आकाश त्याच्या कामामधून फ्री झाल्यावर फेसबुक ओपन करतो तर अन्वी चे मॅसेज आलेले असतात. तो मॅसेज बघतो आणि तिला रिप्लाय करतो. तू खूप चांगली मुलगी आहे. आणि मला दुसरी मुलगी आवडते. मी जस्ट टाईमपास करत होतो. पण मला तुला फसवायचे नाही आहे. आपण जस्ट फ्रेंड म्हणून राहू शकतो. असा मॅसेज करून आकाश ऑफलाईन जातो.
अन्वी रात्री सर्व आवरल्यावर झोपताना फेसबुक ओपन करते तर आकाश चे मॅसेज आलेले असतात. ती मॅसेज वाचून शॉक होते. असा कसा कोण टाईमपास करत का? तिला खूप राग येतो आकाश चा . ती रागामध्ये त्याला खूप मॅसेज करते. का माझ्या भावनाजवळ खेळाला , का उगाच मला खोटी आशा दाखवली. मी तुला या जन्मात तरी माफ करणार नाही. असे काही मॅसेज अन्वी आकाश ला करते. आणि झोपून जाते.दुसऱ्यादिवशी ती जरा उशिरा उठते . रडून डोळे सुजलेले असतात. ती फ्रेश होते आणि तिच्या क्लास ला जायची तयारी करते.असेच दिवसामागून दिवस जात असतात . ती आकाश ला फेसबुक वरून अनफ्रेंड करते. पण तिच्या मनामध्ये झालेल्या सर्व गोष्टींचा विचार चालू असतो.ती जवळ जवळ १ महिना त्याला कॉल मॅसेज करत नाही. आकाश अधून मधून कॉल करायचा पण ती काही फोन रिसिव्ह करायची नाही.
असेच नवरात्रीचे दिवस चालू असतात. एका दुपारी तिला एका अनोळखी नंबर वरून फोन येतो. त्यावेळी trucaller नसल्यामुळे कोणाचा फोने आहे हे कळायचे नाही. तिने फोन रिसिव्ह केला तर आकाश ने त्याचा फ्रेंड च्या फोन वरून तिला कॉल केलेला असतो. तो सॉरी बोलत असतो, माझी खूप मोठी चुकी झाली , मी असे नाही करायला पाहिजे होते. तू माझी एक चांगली मैत्रीण म्हणून तरी बोल माझ्याशी. असे खूप काही बोलत असतो. अन्वी मात्र सगळे चूप ऐकत असते.
अन्वी बोलेल का परत आकाश जवळ बघूया पुढच्या भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा