Login

लव कल्लोळ - ३

Confused Boy Of Choosing Girlfriend



लव कल्लोळ -

ग्रीन वेव्ह कंपनीसोबत मिटिंग संपल्यानंतर तनया सुद्धा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टच्या मिटींगला जाते. तिथे बरीच चर्चा आणि कंपनीचा नफा तोटा याबाबत मंथन होऊन ५०-५०% भागीदारी करून ग्रीन वेव्ह कंपनीसोबत पुढे जायचा निर्णय घेतला जातो.

मिटिंग संपल्यानंतर इतर कामात तनयाला शर्विलचा विसर पडून ती घरी जाते. जेवण वगैरे आटोपल्यानंतर ती झोपायला बेडवर जाते तेवढयात शर्विलचा मेसेज तिच्या मोबाईलवर येतो मोबाईल घेऊन मेसेज उघडताच शर्विलचा डीपी तीला दिसतो मग फोटो ओपन करून थोडा झूम करून पाहते. त्याचा क्लोजअप असलेला फोटो पाहून पुन्हा आजच्या सकाळच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झळकून जातात. त्याचा मेसेज पाहून गालावर स्माईल देत त्याला रिप्लाय करते.

"हॅलो, शर्विल सर..
या... आय हॅव सेव्हड युअर नंबर"

शर्विल तिचा लगेच आलेला मेसेज पाहून खुश होतो. तिने याचा नंबर सेव्ह केल्यामुळे आता तिचा डीपी शर्विलला दिसू लागतो. शर्विल त्या डीपीला क्लिक करतो पण तो तिचा फोटो नसून तिच्या कंपनीचा लोगो त्याला दिसतो. आपली पुन्हा फजिती झालेली पाहून तो जरा ओशाळतो आणि तिला मेसेज करतो.

"थँक्स... हाऊ आर यु ?
हाऊज युअर डे ?"

तनया : "आय एम फाईन, इट वॉज व्हेरी हेक्तिक डे बट ग्लॅड टू सी यु इन मिटिंग.
व्हॉट अबाऊट यु ?"

शर्विल : "सेम हिअर... व्हॉट यु थिंक अबाउट अवर बिझिनेस ऑफर? इज एनी प्रोग्रेस..."

तनया : "येस... वुई डिस्कस्ड अबाउट युअर ऑफर, वुई टेल अवर डिसीजन इन फ्यु डेज."

"नाऊ इज टू लेट, आय एम स्लीपिंग. वुई विल टॉक टुमॉरो...ओके"
"गुड नाईट"

शर्विल : "होप वुई विल स्टार्ट वर्किंग टूगेदर.
गुड नाईट... बाय"

तनया : "बाय...!"

दोघेही एकमेकांचा विचार करत झोपतात. दोन दिवसांनी प्रिझम कंपनीतर्फे ग्रीन वेव्ह कंपनीला ५०-५०% भागीदारी बाबत रीतसर कळविले जाते. तोपर्यंत दोघांमध्ये काही बोलणे होत नाही. आज पुन्हा ऍग्रिमेंटच्या अटी व शर्ती डिस्कस करण्यासाठी मिटिंग असते. त्या मिटींगला पुन्हा दोघे एकमेकांना भेटतात. मिटिंग झाल्यानंतर आज जास्त औपचारिकता न पाळता दोघेही एकमेकांसोबत थेट बोलतात.

शर्विल स्वतःहून तनयाजवळ जात म्हणतो "फायनली... वुई विल स्टारटिंग वर्क टूगेदर"

तनया खुर्चीवरून उठत एक हास्य देऊन "येस, आय होप वुई विल वर्क ग्रेटली अँड कंपनी विल कम आऊट ऑफ द क्राइसिस विथ हेल्प ऑफ अवर पार्टनरशिप."

शर्विल : "थँक यु सो मच फॉर शोईंग ट्रस्ट इन अवर कंपनी अँड गिव्हिंग अस द ग्रेट अपोर्च्युनीटी टू मेकिंग बेटर."

तनया : "ओहह... इट्स अवर प्लेजर सर.."

एक भुवई उंचवत शर्विल म्हणतो "हेय डोन्ट कॉल मी सर, इफ यु डोन्ट माईंड... कॅन वुई मिट फॉर कॉफी इन आउटसाईड ऑफ ऑफिस प्रिमायसेस ?"

तनया शर्विलच्या अश्या अनपेक्षित प्रश्नाने थोडी बिचकते आणि मनात काहीतरी विचार करून बोलते. "शुअर, बट कॅन वुई मिट टुमॉरो ? कॉज आय हॅव टू फिनिश सम इंपोर्टंट वर्क टुडे."

"आर यु ओके विथ धिस ???"

शर्विल मान हलवत "ओके... नो प्रॉब्लेम. वुई विल मिट टुमॉरो ऑर एनी अदर डे व्हेन यु हॅव टाईम."

तनया : "थँक्स सर...आय मिन मिस्टर शर्विल. आय विल टेक्स्ट यु अबाउट धिस."

शर्विल : "हम्म आय विल वेट फॉर इट... नाऊ आय हॅव टू गो. बाय"

तनया : "सी यु सून... बाय बाय"

तिला हाताने टाटा करत शर्विल ऑफीसबाहेर पडतो. तनया ही तिचे काम करायला तिच्या केबिनकडे वळते. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ऑफीस बंद असते.
तनया सकाळीच शर्विलला मेसेज करते.
"गुड मॉर्निंग... टुडे इज माय हॉलिडे.... आय एम फ्री."

शर्विल : "व्हेरी गुड मॉर्निंग... देन वुई कॅन मिट फॉर कॉफी. विल यु कम???

तनया : येस, व्हेअर अँड व्हेन शुल्ड आय कम ?"

शर्विल : "यु कॅन कम फाईव्ह पी.एम. एट सीसीडी डेक्कन"

तनया : "ओके... आय विल बी देअर ऑन टाईम"

शर्विल पाच वाजण्यापूर्वी पाच-दहा मिनिटे आधीच सीसीडी मध्ये येऊन बसतो. पंधरा मिनिटांनी तनया येते आणि डोअर ढकलत शर्विलला नजरेने शोधत आजूबाजूला पाहू लागते. शर्विल एक कोपऱ्यात बसलेला असल्याने तिच्या नजरेस लवकर पडत नाही पण शर्विल एन्ट्री डोअरकडे तोंड करून बसलेला असल्याने आणि त्याचे लक्ष डोअरकडेच असल्याने ती आल्या आल्या त्याचे लक्ष तिच्याकडे जाते.

पिंक टि शर्ट, त्यावर व्हाईट श्रग, शॉर्ट लेन्थ ब्ल्यू जीन्स, पायात कॅनव्हस शूज, खांद्यावर मोकळे सोडलेले बरगंडी रंगाचे केस, कॅज्युअल गॉगल, हातात बँड, खांद्याला अडकवलेली छोटी बॅग अशी समोर तनयाला पाहताच शर्विल तिच्याकडे एकटक पाहतच बसतो. शर्विल काही दिसेना म्हणून तनया शर्विलला कॉल करते. हातातील मोबाईल वाजताच शर्विल भानावर येत जागेवरून उठत तनयाला रिसिव्ह करायला पुढे जातो.

शर्विल "हेय हाय.... वेलकम"

तनया "हॅलो... एम आय लेट ?"

"नो.. नो.. यु आर ऑन टाईम.... प्लिज हॅव अ सिट" शर्विल सोफ्याकडे हात दाखवत म्हणतो.

तनयाला आज ह्या कॅज्युअल लूकमध्ये समोर पाहून शर्विल पुन्हा थोडा बिचकतो, तसा मनात विचार करतो की हिला पाहून मला दरवेळी असे का होत असेल? पण नाही... आता मला असे भांबावून न जाता तनयासोबत फ्रिली बिहेव्ह करून तिलासुद्धा आपल्यासोबत फ्रेंडली वाटेल असे काहीतरी केले पाहिजे. यासाठी आता माझा मूळचा पुणेरी बाणाच वापरलाच पाहिजे. स्वतःशीच मनास ठरवून मान हलवत तनयाला म्हणतो,
"या शर्विल विश्वात आपले स्वागत आहे, आशा करतो की तुम्हाला हे विश्व पहायला आवडेल."

पर्स टेबलवर ठेवत असताना त्याच्या अश्या अचानक बोलण्याच्या शैलीवरुन चकीत होऊन तनया आश्चर्यकारकपणे शर्विलकडे मान वळवून पाहू लागते. एक मोठी स्माईल देऊन त्याला प्रतिसाद देते.

"नक्कीच मला आवडेल शर्विल विश्व पहायला आणि त्यात फिरायला"

तिच्याही अनपेक्षित प्रतिसादाने शर्विलसुद्धा मोठ्याने हसतो आणि त्यांच्यामध्ये असलेला एक प्रकारचा फॉर्मलपणा निघून जाऊन त्याजागी दोघांचा आपापला हसरा खेळता स्वभाव पुढे येतो. दोघेही मग गप्पा मारत कॉफीचे घोट घेतात आणि एकमेकांविषयी जाणून घेतात. शर्विल नुकताच ऑस्ट्रेलियावरून शिक्षण घेऊन आलेला आहे असे तिला सांगतो तर ती कशी तिच्या डॅडीला बिझिनेसमध्ये साथ देते यावर गप्पा होतात.

दोघांच्याही आवडीनिवडी, हॉबीज, लिविंग स्टँडर्ड मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये छान ट्युनिंग जुळते. तनयाच्या मनात शर्विलविषयी आकर्षण उत्पन्न होते. शर्विललाही तनयाचे फ्रेंडली नेचर फार आवडते. तास-दिड तासानंतर दोघेही घरी जाण्यासाठी निघतात. सिटीमध्ये पार्किंग प्रॉब्लेममुळे तनया कॅब करून आलेली असते त्यामुळे ती बाहेर येता येता कॅब बुक करते. पाच मिनिटात कॅब येताच दोघेही एकमेकांशी हात मिळवून चेहऱ्यावर आलेले हसू सांभाळत निरोप देतात. तनया गेल्यावर शर्विलसुद्धा त्याची बाईक घेऊन शीळ वाजवत घरी जातो.

****************************

आजच्या भेटीमुळे दोघांच्या मनात काय चालले असेल? एकमेकांचे आज दिसलेले स्वभाव आवडले असतील का? की काही खटकले असेल? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय)

🎭 Series Post

View all