Login

मधुबाला

A Poem Of Every Dreamer...
मधुबाला
आज एक पामार मधुबालेवर आला..
परि अचानक तिला सोडून गेला..
एकटीच ती मधुबाला विसावली देठावर..
पण वाट पाहती डोळे त्याच्या वाटेवर...
दिवस सोवळा, सूर्य कोवळा
फिरवत होता वेळेचा भोवरा..
मावळतीला सूर्य झुकला..
पामराचा तिला विसर पडला..
अंधाराने जाळे विणले
मधुबालेने डोळे मिटले..
तेव्हा अचानक अंधारात
ऐकू आली कुजबुज 
होऊनि काजवा वेडा पामर
वाजवी कानांशी अलगुज..
छेडले मधुबालेस त्याने, तोडला तिचा संयम
तिनेही मग दल पसरवून साऱ्यांना दिला दरवळ..
किर्रर्र रानात डोलला काळोखाचा मनोरा ..
आनंदाच्या डोही त्यांच्या प्रीतीचा फुलोरा..
©® ऋचा निलिमा