आतापर्यंत.........
"मी याच्या वतीने माफी मागतो,याला अजून जाण नाही ...पण हे नाते नका तोडू...माझ्या मायाला तुमच्या नावाचे कुंकू लावून तिला तुमच्या घराची सून बनवा..."म्हणतच ते हात जोडून उभे होते..
अन् पृथ्वी ला तर काही समजतच नव्हते कि काय करावे ते...तो तसाच त्यांना पाहत होता..तसे शिवराज ही त्यांच्या जवळ येतच बोलले.
"हो पृथ्वी मीही तुझ्यासमोर हात जोडतो आपल्या घराची लाज राख...तूच यातून सगळ्यांना तारू शकतोस...हो म्हण या लग्नासाठी अन् मांडवात उभा रहा...प्रेमच्या जागी....."म्हणतच ते पृथ्वी कडे पाहत होते....अन् तो तर त्याच्याच विचारत हरवत चालला होता....
पुढे.......................
पृथ्वी तर सगळ्यांचे शब्द ऐकून तर अचंबितच झाला होता..अन् तो अजूनही त्याची पहिली बायको कविता तिच्या आठवणीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होता... आता कुठे तो काम अन् घरच्यांशी बोलणे करत होता,
नाहीतर तो दिवसभर त्याच्या रूममधून बाहेर यायचाच नाही..तो त्याच्या जगात तिच्या आठवणीत रमून असायचा पण असे हे मध्येच त्याला लग्नासाठी उभं राहायला सांगत होते अन् त्याने त्याचा नुसताच मनस्ताप होत होता..
नाहीतर तो दिवसभर त्याच्या रूममधून बाहेर यायचाच नाही..तो त्याच्या जगात तिच्या आठवणीत रमून असायचा पण असे हे मध्येच त्याला लग्नासाठी उभं राहायला सांगत होते अन् त्याने त्याचा नुसताच मनस्ताप होत होता..
पृथ्वी अगोदरपासूनच हुशार शांत अन् तितकाच रागीट स्वभावाचा होता.. त्याचे अन् प्रेमचे दोघांचे स्वभाव अगदी एकमेकांच्या विरूद्ध होते....पण परिवारासाठी नेहमी एक व्हायचे... पृथ्वी दिसायला हॅण्डसम रूबाबदार अन् त्याला पाहून कोणाचीही नजर त्याच्यावर खिळून राहील असाच होता. त्याचा औरा तो तर वेगळाच होता.. एक वेगळाच रूबाब असायच्या त्याच्या चालढाल मध्ये....
आता ही तिथे कित्येक जणांना तर हेच वाटत होते कि त्याचेच लग्न आहे कि काय...पण तो तर एका मुलाचा बाप होता ..त्यांच्या चेहऱ्यावरून असे काहीच वाटत नव्हते कि त्याला एक मुलगा असेल..पण हेच खरे होते...
त्याचे लग्न अगोदरच झाले होते ..मग तो असा कसा माया शी लग्न करणार होता तेही तिला काहीच माहिती नसताना..तो त्याच्याच विचारात होता कि अविनाश राव त्याला भानावर आणतच बोलले.
"पृथ्वी तुम्ही करा ना माझ्या लेकि शी लग्न...अन् हे जर लग्न नाही झालं अन् ती परत माघारी आली अन् तिने नंतर तिच्या जीवाचे काही बरे वाईट करून घेतले तर....मला हे व्हायला नकोय..."म्हणतच ते घाबरून विनवणी करत होते.....तसा तो
त्यांना हाताला धरूनच उठवत बोलला.
"तुमची काळजी कळतेय मला पण ती शिकली सवरलेली आहे ती असं काहीही करणार नाही ती समजूतदार आहे तुम्ही का असे बोलताय..."
तसे ते परत बोलले.
तसे ते परत बोलले.
"माणसाची वेळ खराब असली कि कितीही समजूतदार किंवा शिकलेला व्यक्ती असला तरी नियती असे काही चक्र फिरवते कि काहीच कळत नाही. काय चूक अन काय बरोबर ते......अन जे व्हायला नको असतं तेच होऊन बसते....अन् मला हे व्हायला नकोय....मी अगोदर हे असं सर्व पाहिलय आता परत नाही बघायचेय "म्हणतच ते त्यांच्या जुन्या आठवणी आठवत बोलत होते.
तशी अनिता त्यांच्या जवळ येतच बोलू लागली.
"अहो नका ना इतका त्रास करून घेऊ काहीही होणार नाही...ताई सारखे ती काहीच करणार नाही नका त्या आठवणी काढू ...आता..."
म्हणतच ती पृथ्वी कडे पाहत बोलली.
म्हणतच ती पृथ्वी कडे पाहत बोलली.
