लव ट्रँगल भाग १६

आज नील रात्री उशिराच...
...सुभाषरावांची तब्येत आता थोडी खालावली होती. वयही झाल होत. त्यामुळे मुलाचं लग्न उरकून घ्याव हाच विचार त्यांच्या मनात यायचा......
------------------------------------------------------
पुढे.......

              आज नील  रात्री उशीराच ऑफिसवरुन घरी परतला होता. आई बाबा झोपले असतील म्हणून सरळ तो त्याच्या बेडरूमकडे  चालता झाला. पण तेवढ्यात आईने पाठीमागून आवाज दिला. " जेवत नाहीस का नील?...अरे किती वेळ केलास?..ये थोड खावून घे..मी देते गरम करून." आई नीलला थांबवत बोलली.
"अग आई भूक नाही मला...झोप आली आहे. अस म्हणून तो  पुन्हा वळला.
"तस उपाशी झोपू नये बाळा...  अन्नाचा अपमान होतो." भूकही नव्हती तरीही आईने बळेच थोडेफार खाऊ घातले.

           'झोप लागली आहे'... नीलने आईला कारण तर सांगितल होत, पण खूप उशीर होऊन ही त्याला झोप लागत नव्हती. त्यामुळे तो मोबाईल हातात घेवून पडला होता ...त्यातही त्याच लक्ष लागत नव्हत. तो मोबाईल बंद करून झोपायचा प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्यात, मनात सतत भूतकाळातील घडलेल्या घटना ठाण मांडत होत्या. माणूस जेव्हा एकटा असतो, तेव्हा त्याचे स्वतःचे विचारच त्याला खायला उठत असतात. नीलचही असंच काही झाल होत. विचारांच भूत निद्रादेवीवरच आक्रमक झाल होत. त्याला सतत आशूचा चेहरा, तीच बोलण, तिचे शब्द आठवत होते.
 
     
       'नील...नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय...आता तुम्हीच माझे सर्वस्व आहात...तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना?....आणि तसच जर झाल तर मी जीव देईन...'  खरच आशू... हे तू बोलत होतीस. किती परीक्षा बघितलीस ग माझी... किती प्रेम केल तुझ्यावर आणि तू....नील मनाशीच बोलत होता. त्याच्या डोळ्यात आसव जमा झाली होती. डोळे पाण्याने डबडबले होते पण त्या अश्रूंना वाट मोकळी होत नव्हती. जगासमोर स्ट्राँग दिसणारा नील आज एका बंद खोलीत अश्रू गाळत होता. स्वतःलाच कोसत होता.  'पण आता नाही... तूच काय कोणत्याच मुलीवर मी आयुष्यात प्रेम करणार नाही... कधीच नाही... आणि तुझ्यामुळे मी माझ आयुष्यही बरबाद करणार नाही....' नील स्वताचे डोळे पुसत स्वतःलाच धीर देत होता. रात्री उशीरा कधी त्याला झोप लागली त्यालाच कळलं नाही.
             
            गेली दोन महिने, सुभाषराव अंथरुणावरच खिळून होते. एका गंभीर आजाराने ते ग्रासले होते. त्यामुळे नील स्वतः घर आणि ऑफिस दोन्हीकडे लक्ष द्यायचा. मोठमोठय़ा दवाखान्यातून त्यांच्यावर उपचार झाले होते, पण काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळेच सुभाषरावांनी नीलकडे लग्नाचा तगादा लावला होता.
      
         " पोरा... लग्नाच कधी बघतोय मग? हे बघ राग मानू नको, कारण रोज उठसूठ मी तुला हेच विचारतोय. पण आता माझा काही भरवसा नाही राहिला." नील चे वडील पुढे काही बोलणार तोच नील त्यांच वाक्य मधेच  तोडत बोलतो...
     "अस काही अभद्र बोलू नका बाबा...तुम्हाला काही नाही होणार...मी आहे ना..." नील अस म्हणत होता खर पण तो सुद्धा फारच खचला होता. कारण डॉक्टरांनी आता सुभाषरावांजवळ खुप दिवस राहिले नाहीत असे सांगितले होते. शिवाय घरात त्यांचाच तर आधार होता.
    "खर तेच बोलतोय मी...इथपर्यंतच्या आयुष्यात तू खूप काही सोसले आहे... आम्हालाही जाणीव आहे...आयुष्यात तू चांगल्या मार्गाला लागलास, आम्ही धन्य झालो.. आता फक्त एकच अपेक्षा आहे...माझ्या सुनेच तोंड बघायची.... तेवढी माझी इच्छा पूर्ण करशील?.." बोलता बोलता सुभाषरावांच्या डोळ्यात पाणी येत. नीलच्या नजरेतून ते अश्रू सुटत नाहीत. मनात नसतानाही बाबांची ही इच्छा त्याला पूर्ण करायची होती.


           'माझी येवढी इच्छा पूर्ण कर' हेच शब्द नील च्या डोक्यात घुमत होते. त्यामुळे त्याच कशातच लक्ष लागत नव्हत. ऑफिसमध्ये सुद्धा आज त्याच मन लागत नव्हत. माझ्याकडून हे शक्य होईल का? भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर भावी पत्नीला मी आनंदी ठेवू शकेन का?... आणि माझ्याकडून हे शक्य नाही झालं तर एका निरागस मुलीचं आयुष्य उध्वस्त होईल... पण बाबांच्या इच्छेच काय? त्यांची इच्छा तर पूर्ण करावीच लागेल ना... म्हणूनच त्या मुलीला मला आधीच कल्पना द्यावी लागेल...' असा विचार करत असतानाच केबिनच्या दरवाजावर टकटक होते. आणि नील त्या आवाजाने विचारांच्या गर्तेतून बाहेर येतो.

      "मे आय कम इन सर..." दिपक आत डोकावून विचारतो. दिपक असिस्टंट सोबतच नीलचा एक चांगला आणि जवळचा मित्र होता. तसे जुने मित्र आता काळाच्या ओघात दुरावले होते. पण कंपनीतील प्रत्येक असिस्टंटला तो मित्रच मानायचा. त्यामुळे सर्वांच्याच मनात नीलबद्दल आदरयुक्त भाव होते.
      " येस कम इन...बोल...काही अडचण?...नील त्याला बसण्याचा इशारा करत बोलतो.
    "हो सर अडचण तर आहे" दिपक खुर्चीवर बसत बोलतो तस नील च्या भुवया उंचावतात......
------------------------------------------------------

                                                 क्रमशः............
    

           

            

             

              


🎭 Series Post

View all