शीर्षक: प्रीतीचे फूल
शब्द फितूर होतात
लिहिल्या जातात भावना
तिच्या मनीचे भाव काव्यातून
त्याला कळावे हीच कामना
लिहिल्या जातात भावना
तिच्या मनीचे भाव काव्यातून
त्याला कळावे हीच कामना
अंतर हे नात्याचे
नेहमी कमी असावे
त्यात गैरसमजाचे
सावट कधीच नसावे
नेहमी कमी असावे
त्यात गैरसमजाचे
सावट कधीच नसावे
झुला आठवणींचा
फक्त मनातच नाही झुलतो
भेटीगाठीने,व्यक्तीने अन्
संवादानेही पुन्हा फुलतो
फक्त मनातच नाही झुलतो
भेटीगाठीने,व्यक्तीने अन्
संवादानेही पुन्हा फुलतो
खोलते त्याच्यासमोर
हृदयाचा हा कप्पा
मोकळी होते ती
फक्त हव्या तिला गप्पा
हृदयाचा हा कप्पा
मोकळी होते ती
फक्त हव्या तिला गप्पा
त्याच्याकडे बघून
चेहरा तिचा खुले
मनी त्याच्याही
प्रीतीचे फूल फुले
चेहरा तिचा खुले
मनी त्याच्याही
प्रीतीचे फूल फुले
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा