Login

प्रेमाचा ऋतू

पहिला प्रेमाचा ऋतू
अष्टाक्षरी काव्य लेखन

शीर्षक - प्रेमाचा ऋतू

प्रेम ऋतु बहरला
प्रेम वर्षावही झाला
फुलूनी वसंत नवा
ऋतू हा प्रेमाचा आला

झेंलू अंगावरी सरी
भिजू बेधुंद होऊनी
नव चैतन्याची वरी
आली लहर फिरूनी

चैतन्याची लहर ही
करी मोहित मनाला
धुंद होऊनी भिजलो
हर्ष नवा या प्रेमाला

प्रेम हे आपले नवे
दाखविन या जगाला
ऋतू आला भरून
रंग चढला प्रेमाला...