Login

लव ट्रँगल भाग १७

काय अडचण आहे मला समजेल?....
लव ट्रँगल भाग १७
........"हो सर अडचण तर आहे"... दिपक खुर्चीवर बसत बोलतो तस नीलच्या भुवया उंचावतात......
------------------------------------------------------
पुढे........

             "काय प्रॉब्लेम आहे मला समजेल..." नील दिपककडे डोळे रोखून विचारतो.
   "सर 'राईज विथ द सन' च्या नवीन ब्रँचेस इतर राज्यात ही जोमाने चालू आहेत. पण कामगारांची संख्या कमी पडते आहे. सहसा या कामासाठी कुणी अर्ज करत नाही. त्यामुळेच." दिपक आपली समस्या मांडतो. त्यावर नील थोडावेळ विचार करतो.
  "दिपक...कोणताही प्रॉब्लेम असा नसतो ज्यावर सोल्यूशन नाही. कंपनीची जाहिरात करा. आणि हो.. जे बेरोजगार आहेत त्यांना विशेष सवलती द्या.... शेतकर्‍यांच्या मुलांना प्राधान्य द्या... कामगारांची संख्या आपोआप वाढती होईल. आणि हो हे काम तुला एकट्याने नाही होणार..सोबत  कशिश आणि गरिमा असतीलच."  नीलने सोल्यूशन तर दिलं होतं पण ते कितपत काम करेल हे अमलात आल्यावरच  कळणार होत. कंपनीतील कोणत्याही असिस्टंटला काही प्रॉब्लेम असला की, ते सरळ नीलच केबिन गाठायचे. आणि नीलही अगदी सविस्तरपणे त्या समस्यांच निराकरण करायचा.

           राइज विथ द सन कंपनीचे मुख्यालय पुणे येथे होते. आणि कंपनीच्या नवीन ब्रँच आता इतर राज्यातही उभारत होत्या. कंपनीसह सगळ्या ब्रँचेसचा ओनर मिस्टर नील सरतापे होता. त्याच्याच हाताखालून सर्व सूत्रे हलायची. त्यामुळे साहजिकच त्याच पूर्ण देशात नाव झालं होतं. मोठमोठे बिझनेसमन नीलकडे पार्टनरशिप मागायचे पण, नील नकार द्यायचा. कारण त्याला एका व्यक्तीला दाखवून द्यायचे होते की, नील सरतापे काहीही करू शकतो. आजपर्यंत त्याने कुणाच वाईट केल नव्हत आणि चिंतलही नव्हत. त्यामुळे सगळेच लोक त्याच्याशी अदबीने वागायचे.अगदी कमी वयातच त्याने खुप यश संपादन केले होते. त्यामुळे तो आता तरुणांचा आयडल मानला जायचा. एखाद  कॉलेजच फंक्शन असो किंवा काही सामाजिक कार्यक्रम असो...यशाच एकच उदाहरण दिले जायच...नील सरतापे....कंपनीमध्ये लाखो रूपयांची उलाढाल व्हायची. पण तो पैसा स्वकष्टाचा होता. त्यामागे कुणाचाही तळतळाट नव्हता.

              "आई बाबा...मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. " नील सकाळ सकाळीच नाश्ता करत असताना विषय काढतो.
  "हो बोल ना बाळा.. काय म्हणतोस..." सुशीलाबाई म्हणजेच नीलची आई नीलला विचारते.
  "आई..मी लग्नाला तयार आहे..."नीलने अस म्हणताच आईच्या आनंदाला पारावार राहत नाही. एका आईच स्वप्नं काय असत तर, आपल्या लेकराने आयुष्यात फक्त आनंदी रहाव... त्याला हव ते मिळाव... सुशीलाबाईनाही नीलची मनस्थिती लक्षात येत होती. सतत बडबड करणारा नील, नेहमी आनंदी असणारा नील आशूच्या नसण्याने किती खचला असेल....त्याच्या मनाला किती यातना होत असतील..त्याच्या आईला हे चांगलच जाणवत होत. शेवटी ती ही एक आई होती. पण अश्या परिस्थितीत धीर देण्याशिवाय त्या दुसर काहीच करू शकत नव्हत्या. त्यांना मनोमन आशूचा रागही येत होता. पण आता झालं गेलं विसरून नीलने आयुष्यात पुढे वाटचाल करावी अस त्यांना वाटत होत.

              "अहो...ऐकलत का?...नील लग्नासाठी तयार आहे म्हणे...शेवटी आपल्याला चांगलच माहीत आहे तो आपल्या शब्दाबाहेर नाही जाणार. " नीलची आई बाबा दोघेही आनंदी झाले होते. नील त्यांची जणू शेवटची इच्छा पूर्ण करणार होता. सुभाषरावांना तर दुखण्यातून उठल्यासारखेच झाले होते. आनंदाने स्फूर्ती मिळाली होती. आता तेच या लग्नकार्यात जातीने लक्ष घालणार होते. इतकी वर्षे नील लग्नासाठी नकार द्यायचा पण आज त्याने होकार दिला होता तेही केवळ आई बाबांसाठी.....

      "बर पोरा...तुला कुठली मुलगी पसंत असेल तर सांग म्हणजे आम्हाला रीतसर मागणी घालायला सोप्प होईल. " सुभाषरावांनाही नीलच दुःख कळत होत. डोळ्यात यातना दिसत होत्या पण काळजावर दगड ठेवून त्यांनी हा प्रश्न नीलला विचारला होता. नीलचा चेहरा मात्र निर्विकार होता. त्यावर कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या. लग्न झाल किंवा नाही झालं तरी दोन्ही त्याला सारखच होत. पण एखाद्या निरपराध मुलीच्या आयुष्याच माझ्यामुळे वाटोळं होईल असच त्याला वाटायच. म्हणूनच तो सतत लग्नासाठी नको म्हणायचा.   
"नाही बाबा....कोणतीच मुलगी मला पसंत नाही. तुम्ही जी मुलगी निवडाल ती माझ्यासाठी योग्यच असेल. आणि तिच्याशीच मी लग्न करेन." नील जमिनीकडे नजर स्थिरावून बोलत होता.

              असाच विचारात दिवस सरला होता. रात्रीचे  एक वाजले तरी झोप लागत नव्हती. माणसाची सवय अशी असते, ज्याचा विचार करू नये नेमका तोच विचार करायला मन सरसावते. भूतकाळात रमताना आनंद वाटतो खरा पण, पुन्हा चालु स्थितीत आल की खूप यातना होतात. त्यामुळे नीलला रात्र नकोच वाटायची. प्रत्येक रात्री भूतकाळाच्या कितीतरी आठवणी त्याला घेरत असायच्या. वेळ पुढे सरकत होता पण आठवणी मात्र तिथेच गोठल्या होत्या....
------------------------------------------------------
  
                                         क्रमशः............

                

           

              
            

           


🎭 Series Post

View all