Login

गाठ बांधली!

प्रेमाची गाठ

शीर्षक:- गाठ बांधली!

घायाळ कळते सख्या
तुझी एकच नजर
प्रीतस्पर्शाने केलास
तू अजबच कहर

निस्वार्थ प्रेमाला
आपुलकीचा वास
सुखाने दोघे खाऊ
समाधानाचा घास

मनाचे धागे
तुझ्याशी जोडले
सुखाचे पाणी
प्रीतसागरात सोडले

वचनपूर्तीवेळी
बांधली सोबतीने गाठ
वाचतात दोघेही
सुखी आयुष्याचे पाठ

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all