"यांच्या बहिणीचे ही असेल लग्न मोडले होते भरमांडवातून तिला माघारी परतावे लागले...त्यांची वरात माघारी गेली तेही नवरीला न घेता.... अन् तो अपमान ते दुःख त्या सहन करू शकल्या नाहीत अन् त्यांनी आत्महत्या केली....
अन् आता मायाचे ही असे झाले तर..... नाही म्हणू नका माझ्या लेकीला परत पाठवू नका तिला तुमच्या घराचा मान मिळवून द्या..."म्हणतच ती सुकन्या कडे पाहत हात जोडत होती...
अन् आता मायाचे ही असे झाले तर..... नाही म्हणू नका माझ्या लेकीला परत पाठवू नका तिला तुमच्या घराचा मान मिळवून द्या..."म्हणतच ती सुकन्या कडे पाहत हात जोडत होती...
तसा पृथ्वी ही विचारात पडला कि काय करावे आता..त्याला तर कोणता मार्ग निवडावा हेच कळत नव्हते...तो अजूनही कविताच्या आठवणीत होता अन् पूर्ण आयुष्य तो तिच्याच आठवणीत घालवणार होता... त्याचे जीवन फक्त त्यांच्या मुलासाठी जगत होता पण हे मध्येच असे काय घडतेय ते त्याला कळतच नव्हते...
तशी सुकन्या परत त्याला पाहून बोलू लागली..
तशी सुकन्या परत त्याला पाहून बोलू लागली..
"पृथ्वी होकार दे ...अन् तसं ही तू किती दिवस तिच्या आठवणींना कवटाळून बसणार आहेस...तुला ही जीवनसाठी जोडीदार हवाच ना..."तसा तो रागातच तिला पाहत बोलला.
"माझा जोडीदार जीवनसाथी तीच होती अन् तीच असेल कायमची..."
तशा त्या परत बोलल्या.
"हो.... ती होती !! पण आता....आता आहे का ती नाही ना मग का तू तिच्या आठवणींना धरून बसला आहेस...अजून बरंच आयुष्य बाकी आहे अन् तू ते एकट्याने काढणार का...बरं ठीक आहे मी मान्य करते कि तुला जोडीदाराची गरज नाही..पण अरे विराज.....!!
त्याच काय.....??
त्याला आईची गरज आहे ना...आता तो लहान आहे रे पण जसा तो मोठा होत जाईल तशी तशी त्याची आई विषयीची ओढ ती कमी जाणवेल तेव्हा काय करणार अन् त्याने जर विचारले कि त्यांची आई कुठे आहे...माझ्या आईला परत घेऊन या...तर....तू तेव्हा काय सांगणार आहेस.....
कोणी कितीही केल,कितीही माया लावली,
तरी आई ची किमया येत नाही.. त्यासाठी आईचं असावी लागते.....
तरी आई ची किमया येत नाही.. त्यासाठी आईचं असावी लागते.....
अरे तुला अजूनही मी नजरेसमोर हवी असते मग ते तर तान्ह आहे रे अजून...तु तुझा विचार करून मोकळा झालास पण त्याच काय..??
त्याच तर पूर्ण जग अधूरं आहे..अजून सुरूवात झाली नाही त्याच्या जीवनाची....मग तो आई शिवाय कसा राहणार ....
आता तो त्याच्या मावशीकडे आजीकडे आहे पण त्याला त्याची हक्काची व्यक्ती हवी आहे...त्याने निताला आई म्हणायला हवं का तुला चालणार आहे का ते......" म्हणतच त्या त्याला पाहत होत्या.
तसा तो रागातच त्यांना पाहत बोलला.
त्याच तर पूर्ण जग अधूरं आहे..अजून सुरूवात झाली नाही त्याच्या जीवनाची....मग तो आई शिवाय कसा राहणार ....
आता तो त्याच्या मावशीकडे आजीकडे आहे पण त्याला त्याची हक्काची व्यक्ती हवी आहे...त्याने निताला आई म्हणायला हवं का तुला चालणार आहे का ते......" म्हणतच त्या त्याला पाहत होत्या.
तसा तो रागातच त्यांना पाहत बोलला.
"नाही...मला ती नकोय माझ्या मुलाच्या लाईफ मध्ये...तेही आईच्या रूपात.....ती कवितांची बहिण होती अन् तिच राहणार..ती विराज ची मावशी आहे अन् तेच राहणार.....त्यात काहीच बदल होणार नाही..."
