Login

Love U Zindagi! 3

आयुष्य नेहमीच संधी देत असते... बस ती ओळखता यायला हवी..

Love U Zindagi

भाग ३ 

पूर्वार्ध: 

प्रभाती विवेकला आत्महत्या करण्यापासून वाचवते आणि त्याला काही काम मिळावं यासाठी मदत करते. इवा फॅशन हाऊसमध्ये एका फॅशन शो साठी मॉडेल्स निवडण्याची प्रक्रिया होणार असते, त्यासाठी विवेक फॉर्म भरून येतो. नंतर प्रभाती त्याला मॉडेलिंगसाठी मदत करते.

आता पुढे: 

" प्रभाती sssssss .............." 

" प्रभाती ssssss, I am selected .... प्रभाती कुठे आहेस तू? यार प्लीज लवकर ये , मला माझा आनंद तुझ्यासोबत शेअर करायचा आहे." विवेक आनंदाने ओरडतच पुलावर आला होता. 

"Congrats buddy, U deserve it . तू खूप मेहनत घेतली होती, फळ तर मिळणारच होते." प्रभाती त्याच्या मागून येत टाळ्या वाजवत बोलत होती. 

"सगळं क्रेडिट तुला जाते आहे. त्या दिवशी तू मला आत्महत्या करण्यापासून रोखले, आत्महत्येचे साईड इफेक्ट्स समजावून सांगितले. परत मी आपल्या नैराश्यावर मात कसा करू शकतो, आणि त्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली. तू ग्रेट आहेस यार, तू ऑसम आहेस." विवेक खूप आनंदाने बोलत होता. 

"बरं बरं चल आता जास्ती हवेत उडू नको. खरी परीक्षा उद्यापासून सुरु होते आहे. आणि ती जिंकायची आहे." ...प्रभाती.

"हो, अगं तू सोबत आहेस ना, मग सगळं पॉसिबल आहे." विवेक खूप आत्मविश्वासाने म्हणाला. 

"ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हे, विवेक बाबू." प्रभाती हसत म्हणाली. 

"ओव्हर कॉन्फिडन्स नाही ग, आत्मविश्र्वास म्हणतात याला. "विवेक.

"अरे वाह, गूड चेंज. आठ दिवसांपूर्वी जो मरणाच्या गोष्टी करत होता आज तो आत्मविश्वासाच्या गोष्टी करतोय? नॉट बॅड!" प्रभाती. 

"हो ग , तुझ्यासारखी समजदार मैत्रीण असेल ना जवळ, तर अशक्य असे काहीच नाही. मी तर प्रार्थना करतो माझ्यासारख्या निराश व्यक्तीजवळ तुझ्यासारखी मैत्रीण वा मित्र जरूर असावा. बोलून कितीतरी प्रश्न सुटतात. जगण्यास उभारी मिळते. आणि नाहीच काही तर मनावरचे ओझे तरी कमी होतात." विवेक.

"अरे बस कर की रे , किती कौतुक करशील माझे? अवघडल्यासारखे होतेय राव." प्रभाती. 

"बरं! प्रभाती उद्यापासून काही दिवस इकडे यायला जमेल की माहिती नाही. इवा हाऊसमध्ये फॅशन शोसाठी ट्रेनिंग आहे आणि दुकान पण बघायचे आहे, वेळ पुरणार नाही.." विवेक. 

"ठीक आहे, नो प्रोब्लेम. तुझं जिंकणे महत्वाचे आहे. तुझ्यासमोर मरणही फिके पडावे असे तुझे जगणे असावे, एवढेच काय ते पाहिजे. आणि भेटायला जिंकूनच यायचे, बरं काय." .... प्रभाती. 

"मी आपले शंभर टक्के देईल, बाकी सगळं देव आणि इवा मॅडमच्या हातात आहे." विवेक.

"स्वतः काही करायचं ठाणलं, आणि मेहनत करण्याची तयारी असली की जिंकतोच व्यक्ती." प्रभाती. 

"हो..पण काय ग कसली भारी बोलते तू ' मरणही फिके पडावे असे तुझे जगणे असावे " ...काय भारी ओळ होती. तू काऊसालिंग सुरू कर, खूप गोड आहे तुझी वाणी. आणि सगळंच किती नीट समजावून सांगते. "... विवेक.

" काय फायदा अशा समजदारीचा? जेव्हा गरज होती तेव्हा नाही दाखवली माझी समजदारी . " ....प्रभाती शून्यात कुठेतरी हरवत बोलत होती. 

"का ग , असे काय झाले? किती हसरी खेळती आहे तू, आणि अशी अचानक मधातूनच तुला काय होते? " .... विवेक. 

"अरे काही नाही, असेच काहीतरी आपलं आठवते. बरे ऐक, फॅशन शो कर पण जबरदस्ती केल्यासारखे नाही तर ते एन्जॉय करत. कदाचित तिथे पाय ओढणारे, तुझ्या चुकांना तुझा गुन्हा दर्शविणारे, तुझ्या मनाचं खच्चीकरण करणारे पण लोकं भेटतील. कारण ती लाईनच तशी आहे. प्रत्येकाला नंबर वन यायचे, प्रत्येकाला फेमस व्हायचे, त्यामुळे तिथे अशा गोष्टी खूप चालतात. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. त्या लोकांचं बोलणं डोक्यात जाऊच द्यायचे नाही, नाहीतर उगाच डीप्रेस व्हायला लागतं. तर सांगायचे हे की काहीही झाले तरी आपला फोकस हलू द्यायचा नाही. तशी ती इवा खूप छान मुलगी आहे . ती सगळ्यांना समजून घेते. तिच्या प्रोजेक्ट्समध्य तिला नेहमीच नवीन लोकांना प्राधान्य द्यायला आवडते. तिला जिंदादील लोकं खूप आवडतात, ती त्यांच्याकडं लवकर आकर्षित होते. प्रामाणिकपणा आणि हार्ड वर्कने ती खूप इंप्रेस होत असते. तर ते शिकवतात आहे, ते तर कर , पण नेहमी तिच्यापुढे अशी हसरी, प्रसन्न मुद्रा ठेव. आयुष्य जगायचं तर असतेच , पण ते एन्जॉय सुद्धा करता यायला हवे . आयुष्य एकदाच मिळत असतं , तर मनसोक्त जगून घ्यावे, हसून घ्यावे. मला माहिती आहे तुझ्यावर घरची जबाबदारी आहे. पण रडका चेहरा केल्याने, उदास राहण्याने जबाबदारी कमी होत नाही की दुःख कमी होत नाही . म्हणून तिच्यासमोर असा मस्त हसत खेळत रहा. Then no one will stop you from winning the hearts.." .... प्रभाती.

"जय हो प्रभाती माता की! तुझे पाय दाखव ग कुठे आहेत? नमस्कार करतो." विवेक तिच्या समोर हात जोडत खाली वाकत तिला नमस्कार करायची अक्टिंग करत होता. त्याला तसे करतांना बघून ती खूप खळखळून हसायला लागली. तिला हसतांना बघून तो पण हसायला लागला. 

"बाई माझे, या लहानशा मेंदूत एवढ्या गोष्टी एकाच दिवशी कशा मावणार? थोडं बक्ष दे या पामराला." ... विवेक.

"सॉरी सॉरी, जास्तीच झाले नाही? " ... प्रभाती.

" ह्मम..खरंच.." तो हसत म्हणाला. 

"जाऊ दे.." ती हसली. 

"मी सुट्टीच्या दिवशी, कधी वेळ मिळेल तसे इकडे येईल..कारण गुरुशिवाय शिष्य काही करू शकत नाही." विवेक.

"काहीही..तुझं आपलं काहीतरीच.." तिने डोक्यावर हात मारला. 

"मी आता तिथे बघितले ना, कसे शिकवतात.. त्यापेक्षा तर मला तुझं शिकवणं भारी वाटते." विवेक.

"इवाचा हात लागू दे, करीअरचं सोनं होतं.." प्रभाती. 

"ह्मम..काय ग ही जवळून जाणारी लोकं अशी अजब नजरेने का बघतात आपल्याकडे?" ... विवेक.

"कोण रे?" प्रभाती.

"अग ही, आता इथून दोन माणसं गेलीत? त्या दिवशी पण मी डोक्यावर बुक्स घेत चालण्याची प्रॅक्टिस करत होतो, तेव्हा सुद्धा एक बाई अजब नजरेने माझ्याकडे बघत होती. तू पण होती, पण तुझ्याकडे बघत नव्हती, माझ्याकडे टक लावून बघत होती." ...विवेक.

"हा हा हा! आता बाई मुलीकडे कसे बघणार.. मुलालाच बघणार ना? तू आवडला असशील तिला, हॉट अँड हँडसम.." प्रभाती त्याची मस्करी करत होती. 

" काहीतरीच तुझं , हॉट अँड हँडसम म्हणे?" विवेकला लाजल्यासारखे झाले होते. त्याचे गाल पण थोडेसे लाल झाल्यासारखे वाटत होते.  

"हा मग, बघच तू आता, तुझं ट्रान्सफॉरमेशन कसं होतंय ते? तू पण स्वतःला ओळखू शकणार नाहीस." प्रभाती. 

"बरं चल, येतो मी. घरची थोडी कामं करायची राहिली आहेत लहान बहिणीवर खूप काम पडते, जरा बाहेरची कामं तरी करून घेतो . "..... विवेक.

"हो ठीक आहे , आणि हो ऑल द बेस्ट!" ...प्रभाती. 

"थँक यू. बाय."विवेक.

" बाय." प्रभाती.

"अरे हो, कधी आलो इकडे तर आवाज दिला तर येशील ना?" तो परत जात होता तोच मागे वळत परत बोलला. 

"हो हो.. बिनधास्त.. गरज पडली तर कधीही आवाज दे.. दुसऱ्या क्षणाला इथे असेल.." ती हसत म्हणाली. 

"आणि गरज नाही पडली, पण तरीही उगाच आवाज दिला तर..?" विवेक.

"हो तुझा आनंद शेअर करायला नक्की येईल.. चल बाय.. आंधार पडतोय..जा उशीर होईल." म्हणत त्याला बाय करत ती तिच्या घराच्या दिशेने निघाली सुद्धा. 

      आपल्या केसांमधुन हात फिरवत, प्रसन्न मुद्रेने तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता. ती दिसेनाशी झाली तसा तो आपल्या घरी जायला पाठीमागे वळला.