प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग ८३ (अंतिम)

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
गौरवी चाप्टर -८३


सार्थक गौरवीच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नवदांपत्यांच्या हस्ते  सत्यनारायणाची पूजा विधीवत निर्विघ्न पार पडली. पूजा झाल्यानंतर सर्वांनी त्या दोघांना पून्हा एकदा भावी जीवनासाठी शुभाशिर्वाद दिले. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्रच केलं. अनेक गप्पा गोष्टी, मजा मस्ती करत सगळे एन्जॉय करत होते. मागच्या आठवडाभरात सगळ्यांना एकमेकांची इतकी सवय झालेली की आता उद्यापासून पुन्हा आपापल्या कामाला लागायचं होतं. त्यामुळे इथून निघण्यापूर्वी जरा जडावल्यासारखं वाटत होतं सर्वांनाच...


जेवणानंतर ते सगळे असेच हॉलमध्ये गाद्या, उशा टाकून बसलेले...

" चला बाबा सगळं झालं. आता आपण मोकळे झालो. खूप छान वाटतंय खूप छान आठवणी तयार झाल्या या दिवसात... " नानी आनंदाच्या भरात म्हणाल्या.

" एवढ्यात कसे काय मोकळे होणार बरं? अहो अजून ही एवढी सगळी पिलावळ आहे लग्नाची बाकी आपल्याकडे... " डॉ नेनेंनी गुगली टाकली. तसं सगळे ज्येष्ठ मंडळी हसले. आणि आपल्या चिल्लर गॅन्गला कुठे तोंड लपवू असं झालेलं.

" होईल त्यांचंही हळूहळू. जाऊदे अजून जरा वेळ... एकटे आहेत तोवर करतील मजा, परत तर लग्नानंतर आहेच सजा. कारण लग्न म्हणजे जबाबदारी... " वसंतराव म्हणाले.

" हो तेही आहे म्हणा. पण तसं म्हटलं तर आतापर्यंत खूप मजा मारलीय यांनी. मग आता चढवू एकेकाला सुळावर... म्हणजे I mean बोहल्यावर " डॉ नेने काही सहजासहजी विषय सोडणार नव्हते.

" नेने अंकल कोणत्या जन्मीचा सूड उगवत आहेत रे आपल्यावर... " कृणाल दिग्विजयच्या कानात पुटपुटला.

" कोणत्या जन्मीचा वगैरे नाही, याच मागच्या आठवडाभर आपण केलेल्या करतूतींचा... " दिग्विजय डोळे फिरवत म्हणाला. तसं कृणालने कपाळावर हात मारून घेतला.

" अरे संदीप एवढं म्हणतच आहेस तर तुझा रोख कुणाकडे आहे तेही सांग बाबा.. कारण हे नमुने इकडचं जग तिकडे झालं तरी काही थांगपत्ता लागू द्यायचे नाहीत. " नानी डॉ नेनेंना म्हणाल्या. तसं दादासाहेब, वसंतराव, मनोहरराव आणि माधवी हसले.

" हम्म आता तुम्हीच बघा बरं सार्थक गौरवीनंतर अनुक्रमे कुणाचा नंबर लागतो ते... " डॉ नेने दिग्विजय कृणालकडे बघत म्हणाले. तसं त्या दोघांनी मुद्दाम आपण काही ऐकलं नसल्यासारखं इकडेतिकडे बघत डोळे फिरवले...

" अंकल जी आप तो इतना confidence से कह रहे है तो जरूर कोई वजह होगी है ना नानी? " आलिशाने आता मध्ये उडी घेतली.

" तर तर... म्हणजे आता संशोधनाचा कस बाकी आहे तर हो ना... " शशांक उवाच. गप बसेल तो शशांक कसला...

" तुम्ही संशोधनाचं काय घेऊन बसलाय, कुणावर संशोधन करायचं आणि कधी करायचं हेही त्यांचं फिक्स असेल... " डॉ नेने म्हणाले तसं सगळेच अवाक् झाले.

" सिनियर, ये कुछ ज्यादा नहीं हुआ? " सार्थक डॉ नेनेंना म्हणाला.

" काय ते आता तुम्हालाच माहिती बाबा, आम्ही तर जोवर आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत काही बोलू शकत नाही. " नानी म्हणाल्या. आणि त्यांनी दादासाहेबांकडे हळूच तिरपा कटाक्ष टाकला. तसं दादासाहेबांनी ' आता माझं काय यात' अशा अर्विभावात त्यांच्याकडे बघितलं.

" Relax guys... नेने अंकलना असंच अध्येमध्ये काहीतरी पिल्लू सोडायला आवडतं... " सौम्या दिग्विजय कृणालसाठी सरसावली.

" हा पिल्लू... बेटा तू सचमें अभी भी पिल्लू है... आली मोठी " नेने अंकल अगेन... शशांकला मात्र कोणे हसू फुटत होतं यावर...

" हे भारी होतं हा अंकल... पिल्लू.. आता यावरून उद्या तुमच्यावर केस पण होऊ शकते. गुन्हा काय तर, पिल्लू को पिल्लू बोल दिया... " शशांक मोठमोठ्याने हसत म्हणाला. तसं सौम्या त्याच्याकडे रागाने बघायला लागली. त्याला मात्र अजून हसू येत होतं.

" ये सुधरेगा नहीं साला... चाहे टॉपिक कौनसा भी हो, घुमा फिरा के ये सोमी पर ही फिसल जाता है.. और फिर भी उसीसे चाहने की उमीद रखता है " आलिशा म्हणाली. ते शशांक आणि सौम्या सोडून सगळ्यांनी ऐकलं. कारण ते दोघे तर एकमेकांना लूक देऊन मनातल्या मनात सुनावण्यात बिझी होते. सगळ्यांना हसू आवरत नव्हतं.

" बरं हे सगळं राहुदे. गौरवीचं सामान आता सार्थकच्या खोलीत शिफ्ट केलंय. तुम्ही जाऊन झोपा. आम्हीही निघतोच थोड्या वेळात... " माधवी त्या दोघांना म्हणाल्या.

" हो हो तुम्ही दोघे जा. नाहीतर अजून थोडावेळ थांबलात इथे तर परत ही टवाळखोर काही वाट सोडायचे नाहीत... " नानीही म्हणाल्या. तसं ते दोघे शांतपणे तिथून निघाले.

" नानी तुम्ही गौरवीला काही गोष्टी सांगितल्यात ना म्हणजे.... " माधवी हळूच नानींच्या कानात म्हणाल्या.

" नाही ग मी असं काहीच सांगितलेलं नाहीये तिला. ती नासमज नाहीये, आणि त्याहुन जास्त म्हणजे सार्थक... तोच तिला व्यवस्थित समजावेल आणि सांभाळून घेईल. त्यामुळे आपल्याला काळजीचं काही कारण नाही. लाखात एक आहे माझी लेक आणि त्याहुन जास्त आपला सार्थक... " नानी प्रेमाने म्हणाल्या. तसं माधवीलाही खूप बरं वाटलं.

आणि नेमकं जाता जाता सार्थक गौरवी च्या अस्पष्ट हे कानावर पडलं. आणि ते त्यावर काही न बोलता त्यांच्या खोलीत आले. तर पूर्ण रूम फुलांनी सजवलेली होती. गुलाब, निशिगंध या फुलांचा सुवास रूमभर पसरलेला होता.

" वाह, हे सगळं कधी केलं असेल त्यांनी... किती मस्त दिसतंय. त्यात हा फुलांचा सुगंध तर " सार्थक रूमभर नजर फिरवत म्हणाला.

" खाली जेव्हा आपण पूजेसाठी गेलो त्यानंतर सगळ्यांची वर खाली चालू होतं तेव्हाच उरकलंय हे काम... " गौरवी स्पष्टपणे म्हणाली. तसं सार्थकने तिच्याकडे बघितलं.

