Login

अनपेक्षित बंधन...९

अनपेक्षित बंधन..
आतापर्यंत.........

"हो आई..त्याने तसे लेटर लिहिले आहे अन् तो कुठे आहे तेच बघतोय मी...."म्हणतच तो परत कोणालातरी फोन लावत होता...

         तशी सुकन्या ची नजर मायाच्या वडिलांवर गेली अन् ती त्याचा विचार करुन तर हादरूनच गेली..

एका मुलीच्या बापाची काय गत होते हे तिला कल्पना करूनच दुःख होत होते.....तीही तशीच तिथे थांबून राहिली कि प्रेम परत येईल का ....म्हणतच.....काय करून ठेवले हे म्हणतच ती मनातच त्याला दोष देत होती...


पुढे.............

मायाची तर तिकडे बाहेर पाटावर थांबूनच तिची थरथर व्हायला लागली होती‌..सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या होत्या अन् तिला तर तिथून हलता ही येत नव्हते. सगळ्यांचे बोलणे तिच्या कानावर पडत होते...

"नवरा मुलगा पळून बिळून गेला कि काय...
काय ते नशीब इतकी गुणी अन् सुंदर पोर पण तिच्या नशीबात काय लिहलय देवाने काय माहित.....
हिला आता परत जावे लागेल कि काय...काय होणार हिचे कोण करणार हिच्याशी लग्न... मांडवातून परतलेल्या मुलीशी लग्न.....बट्टा लागला कि पोरीला.......काय घडले असेल मुलगा का येत नसेल बाहेर अन् जे कोणी त्याला बोलवायला गेले ते सगळेच तर आत जाऊन बसत आहेत बाहेर यायचे नावच घेत नाहीत..
       नक्की च काहीतरी घोळ झाला असेल म्हणतच तिथे जमलेली एक एक करत सगळीच पाहुणे मंडळी कुजबुज करत होती... अन् माया ते फक्त ऐकत घेत अगदी तिच्या मनावर दगड ठेवून उभी होती..
              तशी आत्या तिला धीर देतच बोलली.

"माया तू नको लक्ष देऊ काहीतरी प्रोब्लेम झाला असेल येईलच प्रेम... इतक्यात.."म्हणतच त्या तिला सावरत होत्या...पण ती जरी चेहऱ्यावरून जरी खंबीर वाटत असली तरी ती मनातून पूर्ण पुणे हादरली होती..
      तिचे मन तर आतून पूर्ण पोखरून गेले होते...काय होणार अन् काय नाही याचा विचार तर मनात नव्हताच पण तिच्या घरच्यांना किती काय काय सहन करावे लागेल...यानेच ती परेशान होत होती.....इतका जो तामजाम केला गेला होता तो असा या प्रसंगाने अगदीच मातीमोल होणार होता अन् तीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी किती जणांकडून पैसे व्याजाने घेतले होते..
अन् तिला तिच्यापेक्षा तिच्या वडिलांची जास्त काळजी वाटत होती...अन् ती तिच्या मनाला अगदी कठोर करतच तिथे तशीच थांबून सगळ्यांचे बोलणे ऐकत होती...

इकडे आत मध्ये....अविनाश रावांची तर हालत जास्तच नाजूक होत होती अन् ते तर खूपच काळजीत पडले होते कि त्यांच्या लेकिचे कसे होणार काय सांगणार तिला अन् असं कसं तिला माघारु घेऊन जाणार... तसे  ते विचार करतच शिवराज रावांना बोलू लागले...

    "प्लीज तुम्ही काहीतरी करा प्रेम ला शोधून आणा हो माझी माया तिचं आयुष्य कस काढेल.... मी पाया पडतो तुमच्या माझ्या मायावर अशी वेळ आणू नका प्लीज शोधून आणा त्याला जिथे कुठे असेल.. प्लीज..." म्हणतच ते हात जोडून रडत होते..
तसा मोहन व अनिता ही आत आले अन् त्यांना तसे रडताना पाहून तेही त्यांच्याजवळ जात अनिता बोलू लागली..

   "काय झाले अन् तुम्ही  असे का करताय अहो काय झाले...प्रेम कुठे गेलेत बाहेर कधीपासून गुरूजी बोलवत आहेत...बोलवा ना त्यांना....."म्हणतच अनिता सुकन्या कडे पाहत बोलली...
तशा त्या काहीच बोलू शकल्या नाहीत.. आता तर पृथ्वी चा ही आता नाईलाज होत होता.....
     सगळ्यासोबत बोलून झाले होते पण कुठेच प्रेम बद्दल काहीच समजत नव्हते... तसा तोही हताश होत मायाच्या फॅमिली कडे पाहू लागला...
      तशी सुकन्या ची नजर त्याच्यिवर गेली तशी ती त्याला खुणेणेच विचारू लागली कि काही समजले कि प्रेम बद्द्ल तसा तोही नकारातच मान हलवतच राहिला...
तशी सुकन्या त्याला पाहतच होती काही तरी बोलण्यासाठी कि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली तशा त्या त्याच्याकडे चमकून पाहतच त्याला बाजूला घेऊन गेल्या..व त्याला काहीतरी बोलणार कि तोच बोलू लागला..

"आई..काय करायचे ग आता आणि...बिचारी यांची फॅमिली त्यांची तर मान वर ही होणार नाही..काय करून बसला हा प्रेम... माहिती नाही कुठे जाऊन बसला आहे ते..कोणाला काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल....
काय करायचे ग माझे तर डोकेच चालत नाही...." म्हणतच तो मायाच्या आईवडिलांना पाहत होता..

तशी ती त्याला पाहतच बोलली.

    "पृथ्वी हे जे काही झालेय ते फक्त तूच निस्तारू शकतो.."तसा तो त्याच्या विचारातच बोलला.

    "आई पण  काय करू काहीच मार्ग सापडत नाही निस्तरायचा प्रयत्न करतोय पण कुठे काहीच रस्ता दिसत नाही..."
      म्हणतच तो हताश होऊन बोलत होता.
त्याला ही प्रेमच्या कृत्याची लाज वाटत होती अन् त्यात राग जास्तच येत होता...
अन् त्यात त्याला मायासाठीही वाईट वाटत होते.....तिला बाहेर ऐकावी लागणारी लोकांची ती बोल काय हालत झाली असेल तिच्या मनाची...अन् त्यात तिला तिथून हलता ही येत नाही काय केलंस हे प्रेम....'
म्हणतच तो मनातच विचार करत होता..तशी सुकन्या त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढतच बोलली..

     "पृथ्वी..."तसा तो तिच्याकडे पाहू लागला..
तशा त्या बोलू लागल्या..

   "पृथ्वी तू कर लग्न तिच्याशी .."तसा तो तर तीन ताड उडालाच अन् जोरातच ओरडत बोलला.

"काय...काय बोलतेय तू हे...."
तसे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या...तसा तो सुकन्या ला बोलू लागला..

"आई तू काय बोलतेय कळतंय का तुला अन् मी हे असं काही ही करणार नाही...असा विचार ही मनात आणू नको मी नाही करणार कधीच कोणाशी लग्न तुला हे चांगलंच माहीत आहे तरी तू मला असं बोलतेय..."
      म्हणतच तो अगदी रागाने बोलत होता.तशा त्याही बोलू लागल्या...

  "पृथ्वी मला माहित आहे पण अरे त्या बिचाऱ्या मायाची काय चूक या सगळ्यात ती तर तीथेच मांडवात वरमाला घेऊन थांबली आहे..
ती आपल्या घरची सून होणार होती पण प्रेम असे काही करेल यांची जराही कल्पना नव्हती....जर तसं काही असते तर मीच तिला आधी मांडवात पाठवून दिले नसते.. तिला असं सगळ्यांच्या समोर अपमानास्पद बोलून तर घ्यावे लागले नसते.‌

    अरे मुलांना कोण काही बोलत नाही पण मुलींचं जग अन् तिच जीवन खूपच अवघड असते रे अन् हे तुला नाही समजणार...अन् ती आता आपली जबाबदारी आहे तर ती आपल्या घरचीच सून बनणार पण ती पत्नी तुझी बनणार..."म्हणतच त्याही अगदी ठामपणे बोलत होत्या....अन् त्या दोघांचे बोलणे ऐकून अविनाश लगेच जागेवरून उठले व ते लगेच जाऊन पृथ्वीच्या पायाला धरून बोलू लागले..


   "हो तुम्ही करा तिच्याशी लग्न मी पाया पडतो हो तुमच्या माझ्या लेकिचा असा बाजार मांडू नका तुम्ही तरी तिला पदरात घ्या ..भरं मांडवात येऊन ती परत घरी गेली तर हे जग अन् हा समाज तिला जगू देणार नाही..अन् सगळा दोष तिच्यावरच लावला जाईल..मी भीक मागतो माझ्या लेकिसाठी प्लीज तुम्ही तरी माझ्या मायाला सांभाळून घ्या...."म्हणतच ते रडत होते....

तसा मोहन लगेच समोर येतच त्यांना उठवत बोलला.

   "काय करताय तुम्ही हे का इतकी विनवणी करताय....त्यांचि नाही झाले लग्न तेच बरे झाले लग्नानंतर जर समजले असते अन् तो तेव्हा माया ला सोडून निघून गेला असता तर काय करणार होतो आपण... त्यापेक्षा हे लग्न झाले नाही तेच योग्य झाले...."म्हणतच तोही रागाने बोलत होता..तसे ते त्यालाच चिडून बोलू लागले‌.

     "तू शांत बस तू नको सांगू मला काय योग्य अन् काय अयोग्य...
जेव्हा माया परत घरी येईल तेव्हा हा समाज आपलीच माणसे तिला सुखाने जगू देणार नाहीत..तू आता या जगात आला आहेस तुला अजून माहिती नाही या जगाची रीत कि कसे ते एखाद्याला हे जग सोडण्यास प्रवृत्त करतात ते मी स्वतः च्या डोळ्यांनी बघितले आहे....नकोय ते मला परत..मी आधीच माझी एक बहिण गमावली आहे आता मला परत माझ्या मायाला गमवायचे नाही..." म्हणतच ते परत पृथ्वी कडे पाहतच बोलले.....

         "मी याच्या वतीने माफी मागतो,याला अजून जाण नाही ...पण हे नाते नका तोडू...माझ्या मायाला तुमच्या नावाचे कुंकू लावून तिला तुमच्या घराची सून बनवा..."म्हणतच ते हात जोडून उभे होते..

अन् पृथ्वी ला तर काही समजतच नव्हते कि काय करावे ते...तो तसाच त्यांना पाहत होता..तसे शिवराज ही त्यांच्या जवळ येतच बोलले.

    "हो पृथ्वी मीही तुझ्यासमोर हात जोडतो आपल्या घराची लाज राख...तूच यातून सगळ्यांना तारू शकतोस...हो म्हण या लग्नासाठी अन् मांडवात उभा रहा...प्रेमच्या जागी....."म्हणतच ते पृथ्वी कडे पाहत होते....अन् तो तर त्याच्याच विचारत हरवत चालला होता....