म्हणतच तो अविनाश रावांना पाहतच बोलला
"ठीक आहे मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला... पण त्याआधी मला तुमच्याशी काही बोलायचे आहे ....माझ्याविषयी काही सांगायचे आहे...तुम्हाला माहिती आहे कि नाही मला माहीत नाही पण मी सांगणे गरजेचे आहे...."तसे अविनाश,मोहन ,अनिता त्याच्याकडे पाहू लागले.
" माझे लग्न अगोदरच झालेले आहे अन् मला दीड वर्षाचा मुलगा आहे...माझी पत्नी कविता तिचा एका अपघातात मृत्यू झाला...मी मुळात लग्न च करणार नव्हतो पण फक्त तुमचा मान अन् तिचा जीव वाचवण्यासाठी मी होकार देतोय....पण तिला ही गोष्ट लग्न लागण्या आधी माहिती असायला हवी...तिला नंतर असे वाटू नये कि तिला धोका दिला गेला आहे.... तिला अंधारात ठेवून लग्न लावले गेले...त्यासाठी आधी तुम्ही तिच्याशी बोलून घ्या..."
तसे अविनाश राव बोलले.त्याला आडवतच बोलले..
"मी बोलेन तिला नंतर तुम्ही आधी मांडवात चला तुम्ही मला सांगितले म्हणजे झाले ती माझ्या शब्दाबाहेर नाही...आता तिला तिथून उठवून आत घेऊन येणे योग्य नाही तुम्ही चला बाहेर मी बोलेन तिच्याशी...."म्हणतच ते त्याला बाहेर चालायला सांगत होते.
पण तो तरी बोलला.
पण तो तरी बोलला.
"हो पण एकदा तिला कळला....."तसे तिची आई बोलली.
"आता वेळ नाही तुम्ही चला बाहेर ती समजुन जाईल सगळे अन् मुळात ती हे बोलले तसे यांच्या शब्दांबाहेर नाही.. तुम्ही चला..."म्हणतच ती ने ही त्याला तयार व्हायला लावले तसे सुकन्या त्यांच्या चेहऱ्यावरून बोटे मांडून अगदी आसवे गाळत होत्या....
तसा तो तिला पाहतच बोलला.
तसा तो तिला पाहतच बोलला.
"आई ..आता का रडतेय करतोय ना तुमच्या मनासारखे....पण माझ्याकडून या नात्याला लगेच निभावण्याची जबरदस्ती करू नका ती फक्त विराज ची आई म्हणून या घरात येईल अन् तुमची सून माझी बायको म्हणून नाही....."तशा त्या परत संभ्रमात पडल्या....
याच्या अशा बोलण्याने त्या पोरीला परत आडातून काढून विहिरीत ढकल्यासारखे तर करत नाही ना मी....म्हणतच त्या विचार करत होत्या..तसे शिवराज त्यांच्या जवळ येतच बोलले.
"नको इतकं टेंशन घेऊ होईल सगळं ठीक.... अन् मुळात ती माया आहे,सगळ्यांना मायेने बांधून ठेवणारी... अन् एक दीवस असा येईल कि आपला हा अकडू ही तिच्या बंधनात अडकून जाईल..नको विचार करू जास्त चल बाहेर...मी घेऊन येतो त्याला..."म्हणतच ते तिला सांभाळत होते....
तशा त्या तरीही विचार करतच बोलल्या..
तशा त्या तरीही विचार करतच बोलल्या..
"अहो पण...."तसे ते तिला आडवतच बोलले.
"आता पण बीन काही बोलू नको तू... चल बाहेर आलोच मी त्याला घेऊन...."म्हणतच त्यांनी तिला बाहेर पाठवले...
तशा त्याही विचार करतच तिथून बाहेर आल्या..पण काही केल्या त्यांचे विचार काही कमी होत नव्हते...
तशी ती मायाला पाहतच तिच्याकडे गेली...व तिच्या जवळ जातच बोलली.
"गुरूजी मी नवरीला थोड आत घेऊन जाऊ शकते का...? नाही म्हणजे तिचा पाठीमागून पदर खाली लोंबकाळतोय तर ते जरा ठीक करून घेऊन येते..किती वेळ झाले ती तशीच उभी आहे....अजून विधिला सुरुवात झाली नाही ना तर मी घेऊन जाऊ का तिला आत..."
तसे ते गुरूजी मायाकडे पाहतच विचार करतच बोललो...
बिचारी पोर कधीची वाट पाहतेय धड तिला कोणी आत सुध्दा घेऊन गेल नाही...काय होणार आहे हिच त्या परमेश्वरालाच माहित म्हणतच ते बोलले
"हो हो जा घेऊन...नवरा मुलगा आला कि परत घेऊन या..."म्हणतच त्यांनी होकार दिला तसे सुकन्या मायाच्या हाताला धरून तिला आत रूममध्ये घेऊन गेली....
Keep reading..................
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा