लव ट्रँगल भाग २०

थांब ताई....
..........सारासार विचार करूनच काय ते कळवा. निघतो आता आम्ही."—सुशीलाबाई.  चहा पाणी करून दोघेही जायला निघतात.........
------------------------------------------------------
पुढे..........

             "थांब ताई...आमचा निर्णय काय आहे ते आताच ऐकून जा. आम्हाला तुमच स्थळ पसंत आहे. तुला आणि भावजींना मी चांगले ओळखतो. तुमच्यासारखी देवमाणस माझ्या दारी चालून आली हे आमच पुण्यच म्हणायचे. आणि नील सारखा सुस्वभावी मुलगा जावई म्हणून मिळत असेल तर आमची मुळीच ना नाही."—प्रकाश.
प्रकाश आणि उषा दोघेही होकार कळवितात. आता फक्त प्राचीच मत हव होत. पण त्या दोघांनाही विश्वास होता की ती आपल्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. आणि तसच होत... प्राची कधीच आईवडिलांच्या शब्दाबाहेर जात नव्हती. प्रकाश आणि उषाने तिच्यावर संस्कारच तसे केले होते. जे ती कधीही विसरत नव्हती. पण आता प्रश्न तिच्या आयुष्याचा होता त्यामुळे तीच मत जाणून घेणं खूप महत्वाच होत.
------------------------------------‐-‐‐--------------

        
             "काय ऐकतेय हे मी आई?....अग माझ शिक्षण अजून अपूर्ण आहे शिवाय माझ स्वप्न...तेही मला पूर्ण करायचे आहे. आणि मला न विचारताच तुम्ही लग्नाला होकार दिलात. एवढ्या लवकर मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. आधी माझ स्वप्न पूर्ण करून मगच लग्न करेन मी मग तेव्हा तुम्हालाही सोबत घेवून जाईन.  मला न विचारताच तुम्ही माझ्या परस्पर लग्नाला होकार दिलात?.... प्राची रागाने आईवर ओरडत होती. तिचा भाबड प्रेम बघून प्रकाश आणि उषाच्या डोळ्यात पाणी आल होत, पण महत्प्रयासाने त्यांनी ते प्राची पासुन लपवले होते. आणि तिच्या बोलण्याच हसूही येत होत.
      "हे काय?... इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्हा दोघांना हसू येतय?... प्राची जास्तच गाल फुगवून बसली.
       "प्राची.... अग आई वडिलांना कोण सोबत घेवून जात का?... म्हणे तुम्हालाही सोबत घेवून जाईन..." प्रकाश आणि उषा जास्तच हसू लागतात.
      " हो येत... आईवडिलांना सुद्धा सोबत घेवून जाता येत.... जेव्हा मी शिकून खूप मोठी होईन तेव्हा मला होणार्‍या नवऱ्याकडून आश्वासन घेता येईल की माझ्याबरोबरच माझ्या आईबाबांना ही सांभाळाव. प्राची च्या डोळ्यातील चमक तिच्यात असलेली एक वेगळीच जिद्द दाखवून देत होती.
         "तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करायला तो एकटा खंबीर आहे. असा मुलगा कदाचित पुन्हा भेटेल. किंवा भेटणारच नाही."— प्रकाश.
         "असा कोण आहे तो...राजा की महाराजा...जो माझ्यासोबत माझी स्वप्नही सांभाळायला तयार आहे?...."— प्राची.
      "हो... त्याचा रुबाब एखाद्या राजापेक्षा कमी नाही... नील... नील सरतापे.... आपल्या सुशीला  ताईंचा मुलगा... नील....."— प्रकाश.
आता मात्र हे नाव ऐकून प्राचीचा विश्वासच बसेना. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली... कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले. पुढे काही ऐकून न घेता तिने तशीच आतल्या खोलीत धाव घेतली.
------------------------------------------------------


            "कस शक्य आहे?...... जे हव होत आणि जे आता नको ही आहे....तेच माझ्या आयुष्यात पुन्हा घडतंय....आजपर्यंत मी फक्त आणि फक्त त्या गोष्टीच स्वप्नं बघितल आणि त्याला स्वप्नच राहू दिलं....त्याच स्वप्नात मी जगलेही आणि कधीच मरले सुद्धा होते.... कधीच त्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा अट्टहास नव्हता माझा ना की अपेक्षा होती.... मनापासून आवडली होती ती व्यक्ती, पण कधीच तिला मिळवण्याची इच्छा नव्हती.... ही अशक्य गोष्ट शक्य होईल?.... ना... कधी विचारही केला नव्हता.... बाबां नी जेव्हा तुझं नाव घेतल धडधड वाढलेली हृदयात पण महत्प्रयासाने कंट्रोल केल स्वतःवर.... आवर घातला मनाला....
                 मला माहित आहे, खुप प्रेम होत तुझं आशूवर... कदाचित तिचही असाव... पण आजही मी तुला मनोमन जपलय... प्रेम केलय... हो प्रेमच... ज्याचा तुला किंचितसाही अंदाज नव्हता... एक अस प्रेम केलय ज्यात तुला मिळवण्याची तिळमात्र अपेक्षा नव्हती... मध्यंतरीच्या काळात तुझं नी आशूच काय झालं मला काहीच माहित नाही... आणि त्यात मला इंटरेस्ट ही नाही... पण त्यावेळी तुझं आशू वर असणाऱ्या असीम प्रेमाची जाणीव मला सतत व्हायची... खुप यातना व्हायच्या या मनाला... पण जे आपल्या नशिबात नाही त्याबद्दल जास्त विचार करण आणि व्यक्त होण मी तेव्हाच सोडून दिल होत. पण आज तेच नशीब फिरून मला इशारा करतय... ही एक नशिबाने दिलेली संधी म्हणू की दुसर काही... आणि जर ही संधीच असेल तर मी इतकी संधीसाधू नाही... कारण त्यावेळी तर तू माझ्याकडे ढुंकूनही पहात नव्हतास... आणि आज त्याच मुलीशी तुला लग्न कराव लागतंय... तुझ्याकडूनच काय माझ्याकडून सुद्धा हे शक्य होणार नाही... आणि माझ स्वप्न... जे मी तुझ्या नंतर मनात साठवलेल, ते मी कधीच धुळीस मिळू देणार नाही...
               विचार करत होती ती... हो तीच ती... प्राची.  जिने नीलला पाहिल्यापासून त्याच्यावर प्रेम केल होत. प्रेम.... एकतर्फी प्रेम.... पण या एकतर्फी प्रेमाची भनक
सुद्धा लागू दिली नव्हती.
-----------------------------‐---------------------‐--

                                                    क्रमशः.......

      

            


🎭 Series Post

View all