(तर मागील भागात आपण पहिले कि निशा आपल्या काल्पनिक दुनियेत खूप आनंदी असते पण अचानक तिच्या आयुष्यात एक तरुण येतो समीर जो तिच्या स्वप्नातला राजकुमार बनतो आणि या राजकुमारासोबत निशा आता मैत्रीचे काही क्षण हळूहळू अनुभवू लागते. असेच एक दिवस निशा आणि समीर एक खेळ खेळत असतात पण काही अनपेक्षित घटनांमुळे त्यांचा खेळ थांबतो आणि निशा घरी परतते )
निशा घरी आल्यानंतर सर्व आवरून आपल्या खोलीत येऊन बसते आणि एका पुस्तकामध्ये स्वतःचे डोके घुसवून बसते . आणि फोने मात्र दूर फेकून देते . कळत न कळतपने हे तेच पुस्तक असते जे ती नेहमी वाचत असे आणि स्वतःचा आनंद एका काल्पनिक दुनियेत शोधत असे . पण आज त्या पुस्तकाची पाने सुद्धा निशाला वेगळेच संदेश देत होते . आज त्या पानांमध्ये गुरफटताना निशाला समीर आठवत होता त्यांचे ते दोन क्षणांचे चुंबन आठवत होते त्याची ती दोन क्षणाची भेट आठवत होती त… त्याचे ते न कळत पने जवळ येणे तिला आठवत होते त्याचा तो अलगद स्पर्श त्याचा तो सहवास ते सर्व काही निशाच्या डोळ्यासमोर लक्ख पने उभे राहत होते ...आणि जणू पुन्हा पुन्हा ती ते क्षण जगात होते तिच्या मनाला ते क्षण खूप सुख सुद्धा देत होते पण त्याच बरोबर हे योग्य आहे का ? मी घाई तर नाही करता ना ? समीर विश्वासू तर आहे ना ? आणि हे सर्व योग्य आहे का? असे अनेक प्रश्न निशाच्या मनाला भेडसावत होते.
असाच विचार करत निशा झोपी जाते …
सकाळी उठून ती फोन बघते तर तयावे खूप कॉल आणि मेसेंज आलेले असतात . त्यामधील काही समीरचे तर काही कंपनीचे असतात . समीरचे एवढे कॉल बघून निशाला काही कळत नाही म्हणून ती घाईने त्याला फोने करते पण तो उचलत नाही अखेरीस निशा आवरून त्याच्या घराकडे जाण्यास निघते .. काही वेळांनंतर त्याच्या घरी पोहचल्या नंतर ती जोरजोरात त्याचे दार ठोठावू लागते पण काही केल्या दरवाजा कुणी उघडत नव्हते शेवटी ती आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ती दरवाजा तोडते आणि बघते तर काय ?समीर शांत झोपलेला असतो. काही क्षणासाठी निशाला काही समझत नाही आणि ती जवळ असलेला पाण्याचा ग्लास एकदम समीरच्या तोंडावर मारते .. ज्यामुळे समीर जागा होतो आणि तिला बघून थोडा धक्का देखील खातो पण सावरत तो तिची विचारपूस करतो …
समीर तू वेडा आहेस का ? अरे मी निघून काय गेली अस कोण वागत? समीर आणि एवढे कॉल अरे मला वाटल काय झालं आणि काय नाही तुला ? अरे किती घाबरली होती मी आणि हे काय एवढे मद्यपान ? समीर
तुला काही झाले असते तर मी काय केले असते ? आणि निशा एकदम रडून गेली .
निशा , इकडे बघ मी एकदम छान आहे . आणि मला माफ कर पण मला खूप असे झाले कि मी तुला काल रात्री दुखावले . म्हणून मी खूप टेन्शन मध्ये आलो होतो ग बाकी काही नाही … असे म्हणत समीरने निशाचा हाथ स्वतः च्या हातात घेतला .
त्यांनतर काही वेळ सोबत बसल्यांनतर अचानक निशाचा फोने वाजतो . तर त्यावर तिच्या कंपनीचा फोने असतो आणि तिचे प्रमोशन झालेले असते .त्यानिमित्त त्यांनी तिला नवीन लोकेशन नियुक्त केलेले असते हि बातमी ऐकून निशा खूप आनंदी होते आणि लवकरच हि बातमी ती समीर आणि आईला सांगते . सर्व अगदी खुश असतात आणि निशा सुद्धा खूप आनंदी असते पण त्यासोबतच हे दुःख पण असते कि आता समीर पासून ती दूर चालली आहे . पण समीर देखील तिला समझवतो कि मी भेटायला येईल आणि आपण करू सर्व नीट नको काळजी करू तू कामावर लक्ष दे फक्त . अखेरीस खूप समजावण्यानंतरनिशा सुद्धा अगदी खुश होऊन तयारीला लागते
नवीन शहर ..नवीन काम...नवीन जागा .. या मध्ये निशा खूप रमून जाते पण तिला समीरची आठवण मात्र सतावत असते . पण काय करणार वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो . असेच एक दिवस रात्री ती उशिरा पोहचते आणि झोपायला जाते पण तेवढयात तिच्या घराची बेल वाजते … रात्रीच्या ११ वाजता तिच्या रूम वर कोण आले म्हणून ती थोडी घाबरली खरी पण पाहणे गरजेचे होते . आणि जीव मुठीत धरून ती बघायला गेली आणि बघते तर काय !
भाग थोडा उशिरा टाकत आहे माफी असावी पण काही कारणास्तव मी पूर्णतः विसरून गेली होती ..
क्रमश :
भाग - ५
( कोण असणार दरवाजावर ? एवढ्या रात्री निशाचा कोणी पाठलाग तर केला नसणार ना ? आणि त्याला व्यक्तीला बघून निशा घाबरली का असणार ? बघू पुढच्या भागात )