Login

मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 4 अंतिम

सतीशला समजल त्याची चूक, पण त्याने ती मान्य केली नाही, पण मनात ठरवल की आता अस करायच नाही, माधवीला खरच त्रास होत असेल,


मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
..............

दुसऱ्या दिवशी सतीशची मावशी त्यांचा भाऊ सगळे लोक अचानक आले, सतीश घरच्या पायजम्यावर बसून काहीतरी काम होता करत होते, ते लोक आल्यावर परत एकदा माधवी सगळ्यांसमोर त्याच्या अंगावर ओरडली.. " जा आत मध्ये थोडे व्यवस्थित कपडे घालून या, यांना प्रत्येक वेळी सांगावं लागतं, कसे राहतात असे",

सतीश आत आला त्यांच्या मागे माधवी आली..

"माझे हे कपडे व्यवस्थित आहे माधवी, काय प्रॉब्लेम आहे तुला",.. सतीश

"नाही... बरे दिसत नाही ते, सगळ्यांसमोर काय अस, मला लाज वाटते तुमची, तुम्ही अशा कपड्यांमध्ये फिरतात तर, घरात ठीक आहे पण आता पाहुणे आले ना ",.. माधवी

सतीशने कपडे बदलले, घरचे सगळे माधवीकडे आणि सतीश कडे बघत होते, माधवीला माहिती होतं नंतर सतीश नंतर आपल्यावर चांगलाच राग काढणार आहे, असू दे ती याच गोष्टीची वाट बघत होती.

जेवण झाल, जेवतानाही माधवी दोन-तीन दा बोलली यांना काही काम जमत नाही, काही मदत करत नाही हे घरात, काहीही झाल की ती सतीश वर टिकासत्र घेत होती, बाकीचे बोलू लागत होते तिला, सतीश गोंधळून गेला होता,

मावशी बोलली जाता जाता... सतीश जरा बायकोकडे लक्ष देत जा, नीट वागत जा.

पाहुणे गेले आता सतीशच्या रागाचा कडेलोट झाला,... "माधवी इकडे ये आधी",.. त्याने तिला आत मध्ये बोलवलं, काय अस करते तू आता हल्ली? काय वागणं आहे हे तुझ? सगळ्यांसमोर मला का बोलतेस इतक तू? ",

"काय झालं हो, काय त्यात ?तुम्ही का एवढा त्रास करून घेता आहात ",...माधवी

"तू माझा सारखा अपमान का करत होती पाहुण्यांसमोर, तुला समजत नाही का कस वागावं ते, माझी लाज वाटते का तुला ",...सतीश

" अहो पण हीच आपल्या घरची पद्धत आहे ना, तुम्ही आणि अदिती असेच करतात ना मला चारचौघात, माझे कपडे माझा साधेपणा तुम्हाला आवडत नाही, तुम्ही मला बदल करायला सांगता, तसंच आहे, मला तुमचे कपडे आणि तुमचा साधेपणा आवडला नाही, तुम्ही जस मला कपड्यांमध्ये बदल करायला सांगितला तस मी तुम्हाला कपडे बदलायला सांगितले इतकच झाल, त्यात काय? मी ऐकल ना तुमच, मी नाही केला एवढा मोठा इश्यू, सहन केल, प्रियाने सांगितल त्या प्रमाणे घातले ड्रेस, तुम्ही ही शांत व्हा, मी म्हणते त्या प्रमाणे रहात जा ",... माधवी

" काय शांत व्हा?.. माधवी मला नाही आवडल अस",.. सतीश

" जर तुम्ही माझा अपमान कराल तर मी पण तुमचा अपमान करेल, जर तुम्हाला माझ्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा हवी असली तर मलाही या घरात मान मिळाला पाहिजे, इतर लोकांसमोर तुम्ही मला बोलणार तर मलाही तोंड आहे",.. माधवी

" हे मला अजिबात चालणार नाही, शहाणपणा नको आहे माधवी, माझ्याशी अस बोलायच नाही, नसेल आवडत तर इथे रहायच नाही ",... सतीशला वाटल माधवी घाबरेल.

" तुम्हाला काय वाटल मी खूप गरीब बिचारी आहे का, तुम्ही घराबाहेर काढल तर कस होईल माझ, मी अजूनही तेवढी बोल्ड आहे काहीही करू शकते मी, थोडा वेळ लागेल पण उभी राहीन मी माझ्या पायावर, अजिबात धमकी द्यायची नाही",.. माधवी

सतीश गप्प बसले,

"आणि मी बोलणार मी करणार मला हव ते, अजिबात काही बोलू नका मला , शांत रहा तुम्ही, मला समजून घ्यायला हव होत तुम्ही, तर तुम्ही मला कमी समजतात, मी काहीही केलेल तुम्हाला आवडत नाही, त्या उलट मी नेहमी तुम्हाला जसे आहेत तस स्विकारल होत, पण आता नाही तुम्हाला मी मॉडर्न हवी मी माझा कम्फर्ट सोडला तुमच्या प्रमाणे झाली मी, तर तुम्ही पण बदला स्वतःला ",.. माधवी

सतीशला समजल त्याची चूक, पण त्याने ती मान्य केली नाही, पण मनात ठरवल की आता अस करायच नाही, माधवीला खरच त्रास होत असेल,

थोड्या दिवसांनी...

अदितीच्या स्कूल मधे पेरेंट्स टीचर मीटिंग होती, सतीश माधवी अदिती सोबत जाणार होते,

" अदिती इकडे ये मी हा ड्रेस घालु का?",.. माधवी

"आई तुला हवा तो ड्रेस घाल, तू कंफर्टेबल हवी" ,.. अदिती

"सतीश हा ड्रेस ठीक आहे का?" ,.. माधवी

"माधवी तू छान दिसतेस जशी आहेस तशी" ,.. सतीश

माधवीने तिचा आवडता रेड ड्रेस घातला, कार मधे माधवी खूप खुश होती, अदिती तिच्या बाजूने होती, सतीश काही बोलत नव्हते, पण बर्‍यापैकी शांत झाले होते ते, माधवीने ही पुढे अजून ताणल नाही, ती पण शांत होती, मान देत होती मान घेत होती.

0

🎭 Series Post

View all