Login

प्रेम कधीही न संपणारे : (भाग - 3)

Love Story

आपण मागील भागात बघितले कि आकाश अन्वी ला प्रपोस करतो आणि अन्वी होकार देते.



अन्वी आणि आकाश रोज कॉल , फेसबुक , मॅसेज वर बोलत असतात. असेच काही दिवस जातात , आणि एक दिवस आकाश आणि अन्वी भेटायचे ठरवतात. अन्वी तिचा कॉलेज चा वेळ बघून एक दिवस जवळच्या रेल्वे स्टेशन ला भेटायचे ठरवते. ती मस्त पैकी ग्रे आणि पर्पल रंगाचा  ड्रेस , त्याला मॅचिंग असे छोटे कानातले, गळ्यामध्ये तिची नेहमीची सोन्याची नाजूक चैन , चेहऱ्याला हलकीशी पावडर , आणि ओठाला दिसणार नाही अशा न्यूड कलर ची लिपस्टिक लावून तयार होते.


एका हातामध्ये सिल्वर बेल्ट चे घड्याळ आणि एका हातात नाजूक कडा . ती रंगाने थोडी सावळी  पण रेखीव चेहऱ्याची होती. तिचा  क्लास सुटल्यानंतर ४ वाजता ती ट्रेन ने त्याला सांगितलेल्या रेल्वे स्टेशन ला येते. आकाश तिचा आधी आलेला असतो , परंतु कधीही बघितले नसल्यामुळे ते एकमेकांना शोधात असतात. आणि तेवढ्यात ते एकमेकांच्या समोर येतात. ओळख होते. पण आकाश तिला बोलतो आपण नंतर कधीतरी भेटूया आता माझा भाऊ पण या स्टेशन ला आला आहे, आणि आल्या पावली अन्वी त्या ट्रेन मध्ये बसून घरी निघून जाते.


अन्वी ला  पण ते थोडं विचित्र वाटते. कि हा असा काय मुलगा आहे मला भेटायला बोलावले आणि आल्या पावली परत पाठवले. अन्वी थोडी नाराज होते, ती घरी येते फ्रेश होते आणि झोपून जाते.
  संध्याकाळी तिच्या मावशीच्या आवाजाने उठते. थोडं चहा नाश्ता झाल्यावर अन्वी  फेसबुक ओपन करते पण आकाश चा काही मॅसेज आलेला नसतो , ती कॉल करते तर तो फोन उचलत नाही  ती थोडी नाराज होते. आणि त्याला मॅसेज करते , मला माहित आहे मी तुला आवडले नाही. तू दिसायला स्मार्ट आहेस, तर तुझी अपेक्षा असेल कि तुझी गर्लफ्रेंड पण तशीच असावी. मी काही तुला फोर्स करत नाही . तुला मी नसेल आवडली तर तू मला सांगू  शकतो तसे. असा मॅसेज करून मी फेसबुक लॉगऑऊट करते.


बघूया तिच्या या मॅसेज ला आकाश काय रिप्लाय करतो पुढच्या भागात. 


🎭 Series Post

View all