचे विधी म्हणजे तुमच्या वेळेस लक्षात राहील. " नानी डाफरत म्हणाल्या तसं ते जरावेळ शांत झाले. पण इशार्याने किंवा हळू आवाजात खुसफूस चालूच होती त्यांची...

" अगं ते किती फेरे झाले आतापर्यंत तू काऊंट केले का... " सौम्या आलिशाला म्हणाली.

" अरे वो पंडित है ना वहा, वो सब करेगा कुछ कम ज्यादा नहीं होगा. उसे इसीलिए बैठाया है वहापे..." आलिशा तिच्या अंदाजात बोलली. तसं सगळेच तोंड दाबून हसले.

" पाच झाले वाटतं ग, म्हणजे अजून तीन राहिले..." मितल सौम्याला म्हणाली. तसं नानींनी पाठीमागे वळून बघितलं.

" अगं राणी, सातवी फेरी चालूय आता... हे काय बघ झाली पण... " नानी म्हणाल्या. तसं कृणाल एकदा नानीकडे आणि एकदा मितलकडे वळून बघत होता.

" तुमच्यामुळे झालं सर. तुमच्याशी गप्पा मारत बसले त्या नादात गफलत झाली. चुकलं ना माझं काऊंटिंग..." मितल त्याला हळू आवाजात नाराजीने म्हणाली. तरी ते मागे बसलेल्या तिघाडीने ऐकलंच. कृणालला मात्र कळत नव्हतं असं काय केलं मी.


" अहं अहं.... " शशांकने मुद्दाम घसा खाकरला. तसं कृणालने बारीक नजरेने त्याच्याकडे कटाक्ष टाकला.

" तुला काय झालं खोकलायला..." सौम्या त्याला म्हणाली.

" खोकला आल्यावर खोकणारच ना की ओकू" शशांकचा तिला टोमणा...

" नाटकी आहे एक नंबरचा. आमचं बोलणं चालू असल्यावरच याला बरा खोकला येतो..." कृणाल म्हणाला तसं सगळेच हसले.

" नाही नाही नाटकं नाही करत तो, फक्त हसू आवरायचा प्रयत्न करतो खोकल्याच्या नावाखाली " करण म्हणाला. यावर शशांक सोडून सगळे हसले.

" अबे निदान दिलेल्या शब्दाला जरी जाग." शशांक उवाच. सौम्याने कान टवकारले.

" कसला शब्द आ ?" सौम्याने कान टवकारले.

" काही नाही ते आम्ही कृणालच्या लग्नाचं प्लानिंग करत होतो. आणि त्यात मी त्याला त्____ " करण पुढेही बोलतच होता तितक्यात शशांकने त्याच्या पायावर पाय दिला. तसं करण हडबडला.

कृणाल आणि मितलच्या लग्नाचा विषय निघताच त्या दोघांचे चेहरे उडाले. मितल कृणालकडे रोखून पाहत होती तर कृणाल शशांक आणि करणकडे... आणि दुसरीकडून सौम्या पण भुवया ताणून शशांककडे बघत होती. दिग्विजयने कपाळावर हात मारून घेतला. तर आलिशा आता काय नवीन कांड करतायत हे म्हणून काही होऊ शकत नाही यांचं अशा अर्थी त्यांच्याकडे बघत होती.

" अरे ए काय बोलताय तुम्ही... साल्यांनो माझं जुळायच्या आधीच तोडणार तुम्ही.." कृणाल उठून दिग्विजयशेजारी बसत त्यांना म्हणाला...

" सर तुम्ही तर गप्पच बसा. " शशांक त्याला मितलच्या टोनमध्ये चिडवत म्हणाला. कारण मितल त्याला सरच म्हणायची.

" एए माझ्या मितूला काय बोलशील तर खबरदार... " सौम्या पुढे सरसावली.

" मग तुला बोललं तर चालेल का तुला ?" करण उवाच.

" आणि माझी मितू.... ये कब हुआ. म्हणजे आम्ही येडे ?" कृणाल मितलकडे बारीक नजरेने बघत म्हणाला. ती हसली यावर. तसं त्याने डोळे वटारले तिच्याकडे बघून...


" आणि करण बेटा, तुला तर मी बघून घेईन. तू भी क्या याद रखेगा किस चीज से पाला पडा है तेरा... तुझ्यामुळे आम्ही हरलोय याचं रिवेंज मी घेणारच" सौम्या ठसक्यात म्हणाली.

" हे काय आता नवीनच ? यात माझा काय संबंध, मी तर सार्थकला दिलेला माझा शब्द पाळला. तुमची competition होती हे तर मला माहित पण नव्हतं. उगाच बळीचा बकरा बनवायचं नाही मला " करण म्हणाला.

" ऑ... तू तर स्वता येऊन बकरा बनलाय. त्याला आम्ही तरी काय करणार. दोष तुझा आहे. तू का नाचलास.." सौम्या

" अरे का काय, म्हटलं ना मी सार्थकला बोललो होतो त्याच्या लग्नात नाचणार आणि नाचलो त्यात काय चुकलं... ? आता काय नाचायची पण चोरी झाली का बाबोव देवा बघतोय ना रे " करण उवाच.

" हे असंच असतं. विषय लै हार्ड आहे बाबा करण... आम्ही मागचे दोन दिवस झाले भोगतोय. ये आता तू पण सोबतीला..." कृणाल अगेन उवाच. तसं मितलने त्याच्याकडे बघून काहीही नौटंकी करतोय अशा आविर्भावात बघितलं.

" असूदे ना भाई, अरे आपला करण हार्डवेअर इंजिनिअर आहे. मग हे असले हार्ड कम सेमी हार्ड विषय किस खेत की मुली त्याच्यासाठी..बरोबर ना दिग्विजय ?" शशांक बोललाच. तसं दिग्विजयने एक लूक दिला त्याला...

" असं वाटतंय हा काडीमास्टर शशांक स्वताचं तर नाहीच, पण दुसर्याचं पण बिघडवून टाकणारे दिग्विजय..किती आग लावतोय बघ हा. " कृणाल दिग्विजयच्या कानात कुरबुरला.

" त्याच्या विषयाचा रिझल्ट लावायची वेळ येईपर्यंत हा हेच कुटाणे करणार. नो डाऊट. स्वता खपून आपल्याला पण खपवणार. " दिग्विजय पण म्हणाला.

" अरे पोरांनो जरा म्हणून शांत बसेनात तुम्ही... काय लावलंय आता परत सुरू केलं का ? " नानी त्यांच्याकडे वळत म्हणाल्या.

" नाहीतर काय,नुसती कुजबुज चालूय यांची... काय करावं तरी काय यांचं ?" वसंतरावही डोक्याला हात लावत म्हणाले.

" काय करायचं म्हणून काय विचारता, अहो आता राहिलंय काय त्यांचं करायचं... लग्नच तर ना. लवकर उरकून टाका सगळ्यांचीच एकामागून एक. म्हणजे अशा कुरापती करायला उसंतच मिळणार नाही यांना..." इतका वेळ शांत बसलेल्या डॉ नेनेंनी संधी पाहून बरोबर गुगली टाकली.

" अगदी बरोबर बोलतोय संदीप... एकदाच काय ते उडवून टाकावा यांचा बार म्हणजे आपल्या डोक्याची झंझट जाईल. " नानी म्हणाल्या. तसं दादासाहेब हसले.

" झंझट जाणार नाही, उलट अजून वाढेल. " दादासाहेब हसू आवरत म्हणाले.

" पण काही का असेना जयवंत. खरंच रे लग्नाला आलेत सगळे, सौम्याच काय ते ती एकटीच लहान आहे. तोपर्यंत या बाकी सगळ्यांनी संसाराला लागावं. " वसंतराव म्हणाले.

" मग वाट कसली पाहताय मोठे बाबा. ?" शशांक उवाच. तसं ज्येष्ठ मंडळी हसली. आणि उरलेल्या गॅन्गने शशांककडे बघत खुन्नस दिली.

" शशांकचंच बघा सगळ्यात आधी, त्यालाच खूप घाई आहे. बाकी आम्हाला काही घाई नाही. " कृणाल म्हणाला.

" सच में, फिर शशांक का ही देखलो पहले. सबको परेशान कर रखा है बंदे ने.." आलिशा हसत म्हणाली. तसं परत हशा पिकला.

" इथे आधी एक लग्न चाललंय ते तरी होऊद्या. मग बाकीचं नंतर बघा. " सौम्या बोलली. आणि परत हशा...

" ओहहह खरंच का, म्हणजे तुलाही घाई झालेली दिसतेय " कृणाल उवाच. तसं सौम्याने रागीट लूक दिला त्याला. त्याने मात्र वाकुल्या दाखवल्या. सौम्याने पण याआधी मितलला असंच चिडवून हैराण केलेलं... त्याचाच रिवेंज घेत होता कृणाल. Krunal be like सबका बदला लेगा तेरा फैजू


" What the hell is that, मागच्या आठवडाभरात शांतता नावाचा प्रकारच अदृश्य झालाय. " दिग्विजय ने टोमणा मारला. तसं नानी खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे बघत होत्या. त्यावरून त्याने ओळखलं निशाणा बरोबर लागलाय ते.

क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all