Love U Zindagi
भाग 9
पूर्वार्ध:
विवेक फॅशन शोची स्पर्धा जिंकतो. तो सहा महिन्याचे काही कॉन्ट्रॅक्ट साइन करतो. त्यासाठी त्याला परदेशात जावे लागते. प्रभातीवर तो प्रेम करायला लागतो. स्वतः काहीतरी बनून आल्यावर तिच्या समोर आपले प्रेम व्यक्त करू असे ठरावतो. इवा आणि तिची पूर्ण टीम परदेशात जातात.
आता पुढे..
चार वर्षा नंतर....
" विवी ssssss ...... I love you yar " माईक लाऊड स्पीकर मधून एका मुलीचा आवाज येत होता....जो सगळीकडे घुमत होता.
एक दुमजली मोठं आश्रम , दोन भागात विभागलेले होते. एक भाग पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी अशा पद्धतीने दुभागले होते. पण कार्यक्रमाच्या वेळी सगळे एकत्र मैदानावर येत असत. आज पण तिथे कोणाच्यातरी वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती .
हे आश्रम एक कौन्सेलर आणि लघु उद्योग केंद्र होते. इथे डीप्रेस , जीवनाला कंटाळलेले , स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या लोकांसाठी एक मदतगार केंद्र होते . इथे तरुण, म्हातारे सगळ्याच वयाचे बाई माणसं होती. त्यांना इथे मोफत उपचार आणि जीवनावश्यक गोष्टींची सोय होती . त्याच्यासाठी काही लघुउद्योग उपलब्ध करून देण्यात आले होते. दोन वर्षांपासून हे आश्रम निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करत होते. आज तिथे कोणाचा तरी वाढदिवस होता.
आश्रमातल्या एका मोठ्या ऑफिस खोलीमध्ये एक तिशीच्या आसपासचा भयंकर हॉट अँड हँडसम असा तरुण एका खूप सुंदर मुलीच्या पाच फूट मोठ्या फोटोपुढे उभा होता.
" एकदाच शेवटचे भेटून जायचे होते ना? तू मला माझ्या एवढ्या लहान चुकीची इतकी मोठी शिक्षा दिली." विवेक डोळे पुसत तिच्या आठवणीत भूतकाळात गेला.
चार वर्षांपूर्वी , जेव्हा विवेक ईवा फॅशन हाऊस सोबत प्रोजेक्ट्सच्या कामाने सिंगापूर , मॉरिशस अश्या ठिकाणी फिरत होता.
स्थळ: मॉरिशस ( एक मोठे पंच तरिका हॉटेल)
" Hey Vivi , you were awesome yaar . They all were just speechless.." इवा.
" Thank you mam!" विवेक.
" Hey don't call me mam yaar, just call me Iva , only Iva. Now We are friends." इवा.
" हो पण तरीही तुम्ही पदाने, वयाने सगळ्याच बाबतीत मोठ्या आहात. असे कसे नाव घेऊ? ते शोभणार पण नाही. " विवेक.
" तरीसुद्धा इवा च म्हणायचे, otherwise I will cut your salary." इवा त्याची मस्करी करत होती.
" खूप गोड धमकी हा, मला माहिती तुम्ही असे काही करणार नाही आहात. बरे ठीक आहे इवा म्हणेल आहे." विवेकने हसतच उत्तर दिले.
"That's like a good, hot and handsome boy." इवा हसत म्हणाली.
"मॅम , तुम्ही ना खरंच खूप छान आहात. तुमच्याकडे बघून काम करण्यासाठी खूप उत्साह येतो." विवेक.
"बरं मी काय म्हणते, आपण ती मिस्टर शहाची मिस्टर इंडियावाली डील साईन करूयात." इवा.
" खरंच तुम्हाला वाटते , मी तिथे टिकू शकेल?" विवेक.
" Yess , I am sure. you will not only win the show, but everyone's heart as well.." इवा.
" ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तर करुया साईन." विवेक.
" सुपर्ब , मी आताच मिस्टर शहा ला कळवते." इवा.
इवा विवेक सोबत बोलून त्याच्या रूममधून बाहेर निघून आली.
" इवा , त्याला सांगत का नाही, तुला तो आवडतो, तू त्याच्यावर प्रेम करते ते ?" रिकी ( इवाचा मित्र ) म्हणाला.
" योग्य वेळ आली की सांगेल आहे." इवा..
" योग्य वेळेच्या प्रतीक्षेत, कदाचित वेळच हातातून निघून जायला नको.." रिकी.
"इवाने वेळेला पकडुन ठेवले आहे.. आणि इवाला जे पाहिजे ते ती मिळवतच असते.." इवा पूर्ण आत्मविश्र्वासाने म्हणाली.
"मॅडम हे प्रेम आहे.. हे जबरदस्ती नसते मिळवता येत.. ते जिंकावं लागते.. मन.. समोरच्याचे हृदय जिंकावं लागते.." रिकी.
"मला नकार कोण देणार..?" इवा हसत म्हणाली.
"एवढा कॉन्फिडन्स आहे तर मग वेळ का घेत आहेस?" रिकी.
"विविसाठी.. " इवा.
"विविसाठी? म्हणजे?" रिकी.
"आधी त्याला त्याचं नाव मोठं करू देत.. त्याने पुढे जायला माझा वापर केला, म्हणून लव्ह अफेयर आहे, असे मला नको आहे. आपली इंडस्ट्री माहिती आहे ना, या बाबतीत किती बकवास आहे.. विविची चुकूनही निगेटिव्ह इमेज तयार व्हायला नको.. आणि तो बघितला ना कसा आहे? किती सिंपल किती साधा.. किती प्युर.." इवा.
"खरंच प्रेमात पडली ग.." रिकी.
इवाने त्यावर एक गोड स्मायाल दिले..
******
मिस्टर इंडियावाल्या प्रोजेक्टसाठी इवाने विवेकवर स्वतः लक्ष घालून त्याला सगळी ट्रेनिंग दिली होती. कामाच्या निमित्याने दोघंही रोज सोबत वेळ घालवत होते. बाहेर फिरणे, शॉपिंग असे सगळे सोबतीने सुरू होते. दोघांमध्ये हळूहळू एक सुंदर मैत्रीपूर्ण नातं निर्माण झाले होते.
विवेक आणि इवाच्या मेहनतीने विवेकने मिस्टर इंडिया प्रोजेक्टमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. आता मात्र इंटरनॅशनल लेव्हलवर विवेकची ख्याती पसरत चालली होती. त्याला भरपूर प्रोजेक्ट्स मिळाले होते. त्यामुळे सहा महिन्याचा कालावधी आता वाढला होता. विवेक सुद्धा त्याचा कामात खूप व्यस्त झाला होता.
*******
टूर आणि प्रोजेक्ट आटोपून इवा, विवेक आणि बाकी पूर्ण टीम भारतात परत आले होते.
" इवा तर खूप चांगली आहे , तिला प्रभाती बद्दल सांगू काय? प्रभाती पण तिलाखूप मिस करते . बोलून बघुया. जर आपल्या बोलण्याने दोन दूर गेलेल्या मैत्रिणी जवळ येतील तर, चांगलच आहे ना." विवेक लॅपटॉप उघडून, त्यात प्रभातीचे फोटो बघत मनातच विचार करत होता.
"पण नको.. प्रभातीने त्यांच्या दोघींमध्ये पडायला साफ नकार दिला आहे. आधी माझं आणि तिचं नातं पक्क करू.. मग या मैत्रिणींचं बघू. उद्याच पोहचलो की आधी प्रभातीला माझ्या मनातले सांगतो. मग पुढले पुढे बघू." त्याचा डोक्यात बरेच विचार येत होते.
" हे विवी , काय चाललंय? काय बघतोय?" इवा त्याच्या जवळ येत बसत म्हणाली, तर तिचे लक्ष त्याच्या लॅपटॉपकडे गेले.
"अरे ही तर प्रभाती आहे? तू तिला कसा ओळखतो?" इवा शॉक नजरेने त्याच्याकडे बघत होती.
" ती माझी मैत्रीण आहे. तिनेच मला इथे पाठवले होते." विवेक.
" What? How is it possible?" इवा.
" हो, मला माहिती तुम्ही खूप छान मैत्रिणी होत्या. पण काहीतरी प्रॉब्लेममुळे तुमच्यामध्ये वाद झाला आहे. तुम्ही तो वाद बोलून का नाही मिटवत? ती नेहमी तुमच्याबद्दल खूप सांगत असते. ती मनाने खूप चांगली आहे, समजदार आहे. तुमचे म्हणणे तिला लगेच समजेल." विवेक.
"Vivi, Are you mad ?" इवा.
" प्लीज तुम्ही एकदा बोलून घ्या ना , मला तुमची आधी जशी घट्ट मैत्री होती तशीच बघायची आहे. " विवेक विनवणी करत म्हणाला.
" बोलायचे तर मला सुद्धा होते, पण आहे कुठे ती?" इवा.
" बोलणार तुम्ही? चला तुमची भेट घडवून देतो . मला पण तिला भेटायला जायचे आहे, नऊ दहा महिने झाले. चला जाऊ." विवेक.
" Vivi, are you out of your mind? " इवा.
" मॅडम प्लीज , तिच्या सोबत एकदाच बोला. " तो विनवणीच्या सुरात बोलत होता.
" चल.." इवा.
*******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा