"लुडबुड संसारातील" भाग - २
आज स्नेहा जास्तच रिअॅक्ट झाली. कारण सतत सासुबाईंनी मारलेले ताने आणि त्याचा परिणाम आॉफीसच्या कामावर त्यामुळे बॉसची बोलणी म्हणूनच स्नेहा जास्त रिअॅक्ट झाली.
आज स्नेहा जास्तच रिअॅक्ट झाली. कारण सतत सासुबाईंनी मारलेले ताने आणि त्याचा परिणाम आॉफीसच्या कामावर त्यामुळे बॉसची बोलणी म्हणूनच स्नेहा जास्त रिअॅक्ट झाली.
सासूबाई मुद्दामच जरा मोठमोठ्यांनी भाच्चीशी बोलत होत्या. आपल्याकडे असे करतात हे तसे करतात. असे परत, परत भाच्चीला सांगत होत्या. खुप दिवसात आपल्या पद्धतीचे वरण खाल्लेच नाही. साधे वांग्याचे भरीत पण कित्येक दिवसात मी खाल्लेच नाही. कारण स्नेहा वांगी आवडत नाही. मग विषय संपला. अग आपण कुठे सगळ्या पदार्थांत कांदा, टोमॅटो घालतो. सोवळ्यात चालत पण नाही.पण इथे भेंडीच्या भाजीत देखील कांदा टोमॅटो.
त्यात भाच्ची बाई पण भर घालत होत्या. हो ना आत्या आज्जीच्या पध्दतीनेच आई सगळे करते आणि मी पण. आपल्याला असेच पदार्थ आवडतात ग!
"मी पण ग माझ्या सासुबाईं सांगतिल तसेच करायची."पण आता sss!.. घरात सासु म्हणजे कोण? तिला कोण किंमत देतो. सगळे नशीबानं घ्यावे लागते.
स्नेहा हे सगळे ऐकत होती एकीकडे तिचा रोजच्या प्रमाणे हात चालत होता आणि एकिकडे ति आयपॉडवर आजच्या क्लाएंट बरोबरच्या मिटींगची तयारी करत होती.
आत्या भाच्चीच्या चाललेल्या सुसंवादाने तिला कामात बराच व्यत्यय येत होता.तिचे मन मधून मधून विचलित होत होते.
अचानक तिकडून मॅनेजर ओरडला. "स्नेहा आधी घरचे काम आटप आणि मग आॉफीसच्या कामाचे डिस्कशन करू."
स्नेहाच्या मनाला हे खुप लागले म्हणून ती आज पहिल्यांदा भडकली.
आई आमच्या कडचे रितीरिवाज खुप वेगळे आहेत. सोवळे ओवळे आम्ही शब्दाचे पाळतो. आईबाबांनी कोणाला ही दुखवायचे नाही हे संस्कार केले माझ्या वर.
आई तुम्हाला काय हावे तसेच मी करते.आशिष आणि बाबांना आवडते भाजीत टोमॅटो, कांदा हे तुम्हीच सांगितले म्हणुनच मी घालते. माझी आवडनिवड कधीच मी सांगितली नाही.
तुम्हीही कधी मला विचारली नाही आणि आईबाबांचे संस्कार म्हणून कधी उलट बोलत नाही. आशिषवरचे प्रेम मला हे सगळं सहन करायला सहनशक्ती देते.
देवघरातील स्वामी मला बळ देतात. तेंव्हा काय जे बोलायचं ते मला सरळ सरळ बोला! कोणावर घालून पाडून बोलू नको. त्यामुळे उलट तुमच्याविषयी आदर वाढेल तुमचा अनादर होणार नाही.
"शेवटी ति म्हण आहेच ना ज्याचा उपयोग तुमचा नित्य व्यवहारात असतो.मला पण ती म्हण आचरणात आणायला भाग नका पाडू!"
" चला निघते मी आॉफीस मध्ये आज मिटींग आहे."
स्नेहा ऐवढे बोलून आॉफीसला गेली पुढे काय झाले असेल पाहूया पुढील भागात ?.
स्नेहा ऐवढे बोलून आॉफीसला गेली पुढे काय झाले असेल पाहूया पुढील भागात ?.
क्रमशः
©️®️सौ.ऊज्वला रवींद्र राहणे
©️®️सौ.ऊज्वला रवींद्र राहणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा