भाग -३
निशाने जी रिक्षा थांबवली होती त्यात बघते तर काय!एक नाही दोन नाही तब्बल ५ व्यक्ती मद्यप्राशन करून बसले होते.
त्यामुळे त्यात जाणे तिला योग्य वाटले नाही. म्हणून ती पुढे चालू लागली पण ती रिक्षा आणि त्यातले तरुण तिच्या मागे येऊ लागले.
आणि इतक्यात एकाने तिचा हाथ खेचला...
"ए हेरॉईन चल ना! आम्ही थांबलो तुझ्यासाठी ..तू नाही ना आली आम्ही पण नाही जाणार काय रे चला मॅडमला घेऊन चला..
आणि इतके बोलून ते सर्व तिच्या चारही बाजूंनी येऊन उभे राहिले "
निशा अतिशय घाबरली...तिला काहीच सुचेना ..हळू हळू ते सर्व जवळ येऊ लागले आणि इतक्यात .....
कोणीतरी त्या तरुणांना मागून गाडीने जोरात धक्का दिला...
काही क्षण निशाला काही समजले नाही .
कारण
ते तरुण जसे जवळ आले तशी निशा खूप घाबरली आणि जवळ जवळ ती चक्कर येऊन पडत होती पण अचानक कोणीतरी तिला सावरले आणि गाडीत सुखरूप बसवले आणि त्या तरुणांना मारू लागले ...
काही वेळानंतर ते तरुण घाबरून पळून गेले आणि तिला समोर समीर दिसला ..
आणि अचानक घाबरलेल्या निशाने समीरला पटकन मिठी मारली आणि हुंदके देत बडबडू लागली...
"समीर, तुझे खूप आभार ! तुला काहीच अंदाज नाही आज जर तू नसता तर कदाचित माझ्या सोबत काय झाले असते मला सुद्धा समजले नसते! " .. निशा
निशा , शांत हो. गेले ते घे पाणी पी..आणि शांत हो.आणि तुला मुळात काही कळते का? एवढ्या रात्री पर्यंत काम करण्याची काही गरज होती का? आज जर मी नसतो तर काय झाले असते तुझे? कोणी वाचवले असते तुला! ...समीर
अरे, मी निघालेच होते पण जरा उशीर झाला . बस ना आता किती बोलशील! .. निशा.
समीर... फ्रेंडस! ... निशा.
होहो.. नक्कीच तर आजपासून आपण मित्र! मग या मैत्रीच्या
नव्या आनंदात मी काही मागितले तर तू
देशील? ..समीर
बोल की ! काय हवे तुला? .. निशा
तुला उद्या माझ्यासोबत कॉफी पिण्यास आवडेल? .... समीर
कॉफी.. समीर.. मला उद्या नाही जमणार ! पण तू म्हणशील तेव्हा नक्की येणार मी. ....निशा थोडी विचलित होऊन उत्तरली.
अच्छा, उद्या नाही जमणार . परवा? आता परवा जर तू नाही बोललीस तर मी ऐकून नाही घेणार! .... समीर.
बर, समीर येते मी परवा. पण एकाच अटीवर. .... निशा.
हो बोल ना . मला मान्य आहे ! .... समीर.
मी तुझ्यासोबत कॉफीला येणार पण मला तुझ्या हाताची मस्त बनवलेली कॉफी हवी. बोल जमेल तुला? ... निशा.
माझ्या हाताची! बर ठीक आहे . तू म्हणतेस तस. मी तुला परवा दुपारी घ्यायला येईल . तेव्हा रेडी रहा . आपण सोबत माझ्या घरी जाऊ. .... समीर.
चल तर मग ठरल. परवा कॉफी डेट. .... निशा.
एवढ्यात निशाचे घर आले आणि समीर आणि निशाने एकमेकांचा निरोप घेतला आणि तो स्वतः च्या घरी परतला.
रात्री घरी येण्यास खूप उशीर झाला होता पण घराची किल्ली निशाकडे असल्यामुळे घरी कोणाला काही समजले नाही.
जशी ती घरी पोहचली..तिच्या फोन वर समीरचा मेसेज आला.
हॅलो, निशा . खूप छान वाटले तुला भेटून . आणि खूप खूप आभार मला तुझा मित्र म्हणून स्वीकारण्यासाठी.
यावर निशाने देखील उत्तर दिले...
हॅलो, समीर. सेम हियर टू. मला सुद्धा खूप छान वाटले. आणि मी वाट बघत आहे तुझ्या कॉफीची.
बऱ्याच वेळ बोलल्यानंतर दोघेही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सुद्धा निशाच्या आयुष्यात समीर कायम होता..
हा दिवस तर तिला खूप जड जात होता कारण आज ती सुद्धा खूप व्यस्त होती आणि समीर सुद्धा एका मीटिंग मध्ये अडकला होता. ज्याची कल्पना त्याने तिला सकाळीच दिली होती पण तरीही तिचे मन कासाविस होत होते. पण नंतर कामामध्ये व्यस्त झाल्यानंतर तिला विसर पडला ....
अखेरीस म्हणता म्हणता दिवस संपला आणि आज निशाची कॉफी डेट होती.
निशा सकाळ पासून एकदम खुश होती. आजचा दिवस ती खूप छान घालवणार होती ... आणि आईला सुद्धा तिने सांगितले होते की ती आज तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे
अर्थात निशा आज खूप खुश होती .कदाचित एक गोष्ट जी ती या बाहेरच्या जगात शोधत होती ती तिला सापडली होती. समीर.
तिच्या हक्काचा असा एक व्यक्ती. तिच्या प्रेमाचा व्यक्ती . तिचा जवळचा व्यक्ती आणि समीर तिला घेण्यास आला.
काही वेळात दोघेही त्याच्या घरी पोहचले . त्याचे घर भरपूर मोठे होते. घरात खूप जास्त वस्तू नव्हत्या पण घर भव्य होते. घर पूर्णतः समीर सांभाळत असे. घरी कुणी कामाला वगेरे नाही येत हे तिला घराच्या साफ सफाई वरूनच लक्षात आले..पण ती समीर काही बोलली नाही.
आल्यानंतर काहीच वेळात दोघांची कॉफी डेट सुरू झाली.
आता बसल्या बसल्या काही सुचेना म्हणून समीर तिला वेगवेगळ्या गोष्टी विचारू लागला ...घरी कोण असतात.काय करते ...बाकी वेळ ...पण प्रश्न ही संपत होते आणि मग शेवटी समीरने एक खेळ सुचवला ...
निशा, तुला हरकत नसेल तर आपण एक खेळ खेळायचा का? .... समीर
हो हो आवडेल मला वेळ ही जाईल. ...निशा.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा