Login

Love U Zindagi 4

Practice Makes Man Perfect

Love U Zindagi

भाग 4


पूर्वार्ध : 

विवेकचे इवा फॅशन हाऊस मध्ये सिलेक्शन होते. 


आता पुढे: 


       इवा फॅशन हाऊस मध्ये जवळपास तीस मुलांचे शो साठी सीलेक्शन झाले होते. आता त्या सगळ्यांना प्रोपर ट्रेनिंग मिळणार होती. सगळी मुलं तिथे एका हॉलमध्ये जमले होते. कोणी कोणी आधीच छोटीमोठी मॉडेलिंग केली होती, तर कोणी नवीन होते. पण उत्साह मात्र सगळ्यांचा खूप भारी दिसत होता. आणि आता सर्वांना उत्सुकता लागली होती ती इवा मॅडमला बघायची. कारण आतापर्यंत सगळे तिच्या बद्दल फक्त ऐकून होते, आज सगळ्यांना त्यांना बघता, भेटता येणार होते..या क्षेत्रातील खूप लोकांसाठी ती रोल मॉडेल होती. आणि शेवटी सगळ्यांचे वाट बघणे संपले होते, आणि एक आवाज हॉलमध्ये फिरू लागला. " Good morning guys!" जसा आवाज आला तसे सगळ्यांची नजर दरवाजाकडे वळली आणि सर्वांच्या ओठांवर समाधानकारक हसू पसरले.  


" Good morning guys..I am Iva , Iva Sardesai . Hope you all are excited for this show." इवा. 


       ईवा हॉलमध्ये आली. तिला बघून सगळ्यांचे होशच उडालेत . सगळे आवसून तिला बघत होते, इतकी ती सुंदर आणि ड्याशिंग दिसत होती. 


"आपल्याला या जगाने आपल्या कामाने ओळखावे, आपली ओळख आपण स्वतः बनवावी असे मल वाटते. ' So do your best and shine like star'. एक महिना तुम्हाला इथेच राहावे लागेल, आठवड्यातून एक सुट्टी मिळेल, तेव्हा तुम्हाला हवे ते करू शकता पण इतर वेळी तुम्हाला तुमचे शंभर टक्के द्यायचे आहे. तुमच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी सोय इथे केली आहे . इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिल्या जाईल. तुम्ही फक्त तुमचे हंड्रेड पर्सेंट द्यावेत , तेवढीच अपेक्षा आहे." इवा.


"Sure mam!" सगळे कँडिडेट एकसाथ ओरडले.


" Good, All the best !" इवा. 



       इवा सरदेसाई, 26 वर्षाची तडफदार तरुणी, आपल्या कामात एकदम परफेक्ट, इवा ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज च्या रमेश सरदेसाई यांची कन्या . इवा ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज मधीलच एक इवा फॅशन हाऊस एक मोठी कंपनी , ज्याची इन्चार्ज होती इवा . बाकी कंपनी तिचे वडील आणि भाऊ बघायचे. इवा फॅशन हाऊसला तिला जगात एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी ती बरेच प्रोजेक्ट्स करायची. त्यासाठीच ती असे फॅशन शो , ब्युटी काँटेस्ट असे काही काही अरेंज करत असायची.  


           विवेकने दुकानातून एक महिन्याची सुट्टी घेतली होती. घरी आई आणि बहिणीची व्यवस्थित सोय करून तो इवा हाऊसमध्ये आला होता. आणि जोमाने प्रॅक्टिस करत होता. तिथली लोकं शिकवतील तसे मनःपूर्वक ऐकून , ते सांगतील तसे सगळे करत होता.  



          या सगळ्यामध्ये विवेक बिझी असल्यामुळे त्याला प्रभातीला भेटायला जाता येत नव्हते. आज दोन दिवस झाले होते, तो तिला भेटला नव्हता. आता त्याला तिची आठवण यायला लागली होती. तिचं खळखळून हसणं, तिचं समजावणं, तिचं रागावणं, तिचा गोड सुंदर चेहरा सगळंच त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. निवांत असला, रात्री झोपताना आता तीच ती त्याला दिसत होती. आणि तिला आठवून आपुसकच त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटत होते. 


" Looking like someone is deeply in love.. " विवेकचा रूममेट रितेश विवेकला एकट्यात हसतांना बघून चिडवत होता. 


"It's not like that, she is my friend only." .. विवेक.


" फ्रेंडचे नंतर गर्लफ्रेंड होत असते, आणि तुझ्या चेहऱ्यावरून कोणालाही कळेल that you are in love ." रितेश.



"Ohh really Ritesh?" ... विवेक प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होता. 



"Hey bro , don't call me Ritesh, it's Rits , only Rits" … रितेश आपली cool स्टाईल करत म्हणाला.  


" किती छान नाव आहे रे तुझे, हे काय रिट्स भिट्स करत असतो?" विवेक. 


"बावा , या फॅशन वर्ल्डमध्ये अशीच नाव सुट होतात. हे ओल्ड फॅशन नाव काम नाही करत. तू पण तुझं नाव चेंज कर." रितेश.


" बापरे , मला माझ्या आयुष्यात सगळे मित्र गुरूच भेटत आहेत. एक तू एक ती ....." विवेक.  



" हा हा हा, see I told you , only girlfriends give these many pravachans." रितेश हसत त्याची मस्करी करत म्हणाला. 



" ह्मम , पण ती मला फक्त मित्र मानते. " विवेक.


" ह्मम! मुलींना त्यांच्या भावना उशिरा कळतात. इन शॉर्ट त्या डफर असतात. बाय द वे , बघू तर दे कोण आहे ती , जिने तुला वेडे बनवले आहे? " रितेश.



"माझ्याजवळ फोटो नाही आहे." विवेक. 


" फेसबुकवर असेल ना फोटो ?" रितेश.


"नसेल कदाचित, तिच्याकडे फोन सुद्धा नाही आहे." विवेक.


" काय करते? " रितेश.


" आर्किटेक्ट आहे." विवेक.


" Wow yar , superrrrrr .... असेल ती फेसबुकवर, आजकाल सगळेच असतात . नाव सांग मी शोधतो." रितेश.


" प्रभाती." विवेक. 


" अरे पूर्ण नाव? " रितेश


" नाही माहिती रे , कधी विचारलेच नाही. " विवेक हताशपणे बोलत होता.  


" सही आहे यार तू , तुला तिचे पूर्ण नाव सुद्धा माहिती नाही , अन् प्रेमात पण पडला?" रितेश.


" नाव गाव विचारायची कधी गरजच नाही पडली." विवेक. 


" बरे ठीक आहे, ट्राय मारुया..प्रभाती बऱ्यापैकी unique नाव आहे , जास्ती नसतील या नावाच्या मुली. चेहरा बघून तरी ओळखशील ना?" रितेश परत त्याची मस्करी करत होता. 



" हा काय प्रश्न?" विवेक एक भुवई उंचावत त्याच्याकडे बघत होता. 


" ओके ओके , मस्करी करत होतो ."रितेश.


        रितेशने आपला लॅपटॉप ऑन केला, त्यात त्याचे फेसबुकचे अकाउंट ओपन केले आणि सर्च ऑप्शनमध्ये प्रभाती नाव टाकले, चार प्रोफाइल झळकल्या. 



" Yess, ही सेकंड वन, प्रभाती राणे." विवेक ते बघून खूप आनंदी झाला होता. 



" खूप फन लविंग मुलगी दिसते आहे रे ही, Nice choice ..."रितेश.


"ह्मम.." विवेक.


"थांब हिच्या फ्रेंड्स सर्च करूया.. त्या पण भारी असतील.." म्हणत रितेश तिची फ्रेंड लिस्ट चेक करायला गेला. 


"फ्रेंड लिस्ट कशाला? नको असू दे.." इवा तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये दिसली तर खूप गडबड होईल या भीतीने तो लगेच बोलला..


"श्या…ह्या मुली पण ना? आजकाल आपली प्रोफाइल सुद्धा लॉक करून ठेवतात? झूक्या भाऊने हे खूप आगाऊ फीचर आणले आहे.." रितेश हताश होत म्हणाला. 


"गरज आहे रे ती.. काही लोकं उगाच त्रास देत असतात.. परत फोटो, इन्फॉर्मेशन चोरी जाण्याची दाट शक्यता असते. बरोबरच केले त्यांनी." विवेक. 


"मग तर आजोबा, तू म्हणशील मुलींनी फेसबुक सुद्धा वापरू नये?" रितेश.


"नाही.. असे नाही म्हणेल मी.. फक्त दक्षतापूर्वक वापरावे. कोणी आपल्या माहितीचा दुरुपयोग करू नये, इतकंच." विवेक. 


"आजोबा, आपल्याला गरज आहे फोटो वगैरे टाकायची.. त्याशिवाय आपली ओळख वाढणार नाही. आपल्या लाईनमध्ये जेवढे जास्त फेमस तेवढे जास्त सक्सेसफुल.. काम पण मग खूप मिळेल. सोशल मीडिययावर ॲक्टिव राहावं लागते.." विवेक.


" ह्मम ...... " विवेक ह्मम ह्मम करत होता , त्याचे रीतेशच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हते, तो तर प्रभातीचे फोटो बघण्यात गुंगला होता. 


" पण हे काय रे , गेल्या चार वर्षांपासून ही फेसबुकवर ॲक्टिव नाही दिसत आहे? चार वर्षापूर्वीची तिची शेवटची पोस्ट आहे ." रितेश. 



" घराची जबाबदारी आहे म्हणाली , नसेल मिळत वेळ फेसबुक वगैरेसाठी. आणि तिच्याजवळ फोन पण नाहीये, म्हणून नसेल बघत आता ."विवेक. 


" ह्मम , तुला तिचे फोटो हवे असेल तर डाऊनलोड करून घे ." रितेश. 



" हो, थांक्स." विवेक. 



           रितेशच्या बोलण्याने विवेकला त्याला प्रभातीवर प्रेम झालंय याची जाणीव व्हायला लागली होती. आपल्याला प्रभाती आवडते आहे , मैत्रीपेक्षा काहीतरी जास्ती आपल्याला प्रभाती विषयी वाटत आहे , आपण प्रेमात पडतोय याची त्याला जाणीव होत होती. 


     

      दिवसभर कोचिंग, स्विमिंग, आणि इतर सगळी प्रॅक्टिसमध्ये विवेकचा दिवस जायचा पण रात्री मात्र प्रभातीच्या आठवणींमध्ये तो व्याकूळ होत. रितेशच्या लॅपटॉपमधुन त्याने तिचे काही फोटो सेव्ह केले होते, मग तो तेच बघत बसायचा. कधी कधी तिला भेटतोय असे त्याला होऊ लागले होते. 


*****

क्रमशः 







0

🎭 Series Post

View all