Login

“प्रेम, आकर्षण आणि जबाबदारी” एक जाणीव देणारा विचार.

Love With Trust, Enjoy Love In Life
“प्रेम, आकर्षण आणि जबाबदारी” एक जाणीव देणारा विचार.....सुनिल पुणेTM

“बायकोपेक्षा मेहुणी बरी…
राधा-कृष्णासारखी जोडी…
प्रेमिकाच जीवनात खरी…”
अशा ओळी ऐकायला धक्कादायक वाटतात, पण त्या मानवी मनातील अनावर आकर्षण, अपूर्णतेची जाणीव आणि सतत काही तरी ‘वेगळं’ मिळवण्याची ओढ याचं प्रतिबिंब आहेत. माणूस अनेकदा जे आहे त्यात समाधान मानत नाही; दूरचं हिरवंगार गवत अधिक हिरवं वाटतं. इथूनच अनेक नाती भरकटतात… आणि अनेक आयुष्यं उद्ध्वस्तही होतात.

राधा-कृष्णाचं प्रेम आपण आदर्श मानतो, पण ते शुद्ध, नि:स्वार्थ, त्यागमय आणि आध्यात्मिक उंचीवरचं प्रेम होतं. आज त्याच नावाखाली केवळ शारीरिक आकर्षण, लपवाछपवी आणि फसवणूक केली जाते, हे ते प्रेम नाही, ती फक्त वासना असते.

“एकतरी असावी शेजारी…”
ही ओळ त्या एकटेपणाच्या जखमेचं प्रतीक आहे. आज माणूस गर्दीत असूनही एकटा आहे. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, पण मनाशी बोलणारं कोणी उरलेलं नाही. आणि याच पोकळीतून चुकीची नाती जन्म घेतात. ती क्षणिक आधार देणारी, पण आयुष्य उद्ध्वस्त करणारी.

“इतिहास पण गवाह आहे,
प्रेमिका शिवाय जन्म अधुराच आहे…”
हो, प्रेमाशिवाय माणूस कोरडा असतो. पण प्रेम आणि परस्त्रीगमन यांची गल्लत होता कामा नये. प्रेम म्हणजे केवळ देहाची भूक नाही; ते दोन मनांचा, दोन आत्म्यांचा सन्मानपूर्वक संगम असतो.

आजची खरी गरज काय आहे, तर
विश्वासयुक्त प्रेम.
त्यागातून फुलणारं प्रेम.
काळजी घेणारं, जपणारं, जखम न देणारं प्रेम.

जर प्रेमात गोपनीयता, खोटेपणा, भीती आणि गैरसमज असतील, तर ते प्रेम नसून हळूहळू वाढणारा आजार ठरतो अगदी मानसिकही आणि शारीरिकही. आजार फक्त शरीरालाच होत नाही, तर कुटुंब, मुलं, समाज सगळे त्यात होरपळतात.

म्हणूनच
प्रेम करा, पण जपून करा.
आकर्षणावर नाही, विश्वासावर उभं करा.
स्वतःच्या सुखाइतकाच समोरच्याच्या आयुष्याचाही विचार करा.
क्षणिक समाधानासाठी आयुष्यभराचं शांतीसुख जाळू नका.

रोमँटिक व्हा,
शृंगारिक व्हा,
पण जबाबदारही व्हा.

कारण खरे प्रेम तेच,
जे आजार देत नाही, तर आयुष्याला आरोग्य देतं…
जे घर तोडत नाही, तर घर बांधतं…
जे क्षणात संपत नाही, तर जन्मभर साथ देतं…

परत सांगतोय....म्हणूनच
प्रेम करा, पण जपून करा.
आकर्षणावर नाही, विश्वासावर उभं करा.
स्वतःच्या सुखाइतकाच समोरच्याच्या आयुष्याचाही विचार करा.
क्षणिक समाधानासाठी आयुष्यभराचं शांतीसुख जाळू नका.
0