Login

प्रेमाचे क्षण

गोड प्रेमाचे क्षण
पावसाळी वातावरण झाले होते........ सगळीकडे अंधार पसरला होता........ मोठमोठ्या विजेच्या गडगडाटात पावसाने बसायला सुरुवात केली होती.......... आराध्या तिच्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभी राहून समोर धो धो पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत होती............ पावसाचे काही थेंब तिच्या अंगावरही उडत होते....... जसा धो धो पाऊस बाहेर चालू होता, तसाच एक पाऊस तिच्या आतही चालू होता.......... त्याचे थेंब तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपात वाहत बाहेर पडत होती.......... त्या बरसणाऱ्या पावसाने आराध्याला तिच्या भूतकाळात पोहोचवले..........

आराध्या घरातली अगदी हुशार समजूतदार आणि मोठी मुलगी होती परंतु घरातली बिकट परिस्थिती पाहता तिच्या वडिलांनी समोरून चांगले स्थळ चालून आले म्हणून लगेचच तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला........ आराध्याने पण आपल्या पाठीमागे असणाऱ्या दोन लहान बहिणींचा विचार करून लग्नाला होकार कळवला........

बघता बघता तिचे लग्नही झाले.... . लग्न सोहळा अगदी छान संपन्न झाला....... मुलाकडच्याने कसलीही मागणी केली नव्हती त्यामुळे आराध्यालाही तिच्या आई-वडिलांच्या डोक्यावरून आपण भार हलका केल्याप्रमाणे वाटू लागले परंतु मनात कुठेतरी शिक्षणाची असलेली आवड तिने जपून ठेवली होती........ तिला आपले शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करून आपले घर सांभाळायचे होते, पण ते स्वप्न कुठेतरी स्वप्नच राहून गेले........ अर्धवट शिक्षणाने ती काहीही करू शकणार नाही..........

तिने आपल्या मनातली इच्छा मनातच दाबून मोठ्या मनाने आपला संसार सांभाळला....... तिच्या घरचे सगळेच खूप चांगले होते........ नवरा सासू-सासरे सगळे तिला खूप सांभाळून घेत होते.......

एक दिवस असेच घरची साफसफाई करताना तिच्या हातात काही फाईल लागल्या....... तत्या फाईल मधले पेपर वाचून तर तिच्या पायाखालची जमीन सरकली...... तिच्या नवऱ्याच्या हृदयाचे ऑपरेशन झाले होते........ एवढी मोठी गोष्ट तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरकडच्या मंडळींनी त्यांच्यापासून लपवून ठेवली हा धक्का आराध्याला सोल होत नव्हता........ तिने रडतच आपल्या माहेरी फोन करून सगळे सांगितले..........

तिचे वडील गावाकडचे काही माणसे घेऊन आराध्या च्या घरी आले होते ....... घरात खूप मोठे वादविवाद रंगले...... सासरकडची मंडळी ने आपली चूक कबूल केली आणि मोठ्या मनाने सगळ्यांची माफी मागू लागले........ तिच्या वडिलांनी तर आराध्या ला परत घेऊन जाण्याचाही निर्णय घेतला होता...... या सगळ्या वेळात आराध्याने खूप विचार केला........

" नाही बाबा, मी तुमच्यासोबत परत घरी नाही येऊ शकत यामुळे तुम्हालाच गावाकडची लोक नाव ठेवतील....... माझे लग्न झाले आहे त्यामुळे आता हेच माझं भाग्य आहे....... " आराध्यने त्या सगळ्यांसमोर आपला निर्णय सांगितला...... आराध्याच्या घरच्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती.......... शेवटी तिच्या घरचे सगळे वैतागून तिच्यावर राग धरून तिकडून निघून गेले..........

" आराध्या माझी खरंच खूप मोठी चूक झाली........ जीच्यासोबत माझं लग्न झाले आहे, ती माझी अर्धांगिनी असूनही मी तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली, पण खरंच मी मजबूर होतो....... मला तर लग्नाच्या आधीच तुला हे सगळं सांगायचं होतं, पण काय करू माझ्या आईने मला शपथ घातली होती त्यामुळे ती शपथ पाळण्यासाठी मी तुझ्यापासून हे सगळे लपवले......... " आराध्याचा नवरा धनुष तिला समजावण्याच्या स्वरात बोलू लागला........

" या आधी जे काही झाले ते तर बदलता येणार नाही, पण मला वचन द्या की, इथून पुढे जेवढे दिवस आपल्याकडे आहे आपण ते सुखाने आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू........ " आराध्या प्रेमाने त्याच्याकडे बघून बोलते .......

" हो आराध्या मी तुला वचन देतो की, इथून पुढे आपले सगळे दिवस आनंदाचे येतील....... आपण आपल्या आयुष्यातले हे ' प्रेमाचे क्षण' अगदी मन भरून जगून घेउ........ " धनुष हि तिच्या हातावर हात ठेवून प्रेमाने तिच्या डोळ्यात बघत वचन देतो.........

यापुढचे प्रत्येक दिवस ते दोघे अगदीं मनाने जगत असतात...... त्यांचा संसार खूपच सुखाचा चालू असतो......... पुढच्या काही दिवसातच आराध्याला गोड बातमी मिळते...... तिने ती धनुषला सांगितल्यावर धनुष आनंदाने नाचू लागतो......... काही महिन्यातच त्यांच्या हातात त्यांचे छोटेसे बाळ असते....... धनुष प्रेमाने आपल्या बाळाचे नाव आरुष ठेवतो...........

आराध्याचा सगळा वेळ तिचा संसार आणि तिच्या बाळाला संभाळण्यामध्येच जात असतो........ धनुष आपल्या परीने तिला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो...... त्यांचे हे प्रेमाचे क्षण खूपच छान चाललेले असतात........... आरुष आता पाच वर्षाचा झालेला असतो आणि तो शाळेमध्येही जात असतो.........

सगळं चांगलं चालू असताना एक दिवस तो क्षण येतोच आणि अचानक रात्रीच्या वेळी धनुष च्या छातीमध्ये खूप दुखायला सुरुवात होते........... आराध्या तर खूपच घाबरून जाते........ जराही वेळ न घालता ती धनुषला घेऊन ताबडतोब हॉस्पिटल ला जायला निघते........ तीचे सासू-सासरे ही तिच्यासोबत असतात....... धनुषला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते........ त्याच्यावर उपचार सुरू होतात......... आराध्या बाहेर बसून देवाचे नामस्मरण करत असते..........

" तुमच्या हजबंडला तुम्हाला भेटायचे आहे..... " एक नर्स बाहेर येऊन आराध्याला सांगून जाते ..... तशी आराध्या धावतच धनुषला ठेवलेल्या आई सी यू मध्ये येते........ त्याची ती बिकट परिस्थिती पाहून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचे नावच घेत नाही...... ती पटकन त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागते.......

" आराध्या मला नाही वाटत आता मी या सगळ्यातून सुखरूप परत येईल. ..... " धनुष रडके आवाजातच तिच्याकडे बघून बोलू लागतो........

" नाही धनुष प्लीज तुम्ही असे बोलू नका...... डॉक्टर आहेत ना ते त्यांचे प्रयत्न करत आहेत........ " आराध्या त्याला समजावण्याच्या स्वरात बोलते....... खरंतर मनातून ती पण खूपच घाबरलेली असते.. ......

" आराध्या आपल्याला सत्य परिस्थितीची आधीपासूनच जाणीव होती त्यामुळे हा खोटा दिलासा तू मलाही देऊ नको आणि स्वतःच्याही मनाला देऊ नकोस...... आता फक्त मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे........ " धनुष शांत शब्दातच तिच्याकडे बघून बोलण्याचा प्रयत्न करतो........

" धनुष प्लीज तुम्ही अशी आशा सोडू नका...... " आराध्या तरीही त्याला समजवण्याचा निरर्थक प्रयत्न करत बोलते........

" आराध्या मी तुझ्या कपाटात ठेवलेली तुझी डायरी वाचली होती त्यामुळे मलाही समजले होते की , तुला शिक्षणाची खूप आवड आहे.......... तेव्हा बोलण्याची हिंमत नाही झाली पण आता मला वचन दे की, तू तुझी शिक्षणाची आवड पूर्ण करशील आणि तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या कंपनीमध्ये चांगली नोकरी करून दाखवशील......... माझ्या आरुषचा चांगला संभाळ करशील आणि आपण एकमेकांसोबत जगलेले आपले प्रेमाचे क्षण कायम तुझ्या हृदयामध्ये साठवून ठेवशील......... " बोलताना धनुष चा आवाज कापरा झालेला असतो....... त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत असतात........

" हो धनुष मी तुम्हाला पचन देते, तुम्ही जे सांगितले आहे ते मी पूर्ण करेल....... मी माझे शिक्षण पूर्ण करेल, आपल्या आरुषचा चांगला सांभाळ करेल आणि तुमच्या सोबत घालवलेले आपले प्रेमाचे क्षण आयुष्यभर माझ्यासोबत ठेवेन....... " आराध्या पण त्याच्याकडे बघून रडक्या स्वरातच वचन देते....... तिचे वचन ऐकून धनुष समाधानाने डोळे मिटतो.......

धनुषचा अंत्यसंस्कार केला जातो. .. . पुढचे काही दिवस आराध्या धनुष च्या आठवणी मध्येच स्वतःच्या रूममध्ये बसून आपले दुःख व्यक्त करत असतो.........

" आराध्या तुला असे बसून चालणार नाही..... तू धनुषला दिलेले वचन विसरलीस का ? तुला आता स्वतःसाठी स्वतःच्या मुलासाठी खंबीर बनायला पाहिजे....... " आराध्याचे सासरे एक दिवस तिच्या रूममध्ये येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करून लागतात........

" हो बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात....... मला आता माझे दुःख बाजूला ठेवून माझ्या मुलासाठी जगायचे आहे...... माझ्या धनुष ने मला सांगितले होते की, आमच्या गोड आठवणी , आमच्यातले प्रेमाचे क्षणच मला सोबत घेऊन जगायचे आहे त्यामुळे मी आता दुःख करत बसणार नाही........ " आराध्या पण आपल्या सासऱ्यांकडे बघून आत्मविश्वासाने बोलते......


आराध्या चे सासरे तिकडे असलेल्या मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये तिचे ऍडमिशन करतात....... तिच्या सासू-सासाऱ्या कडून तिला मानसिक सपोर्टही मिळतो........ आराध्या आपले शिक्षण पूर्ण करत आपल्या मुलाचाही चांगला सांभाळ करू लागते...........

आज आराध्याने आपले शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावरची नोकरी मिळवलेली असते........ आज ती स्वतः खूप मोठा पगार हातात घेत असते...... त्याचबरोबर तिने आपल्या मुलांवर ही चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न केलेला असतो....... तिचा मुलगाही अभ्यासामध्ये खूप हुशार असतो................

आजही आराध्या आपल्या पूर्ण दिवसांमधून थोडा वेळ आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे धनुष साठी काढून बाल्कनी मध्ये उभी राहून त्याच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असते....... त्याच्यासोबत घालवलेले ते ' प्रेमाचे क्षण' आज तिच्या आयुष्यातलीच सगळ्यात मोठी ताकद बनून तीला उभा राहण्यासाठी सहारा देत होते........ आजही समोर धो धो पडणाऱ्यापावसाला बघून तिला धनुष सोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत होते आणि त्याच्या प्रेमाचा पाऊस तिच्या हृदयात ही बरसत होता....... त्याचे थेंब तिच्या डोळ्यातून अश्रू वाटे बाहेर पडत होते..........


समाप्त


********************************************
( कथा आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरु नका............. )