लव कल्लोळ - १२
तनयाचा एशिया दौरा एकूण सहा देशात होणार असतो. सर्वप्रथम ती रशियामध्ये पोहोचते आणि प्रत्यक्ष कंपनी ब्रांच इनिस्पेक्शन कामकाज चालू करते. कंपनीची नव्याने झालेली संरचना आणि कामकाज पद्धती, नियम, उद्दिष्टे, धोरणं वगैरे बाबत ती सर्व स्टाफला ब्रिफ करते. वार्षिक स्टॅटिस्टिकल माहिती तपासते. येताना सोबत आणलेली पुढची सर्व प्लॅन्स कॉपी समजावून सांगते. सोबत आलेला सुयश या सर्व कामात तिला खूप मदत करतो तसेच काही तांत्रिक बाबीसुद्धा मॅनेज करतो. असे पहिल्या दिवसाचे कामकाज तनया पूर्ण करते, डिनर करते आणि स्टे असलेल्या हॉटेल रूममध्ये जाते.
रूममध्ये येऊन फ्रेश होते नंतर घड्याळाकडे पाहते तर रात्रीचे दहा वाजलेले असतात. तिला शर्विलची खूप आठवण येते म्हणून ती मोबाईल पाहते तर शर्विलचे चौकशीचे मेसेज आलेले असतात आणि एक तासापूर्वी \"गुड नाईट\" असा शेवटचा मेसेज असतो. हे पाहून तिच्या अचानक लक्षात येते की रशियाचा टाईम झोन भारतापेक्षा अडीच तास मागे आहे. म्हणजेच आता भारतात मध्यरात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि शर्विलने साडे अकरापर्यंत माझी वाट पाहून शेवटी \"गुड नाईट\" असा मेसेज करून झोपलेला असेल.
"अरे यार..." ती स्वतःवरच चिडते आणि मोबाईल स्क्रीन ऑफ करते
तीसुद्धा ट्रॅव्हलिंग आणि दिवसभर ऑफिस वर्कमुळे थकलेली असल्याने झोपी जाते. दुसऱ्या दिवशी तिची रशियामधील मोठे दोन-तीन क्लायंटसोबत मिटिंग असल्याने सकाळी उठून शेड्युलप्रमाणे तिच्या पुढच्या कामकाजाला सुरुवात करते. हॉटेलबाहेर रशिया ब्रांचचा मॅनेजर व सुयश हे गाडी घेऊन तयारच असतात. सकाळी साडे दहा वाजता तनया आल्यानंतर ते थेट क्लायंटच्या ऑफिसकडे जायला निघतात.
गाडीत बसताच तनया शर्विलला मेसेज करते "हाय शर्विल... गुड मॉर्निंग
शर्विल ऑनलाईनच असल्याने लगेच त्याचा रिप्लाय येतो "हॅलो... गुड आफ्टरनून"
तनया पुन्हा पुन्हा स्वतःची जीभ चावत स्क्रीनवरील ड्युअल क्लॉककडे पाहते, त्यात भारतात दुपारचे एक वाजलेले असतात. ती पुन्हा रिप्लाय करते,
"ओहह सॉरी सॉरी... गुड आफ्टरनून...
काय करत आहेस ?"
"ओहह सॉरी सॉरी... गुड आफ्टरनून...
काय करत आहेस ?"
"तुलाच मिस करत होतो आणि तुझा मेसेज आला" शर्विल
"अरे वा... माझी आठवण ! काही काम नाही वाटतं आज बॉसला" तनया
"तिकडे जाऊन आम्हाला विसरले काही लोकं, साधा रिप्लाय पण नाही देत" शर्विल
"सॉरी शर्विल... काल मी पूर्णवेळ कामच करत होते आणि रात्री जेव्हा मेसेजेस पाहिले तेव्हा तू झोपला होतास, टाईम डिफरन्समुळे असे झाले." तनया
"तनया किती सिरीयस होतेस... मला माहिती आहे तुझे शेड्युल. सॉरी काय लगेच ? आणि तसेही सुयशकडून मला माहिती मिळाली होती." शर्विल
"अच्छा तर आमच्यावर वॉच ठेवला जातोय... माहिती घेतली जातेय. थांब बघतेच उद्या सुयशला" तनया
"ए काहीही नको बोलूस, म्हणजे त्याने मला रात्री रिपोर्ट दिला होता त्यामुळे वेळेचे माझ्या लक्षात आले होते. मी उगाच तुला चिडवायला म्हणालो" शर्विल थोडा घाबरून रिप्लाय देतो
"आता कसं वाटतंय... आय नो शर्विल तू कामात किती प्रॉम्प्ट आहेस. तुझ्याकडून फार शिकायला मिळत आहे मलाही." तनया
"बास हा माझं कौतुक... इकडे आल्यावर बाकीचे कर, तू तिकडे फक्त कामच नको करत बसू थोडे फिरून पण ये" शर्विल
"हो, मी इकडे चार दिवस आहे, उद्यापर्यंत सर्व संपेल मग लास्ट डे फ्री आहे, त्यादिवशी जाईल मी बाहेर" तनया
"तनया इकडे दिड वाजला, तू नाहीस सोबत लंच करायला... एकटा जेवायला बोअर होतंय" शर्विल
"असे कसे... नीट जेवण करत जा, बोअर काय त्यात ? हवं तर सोबतीला कोणालातरी बोलाव" आपल्याविना शर्विलला एकटे वाटतंय हे ऐकून तनया मनातून खुश होते.
"हो... असेच करतो, तू पण वेळेवर जेवण करत जा" शर्विल
"हो मी वेळेत करेल रे... नको काळजी करु, चल मी बोलते नंतर... मी क्लायंटच्या ऑफिसमध्ये पोहोचले आहे. बाय" तनया
"बाय टेक केअर..." शर्विल
तनयाचे दोन दिवस असेच कामात व्यस्त जातात. रशियातील सर्व काम संपून आज शेवटचा दिवस तिला फ्री मिळतो म्हणून ती मार्केटमध्ये फिरायला जाते. दिवसभर बाहेर फिरून रात्रीचा झगमगाट पाहून मनसोक्त आनंद घेते. अधेमधे शर्विलला व्हिडीओ कॉल करून काही वास्तु, गार्डन, मार्केट असे विलोभनीय दृश्ये दाखवते. शर्विलदेखील कुतूहलाने सर्व पाहतो. दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत मस्करी करतात. अश्या रीतीने तनयाचा रशियाचा दौरा संपतो.
दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने उरलेल्या इतर देशात तनया तिचे काम करायला रवाना होते. तिचे पुढचे शेड्युल चीन, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, पाकिस्तान, मंगोलिया या पाच देशात असते. प्रत्येक देशामध्ये चार-पाच दिवसांचा स्टे असतो.
तनयाला दौऱ्यावर जाऊन १५ दिवस झालेले असतात. तिचे काम ती व्यवस्थितपणे हँडल करत असते त्यामुळे शर्विल निश्चिंत असतो. याचमुळे त्यांचा कामानिमित्त रोज होत असलेला संपर्क कमी होतो तसेच प्रत्येक देशातील टाईम झोन वेगवेगळा असल्याने इतर गप्पांसाठी सुद्धा त्यांचा टाईम जुळत नाही.
*********
इकडे भारतात शर्विल सर्व हँडल करत असतो. नवीन एम्प्लॉयींचे ट्रेनिंग पूर्ण होते आणि नवीन स्ट्रेटिजी सेक्शनमधून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली जाते. यामध्ये गार्गी, नेहा, रीना, विपुल आणि दिनेश असे पाच जण असतात. एक आठवडा सर्वांचे काम पाहून शर्विल त्यांची मिटिंग घेतो. सेक्शनमधून बॉसला कम्युनिकेट आणि रिपोर्टिंग करण्यासाठी गार्गीला त्या सेक्शनचा मिडीएटर बनवतो. त्यामुळे त्या सेक्शनच्या वतीने कम्युनिकेट करण्यासाठी तिचा रोज शर्विलसोबत संपर्क येऊ लागतो.
इकडे भारतात शर्विल सर्व हँडल करत असतो. नवीन एम्प्लॉयींचे ट्रेनिंग पूर्ण होते आणि नवीन स्ट्रेटिजी सेक्शनमधून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली जाते. यामध्ये गार्गी, नेहा, रीना, विपुल आणि दिनेश असे पाच जण असतात. एक आठवडा सर्वांचे काम पाहून शर्विल त्यांची मिटिंग घेतो. सेक्शनमधून बॉसला कम्युनिकेट आणि रिपोर्टिंग करण्यासाठी गार्गीला त्या सेक्शनचा मिडीएटर बनवतो. त्यामुळे त्या सेक्शनच्या वतीने कम्युनिकेट करण्यासाठी तिचा रोज शर्विलसोबत संपर्क येऊ लागतो.
दुपारचे दिड वाजलेले असतात, लंचसाठी शर्विलला सोबत हवी असल्याने तो गार्गीला मेसेज करतो.
"गार्गी... तू लंचब्रेकमध्ये तुझा टिफिन घेऊन माझ्या केबिनमध्ये जेवायला ये"
गार्गी रोज तिच्या टिमसोबत जेवत असते त्यामुळे आता शर्विलला कसं नाही म्हणू अश्या दुविधेत ती पडते. पण शर्विलला हे सांगण्याची हिम्मत तिच्यात येत नाही कारण काहीही झाले तरी शर्विल तिचा बॉस असतो.
ती टिम मेंबर्सला तशी कल्पना देते.
"गाईज... मला शर्विल सरांनी बोलावले आहे, बहुतेक काही काम असेल... तर तुम्ही लंच चालू करा."
"गाईज... मला शर्विल सरांनी बोलावले आहे, बहुतेक काही काम असेल... तर तुम्ही लंच चालू करा."
"तू ये ना जाऊन,आम्ही थांबतो" विपुल
"अरे नाही त्यांनी टिफिन घेऊन बोलावले आहे, बहुतेक लंच करता करता डिस्कस करणार असतील" गार्गी दबकत बोलते
हे ऐकून गार्गीचे इतर सहकारी तिची मस्करी करू लागतात,
"ओहह... तर असे आहे, गार्गी मॅडमला लंचसाठी बोलावले आहे." नेहा
"ओहह... तर असे आहे, गार्गी मॅडमला लंचसाठी बोलावले आहे." नेहा
"मजा आहे बुवा, बॉससोबत लंच" रीना
"अरे यार... आता मी त्यांना कसं नाही म्हणू, त्यांनी अचानक मेसेज केला" गार्गी केविलवाण्या चेहऱ्याने सर्वांसमोर उभी असते
"अगं जा तू... यांचं काय ऐकतेस, उगाच तुझी मस्करी करत आहेत. जा लवकर नाहीतर पुन्हा मेसेज येईल सरांचा" दिनेश
"हो जाते, तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका, मी काय करू समजत नाही" गार्गी
"गार्गी तू जा लवकर, आम्ही करतो इकडे जेवण... पळ नाहीतर आता सरांचा मेसेज नाही फोनच येईल" असे बोलून विपुल हसतो. त्यासोबत इतरही सर्वजण हसतात आणि तिला जाण्यासाठी हाताने खुणावतात.
****************************
गार्गी आत शर्विलसोबत जेवताना काय करेल? त्यांच्यामध्ये मैत्री वाढेल की आधी घडलेल्या लग्नासाठीच्या प्रसंगावरून ते एकमेकांपासून दूरच राहतील ? पाहुयात पुढील भागात...
समीक्षा द्या आणि वाचत रहा...
© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा