Login

लघू कथा केवडा

सुमेधा अन् रघूवीर या प्रेमी जीवांची कहाणी

#केवडा
तु नादखुळी राजस बाला
तुझ्या मखमाली हास्यावर भाळून
जो आला इथेच थांबला...
रघूवीर शब्दा शब्दात तिला बांधू पाहत होता. ती अक्षर अक्षर रिती होत गेली.

सुरेख चांदण्याखाली तरूण मंडळींची मैफील सजली होती.त्यावर कहर म्हणजे बडे मंडळींची दाद मिळत होती.
सुमेधा समेवर येवून थांबली होती केव्हाच जणू अनंत काळापासून.

विभावरीची अनिकेतशी लग्नगाठ बांधली गेली.सुमेधा पाठराखिण म्हणून पोहोचली . रघूवीर अनिकेतसाठी परदेशातुन खास आलेला.अन् जास्त दिवस रेगाळला.

सुरेख सुंदर स्वप्नवत वाटणार्या गोष्टी शाश्वत का राहत नाहीत? वाटलं बकुळाला बेमौसमी फुलावसं...वार्याला सोबतीस घेवून मिरवावंस जरा... तर बिघडलं कुठे? पण नाही ना.तसं होवू शकत नाहीच.

रघूवीरनं सुमेधाला आपल्या बरोबर यायची गळ घातली.सुमेधा बाबा गेल्यानंतर एकट्या पडलेल्या आईला एकटं सोडून जाऊ शकली नाही.

आता रघूवीर अन् तिला फक्त शब्दांनी बांधून ठेवलं होतं.

मी अबोलीच्या कानात सांगीतले आहे
प्रियेविण बहर सुकला पारिजाती
ती मुकाश्रू ढाळत राहिली
श्वासात फक्त तुझा केवडा दरवळला...
तुझा केवडा दरवळला...

© सौ.स्वाती विवेक कुंभार