मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 1

माधवीचा एकदमच मूड गेला ,या सगळ्यांना काही वाटत नाही का मला बोलतांना, या प्रसंगी किती मोठा अपमान झालेला आहे माझा



मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
..............

माधवी सतीश एक मध्यमवर्गीय जोडपं आणि त्यांची मुलगी अदिती, एकुलती एक होती ती, अदिती नववीत शिकत होती, माधवी गृहिणी होती, पूर्वी करायची ती काम पण आता बरेच वर्ष झाले गॅप पडला होता, हुशार माधवी अप टु डेट होती, लेखन वाचन, जगात काय सुरु आहे याची तिला माहिती असायची.

आता हल्ली सतीश आणि अदिती सगळ्या गोष्टीत माधवीला कमी समजत होते, घरी असल्यामुळे तिला काही समजत नाही, अस वाटायच त्यांना, सारख प्रत्येक गोष्टीत ते तिला बोल लावत होते, अदितीला ही आईने काही सांगितल ते पटत नव्हतं, आईला काय समजत नाही अस वाटत होत तिला,

"आई तू जॉब का सोडला?",.. अदिती

"तुझ्यासाठी, तुला सांभाळायला कोणी नव्हत आणि ऑफिसच्या वेळा खूप होत्या",.. माधवी

"नव्हता सोडायचा, चुकीचा निर्णय होता तो, बोर नाही होत का तुला घरात? काही तरी करायला हव, अशी स्मार्ट आई आवडते मला",.. अदिती

"ते सगळ बरोबर आहे तुझ अदिती, पण तुला माहिती नाही तेव्हा काय परिस्थिती होती, सदोदित आजारी असायची तू, आम्ही बरोबर केल तेव्हा, गप्प बस बर सारख काय तेच ग तुझ ",.. माधवी

काय कराव अस झाल होत माधवीला, तस बघितल तर अतिशय हुशार होती माधवी, पण तिची साधी राहणी आवडत नव्हती घरच्यांना, आई तू हेच करायला हव होत, तेच कर, तुझ चुकल अस अदिती करायची,

माधवी दुपारचा स्वयंपाक करत होती अचानकच बेल वाजली, कोण आलं असेल आता यावेळी, सतीशने पुढे जाऊन दार उघडलं, दारात तिची बहीण प्रिया होती

"अरे प्रिया तू यावेळी कशी आलीस? ",.. माधवी

"अगं ताई जिजाजींनी मला बोलावून घेतलं",.. प्रिया

ती सतीश कडे बघत होती, मला कसं माहिती नाही, आता हल्ली काही सांगत नाहीत हे मला, काय अस?

" हो मीच बोलवलं आहे प्रियाला, प्रिया जेवण कर आणि माधवी सोबत शॉपिंगला जा, उद्या आमच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे, माधवी साठी एक छान सलवार सूट तुझ्या चॉईसने विकत घेऊन दे, कशी गबाळी राहते ही माधवी, किती जुनाट कपडे आहे तिचे, काही फॅशन सेन्स नाही हिला ",... सतीश वाटेल ते बोलत होते, माधवीला कसतरी झाल अगदी बहिणी समोर,

तेवढ्यात आतून अदिती बाहेर आली, ती येवून प्रियाला भेटली, त्या दोघींच खूप पटायच,..."हो मावशी आईला ना सुंदर सुंदर दोन-चार ड्रेस घेऊन दे, माझ्या पण शाळेत मिटींग असते ना तेव्हाही तोच ड्रेस घालेल आई, तिचे बाकीचे ड्रेस किती घाण आहेत, जरा समजेल तरी तिला कस रहाता ते, तुझे ड्रेस किती छान आहेत कुठुन घेते तू? ",.. दोघी बोलत बसल्या,

"अदिती अग इकडे ये, मी तो माझा रेड ड्रेस घालते ना उद्या, कसा वाटेल तो ",... माधवी

" आई प्लीज नको अस करु, मावशी सोबत जा शॉपिंग ला, किती वेळा तू तोच रेड ड्रेस घालणार आहेस, बोर आहे तो ड्रेस" ,.. अदिती

"आपण दोघी गेलो असतो शॉपिंगला अदिती, अहो तुम्ही कश्याला प्रियाला बोलवत बसले ",.. माधवी

"नको तू ऐकत नाही माझ बाहेर, सारखे एका पॅटर्नचे ड्रेस घेते ती, आईला भरपूर पैसे दिले तरी तिला काय घ्यावा ते समजत नाही",.... आता प्रिया, सतीश, अदिती चांगलच माधवी वर तोंड सुख घेत होते,

" बरोबर बोलते अदिती, बघ अदितीला समजत पण माधवीला समजत नाही कस राहायच ते",.. सतीश

" मी आली ना आता जिजु, तुम्ही काळजी करू नका",.. प्रिया

माधवी तिथे उभी होती.

" जा आटोप आता लवकर माधवी ताई, उशीर होतोय आपल्याला",.. प्रिया

ते तिघं बोलत बसले.

माधवीचा एकदमच मूड गेला ,या सगळ्यांना काही वाटत नाही का मला बोलतांना, या प्रसंगी किती मोठा अपमान झालेला आहे माझा , माझा नवरा, माझी बहीण, माझी मुलगी तस बघितल तर किती जवळची नाती आहेत ही , ते असे करतात मला, बाकीच्यांकडुन काय अपेक्षा ठेवणार.

जेवण झालं प्रिया माधवी आणि अदिती सगळ्या मार्केटमध्ये गेल्या, छान चार-पाच ड्रेस घेतले, ड्रेस घेतांना ही प्रिया सारखं माधवीला कशी खरेदी करायची, काय आहे सध्याची फॅशन हीच माहिती देत होती,

अगदीच कंटाळा आला होता माधवीला, एवढीही काही गबाळी राहत नाही मी, काय हे असं? सतीशही जास्तच करतात, माझ्याबद्दल असं सांगून ठेवतात सगळ्यांना की बस, जस काहीही येत नाही मला.

पण प्रियाला तर माहिती आहे ना मी तिची बहीण आहे, एवढच आहे की थोडी साधी राहते मी, काय करणार आहे मग घरातल्या घरात एवढी तयारी करून, कुठे जायचं असलं तर त्यानुसार तयार होते मी, याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही.

जलद कथा मालिका स्पर्धा


🎭 Series Post

View all