Login

प्रेम - निस्वार्थ की स्वार्थी

Love

 भाग - २

"काय ग निशा ? हे असं वागणं कितपत योग्य तुझ? अग रात्रीचे ११ वाजले! मला सांग एक फोन करून तुला कळवता देखील नाही आले? की तुला उशीर होणार आहे! आई निशावर जरा चिडून बोलत होती."

"आई , आले ना घरी ! जेवायला वाढ बघु . उद्या सकाळी परत कामावर जायचे आहे मला . एवढेच बोलून निशा खोलीत गेली.
खोलीत गेल्यावर निशा विचार करू लागली". 
की ,"कोण होता तो व्यक्ती आणि असा कसा मला इतकं पटकन बोलून गेला! पण तसा दिसत तर चांगलाच होता. राहणीमान सुद्धा चांगले होते. शिकलेला सुद्धा होता की ! पण जाऊद्या शेवटी होता तो अनोळखीच! " असा विचार करून निशा जेवण करायला गेली.
दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि त्यानंतर रविवार म्हणून आईने काही सामानाची यादी दिली आणि सायंकाळी घेऊन येण्यास सांगितली.
आज कामावर गेल्यावर सुद्धा निशाच्या डोक्यातून तो व्यक्ती काही जाईना! कुणास ठाऊक परत परत तिच्या डोळ्यासमोर तो व्यक्ती येत होता. 
आणि इतक्यात....
"निशा, ए निशा..अग एकडे ये ग ! तुझ्या नावाने काही वस्तू आल्या आहेत."निशाला कोणीतरी गेट वरून आवाज दिला.
निशा घाईत गेट कडे धावली.. 
आणि बघते तर काय! 
एक लाल गुलाबांच्या खूप मोठा पुष्गुच्छ सोबतच एक चॉकलेट बॉक्स आणि एक पत्र तिच्यासाठी कोणीतरी सोडून गेले होते..
            प्रिय निशा,
                            मी समीर बोलत आहे. कदाचित तुला विसर पडला असणार पण मला तू अगदी स्पष्ट आठवत आहेस. अग काल मी तुझ्या कडे पर्यटन विषयी चौकशी करायला नव्हतो का आलो! निशा मला चुकीचं समझु नकोस पण खर सांगू मी तुला बघताच बघतच राहिलो ग! मला खरंच तू खूप पसंद पडली आहेस पण मी तुझ्यावर दबाव अजितबात टाकू इच्छित नाही.पण जास्त काही नाही तर मैत्री तर मागुच शकतो ना! तुला माझ्यासोबत मैत्री करायला आवडेल का? निशा . आणि जर तुझा होकार असेल तर तुझ्या साठी पाठवलेल्या वस्तूंचा स्वीकार कर पण नकार असेल तर त्या वस्तू बाहेर ठेऊन तू आत कामाला जाऊ शकतेस.. पुढे तुझी मर्जी! 
                                                     तुझा हितचिंतक
                                                            समीर
पत्र वाचून निशा थोडी थबकली कारण हे सर्व तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच होत होते.आणि समीर किंवा तो व्यक्ती तिच्यासाठी अगदीच नवीन होता पण हे असं तिच्यासाठी कधी कोणी केलेही नव्हते.अर्थात ती चकित सुद्धा होती..थोडी आनंदी सुद्धा होती पण एवढ्यात नको म्हणून तिने त्या वस्तू बाहेर ठेऊन ती कामावर निघून गेली.
     सायंकाळी तिला परतत असताना बाहेर ठेवलेलं ते फुले आणि तो बॉक्स तिथेच दिसला पण नजर फिरवून ती तिथून निघून गेली.
आईने समान आण्यास सांगितले होते म्हणून जवळच एक मॉल होता त्या ठिकाणी ती ते सामान आण्यास गेली.
सर्व खरेदी केल्यानंतर बिल्लिंग खात्यावर तिला समीर दिसला आणि तिने काही विचारण्याआधी त्यानेच प्रश्न केला..
"मिस निशा, तुम्ही माझा पाठलाग करता ना! खर सांगा!
मी फक्त एक भेट पाठवली पण तुम्हाला आवडली नाही आणि तुम्ही माझा पाठलाग केला! आणि तुम्ही आता मला पोलीस स्टेशन मध्ये देणार ना!
समीरला एकदम बघून ती थोडी चकित झाली ...आणि उत्तरली.
"नाही! अस काही नाही ! मी तर इथे समान घेण्यास आली होती पण पण कदाचित तुम्ही माझा पाठलाग करत आहात."
मिस. निशा मी गम्मत केली. खरतर मी एक उद्योगपती आहे.आणि काही दिवस या शहरात आलो आहे ...आणि जवळच मी एक घर घेतले आहे पण वस्तू संपल्या म्हणून जरा सामान घेण्यास आलो आणि सकाळ साठी मला माफ करा तुम्हाला दुखवण्याचा माझा काही इरादा नव्हता...
असो..मी येतो आता .आणि छान वाटले तुम्हाला परत एकदा भेटून .
आणि एवढे बोलून समीर निघून गेला.
त्यानंतर निशाने सुद्धा काही गंभीरतेने घेतले नाही. ती सुद्धा तिच्या घराकडे निघाली.
घरी आल्यानंतर आईने मस्त जेवण बनवले होते. ते करून ती खोलीत गेली.
आज खूप दिवसानंतर निशा तिचे पुस्तक बघत सुद्धा नव्हती.कुणास ठाऊक आज वेगळीच घटना तिच्या डोक्यात फिरत होती....
ते पत्र आणि त्यातली वाक्ये! 
कुणास ठाऊक निशा मनोमनी मानू लागली की हा सर्व योगायोग नाही कुणास ठाऊक खरंच माझ्या आयुष्यात कोणी तरी येणार असेल ...खरंच समीर तर नाही ना तो व्यक्ती! मनोमनी त्याच्याविषयी ती योग्य आणि अयोग्य सुद्धा विचार करत होती.
त्याची एक जलदता तिला योग्य वाटत नव्हती पण त्याच्या भावना तिला योग्य वाटत होत्या...
शेवटी एका मुलीसाठी एखादा मुलगा एवढा खर्च का करेल? आणि कशासाठी? 
पण सर्व विचारांना पूर्ण विराम लावत ती शांत झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी निशा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेली .आज मात्र समीरचा काहीही विषय तिच्यासमोर नाही आला.म्हणून तिने सुद्धा काही विचार नाही केला आणि ती आज पुन्हा उशिरापर्यंत काम करत राहिली...
पण आज बाहेर आली तेव्हा जरा जास्तच उशीर झाला होता आणि ती थोडी घाबरली सुद्धा होती .
एवढ्यात तिला एक रिक्षा दिसली तिने त्या रिक्षेला हाथ दिला पण ती थांबली खरी पण त्यात....