तिची निरीक्षण क्षमता अफाट होती हे त्याला माहितीच होतं. पण लग्नाच्या एवढ्या सगळ्या गोष्टींनंतरही ती जरा सुद्धा डिस्टर्ब किंवा हेक्टीक झालेली, वैतागलेली वाटत नव्हती. तिचा sense of humour म्हणजे तिला कायमस्वरूपी मिळालेलं वरदान असावं असंच वाटून गेलं त्याला... आणि तो मंद हसला या विचाराने... तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता. तसं तिने त्याच्याजवळ जात हलकेच त्याच्या गावावरून हात फिरवला.

" Tired? Hmm? " तिने त्याच्याकडे बघत विचारलं.

" हो पण आणि नाही पण... हे पंधरा दिवस मला  पंधरा वर्षासारखे वाटले माहितीये. त्यामुळे नक्कीच आतापर्यंत मी कंटाळलो होतो. But your touching adorable treatment..  And Now I'm full fine. " सार्थक तिला अजून जवळ ओढत तिच्या कपाळावर प्रेमाने हलकेच नाक घासत म्हणाला. तसं ती हसलेली हे त्याने डोळे बंद असूनही बरोबर ओळखलेलं. आणि नकळत त्याचे ओठ तिच्या गालावर पडलेल्या खळीचा वेध घेण्यासाठी सरसावले.

" गौरवी कशी आहेस ना तू... जशी आहेस तशीच आवडतेस मला, वेडावतेसही... I love you " असं म्हणत सार्थकने तिच्या गालांवरून ओठांकडे आगेकुच केलं. And she responded well..


थोड्या वेळाने ते दोघे विलग झाले. पण अचानक सार्थकला फार हसू येत होतं. आणि तो तोंड दाबून हसायला लागला. गौरवीला कळलं नाही याला अचानक काय झालं हसायला. म्हणून ती त्याच्याकडे बघत होती.

" तुला सांगू मला का हसू येतंय... म्हणजे तसं हसू येत नाही. पण ना मला ती गोष्ट आठवून खूप अप्रुप वाटतंय आणि तेवढाच गिल्टी... " सार्थक त्याच्या कपाळावर बोटं प्रेस करत म्हणाला.

" काय झालं असं? " गौरवीने विचारलं.

" आता नानी आणि आईचं बोलणं ऐकलंस ना. म्हणजे जेव्हा हे पहिल्यांदा घडलं तेव्हा आपण दोघे किती गोंधळलो होतो ना... याचं हसू येतंय. आणि तेव्हा मी जरा केअरलेस पण वागलो त्याचं गिल्ट... " सार्थक संमिश्र भावनेने म्हणाला. तेव्हा त्याने नजर वळवलेली.

गौरवीने त्याच्या हनुवटीला धरत त्याचा चेहरा तिच्याकडे वळवला. तो तिच्याकडे जरा अपराधी भावनेने पाहत होता. आणि ती त्याच्याकडे प्रेमाने आणि तितक्याच अभिमानाने पाहत होती.

" सार्थक तू खूप छोट्या गोष्टींचा विचार करतोस. At that time, we both are careless. That is why it's happened. कारण ते तेव्हा नाहीतर आता हे घडलंच असतं ना. Chill dude.. " ती त्याच्या नाकावर नाक घासत म्हणाली.

" तेव्हा नाहीतर आता म्हणजे... " सार्थक नाटकीपणे म्हणाला. यावर तिने फक्त त्याच्याकडे बघून स्माईल केली. आणि त्याने तिला परत अजूनच जवळ ओढलं.

" झुकायचं नाही, झुकवायचं... हा तुझा अजेंडा एकदम भारी आहे. आणि इथेच मी घसरलो. आणि आपटलोही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. " तो तिच्या डोळ्यात बघत बोलत होता. तीही त्याच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत होती.

" प्रत्येक गोष्ट जी मनात असेल ती लगेच योग्य शब्दात बोलून कसं दाखवतोस तू... हा प्रश्न मला अजूनही पडतो. तुझं natural behaviour आणि प्रेमळ, लाडिक अंदाज खूप आवडतो मला सार्थक. तू नेहमी असाच रहा. जर कधी मी प्रोब्लेम असले तर तू सोल्युशन असशील, कधी तू तेल तर मी मीठ, तू आभाळ तर मी धरती, तू ध्वनी तर मी वाणी, तू शायर तर मी शायरी....  And so on. असंच दुतर्फा असलो तरी ज्या त्या सिच्युएशन नुसार एकमेकांना, एकमेकांच्या मदतीने हॅन्डल करू शकतो. हा विश्वास, हीच प्रेम करण्याची भावना, समोरच्याला त्याच्या मताने नाही तर मनाने जाणण्याची ही कला मी तुझ्याकडून शिकलेय. तू आमच्या आयुष्यात आहेस हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, especially माझ्यासाठी आणि दिग्विजय साठी... तुला मिळवण्याची भावना नव्हती, पण तुला गमवायलाही भीती वाटायची. त्यामुळे आताचा हा क्षण खरोखर अविश्वसनीय आहे. प्रेमात दोघेही हरले तर तर ते प्रेम जिंकलेलं असतं असं तूच म्हणालेला ना... Then it same applies to us. " गौरवी अगदी मनापासून बोलत होती.

सार्थक एकटक तिच्याकडे बघत होता. ती बोलताना तिच्या चेहर्यावर बदलणारे भाव, तिचे हसणारे डोळे, भिरभिरणार्या पापण्या, रूंदावणारे ओठ आणि त्याहुन कितीतरी पटीने जास्त तिचे प्रभाव पाडणारे शब्द नि त्याआड असंख्य भावनांचा रीळ हे सगळं तो अनुभवत होता. ती नेहमी मोजकंच बोलायची. पण तिचे डोळे मात्र सगळं सांगून जायचे. पण आज ती शब्दांच्या साहाय्याने आणि भावनेच्या आवेगाने तितक्याच अगतिकपणे मनापासून बोलत होती. तिने थांबल्यावर त्याच्याकडे बघितलं. तो ऐकण्यासाठी आतूर असलेला तिच्या प्रत्येक शब्दाला त्याच्या हद्याच्या भांडारात जपत होता. ते बघून तिने हलकेच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आणि तिथून नाकाला स्मूच करून ती ओठांजवळ येऊन थांबली. तसं त्याचे ओठ रूंदावले.  कारण तो स्माईल करत होता. आणि तिने हसतच त्याचे ओठ जायबंदी केले. त्यानंतर मात्र दोघेही रात्रभर एकमेकांच्या प्रेमात तन, मनाने आकंठ बुडालेले... कायमचं एकरूप होण्यासाठी...



क्रमशः _____ हा शब्द इथे आज लिहावा की नाही हा प्रश्न पडलाय. पण तरी गौरवी आणि सार्थक इतक्यात आपला निरोप घेणार नाहीत. त्यांचा पुढील संसारिक प्रवास पाहण्यासाठी तुम्ही अनुकूल असाल तर नक्कीच आपल्याला तो अनुभवता येईल.

गौरवी ही माझी पहिली मोठी कथामालिका आहे. यामुळेच मला ओळख मिळाली. आणि विशेष म्हणजे ही फक्त कथा नसून प्रेरणा, जीवनकहाणी आहे माझ्यासाठी. एक लेखिका म्हणून मी यातलं प्रत्येक पात्र जगलेय. त्यांच्या भावना माझ्या काळजातल्या कुपीतून एकेक शब्दबद्ध केल्यात. आणि या कथेला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. माझ्याइतकंच या कथेतील प्रत्येक पात्रावर तितकंच प्रेम केलंत. माझ्या या सहप्रवासाचे भागीदार झालात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!!!

आता याउपर काही बोलायला मला शब्द सुचत नाहीत. पण तरी A BIG THANKS TO EVERYONE...

गौरवीला जसं प्रेम दिलंत तसंच इतर कथांनाही द्या. काही चुकत असेल, असंबद्ध वाटत असेल तर विनासंकोच सांगा. आणि काळजी घ्या खुश रहा.


🎭 Series Post

View all