लव ट्रँगल भाग १८

देव पण किती क्रूर असतो ना....
.......वेळ पुढे सरकत होता पण आठवणी मात्र तिथेच गोठल्या होत्या.......
------------------------------------------------------
पुढे.........

           'देवपण किती क्रूर असतो ना... जो माणूस मनाने साफ असतो, जो खर प्रेम करतो त्याच्याच वाटेला हे दुःख देतो....की परीक्षा घेतो...कळतच नाही. या जगात मी एकटाच असा नसेल ज्याला प्रेमात धोका मिळाला. माझ्यासारखे कितीतरी लाखो तरुण असतील  ज्यांच आयुष्य प्रेम नावाच्या क्षणभंगुर गोष्टीमुळे बरबाद झाले असेल. पण मी तर निस्वार्थी प्रेम केल होत ना आशू तुझ्यावर..... कुठ चुकल ग माझ?... फक्त एवढंच की मी परिस्थितीने गरीब होतो?..... पण सुरवातीलाच तर याची कल्पना मी तुला दिली होती. त्याचवेळी तू जर मला नकार दिला असतास तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.

               आज तू जगाच्या पाठीवर कुठे असशील... कशी असशील.... मला माहित नाही, आणि माहीत ही करून घ्यायचे नाही. पण कधीतरी एक गोष्ट तुझ्या लक्षात येईल की रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. समोरचा माणूस ओळखता आला पाहिजे. भविष्यात तुला कधीतरी पश्चाताप होईलच. कदाचित मीही तुला ओळखू शकलो नाही. आणि तुझं माझ्यावर प्रेम असूनही तू मला ओळखलं नाहीस.... प्रेमच होत ना ते? की मला खेळवत होतीस?..... केवळ एका अफवेवर विश्वास ठेवून तू मला दूर केलस?......' विचारांच्या गर्तेत त्याच मन आकंठ बुडाल होत. भूतकाळ जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता.....

(भूतकाळ)...........

            मुंबईतल्या एका आलिशान प्लॅटमध्ये नील आणि समीर दोघे बसले होते. समोर आशू, नमू, भावना आणि मुकुंदराव ज्यांचा तो आलिशान प्लॅट होता. प्रेम केल आहे तर लग्नासाठी विचारायला हव या उद्देशानेच तो आशूच्या घरी गेला होता. पण भलतच काही घडल होत.
       " तुला काय वाटल...मला काहीच माहित नसेल? बाप आहे मी तिचा, तिच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे मी पण तुझ्यासारख्या लुच्चा पोराला मी माझी मुलगी कधीच देणार नाही. कोणत तोंड घेऊन तू आला आहेस इथपर्यंत?...काय बघून आम्ही आमची मुलगी तुला द्यावी?... लाज तर वाटावी थोडी....आला मोठा लग्नाला विचारायला. तुझी लायकी काय आहे हे मला चांगलच ठाऊक आहे. ताई ने वेळीच सावध केल म्हणून बर,  नाहीतर मी काय....मुलीच्या प्रेमापोटी तिला स्वताच्या हातानेच खड्ड्यात ढकलली असती. दोन वेळच्या जेवणाची पंचायत तुझी, माझ्या मुलीला कुठून सुखी ठेवणार तू." मुकुंदराव नीलला नको नको ते बोलत होते, पाणउतारा करत होते आणि तो प्रत्येक शब्दनशब्द नील च्या वर्मी लागत होता. पण निमुटपणे तो ऐकत होता...सहन करत होता. फक्त आशूसाठी......
आपल्या प्रेमासाठी......

           सोयराबाईच्या कृत्यापासून तो आजपर्यंत अनभिज्ञच होता. पण 'ताईने वेळीच सावध केल' या एकाच वाक्यावरून सर्वकाही त्याच्या लक्षात आल होत.
'काकू तुम्ही?...काय वाईट केल मी तुमच?...' नील च्या मनात हजारो प्रश्न उठत होते. ज्यांना आजवर त्याने स्वतःच्या आईसमान मानले होते त्यांनीच त्याचा घात केला होता. शेवटी कितीही झालं तरी परकेच म्हणायला भाग पाडले होते.
       "तस काहीच नाही आहे बाबा, माझ ऐकून तर घ्या." नील मुकुंदरावांना समजावत होता पण ते काहीएक ऐकायला तयार नव्हते.
  "काही ऐकायच नाही मला...निघ इथून..." मुकुंदराव नीलवर ओरडत होते.
       "आशू तू तरी ऐकून घे ना प्लीज...तू..तू प्रेम केलस ना माझ्यावर...मग समजव ना तुझ्या बाबांना...प्लीज आशू....मी नाही ग जगू शकत तुझ्याशिवाय...बोल ना काहीतरी..." नील आशूला गयावया करत होता.
    "काय बोलू?... काय समजवू?.... की तुझ्यासारख्या लोचट मुलाशी मला लग्न करायचय... माझ्या आयुष्याच वाटोळं करून घ्यायचय...तू मला आनंदी ठेवू शकशील...तेवढी ऐपत आहे तुझी... बोल ना..." एरवी अहोजाहो करणारी आशू आज सरळ एकेरीवर आली होती.
  "बाबा बोलताहेत ते खरच आहे ना...हे बघ मी स्पष्ट शब्दात सांगते आहे...माझा नि तुझा काही संबंध नाही आहे आणि मला तुझ्याशी लग्नही नाही करायच आहे. समजल ना...." ईतका वेळ शांत बसलेली आशू अचानक अस काही बोलेल वाटलं नव्हत. तिच्या शब्दांनी नील आता पुरता कोसळला होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती. डोळ्यासमोर अंधारी आली होती. तो आज आशूच खर रूप बघत होता. त्याचा विश्वास बसत नव्हता. जिच्या भरवशावर तो इथपर्यंत आला होता, तीच त्याच्याशी इतकी निष्ठुरपणे वागली होती.
   "आता ऐकलस ना, काय म्हणते आहे आशू. निघ आता इथून आणि पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस." मुकुंदराव त्याच्या दंडाला धरून बाहेर खेचत होते. पण तो जागचा हलत नव्हता जणू त्याच सर्वांग तिथेच गोठल होत.
       "गेट आऊट नील, समीर सांग त्याला..." मुकुंदराव ओरडले तस नील भानावर येत थेट घराबाहेर पडतो.
   "बस्स...बस्स झालं आता...खूप झाला अपमान...तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांशी नात जोडण्यापेक्षा एकवेळ मरण पत्करलेल बर..माझ्या या अपमानाची भरपाई कधीतरी तुम्हाला करावी लागेल. निघतो.." अस म्हणून नील समीरलाही न विचारता तिथून एकटाच निघुन जातो.
------------------------------------------------------

                                                 क्रमशः........


🎭 Series Post

View all