घर आवरता आवरता बेडरूम मधल्या कपाटाची आज सफाई करून घेऊ असा विचार तिच्या मनात आला. तिने कपाटातील सर्व सामान बाहेर काढलं. कपाट पूर्णपणे स्वच्छ करून एक एक सामान ती त्या कपाटात ठेऊ लागली. सामान ठेवता ठेवता तिला एक फोटोंचा अल्बम सापडला. तिने याआधी खूप वेळा अल्बम पाहिला होता पण पुन्हा एकदा अल्बम ती पाहू लागली..तिच्या पाळण्यातल्या फोटोपासून ते तिच्या ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व फोटो होते. प्रत्येक फोटो बरंच काही सांगून जात होता. ती फोटो पुन्हा चाळत होती. अल्बमच्या शेवटी तिच्या फ्रेन्डस् चे फोटो होते. ते फोटो पाहून तिच्या डोळ्यात नेहमीसारखं पुन्हा पाणी आलं. त्या फोटोंमध्ये होतं तिचं पहिलं प्रेम.. सुबोध. सबोध शिरवळकर. त्याची आठवण येताच तिने तो अल्बम बंद केला व बाजूला असलेल्या ट्रंकेत काहीतरी शोधू लागली. तिच्या ट्रंकेत पहिलं प्रेम नावाचं एक पुस्तक होतं. तिने ते पुस्तक उचललं व उघडलं. त्यात अगदी जीर्ण झालेलं , सुकून गेलेलं गुलाबाचं फुल व एक लेटर होतं. लव लेटर.. ती त्या जुन्या आठवणीत हरवून गेली..
समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणातील एका गावात ती रहायची ती म्हणजे प्राजक्ता लेले तो सुध्दा त्याच गावात रहायचा. एकाच शाळेत एकाच इयत्तेत शिकणारे हे दोघं इयत्ता दहावीत शिकत होते . एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. वयात आल्यावर तो तिच्यावर प्रेम करू लागला. अगदी नळकतपणे. तिला ते जाणवत होतं. ती सुद्धा त्याच्या प्रेमात होती. ते दोघं रोज संध्याकाळी एकमेकांना समुद्रकिनारी भेटायचे. दोघांनी एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. प्रेम कसं व्यक्त करावं हा दोघांपुढे एक गहन प्रश्न निर्माण झाला होता. एके दिवशी तिने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक love letter लिहिलं. इकडे त्यानेही love letter लिहिलं. आता प्रश्न हा होता की ते love letter एकमेकांना कसं द्यायचं ?
दुसऱ्या दिवशी ती शाळेत खूपच म्हणजे एक दिड तास लवकर आली. वर्गात कोणीच नव्हतं. तिने सुबोध ज्या बाकावर बसतो त्या बाकामध्ये तिने तिचं love Letter त्याला दिसेल असं ठेवलं .. काही क्षणातच वर्गात विद्यार्थी येऊ लागले. ती तिच्या बाकावर बसून सुबोध येण्याची वाट पाहू लागली तोच सुबोध आला पण तो त्याच्या नेहमीच्या बाकावर न बसता चक्क पहिल्या बाकावर जाऊन बसला. तिला त्याचा प्रचंड राग आला . नेहमी शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलगा ती पहिल्या बाकावर बसल्ये पाहून तो सुध्दा दुसऱ्या रांगेत पहिल्या बाकावर जाऊन बसला. ती मनातल्या मनात त्याला शिव्या देऊ लागली. त्याने दप्तरातून एक वही बाहेर काढली. त्या वहिच्या एका पानावर त्याने तिच्याबद्दल गुंफवलेल्या भावना होत्या.. होतं ते एक love letter.त्याच्या मनात विचार आला की संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर तिला देऊ. त्याने वही बंद केली. दप्तरात ठेवली. तिने ज्या बाकावर त्यांच्यासाठी love letter ठेवलं होतं तिथे दुसराच एक खोडकर मुलगा बसला होता. त्याला ते love letter सापडलं .. त्याने वाचलं . त्याला कळालं की प्राजक्ताने सुबोध साठी हे love letter लिहीलं आहे.. मग काय ? सुबोधला चिडवणं , प्राजक्ताला चिडवणं सुरू झालं.. सगळी जणं सुबोध व प्राजक्ताला चिडवू लागले.. सुबोध-प्राजक्ता याचा आनंद घेत होते. त्यांना कसलीच फिकीर नव्हती. तोच क्लास टिचर आले व गोंधळ शांत झाला... शाळा सुटली . दोघं समुद्रावर फिरायला आले.
प्राजक्ता – आपले मित्रं चिडवत होते ते प्लीज मनावर नो घेऊस..
सुबोध – तू सुद्धा. चिडवा चिडवी होतं असते.
प्राजक्ता – हं..
सुबोध – ए , मला असं का वाटतंय तुला काहीतरी सांगायचंय मला ?
प्राजक्ता – मलाही असंच वाटतंय की तुलाही मला काहीतरी सांगायचंय
सुबोध – मला सगळ्यांसमोर सांगायचंय..
प्राजक्ता – काय ?
सुबोध – मला हे सांगायचंय की..
तोच त्याच्या डोक्यात विचार येतो की आत्ता प्रेम व्यक्त केलं आणि ती चिडली तर ? आयुष्यातून निघून गेली तर ? तो अबोल होतो .
प्राजक्ता – अरे बोल की..
सुबोध – खूप छान दिसतेस हेच सांगायचं होतं..
प्राजक्ता समजून जाते की याला प्रेम व्यक्त करायचं आहे. तिलाही प्रेम व्यक्त करायचं होतं. तो समोर असताना तिची हिंमत होत नव्हती. त्यामुळे ती सुध्दा अबोल झाली. काही वेळाने दोघे तिथून आपापल्या घरात निघून गेले.
दहावीचा आज सेन्डऑफ होता. आज दोघांनी ठरवलं की आज हिंमत करून एकमेकांना प्रेम व्यक्त करायचं . शाळेचा सेन्डऑफ झाला. संध्याकाळ झाली. ती समुद्रकिनारी आली . तिला समुद्रावर एक तिच्या वर्गातील मित्र भेटला. तिच्या एका मित्रासोबत सागरी लांटांचा आनंद घेत सुबोधची वाट पाहत होती. काही वेळाने समुद्रावर सुबोध आला पण प्राजक्ताचं त्याच्याकडे लक्ष्य नव्हतं..सुबोधला वाटलं की हाच तिचा प्रियकर असेल. कदाचित प्राजक्ता माझ्यावर प्रेम करत नसेल... ती त्याच्यासोबत खूप सुखी दिसत होती तर आपण आपलं प्रेम व्यक्त करून तिला त्रास कशाला द्यायचा ह्या विचाराने तो तिथून डोळ्यातील अश्रू लपवत निघून गेला.प्राजक्ता सुबोधची वाट पाहत होती. सुबोध आलाच नाही असे समजून ती निराश होऊन घरी निघून गेली.
काही दिवसांनी बोर्डाच्या परीक्षा आल्या. शेवटच्या पेपरच्या दिवशी सुबोध व प्राजक्ता एकमेकांसमोर आले . प्राजक्ता सुबोधशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती पण सुबोध तिच्याशी काहीच बोलला नाही पण त्याने दप्तरातून एक लेटर व गुलाबाचे फूल तिला दिले व तो निघून गेला. प्राजक्ता पेपरच्या टेन्शन मध्ये होती त्यामुळे लेटर नंतर वाचेन असं म्हणून तिने तिच्या दप्तरात लेटर व गुलाबाचे फूल ठेवलं...
पेपर संपला व ती समुद्रकिनारी आली . सुबोध नेहमीप्रमाणे आजही आला नव्हता त्यामुळे ती निराश होऊन घरी निघून गेली. घरी आल्यावर तिने ते love letter वाचलं.. त्यात सुबोधने आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. ती त्याच्या आठवणीत रडत होती. तिने ते गुलाबाचं फूल व love letter एका पुस्तकात जपून ठेवलं.. तिने गावभर प्रेमाची कबुली देण्यासाठी सुबोधला शोधलं पण सुबोध कुठेच नव्हता. तिने अनेक जणांशी सुबोध विषयी चौकशी केली तर तेव्हा कळालं की सुबोध पुढील वाटचालीसाठी मुंबईत गेला आहे कायमचा. पुन्हा नक्कीच भेट होईल या आशेवर ती जगत राहीली. काही महिन्यातच दहावीचा निकाल लागला. तिला ७७% मार्क मिळाले . घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं तोच तिच्या कानावर बातमी आली की सुबोध नापास झाला. याच कारणामुळे त्याने मुंबईत आत्महत्या केली. त्यांची डेडबॉडी इथे गावातल्या घरी आणली आहे.. तिला पूर्णपणे धक्काच बसला . पहिलं प्रेम असं आयुष्यातून निघून जावं यापेक्षा अजून दु:खं काय ? ती पूर्णपणे खचून गेली. अनेक दिवस गेले. हळूहळू त्या धक्क्यातून सावरायला लागली. ती ते love letter रोज वाचायची. त्याच्या आठवणीत रडायची.
ती त्या भूतकाळातील आठवणीतून बाहेर पडली. आजही ते love letter वाचून ती रडत होती. जर तेव्हा प्रेम व्यक्त झालं असतं तर गोष्टी बदलल्या असल्या असं तिला वाटत होतं.. ती अजूनही तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रडत होती. हळूहळू कपाटात सामान भरून लागली. पुस्तकात पुन्हा love letter व गुलाबाचे फूल ठेवलं. अल्बम कपाटात ठेवला. सगळं सामान कपाटात ठेवलं. कपाट बंद केलं. शांतपणे बेडवर बसली. सुबोधच्या आठवणीत अजूनही रडत होती. तिचं पहिलं प्रेम तिच्या आयुष्यात आता अजिबात नव्हतं. होती एक तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण...तिने तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत काळजात जपून ठेवलेलं , तिच्या पहिल्या प्रेमाची साक्ष देणारं , व्यक्त अव्यक्त भावनांचं , शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारं Love Letter......
समाप्त
®© पूर्णानंद मेहेंदळे
Mobile no. 7507734527
Mobile no. 7507734527
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा