पूर्व सुत्र -
" दोघी बरोबरीच्या आहेत . आते मामे- बहिणी आहेत. गोडी आहे गं . .राहू दे. दुसरं स्थळ येईल त्यात काय एवढं." भागीरथी पण म्हणाली .

"असं काही नाही, त्यांना काहीतरी कारणच हवं असेल नकार द्यायला!" मध्यस्थी बोलले.
क्रमशः
क्रमशः
कथा पुढे-
"नाहीतर बाई यापुढे दाखवण्याच्या कार्यक्रमात दोघी एकत्र नकोच." पद्मा पुन्हा म्हणालीच.
बळवंतरावांचं बी.पी. वाढत होतं.
पण ते शांत बसले व वेंकटरावांना ही चर्चा थांबवण्याचा इशारा केला.
त्यांनी बायकोला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला.
मध्यस्थ काका पुन्हा म्हणाले," ऍक्चुअली वेंकटराव . . त्यांचा पूर्ण नकारही नाही त्यामुळे तुन्ही राधासाठी थांबाच. तुम्हालाही घाई नाही पण मला वाटतं इथेच जुळेल पहा तुमच्या मुलीचं."
" ते असू द्या हो , आम्ही पाहून घेवू
त्यांनी हळूच बळवंतरावांचा विचारलं,
"एक विचारू का ? त्यांच्याकडून मला तसा रमणीसाठी निरोप आलाय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काय सांगू त्यांना?"

बळवंतराव चिडून म्हणाले," तुम्हाला तरी पटतंय का हे? मीच काय कुणीही असं करणार नाही. मी अजून वर्षभरही थांबेल पण असं राधासाठी पाहिलेलं स्थळ रमणीसाठी कधीच करणार नाही."
"बरोबर आहे. तुमचा मागणी बद्दल जोर होता असं ऐकलं म्हणून मला वाटलं की ही एका नजरेत पाहून विचारलं म्हणजे मागणीच झाली ना . . ! या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ते खरच आहे म्हणा . आपण निमित्त मात्रच"
शेवटचं वाक्य ते बळवंतरावांचा कटाक्ष पाहून म्हणाले. त्यानंतर मध्यस्थी निघून गेले व घरात चर्चा होत राहिली.
आता किमान राधाचं ग्रॅजुएशन होईपर्यंत मी स्थळ पाहणारच नाही असा निर्णय देवून वेंकटरावांनी पत्नीसमोर विषयच मिटवला.

दुसर्या दिवशी रमणी नेहमी प्रमाणे मैत्रिणीं सोबत कॉलेजला गेली पण चेहरा उदासच होता. म्हणजे त्या मुलाने तिला पसंत केलं याचा आनंद होण्या ऐवजी तिला अपराधी भावना आली होती.
जातानाच चित्राने विषय काढला होता पण तिने टाळला.
जेवताना मात्र तिने मैत्रिणींना झालेला प्रकार सांगितला. त्या तर खुश झाल्या. .
"काय तुझ्या सौंदर्याची जादू आहे एका नजरेत , घरच्या अवतारात मागणी घातली गं!" सारिका म्हणाली.
" पण हे चूक आहे ना गं? राधीला होकार किंवा नकार कळवायचा ना , माझं नाव उगीचच आलं. .!"
"हो पण घरी सगळे काय म्हणाले? " चित्राने विचारलं.
" काय होणार? नाराज झाले ना बाबा , म्हणजे हे पटलं नाही त्यांना.

