Login

प्रेम कधीही न संपणारे : भाग 5

Love Story
आकाश खूप गयावया करत असतो, सॉरी बोलत असतो . अन्वी ला बोलत असतो आजपर्यंत कधी कोणत्या मुलीशी फ्रेंडशिप केली नाही होती. तुला पण मी टाइम पास म्हणून बोलत होतो , तू एवढी सिरीयस होशील हा विचार मी नाही केला. अग मला आमच्याच बिल्डिंग मधली एक मुलगी आवडते . पण तिला विचारायची हिंमत नाही माझी. मी तुझासोबत असच मस्ती करत होतो. पण आता मी खूप विचार केला तुझासारखी निरागस मैत्रीण मला गमवायची नाही आहे. प्रेमा चे नाही पण मैत्री चे तरी नाते ठेवशील का ? मी तुला request करतो. अन्वी त्याचे फोन वरचे बोलणे एकत असते . व शेवटी तुला माफ केले असे बोलते. पण अशी मस्करी अजून कोणासोबत करू नको असे बजावते.
असेच दिवसांमागुन दिवस जात असतात. अन्वी आता आकाश सोबत फक्त नॉर्मल बोलत असते. असेच नवरात्रीचे दिवस असतात आकाश गरबा खेळून आल्यानंतर अन्वी ला मॅसेज करतो , तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. मला ती मुलगी हो बोलली. आकाश खूप खुश असतो परंतु अन्वी मात्र थोडी नाराज होते. ती फक्त ओके म्हणून त्याला रिप्लाय देते. आकाश ला पण जाणवत अन्वी नाराज आहे ते , पण तो काही बोलत नाही. आकाश रोज अन्वी ला मॅसेज वर त्यांच्या गमतीजमती सांगत असतो. आणि मनात नाराज असते पण तसे ती दाखवत नाही. २ वर्षे अशीच निघून जातात. अन्वी चा कोर्स पण आता संपत आलेला असतो. आणि ती गावी जायची तयारी करत असते. एक दिवस ती आकाश ला मॅसेज वर बोलते आता मी कायमची गावी जात आहे . त्याच्या आधी एकदा मला भेट एक मित्र म्हणून . अन्वी आणि आकाश एक दिवस ठरवतात आणि जिथे पहिल्यांदा भेटले होते त्याच रेल्वे स्टेशन वर भेटायचे ठरवतात.

बघूया आता पुढच्या भागात अन्वी आणि आकाश भेटल्यानंतर काय होते.
0

🎭 Series Post

View all