Login

मितवा part twenty five

Love story of a young couple

मितवा पंचवीस

मागील भागात आपण पाहिले कि राज या लग्नासाठी अप्पा पाटलांकडे नकार कळवतो तसे पाटील मेघनावर चिडतात. मेघना सुद्धा या लग्नाला तयार नाही हे मान्य करते.. आणि अप्पा पाटील तिच्यावर भयंकर चिडतात. लग्नाला मेघनाने नकार दिला तर आर्यनच बरं वाईट करेल अशी धमकी सुद्धा देतात.आता पाहू पुढे..

आर्यनच्या जीवाला धोका आहे हे समजताच मेघना भानावर येते आणि बोलते..

मेघना : पप्पा.. नाही.. प्लीज.. त्याने काय केलं आहे तुम्हाला?? त्याची फॅमिली निष्पाप आहे.. त्यांना का त्रास देत आहात तुम्ही?

अप्पा पाटील : आम्हाला शहाणपणा शिकवू नका.. तुम्ही राजरावांसोबत लग्न करणार आहात कि नाही ते फक्त सांगा.. नाहीतर आमचा आत्ता एक फोन तुमच्या त्या पंजाबी मुलाचं आयुष्य उध्वस्त करू शकतो..

मेघना : पप्पा नको.. प्लीज.. त्याला काही करू नका.. पप्पा माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.. माझ्यासाठी काहीही करू नका त्याला..

राज : पप्पा अहो.. असं जोरजबरदस्तीने आम्हाला हे लग्न नाही करायचं... त्यांच्या मनात आर्यन आहे.. त्या त्याच्यासोबत खुश राहतील..

अप्पा पाटील : पण आमच्या शब्दाचं काय??

राज : मी समजावतो पप्पांना. तुम्ही नका काळजी करू..

अप्पा पाटील : अहो राजराव तुम्हाला सुद्धा माहित आहे हे राजकारण.. पंजाबी मुलासोबत लेकीचं लग्न लावून दिलं तर ही निवडणूक हातातून निसटून जाईल... ते काही नाही.. तुमच्या घरातच मेघना सून म्हणून येणार..

मेघना : पप्पा.. मला राज आवडत नाही.. मी नाही राहू शकत त्याच्या सोबत..

अप्पा पाटील : पुन्हा अरे तुरे वर आला तुम्ही?? आमची चूक झाली जे पुण्याला पाठवलं तुम्हाला.. नसते विचार डोक्यात आले आहेत तुमच्या.. आम्ही तुम्हाला पर्याय देतच नाहीये.. तुम्हाला ठामपणे सांगतोय तुमचं लग्न देशमुख घराण्यातच होणार..

मेघना : पप्पा माझ्या आनंदासाठी तुम्ही काही पण करायचा आणि आता असं का वागत आहात?

अप्पा पाटील : बोला.. राजरावांसोबत लग्न करणार आहात कि नाही?? तुम्हाला त्या मुलाचा जीव प्रिय असेल तर हो बोला आणि राजरावांची माफी मागा..

राज : अहो.. पप्पा.. नका करू हे सगळं.. नको

अप्पा पाटील : थांबा राजराव.. तुमच्याबद्दल अजिबात आदर नाहीये यांना.. यांनी माफी ही मागितली पाहिजेच..बोला मेघना.. काय करू?? फोन लावू???

मेघना :(रडतरडत ) पप्पा मला आर्यन खूप आवडतो.. त्याला काही केलं ना तुम्ही तर मी सुद्धा माझा जीव देईन...

आता मात्र अप्पा पाटलांचा पारा खूपच चढला. त्यांनी मेघनाचा हात धरला.. तिला खेचत आणलं आणि राजपुढे ढकळलं...

अप्पा पाटील : मागा माफी... चला...

राजने मेघनाला उठवलं.. तिला सोफ्यावर बसवलं.. तिला पाणी दिलं आणि बोलला...

राज : पप्पा अहो काय करत आहात तुम्ही?? मेघना आम्हाला आवडतात.. त्यांचा अपमान आम्हाला नाही सहन होणार... तुम्ही त्यांच्याशी असं वागू नका..

अप्पा पाटील : बघा मेघना.. किती प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर..
असं म्हणून पाटलांनी कोणाला तरी फोन लावला..
"हॅलो.. हा.. मी त्या फॅक्टरी बद्दल बोललो होतो ना.. ती लवकरात लवकर बंद झाली पाहिजे..."

मेघना पाटलांचं बोलणं ऐकून त्यांच्या पायाशी जाते..
मेघना : पप्पा प्लिज.. नका त्या लोकांना त्रास देऊ... प्लीज नका हे सगळं करू..

अप्पा पाटील : आम्ही आत्ता फक्त फॅक्टरीचा विषय करतोय.. त्या मुलाच्या जीवाला काहीही करत नाहीये... पण तुम्ही हट्टीपणा सोडला नाही तर त्या मुलाच्या जीवाचं पण काही खरं नाही.. पण फॅक्टरी तर आम्ही बंद पाडणारच..

मेघना : पप्पा.. नको.. तुमची इच्छा आहे ना मी राजची माफी मागावी.. मग थांबा मी मागते.. पण आर्यन.. त्याची फॅमिली आणि फॅक्टरी.. कशालाच तुम्ही काहीही करू नका..
    असं म्हणून मेघना आता राजच्या पायाशी जाते आणि बोलते..
मेघना : राज मला माफ कर.. मी पाय धरून तुझी माफी मागते.. माफ कर मला..

राजला मेघनाची हालत बघवत नाही.. तो तिला उठवतो..
राज : मेघना काय करत आहात तुम्ही?? उठा.. उठा.. पटकन.. आमचे पाय कशाला धरत आहात?? नको आम्हाला हे सगळं.. पप्पा अहो.. आमचं जरा ऐकाल का?? आम्ही नाही मोडणार हे लग्न.. पण प्लीज तुम्ही त्या मुलाची फॅक्टरी आणि फॅमिली यांना काही करू नका.. प्लीज.. आमच्या शब्दाचा तरी मान राखा..

अप्पा पाटील : ते काही नाही.. या मुलीने वैताग आणलाय आम्हाला.. किती हरएक प्रकारे समजावून सांगितलं तरी हट्ट सोडत नाहीत.. यांना मिळू दे जरा शिक्षा..

राज : पप्पा एकदा त्यांच्याकडे बघा.. त्या किती रडत आहेत.. काय अवतार झाला आहे त्यांचा.. आम्हाला नाही बघवत हे सगळं.. पप्पा मेघना पुन्हा असं काही करणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो... पण प्लीज त्या मुलाला काहीही करू नका...

अप्पा पाटील : यांनी आधी कबूल करावं तुमच्याशी लग्न करतील या..

मेघना : (रडत रडत )पप्पा... हो.. मी राजशी लग्न करेल.. प्लीज आर्यनला काही नका करू.. प्लीज..

अप्पा पाटील : ठीक आहे.. राजराव.. आता तरी बसा चहा घ्या..
  अप्पा पाटील अक्कांना आवाज देतात.. तश्या तारा अक्का लगबगीने खाली येतात..
अप्पा पाटील : अक्का मेघनाला त्यांच्या खोलीत घेऊन जा.. आणि त्यांचा अवतार ठीक करा..

राज : पप्पा.. तुम्हाला योग्य वाटत असेल तर आम्ही त्यांना खोलीत घेऊन जाऊ?? म्हणजे अक्कांना येऊ दे सोबत.. पण आम्ही सुद्धा जातो..

अप्पा पाटील : अहो.. परवानगी काय मागत आहात?? मेघना आता तुमचीच जबाबदारी आहे.. आणि हे तुमचंच घर आहे..

  तसं राज आणि अक्का मेघनाला घेऊन तिच्या खोलीत जातात. मेघनाचे रडून रडून डोळे सुजलेले होते.. तिला काही सुचत नव्हतं.. तिला खोलीत नेऊन राज तिला समजवण्याचा प्रयत्न करतो...

राज : मेघना.. आमच्याकडे बघा... हे राजकारण तुमच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे.. तुम्हाला आत्ता पर्यंत कळून चुकलं असेल तुमचं आर्यन सोबत लग्न नाही होऊ शकत.. त्यामुळे पळून जायचा विचार सोडून दया.. त्यामुळे आर्यनच्या जीवाला सुद्धा धोका आहे.. समजलं का?? पुन्हा अशी चूक नका करू.. आर्यनला कोल्हापूरला नका बोलवू..

तारा अक्का : बेबी आम्हाला पण हेच वाटतंय.. साहेब काही पण करू शकतात.. आर्यनरावांचा जीव वाचवायचा असेल तर पळून जायचा विचार सोडा.. आम्ही सुद्धा कालपर्यंत तुम्हाला पळून जायला सांगत होतो.. पण आज हे सगळं बघितल्यावर आम्ही तुम्हाला आर्यनरावांना विसरून जायचा सल्ला देऊ..

मेघना : काल मला आर्यन बोलला होता तो येईल मला घ्यायला.. नक्की येईल.. मी त्याची वाट बघतीये..

मेघना शून्यात पाहून बरळत होती.. राज तिचे खांदे गदागदा हलवतो आणि बोलतो..
राज : मेघना अहो ऐका आमचं.. ते शक्य नाही.. कळतंय का तुम्हाला आम्ही काय सांगत आहोत..

मेघना : राज.. तू का नाही मला इथून पुण्याला घेऊन जात? राज मला आर्यन कडे सोड ना.. (असं म्हणत मेघना रडायला लागते )

अक्का मेघनाला सावरतात..
तारा अक्का : बेबी शांत व्हा.. आम्हाला माहित आहे हे सगळं सोपं नाहीये तुमच्यासाठी.. पण आता काहीच पर्याय नाहीये..

राजला तर मेघनाचं रडणं बघवत नाही.. तिचे अश्रू पाहून त्याचे डोळे सुद्धा भरून आले..पण तो स्वतःला सावरतो..
राज : मेघना.. एक लक्षात ठेवा.. तुम्ही आर्यनच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून आमच्याशी लग्न करत आहात.. तुमच्या प्रेमाला वाचवण्यासाठी आमच्याशी लग्न करत आहात... त्यामुळे यात तुमचं आर्यन वरचं प्रेमच जिंकत आहे.. कळलं?? त्यामुळे शांत व्हा.. रडू नका आता... आम्ही नवरा म्हणून तुमच्यावर कधीच हक्क गजवणार नाही.. आम्हाला माहित आहे तुम्ही फक्त आणि फक्त आर्यनच्या आहात..

     राजच्या समजवण्याने मेघना शांत झाली. तारा अक्का सुद्धा राजचे बोलणं ऐकून हा किती चांगला आहे असा विचार करतात... मेघनाला शांत करून राज थोड्या वेळाने तिथून निघतो.रस्त्यात तो मेघनाचाच विचार करत असतो.. सतत तिचा तो रडणारा, दुःखी चेहरा.. तिचं ते गायवया करणं.. त्याच्या डोळ्यासामोर येतं..तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवतो आणि रडायला लागतो...
"मेघना आम्हाला माफ करा.. आज तुमची जी हालत झालीये ना.. ती आमच्यामुळे झालीये.. किती रडत होता तुम्ही.. आमच्या पायाशी सुद्धा आलात.. नाही विसरू शकत आम्ही हे सगळं.. आम्हाला राग आला तुमचा.. त्या रागाच्या भरात लग्न मोडायला आलो आम्ही.. पण त्याचा इतका वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल याचा आम्ही विचारच केला नाही...खरंच आर्यन खूप नशीबवान आहे.. तुम्ही किती प्रेम करता त्याच्यावर... खरचं आम्ही तुम्हा दोघांमध्ये आलो.. माफ करा आम्हाला... हे लग्न तुमच्यासाठी खूप अवघड जाणारे.. आम्ही समजू शकतो... आम्ही स्वार्थी झालो होतो.. तुमच्या प्रेमात आंधळे झालो होतो.. एवढा पण विचार नाही केला आम्ही कि आमच्या नकारामुळे तुम्हाला पप्पांचा किती क्रोध सहन करावा लागेल.. आम्हाला फक्त तुमच्याशी लग्न करायचं होतं.. काय केलं हे आम्ही?? याला प्रेम म्हणतात?? नाही.. प्रेम तर खरं ते आहे जे तुम्ही आर्यनवर करता.. त्याच्यासाठी काही पण करू शकता.. आणि एक आम्ही.. आमच्यामुळं तुम्हाला किती त्रास झाला... माफ करा मेघना... माफ करा.." राजचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.. त्याला मेघनाबद्दल आज फार वाईट वाटत होतं....

क्रमश :

आता पुढे काय होईल?? खरचं राज आणि मेघनाचं लग्न होईल?? आर्यन मेघनाला भेटायला येईल का?? कि आर्यन आणि मेघनाचं नातं इथेच संपेल??? पाहूया पुढच्या भागात.

वाचकहो हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भाग आवडला तर like आणि कॉमेंट नक्की करा.
धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®





 

🎭 Series Post

View all