महापुरा तील कुटुंब १
रात्रीचा प्रसंग परत परत त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. त्याची सगळी स्वप्ने धुळीला मिळाली होती. बायको डोक्यावर हात ठेवून रडत होती. तिला बिलगुन दोन्ही लेकरं आकांडतांडव करत होती. कारण, पोटात भुकेचा डोंब उसळला होता. मदत येण्याची वाट पहात सगळे हतबल झाले होत. निसर्गाच्या या प्रकोपाने गावाचा कायापालट करून टाकला होता. पण एक मात्र आधार होता. तो मात्र कुटुंबाचा. ते सगळे सुरक्षित आहे. हा दिलासा परत नव्याने जगण्याची उमेद निर्माण करत होता.
"अहो, काय करायचं आता? सगळ तर वाहून गेलं. घर तर नाहीच. पण सगळ उध्वस्त झाले. कसं जगायचं आता?"
विलास स्वतः चे डोके धरून बसला होता. काहीच सुचत नव्हतं. तीन दिवसापासूनच संततधार सुरू होती.
या वर्षी सुरवातीपासूनच पावसाला छान सुरुवात झाली होती. सलग दोन वर्षे झालेल्या दुष्काळाने मरगळलेल्या मनात आशा पल्लवित झाली होती.
कोरड्या झालेल्या, भेगाळलेल्या या धरणी मातेने गटगटा पाणी पिऊन स्वतः ची तहान भागवली होती. सगळीकडे हिरवा शालू पांघरूण निसर्ग देखणा दिसतो होता. सगळेच आनंदी झाले होते. त्यामुळे विलास सोबतच गावातील शेतकऱ्यांनी आपले शेत नांगरून तयार केले होते. पहिल्या पावसातच पेरणीला सुरुवात केली. हळुहळु कोंब फुटायला लागले. पण पुढे काय वाढून ठेवले आहे. याची जराही कल्पना नव्हती. योग्य प्रकारे पिकांची काळजी घेत होते. दिमाखाने उभी असलेली पिके पाहून क्षणभर का होईना दिवाळी आनंदाची जाईल ही खात्री वाटू लागली.

"पळा! पळा! वाचवा स्वतः ला! नदीने तिची पातळी ओलांडली आहे. कोणत्याही क्षणी गावात पाणी शिरेल. तेव्हा स्वतः ला सांभाळा. गरजेपुरते आवश्यक सामान घ्या आणि कुटुंबातील लोकांना घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचा."
ग्रामसेवकाने गावभर भोंगा फिरवला. पण गावातील काही लोकांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही. आधीच तीन दिवसांपासून संततधार सुरू होती. त्यात वीज गेलेली. विलास रहातं असलेली वस्ती नदीपासून जरा दूर होती. त्यामुळे तिथल्या लोकांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही. पण जसजसा दिवस वर जाऊ लागला. तसतसा पावसाचा जोर वाढू लागला. संध्याकाळचे चार वाजत आले. हळूहळू हळूहळू नदीचे पाणी गावात शिरू लागले. आकांडतांडव गेल्यासारखा वरूण देव बरसत होता. विजेचा गडगडाट कानावर पडत होता. विलास शेतातून धावतपळत घरी आला.
"अहो, काय झालं ? एवढं धापा टाकत का आलात? किती भिजलात तुम्ही! " रजनी
"अग रजनी , लवकर सामान बांध आपल्याला डोंगरावरच्या गेस्ट हाऊसवर जायचे आहे. आज जर पाऊस कमी झाला नाही. तर खूप पूर येईल. असं म्हणत आहे. अग आजुबाजुच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे."
"ठीक आहे. मी बांधते सामान."
रजनीने गरजेपुरते सामानचे गाठोडे घेतले. पण काडी काडी जमवून केलेल्या संसाराची अशी व्यथा. काय घेऊ आणि काय नको असा विचार ती करत होती. त्यातच गावातील लोकांची आरडाओरड सुरू झाली होती.
"धावा, धावा, चला घराबाहेर पडा.'
काही तरूण मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली.
काही तरूण मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली.
©® अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा