Login

लव कल्लोळ - ७

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ -

शर्विल आणि तनया यांचा कामात पूर्ण आठवडा व्यस्त जातो. शनिवारी दुपारी दोघेही लंच घेत असताना शर्विल तनयाला म्हणतो
"तनया... आपण फार काम केले बघ या विकमध्ये... मला तर जाम थकवा आलाय. उद्या संडे आहे तर मित्रांसोबत जरा चिल करायचा विचार करतोय"

तनया हसत म्हणते "तुला सवय नाहीये ना अशी सलग पूर्ण आठवडा काम करण्याची म्हणून थकलास. मला याची गेल्या एक वर्षांपासून सवय आहे; कारण मी डॅडींचे ऑफिस जॉईन केल्यापासून फक्त संडे ऑफ मिळतो. माझ्या तर चिलआऊट पार्ट्या, ट्रिप्स, लॉंग ड्राइव्ह वगैरे यासर्व गोष्टी फार कमी झाल्या आहेत. आता तर फ्रेंड्स पण जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाहीत त्यामुळे मी संडेला सध्या रेस्ट करते, कधीतरी शॉपिंग वगैरेला जाते. त्या दिवशी तुझ्यासोबत टाईम स्पेन्ड करून मला फार छान वाटले. एकतर मी फार दिवसांनी अशी बाहेर आले होते आणि दुसरे म्हणजे मला तुझी कंपनी फारच आवडली"

हे ऐकून शर्विल म्हणतो, "असे असेल तर मग मी उद्या मित्रांसोबत कुठे न जाता आपण दोघे फिरायला जायचं का? मलाही रिलॅक्स होता येईल आणि तुलाही बाहेर फिरायला कंपनी होईल. काय म्हणतेस?

शर्विलकडून अशी ऑफर ऐकताच तनयाला त्यांची कॉफीशॉप मधली भेट आठवते आणि ती एक्साईटेड होऊन म्हणते, "हो..... नेकी ओर पुछ पुछ.... जाऊयात की, पण कुठे जायचं?

शर्विल "मी एअरपोर्ट वरून पुण्याला येताना लोणावळ्याला आलो तेव्हा फार मस्त क्लायमेट होते. मी तेव्हाच विचार केला होता की लवकरच फिरायला इकडे येईन. मला वाटतंय आपण लोणावळ्याला जाऊयात. तुला काय वाटतंय?

तनया "सध्या पावसाळा पण आहे तर लोणावळा बेस्ट राहील. लॉंग ड्राईव्ह पण होईल आणि निसर्गाच्या सानिध्यात पण फिरता येईल. मला चिलआऊटसाठी आवडेल हे डेस्टिनेशन"

शर्विल "चालेल... लोणावळा फायनल करूयात. पण एक अट आहे माझी, ती मान्य असेल तरच जाऊयात"

तनया "ए... अट वगैरे काय काढलीस मध्येच... कसली अट आहे तुझी? सांग बरं"

शर्विल "उद्या अजिबात कंपनी इश्यु, ऑफिसवर्क असले विषय काढायचे नाहीत. मला जरा एक दिवस या सर्व विषयापासून अलिप्त रहायचं आहे."

तनया "अरे यार इतकेच ना... प्रॉमिस मी अजिबात हे विषय काढणार नाही आणि तुला छान कंपनीसुद्धा देईन"

शर्विल "ते बघ पुन्हा कंपनी म्हणालीस... मी नाही येत जा"

तनया हसत म्हणते "बरं बाबा सॉरी... कंपनी हा शब्द पण नाही म्हणत, मग बास ना, कान पकडू का?"

शर्विल सुद्धा हसत म्हणतो, "हाहाहा... होप वुई विल एन्जॉय टुमॉरो लाईक धिस. मी सकाळीच तुला पीक करेल. आपण लवकरच निघुयात"

तनया "डेफिनेटली... ओके"

अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाचा प्लॅन ठरवून शर्विल लंच करून तनयाच्या केबिनमधून त्याच्या केबिनमध्ये जातो. खरंतर कामामुळे नाही तर आईने लग्नासाठी घातलेल्या घाटामुळे शर्विल वैतागलेला असतो. त्यामुळे हा विचार डोक्यातून बाहेर काढण्यासाठी शर्विलने हा वन डे चिलआऊटचा प्लॅन केलेला असतो. तनयासुध्दा सोबत असणार या विचाराने शर्विल मनातल्या मनात उत्साही होतो.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शर्विल तनयाला सकाळीच पीक करतो आणि दोघेही लोणावळ्याला जायला निघतात. सकाळ असल्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक नसते. हायवे लागताच शर्विल एसी बंद करून कारच्या काचा खाली करतो. बाहेरची फ्रेश हवा गाडीमध्ये शिरते तसे दोघांचेही मन प्रसन्न होते. ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे थंड वारा वाहत असतो. तनया कारच्या म्युझिक सिस्टीमला तिचे ब्ल्यूटूथ कनेक्ट करून तिच्या आवडीचे लेटेस्ट बॉलिवूड सोंग्ज लावते आणि गुणगुणते. शर्विल हे पाहून तिला म्हणतो
"अरे वा... जरा मोठ्याने बोल की, मलाही ऐकू दे तुझा आवाज कसा आहे"

"का... माझा आवाज कधी ऐकला नाहीस का?" तनया

"तुझा आवाज ऐकलाय गं, पण गाताना कसा आहे ते ऐकव म्हणालो. मी दोन वर्षे इकडे नसल्यामुळे मला लेटेस्ट बॉलिवूड सोंग्ज काही इतके माहिती नाही... नाहीतर मी पण तुझ्यासोबत गायलो असतो" शर्विल

"हं... तुला बरं कारण मिळालंय हे, चल तुझ्या आवडीचे गाणे सांग बघू, मी ते लावते. मग तू गा जोरात. लाजू नकोस" तनया

"तनया तू पण ना... मी कशाला लाजू गाणं म्हणायला, आत्ता मी तुला गा असे म्हणालो होतो तर तू मलाच उलटे सांगतेस. ऐक तर मग"

असे म्हणत शर्विल गाणे गायला सुरुवात करतो. तसे तनया पण त्याला साथ देत गाणे म्हणते. दोघेही हसून एकमेकांना आवाज छान आहे असे हातानेच खुणावून सांगतात. थोड्या वेळाने घाट चालू होतो तेव्हा शर्विल गाणे गायचे थांबवतो आणि तनयासोबत गप्पा मारू लागतो.
"आम्ही मित्र कॉलेजला असताना पावसाळ्यात नेहमी लोणावळ्याला यायचो... तुला माहिती का आम्ही ८-१० जण मित्र तरी नक्की असायचो. बुशी डॅममध्ये मनसोक्त भिजायचो, खूप कल्ला करायचो. त्यानंतर आता सर्वजण आपापल्या करिअरमध्ये गुंतल्यामुळे इकडे येणे बंद झाले. मीही सिडनीला गेल्यामुळे दोन वर्ष हे सर्व खूप मिस केले."

तनया "ग्रेट... मग आज तू का नाही आलास त्यांच्यासोबत? मला उगाच विचारलेस... आपण नंतर कधीतरी आलो असतो की"

शर्विल "असे एक दिवसात त्यांच्यासोबत प्लॅन होत नाही आता. सर्वांना वन विक आधीच ठरवावे लागते मग ते शेड्युल ऍडजस्ट करून येतील. पुन्हा येईन मी त्यांच्यासोबत; आणि तुला का विचारलेस असे म्हणतेस तर मला आवडते तुझी सोबत."

तनया "ओहह... सो स्वीट ऑफ यु. आय ऑलसो लाईक युअर कंपनी..... उप्स... सॉरी, म्हणजे तुझा सहवास"

दोघेही एकमेकांना टाळी देत हसतात. थोड्या वेळानंतर ते लोणावळा शहरात प्रवेश करतात. एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता करतात आणि पुन्हा बुशी डॅमच्या दिशेने निघतात. हलका हलका पाऊस सुरू झालेला असतो. शहर संपताच आजूबाजूला जुनी घरे, बंगले, भरपूर झाडे लागतात. उतरत्या छापराची कौलारू घरे, त्यावर साठलेले शेवाळे, झाडांवर चढलेल्या वेळी, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे, फुलझाडे आणि त्यांना लागलेली विविध रंगांची फुले, आकाशात दाटून आलेले काळे काळे ढग, थंडगार वारा, पावसाच्या हलक्या हलक्या धारा आणि गाडीत लागलेले छान रोमँटिक गाणे हे पाहून दोघेही वातावरणात समरस होऊन जातात. निसर्गाचा आस्वाद आणि एकमेकांची सोबत अशी दुहेरी मेजवानी मिळाल्यामुळे दोघांचाही मूड ताजातवाना झालेला असतो. काही वेळ ड्राइव्ह केल्यानंतर ते बुशी डॅमला पोहचतात. गाडी पार्क करून टीशर्ट आणि शॉट्स घालून ते डॅममध्ये जातात.

****************************

पुढचे क्षण ते कसे एन्जॉय करतील? शर्विल आणि तनया यांना आजच्या ट्रिपमुळे एकमेकांबद्दल आकर्षण वाढेल का? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all