कॉलेजच्या कॉमर्स विंगमधे आज तिला मुला मुलींचा घोळका दिसत होता. पण तिने दुर्लक्ष केलं. कसल्याशा स्पर्धांचे पोस्टर लावले होते नोटिस बोर्डवर पण तिला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं.
त्या मुलांच्या ग्रुपमधला एक मुलगा सतत तिला पहात होता असं चित्रा सांगत होती.
कॉलेज सुटल्यावर ती लायब्ररीत पुस्तक घेवून येत होती. पुन्हा एक मुलगा अचानक तिच्या्समोर येवून उभा ठाकला.
" मिस रमणी! काय झालं कालच्या प्रपोजलचं?"
"प्रपोजल?" ती गोंधळलीच. तिच्या डोक्यात ते राधाचं स्थळंच होतं. तिने घाबरून वर पाहिलं तर तो कालचा मुलगा!
"लक्षात आहे ना, मी अतुल कारंजकर! काल भेटलो होतो."
"सॉरी पण मला या सगळ्यात पडायचं नाही. मला आवडही नाही आणि माझ्या घरी चालतही नाही." तिने एका दमात उत्तर दिलं.
" घरचं आम्ही बघून घेवू, तुम्ही फक्त हो म्हणा. . तुम्हाला कल्पना नाहिय की देवाने तुम्हाला किती फुर्सतीने बनवलंय!"
तो एकटक तिला पहात होता व ती खाली मान घालून बोलत होती.
"मला माफ करा मिस्टर अतुल पण. .?"
"कॉलेजातून टोटल ५ फायनॅलिस्ट निघतील. तुम्ही तर बेसिक राऊंडची कसरतही करू नकात. डायरेक्ट फायनल राऊंडमधे एंट्री देईन तुम्हाला. . अरे पण जी एस ची उमेदवार म्हणजे काय? मिस टी.पी. कॉलेज हा खिताब तुम्हालाच मिळावा. . ही आमची म्हणजे माझी इच्छा आहे."
"पण नको मला काय करायचय हे सगळं. . गरज नाहीय. . "तिला काय उत्तर द्यावं हेच कळेना.
इतक्यात मागून मोनिका व चित्रा आल्या.
"येस मिस्टर कारंजकर . . . काय बोलताय आमच्या मैत्रिणीशी?" मोनिकाने डायरेक्ट विचारलं.

"त्यांचं भविष्य बनवतोय सौंदर्य स्पर्धेत पण त्या ऐकायलाच तयार नाहित."
मग त्याने सगळं पुन्हा समजावून सांगितलं. रमणीला सतत काळजी की घरी यातलं कुणी कळवलं तर बाबा किती चिडतील .
कारण अवाजवी आधुनिकता , फॅशन किंवा सौंदर्य स्पर्धा व मॉडेल्स याबद्दल त्यांचं विशेष चांगलं मत नव्हतं .
"नको प्लीज या सगळ्यात पडू नका , तिच्या घरी हे काहिच चालत नाही." चित्रा समजावत होती.
इतक्यात नंतर येवून सगळं ऐकणारी सारिका म्हणाली. . " अहो तिला काही मत आहे की नाही. ती नको म्हणतीय ना . . मग का आग्रह आहे तुमचा ?एक सांगा तुमचा काय फायदा? ही इंटर कॉलेज ब्युटी कॉन्टेस्ट नाहीय. आपलीच आहे इंटरनल. . मग कुणीही जिंको काय फरक पडतो?" सारिकाच्या सडेतोड प्रतिक्रिये नंतर थोडंस पडतं घेत अतुल तिथुन गेला.
घरी परते पर्यंत मैत्रिणींची हीच चर्चा चाललेली होती.
*************
महिन्याभरात कॉलेजमधे स्नेहसंमेलनाचं वारं वाहू लागलं.
एखादी दुसरी दिवसा झालेली स्पर्धा असेल तर रमणीचा ग्रुप पहायला किंवा ऐकायला नाहीतर बाकी कशात त्यांना इंटरेस्ट नव्हता.
सारीका भाषणात वगैरे भाग घ्यायची इतकंच.
सगळ्या स्पर्धांशेवटी सौंदर्य स्पर्धा झाली. रमणीने स्वतःला या सगळ्यापासून मुद्दामहून दूर ठेवलं होतं .
बक्षिस वितरणा दिवशी कळालं की यावर्षी टी.पी. कॉलेजचा ब्युटी क्राऊन "मिस महक" हिला मिळाला.
ती होतीच मॉड व खूप बोल्ड. ग्रॅजुएशन नंतर सरळ सरळ मॉडेलिंग करणं हे तिचं ध्येय होतं. घरून तर सिनेमात जाण्यासही परवानगी होती. मग काय!
तिने सौंदर्य स्पर्धेचे सगळे राउंड पूर्ण केले व शेवटच्या फेरीत खूप प्रभावी उत्तरं दिली होती.
पण स्नेह संमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपल्यावर परतताना अतुल कारंजकर ग्रुप च्या जवळ येवून म्हणालाच " मिस रमणी. . आज तुम्ही तो ब्युटी क्वीन चा मुकुट घालायला हवा होता मला. तुम्हाला तिथे पाहण्याची इच्छा होती माझी . "

"बरोबर आहे पण तिची इच्छा नव्हती ना !" मोनिका पटकन म्हणाली .
"माझी इच्छा होती ना. . पण रमणीजी तुम्ही प्रपोजल नाकारून बरोबर नाही केलंत. पहा आता त्या महकला मिळाला क्राऊन. तुमच्या नखाची तरी सर आहे का तिला. असो."
ती काहिच बोलली नाही व तो निघून गेला.
त्याचं बोलणं व बघणं दोन्हीही रमणीला आवडलं नाही.
दोन दिवसांनंतर मग निरोप संमारंभ . . झाला. ज्युनिअर कॉलेजचा! त्यातही रमणीने कशातच भाग घेतला नाही.
ती अलिप्त राहिली पण अतुल कारंजकर तिची माहिती काढतच होता.
मग परीक्षांचे वारे वाहिले अन दिवस जात राहिले . रमणीचे बारावीचे पेपर खूप छान गेले.
****************************
रमणीची बारावीची परिक्षा झाली.
उन्हाळ्याच्या सुट्टयांत अचानक एक दिवस संध्याकाळी एक भारी कार रमणीच्या घराबाहेर येवून थांबली.

बळवंतराव बाहेरच अंगणात बसलेले होते. सोबत २-३ मित्र ही बसलेले होते.
त्यातून एक राजबिंडा तरूण उतरला. एकदम कडक इस्त्रीचे कपडे भारी व डोळ्यांवर गॉगल.
तो गॉगल काढत अंगणात आला.
" नमस्कार इथे बळवंतराव सरदेशमुख कोण आहेत?"
" मीच ! बोला काय काम आहे?"
"नमस्कार मि. बळवंतराव आपणच मिस रमणीचे वडिल आहात ना ?"
" हो , आपण कोण आणि कुणी पाठवलंय आपल्याला?"
" कुणीही नाही. मीच तुमचा पत्ता शोधत आलो होतो. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे."
"हो बसा व सांगा स्वतःबद्दल. आपलं नाव आणि रमणीला कसे ओळखता?"
त्याला बसायला एक खुर्ची सरकवली. त्याला एकांतात बोलायचं होतं पण त्यावेळी सगळेच बसलेले होते.
बळवंतरावांचे मित्रही कान टवकारून बसलेच होते. काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार असं वाटत होतं.
मग त्या मुलाने जुजबी बोलून घरात चलण्याची विनंती केली.
आत आल्यावर त्याने सरळ सांगितलं की मी तुमची मुलगी रमणी हिला मागणी घालण्यासाठी आलोय.

बळवंतरावांना काही सुचेचना. त्यांनी पत्नीला पाणी घेवून बोलावलं.
सोबत कोण आलंय ? असं ही विचारलं तर घरच्यांसोबत पुन्हा येतो असं म्हणाला .
त्याला बसण्यासाठी विनंती केली.
तो स्वतःच्या कौटुंबिक बिझनेस बद्दल सांगत होता इतक्यात रमणीने आतून पडद्या आडून त्याला पाहिलं व तिची तर ह्र्दयाची गतीच जणु थांबली.
हा इथे कसा ? ह्या प्रश्नाने ती भांबावून गेली.
तो पुढे बोलणार इतक्यात त्याचा ड्रायवर काहीतरी निरोप घेवून आला .
मिस्टर सरदेशमुख मी पुन्हा येतो , थोडा घाईत आहे म्हणून तो मुलगा परत निघाला पण.
बळवंतराव बाहेर आले. तो मुलगा कार मधे बसून गेला .
त्याचा रूबाब श्रीमंती व डायरेक्ट मागणी घालण्याच्या स्टाईलने बळवंतराव खुप इंप्रेस झाले होते.
स्वप्न जणु पूर्ण होणार होतं.
अंगणातल्या अातूर मित्रांना त्यांनी आनंदाने सांगितलं. ." पहा माझ्या रमणीला मागणी आली!"
पण याचं नाव
इतक्यात रमणी बाहेर आली व म्हणाली "बाबा हे मि. अतुल कारंजकर इथे कसे?"
"अगं तू ओळखतेस का त्यांना?"
" हो कॉलेज चे जी. एस. आहेत ते!" रमणी बिलकुल अनुत्सुक पणे म्हणाली.
इतक्यात दिघे उभे राहिले व म्हणाले," बळवंतराव इतके हरखून जाऊ नकात मागणीने ,आता काय तुम्ही जातीबाहेर लग्न करणार काय रमणीचं?"
"हे काय बोलताय दिघे? कारंजकर . . ऐकलं नाही का?"
"बळवंतराव आडनावावर जाऊ नका. माजी नगरसेवक भाऊराव पाटील ,कारंजगाव यांचा मुलगा आहे तो. आम्ही ओळखतो त्याला. आपल्यातले नाहीत ते!"
आता मात्र बळवंतराव मटकन खुर्चीवर बसले.

©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक २०. ०४ .२२
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक २०. ०४ .२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा