माधव उवाच...भाग १
©® सौ. हेमा पाटील.
"माधवा, संकटे एकटी येत नाहीत, ती येताना वादळ वारे घेऊन येतात आणि जाताना खूप पडझड करून जातात. भले ही आपण त्यावर 'विजय' मिळवलेला असेल, तरीही काहीतरी गमावतोच आपण.!"
"आयुष्यात जगताना जे भलेबुरे अनुभव येतात त्यातूनच जगणे शिकायचे असते." माधव म्हणाला खरं, पण ती स्वतःच्याच विचारात मग्न होती.
"अनेकदा ते शल्य ऊरात दाटून राहिलेले असते रे. वेळ, काळ पुढे निघून जातो, पण ती आठवण सल बनून टोचत राहते...कायम!"
"तू कायम गंभीर चेहऱ्याने का वावरतेस गं?" देवपूजा करताना देवघरातील माधवाने विचारलेला प्रश्न तिच्या अंतःकरणापर्यंत पोहोचल होताा. त्या प्रश्नाने अनेक प्रश्न निर्माण केले व त्यापाठोपाठ त्यांची उत्तरे ही...
"माधवा, तुझ्यापासून काहीच लपून राहत नाही. अगदी मनाच्या चोरकप्प्यात जपून ठेवलेले गुपितही तुला माहीत असते. अनेक क्लेशकारक आठवणी मनात साचून राहिल्या होत्या. आता तुझा प्रश्न ऐकून माझ्या लक्षात आले, त्या प्रत्येक आठवणी सोबत माझ्या हसत्याखेळत्या चेहऱ्यावर अनेक पुटे चढत गेली आणि तो चेहरा इतका गंभीर कधी बनला हे मला समजलेच नाही.
त्या आठवणींचे दान मी आता त्यांच्याच पदरात टाकून दिले आणि मी मुक्त झाले त्यातून. त्यामुळे चेहऱ्यावर निर्मळ हसू आले बघ. आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा माझी मी मला गवसले, तीच बालपणीची मी... खळखळून हसण्यामुळे गालावर पडणाऱ्या खळीचे महत्व आज कळले.
धन्यवाद माधवा, तुझ्यामुळेच हे शक्य झाले."
धन्यवाद माधवा, तुझ्यामुळेच हे शक्य झाले."
यावर माधव म्हणाला,
"आयुष्यात अनेकदा आपण हताश होतो, संकटापुढे हतबल होतो. तोच एक क्षण असतो, पुन्हा एकदा नव्याने लढा देण्याचा, धीरोदात्तपणे संकटाचा सामना करण्याचा.
कारण ११: ५९ झालेले असले तरी बारा वाजायला एक मिनिट कमी असते. हे एक मिनिट ही आपल्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. त्या एका मिनिटातील साठ सेकंदांची टिकटिक ऐका आणि स्वार व्हा संकटांवर...यश तुमचेच असेल."
कारण ११: ५९ झालेले असले तरी बारा वाजायला एक मिनिट कमी असते. हे एक मिनिट ही आपल्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. त्या एका मिनिटातील साठ सेकंदांची टिकटिक ऐका आणि स्वार व्हा संकटांवर...यश तुमचेच असेल."
"माधवा, किती मोलाचा सल्ला दिलास रे. आजपासून मी हे नक्की अमलात आणेन. संकटे आपल्याला शिकण्याची संधी देण्यासाठी येत असतात, त्याने नामोहरम व्हायचे नसते. संकटाला तोंड देताना पराजय पदरी पडला तरी त्यामुळे आलेला अनुभव आपल्याला अधिक समृध्द करून जातो. चेहऱ्यावरील हास्याचे दान संकटांच्या पदरात टाकायचे नसते. बचेंगे तो और भी लढेंगे | असे म्हणत पुढे चालायचे असते. बरोबर ना रे सख्या?"
यावर माधव मिश्कीलपणे हसला व म्हणाला,
"अगं, पण या बोलण्याच्या नादात तू माझ्या कपाळावर चंदनाचा टिळा लावायला विसरलीस, त्याचे काय?"
"माधवा, तू पण ना..." असे म्हणत ती खळखळून हसली. तिच्या गालावरची खळी पाहून माधवाच्याही ओठांवर हसू आले.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
आजपासून जमेल तसे माधव उवाच... ही लेख मालिका ईरावर लिहिणार आहे. आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा