"पंकज..या वेळी आला की दोन तास जास्त घालवेल तुझ्यासोबत मग तर खुश! मी पण खूप मिस करते रे ! बर तू मला सांग मी तो मस्त लाल रंगाचा ड्रेस घालू का?तृप्ती उत्तरली .
"अग राणी , तू काहीही घाल मला तू नेहमीच आवडतेस. हो पण त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये तू अधिकच खुलून दिसते...पंकज हसून बोलला.
दुसऱ्या दिवशी दोघं एकमेकांना भेटले आणि ....
तिला.. पाहताच त्याची नजर तिला बघतच राहिली....
"तिचे ते लांबसडक मोठे केस... ओठांवर हल्कीच लाली.. डोळ्यांभोवती पसरलेले ते काजळ...आणि तिच्या गोऱ्या वर्णाला शोभेल असा लाल रंगाचा कुरता त्यात.. तिच्या त्या मानेवर चमकणारी सोनसाखळी आणि यातच तिची ती ओढणी सावरत " त्याला भेटायला आली होती ...
तिला बघून त्याला राहवले नाही आणि त्याने अलगद तिचा हात खेचून ... पटदिशी तिला मिठी मारली ..
तृप्ती...अग माझी तृप्ती! खूप आठवण आली ग तुझी! तरसून गेलो होतो आता मी तुला जाऊच देणार नाही .. आज पूर्ण दिवस तू माझ्यासोबत राहणार.. तृप्ती!सांगून देतो आताच.
पंकज तृप्तीला उद्देशून बोललत असतानाच त्याने हल्केच तिच्या गालावर चुंबन घेतले...
"निशा.. अग निशा कुठे आहेस? आणि किती वेळ लागणार तुला आवरण्यासाठी? अग जायचं आहे की नाही कामावर
निशाची आई तिला बोलवत होती!
एवढ्यात निशाने पुस्तक मध्ये ठेवले आणि घाईतच बाहेर आली.
काय ग आई? काही आवरू पण की नको ? किती घाई असते तुला? बोल काय झाल एवढं? निशा आईला बोलू लागली.
हो ग माझी आई ! किती काम करते ना तू! तुला किती त्रास देते मी ! जा आता हा डबा घ्या आणि जा कामावर! आई उत्तरली.
आणि निशा निघाली.
निशा...अगदी साधी सरळ शांत मुलगी. घराला हातभार लागावा म्हणून कॉलेज सांभाळून काम सुद्धा करायची. निशाला तशी कशाची कमी नव्हती पण हा तिला रोमांचक पुस्तके खूप आवडत असे आणि खूप वाचत देखील असे ! एवढे की रात्र आणि दिवसाचा अंदाज सुद्धा तिला कधी कधी लागत नसे...
तरुण वयात होती ..आयुष्यात नवे बदल बघत होती ... आणि बाजूला कधी प्रियकर आणि प्रेयसी पाहिले ..
की तिला सुद्धा वाटे " की आपल्यासोबत सुद्धा कोणी फिरावे! आपले सुद्धा कोणी लाड पुरे करावे! आपण सुद्धा कोणासोबत बिंदास फिरावे! उनाड वागावे! घट्ट मिठीत अलगद पडून रहावे ! कोणीतरी आपल्याला सुद्धा अलगद स्पर्श करावा ...आणि खूप काही! कधी कधी निशा तिच्या पुस्तकांमध्ये इतकी गुंग होत असे की तिला भानच राहत नसे की वेळ किती पुढे गेली आहे...
आणि अशातच तिला एक पुस्तक खूप आवडले ...कारण त्या पुस्तकात अगदी तिच्या सारखे एक व्यक्तिमत्व होते...अगदी प्रेमाच्या नव्या डोहात स्वतः ला वाहून देणारे...प्रेमाची नवीन परिभाषा शिकण्यासाठी आतुर असलेली तृप्ती!
निशाला तसे मित्र - मैत्रिणी होते पण कुणास ठाऊक सध्या तिला प्रियकराचे वेध लागले होते.. कदाचित पुस्तकातली तृप्ती जशी पंकज सोबत आनंदी होती तसेच सुख तिला सुद्धा अनुभवायचे होते ....पण निशा खूप शांत आणि घाबरट होती. साधं कामावर कधी ओरडा बसला तरी तिला रडू येत असे..आणि कधी उशिरा तर सोडा पण कधी सुट्टी देखील ती घेत नसे...कमाप्रती खूप एकनिष्ठ होती ती...कधी कोणी काही विचारलं तर नेहमी खूप शांततेत उत्तर देत असे कधी कोणावर चिडली तर नाहीच पण कोणाला उलट सुद्धा कधी बोलली नाही ....हा एक आई होती जिच्यावर थोडी चीड - चीड करत असे पण ती सोडली तर कोणी नाही आणि कधीच नाही ! खूप सहनशील..खूप समजदार होती निशा ... त्यामुळे स्वतः च्या मनातल्या गोष्टी सुद्धा ती कोणाला जास्त सांगत नसे कदाचित खूप खासगी सुद्धा होती..
मग एकच कमी तिला तशी वाटत होती एक जवळचा.. जिव्हळ्याचा..एक अगदी निस्वार्थ प्रेम करणारा प्रियकर!
आता एवढं मनापासून मागते तर नशीब आणि योगायोगचे सूत्र जुळून येणारच ना!
परंतु तिची ही उत्सुकता तिला कुठे घेऊन जाईल हे मात्र वेळच ठरवेल .
आज खूप वेळ निशा कामावर थांबली होती खरतर ती एका पर्यटन व्यवसायात कामाला होती त्यामुळे रोजची खूप लोकांशी तिची भेट होत असे आणि कधी कधी वेळ सुद्धा होत असे पण आज जरा जास्तच झाला होता सर्व आवरून निघणार इतक्यात एक व्यक्ती तिच्यासमोर आला आणि तिला पर्यटन विषयी विचारू लागला पण शेवटचे ग्राहक आहे म्हणून तिने सुद्धा विचार केला जाऊद्या एवढं झालं की निघू...
पण त्याची विचारपूस पर्यटन वरून तिच्यावर कधी आली तिला सुद्धा समजले नाही ...
"मिस. निशा तुमचा ड्रेस खूप सुंदर आहे" आणि तुम्ही तर त्याहूनही अधिक! तो व्यक्ती उत्तरला.
"धन्यवाद...ही तुमची पुढची माहिती "आणि या तुम्ही आता ! निशाने थोडा घाबरून त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न केला...
त्याने सुद्धा तिचा निरोप घेतला पण जाताना एक कटाक्ष टाकून तो हलकेच हसत गेला.
तो गेल्यानंतर निशा थोडी विचारात गेली पण दुर्लक्ष करून ती घराकडे निघाली...
क्रमशः