Login

प्रेम कधीही न संपणारे

ही एक लव्हस्टोरी आहे.



                अन्वी आणि आकाश या नुकत्याच वयात आलेल्या तरुणाईची आपण कहाणी बघणार आहोत.

परिचय :अन्वी  गावाकडे राहणारी १२वी  नंतर  कोर्स करण्यासाठी मुंबई मध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेली मुलगी.
तर आकाश हा पहिल्यापासून मुंबई मध्ये राहिलेला मुलगा.
अन्वीने नवीनच फेसबुक अकाउंट ओपन केलेले असते. असच एक दिवस असच फेसबुक स्क्रोल करताना ती  आपली  friend list चेक करत असते. फेसबुक वर नवीन असल्यामुळे ती सगळ्यांचे friend list बघत असते आणि एका friend च्या friend list मध्ये तिला आकाश चे नाव दिसते.
  साधासा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेला असतो. ती त्याची प्रोफाईल  ओपन करते आणि स्क्रोल करत असते , एका जागी ती थांबते कारण तिची जी  जन्मतारीख होती तीच त्याची पण तारीख होती.आणि त्यामुळे ती काही विचार न करता त्या अनोळखी आकाश ला friend request सेंड करते. आणि थोडया वेळाने ती ऑफलाईन जाते.  

आकाश पण घरच्या जबाबदारी मुळे कमी वयात कामाला जायचा. Office मध्ये असच बसलेला असताना एका अनोळखी मुलीची friend request बघून तो पण आश्चर्य चकित होतो. तो तिची प्रोफाइल बघतो. काही मराठी हेरॉईन चा फोटो प्रोफाइल ला असतो.
पहिले तर त्याला वाटते fake असेल प्रोफाइल नाहीतर 2013 च्या जमान्यात कोणती मुलगी स्वतःहून friend request पाठवेल. तरीपण तो ती फ्रेंड रिक्वेस्ट accept करतो. आणि त्याचा कामात बिझी होऊन जातो.

रात्री ती पण तिच्या keypad वाल्या फोन वर Facebook open करते. तर notification असते. आकाश.... रिक्वेस्ट accepted.
ती खुश होते. अल्लाडच वय ते.
संध्याकाळचे 7 वाजून गेलेले असतात असच टाईमपास करत असताना बघते तर तो पण ऑनलाइन असतो.
म्हणून ती hiiii... असा त्याला फेसबुक ला मॅसेज करते.

बघूया पुढे आकाश मॅसेज ला रिप्लाय करतो का?  आणि पुढे काय होते. 


🎭 Series Post

View all