Login

लव कल्लोळ - ९

Confused Boy For Choosing Girlfriend

लव कल्लोळ -

सकाळी ऑफिसला आल्यानंतर तनया शर्विलच्या केबिनमध्ये जाऊन बोलते,
"गुड मॉर्निंग शर्विल... आर यु ओके?"

शर्विल "गुड मॉर्निंग तनया... आय एम फाईन; मला काय झालंय ? तू बरी आहेस ना? "

तनया "येस आय एम ऑलसो फाईन. काल खूप मजा आली मला, आता फ्रेश वाटतंय. तुझा स्ट्रेस गेला की नाही?"

शर्विल "हो... कालच्या ट्रिपमुळे मी पण फ्रेश झालो. घरी जाऊन जे झोपलो ते थेट सकाळीच उठलो, मग पुन्हा येणार ना माझ्यासोबत फिरायला?"

तनया "ऑफकोर्स... मी कालच विचार केला की आपण पुन्हा कुठे जायचे आहे तो. येशील का तू मी नेईन तिथे?"

शर्विल "हो येईल की? मला पण समजू दे जरा तुझे आवडते ठिकाण, कधी जायचे बोल"

तनया "शर्विल ऐक ना... खूप दिवस झाले रे मी डिस्को पबला नाही गेले रे, विकेंडला माझ्या फ्रेंड्स जात असतात, तू येशील का माझ्यासोबत? माझे फ्रेंड्स पण असतील, त्यांच्यासोबत ओळख पण होईल तुझी."

शर्विल "आम्ही मित्र कॉलेजला असताना गेलो होतो, पण मग नंतर ते कपल कपल जाऊ लागले, मी मात्र स्टॅग एन्ट्री नसल्याने आणि त्यात माझा फारसा इंटरेस्टही नसल्याने मी पुन्हा गेलो नाही. बघुयात नंतर ठरवू. आपण कालच फिरून आलोय आता जरा कामाकडे पाहुयात."

तनया "बरं ठिक आहे, आपण नंतर ठरवूयात. या विकचे शेड्युल मला आत्ताच सुयशने दिले आहे. मी त्यासाठीच आली आहे. मला एक क्वेरी आहे, आपण नव्याने तयार केलेले वर्क प्लॅन्स भारतात इकडून मॉनिटर करू शकतो परंतु संपुर्ण एशियामध्ये वर्कआऊट करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक प्रत्येक ठिकाणी जाऊन लक्ष द्यावे लागेल. एरिया मॅनेजरवर सर्व गोष्टी सोपवून आपण बेफिकीर राहू शकत नाही. त्यासाठी तू काय ठरवले आहेस का?"

शर्विल "हो... याबाबत मी विचार केलेला आहे, आपण दुपारी मिटिंग घेणार आहोत त्यामध्ये हा मुद्दा घेतला आहे. तुझे अजून काही पॉईंट्स असतील तर माझ्या टिमला दे, ते मीटिंगमध्ये कव्हर करता येतील."

तनया "ओके... बाकी तसे काही नाही, तू सर्व कव्हर केले असेलच. बरं चल मी निघते, दुपारी भेटूयात मीटिंगमध्ये... बाय"

दुपारी मिटिंगमध्ये नव्याने सुरू केलेल्या कामाची गती तपासली जाते. लवकरात लवकर नवीन स्टाफची रिकरूटमेंट करून कामाची गती वाढवावी लागेल अशी चर्चा होते. एशियामधल्या विविध देशात वर्क प्रोग्रेस आढावा व मॉनिटर करण्यासाठी तनया आणि तिचा असिस्टंट सुयश या दोघांना पुढच्या आठवड्यात एशियामधील ब्रांचला पाठविण्याचे ठरवले जाते. पंचवीस दिवसांत एशियातील एकूण पाच देशातील प्रिझम कम्युनिकेशनच्या ब्रांच ऑफिसला व्हिजिट करून तिथल्या कामाची तपासणी करण्याचे सांगितले जाते. त्यानंतर बरेच इतर विषय होऊन मिटिंग संपते.

मिटिंग संपल्यानंतर शर्विल एच.आर. कडून न्यू रिकरूटमेंटच्या इंटरव्ह्यूसाठी तयार केलेली कॅन्डीडेट्सची लिस्ट मागवतो. ती चेक करताना त्याला गार्गी गिरीश राजेशिर्के हे नाव दिसते. गार्गीचे नाव दिसल्यामुळे त्याला तिची आठवण येते आणि अचानक स्थळ पाहण्याचा प्रसंग आठवतो. गार्गीची आणि आपली स्थिती त्यादिवशी एकच होती, दोघांनाही करिअरबाबत इंटरेस्ट असून दोघांच्याही घरचे लग्नाच्या मागे लागलेले आहेत. गार्गीला जर हा जॉब मिळाला तर तिची जॉब करण्याची इच्छा पण पूर्ण होईल आणि थोडे दिवस लग्नाच्या विषयापासून ती दूर तरी राहील. असा विचार करून तो तिच्या नावापुढे पेनाने स्टार करून एच.आर ला तिचा इंटरव्ह्यू व्यवस्थित घ्यायला सांगतो; इतर ऑफिसवर्क संपवून घरी जातो.

तनयाचा पूर्ण आठवडा कामामध्ये जातो, एशियामधलील सर्व ब्रांचसोबत कॉर्डीनेट करून ती शेड्युल बनवते आणि नव्याने ठरवलेल्या कामकाजाची माहिती तयार करते. कंपनीकडून तनया आणि सुयशचे प्रवास तिकीट, हॉटेल बुकिंग, व्हिजा याबाबतची कामे पूर्ण होतात. तनया मंगळवारी जाणार असते, त्याआधी ती शनिवारी डिस्कशनसाठी शर्विलच्या केबिनमध्ये येते आणि कामकाजाची सर्व माहिती शर्विलला दाखवते. तनयाच्या केलेल्या उत्तम नियोजनावर शर्विल फार खुश होऊन तिच्या कामाचे कौतुक करतो.

शर्विल "ग्रेट तनया... सर्व तयारी तू फारच परफेक्ट केलेली आहेस, तुझ्यासोबत राहून या आठवड्यात मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आता मला खात्री झाली आहे की आपण जे काही करतोय त्यामध्ये लवकरच आपल्याला यश येईल."

तनया "शर्विल मला वाटत होते की तू पण माझ्यासोबत यायला हवं होतं, कारण तू असलास की तुला प्रत्यक्ष आमच्या ब्रांचेस पाहता आल्या असत्या आणि तिथल्या अडचणी किंवा परिस्थिती समोरासमोर पाहता आली असती. मी यापूर्वी त्याठिकाणी गेलेली आहे त्यामुळे मला सर्व माहिती आहेच."

शर्विल "तुला सर्व माहिती आहे त्यामुळेच तर तुला पाठवीत आहोत, तू तिकडे सर्व लाईन अप कर मग पुढच्या वेळी जमल्यास आपण जाऊयात. मला इकडे पण सर्व मॅनेज करावेच लागणार आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू सर्व सुरळीत करून येशील आणि काही लागलेच तर मी आहेच इकडे... तू कॉल करू शकतेस लगेच."

तनया "हम्मम... चालेल येते मी जाऊन, आपला तर या विकेंडला पबला जाण्याचा प्लॅन होता... आता मी रिटर्न आले की जाऊयात"

शर्विल "हो हो नक्की जाऊ... बाय द वे तु कामाची तर तयारी सर्व परफेक्ट केलीस पण बाकी प्रवासाची पर्सनल तयारी काही केलीस की नाही?"

तनया "हो मम्मा ने केली आहे, उद्या थोडी शॉपिंग करण्याचा विचार चालू आहे, माझ्या एका फ्रेंडला बोलावले आहे तिच्यासोबत जाऊन करेल शॉपिंग."

शर्विल "आता जवळजवळ एक महिना तुमचे दर्शन आम्हाला मिळणार नाही... तर आम्हाला विसरू नका. उद्या तुझी शॉपिंग झाल्यावर सांग मी येईन तिकडे मग आपण लंच करायला जाऊयात"

तनया हसत म्हणते "स्वतः येणार नाहीस आता मस्का लावू नकोस, आणि बघू तू लक्षात राहिलास तर राहशील नाहीतर विसरेलसुद्धा"

शर्विल "ओए मी कशाला मस्का लावू, मला सवय झाली आता तुझ्यासोबत लंच करायची. तू महिनाभर नसणार म्हणून उद्या महिन्याभराची आठवण म्हणून सोबत लंच करूयात"

तनया "येणार आहे रे मी पुन्हा, तिकडेच नाही राहणार. मी उद्या माझं झालं की दुपारी एक वाजताच्या दरम्यान तुला कॉल करेल मग तू ये. शर्विल खरं सांगू का, मला पण आता तुझ्यासोबत काम करण्याची, लंच करण्याची सवय झाली रे. म्हणूनच मगाशी म्हणाले की तू आला असतास तर बरं झालं असतं"

शर्विल "तनया मला माहिती आहे, मी स्वतःच्या मनस्थितीवरून तुझी मनस्थिती समजू शकतो."

सिरीयस झालेले वातावरण नॉर्मल करण्यासाठी शर्विल हसत म्हणतो "जरा जास्तच इमोशनल झालं का?, रडू नकोस उगी उगी... हवं तर मी तुला एअरपोर्टवर सोडायला पण येईल"

तनया त्याचा हातावर फटका मारत म्हणते "ए काय रे शर्विल, नेहमी माझी अशीच चेष्टा करतोस... खडूस कुठला"

शर्विल "मग तू किती इमोशनल झालीस लगेच म्हणून जरा तुला हसवायला केली गं, आता महिनाभर सर्व मिस करशील तू बघ"

दोघेही अश्याच गप्पा मस्ती करत काम आटपून घरी जातात. उद्या रविवार असल्याने शर्विल घरी रात्री टिव्ही पाहत बसलेला असतो. अधूनमधून तनया ऑनलाईन आहे का ते चेक करत असतो; पण तनया त्याला ऑलाईनच दिसते. बराच वेळ वाट पाहून मध्यरात्री तो झोपून जातो.

तनया एक महिना जाणार म्हणून घरी तिच्या आईसोबत गप्पा मारत बसलेली असते. तीसुद्धा मध्यरात्री बेडरूममध्ये येऊन मोबाईल पाहते आणि शर्विलचा चॅट ओपन करते; त्याचा लास्ट सिन अर्ध्या तासापूर्वीचा दिसतो त्यामुळे काहीही मेसेज न करता तीही झोपून जाते.

****************************

नवीन भेटीतच लांब जावे लागल्यामुळे हे दोघे एकमेकांपासून दूर जातील की अजून जवळ येतील. कशी असेल दोघांची मनस्थिती पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all