व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक आणि आदरणीय शिक्षकवृंद तसेच माझ्या मित्र मैत्रिणींनो.आज 2ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती!
जगाला सत्याग्रह व अहिंसा ज्यांनी शिकवली आणि हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो हा धडा सगळ्या जगाला शिकवला ते म्हणजे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बापू. आज त्यांची जयंती हा दिवस आपण अहिंसा दिवस म्हणून देखील साजरा करतो.त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे.
जगाला सत्याग्रह व अहिंसा ज्यांनी शिकवली आणि हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो हा धडा सगळ्या जगाला शिकवला ते म्हणजे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बापू. आज त्यांची जयंती हा दिवस आपण अहिंसा दिवस म्हणून देखील साजरा करतो.त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे.
महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869साली गुजरात मधील पोरबंदरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचे लग्न कस्तुरबा गांधी यांच्याशी झाले. महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदरमध्ये तर हायस्कूलचे शिक्षण राजकोट आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादमध्ये झाले. पुढे ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी 1888 मध्ये लंडनला गेले. ते 1891ला म्हणजे तीन वर्षांनी भारतात बॅरिस्टर होऊन परत आले.त्यानंतर काही दिवस त्यांनी मुंबईमध्ये वकिली केली आणि 1893 मध्ये ते एका खटल्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले.द.आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद पाहायला मिळाला. आफ्रिकेत होत असल्याला भारतीय लोकांवरील अन्याय पहिला आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. इंग्रज शासना विषयी त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.आणि 1914 रोजी गांधीजी भारतात परत आले.
आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली पण त्यांनी इंग्रजांशी लढताना अहिंसा, सत्याग्रह या शस्त्रांचा वापर केला. त्यांनी चंपारण्य, खेड सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो, असहकार अशी अनेक आंदोलने केली. त्यात त्यांच्याबरोबर सगळा देश पेटून उठला. या आंदोलनांमुळे गांधीजींना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. पण ते डगमगले नाहीत. अहिंसा, असहकार आणि स्वदेशी ही त्यांची त्रिसूत्री होती. त्यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला आणि स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली आणि खादी कपड्यांचा पुरस्कार केला.
9ऑगस्ट 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडो आंदोलन पुकारले आणि ते देशभरात वनव्या सारखे पसरले. या आंदोलना नंतर दुसऱ्या महायुद्ध संपण्याच्या सुमारास ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत दिले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्य लढा जिंकला होता.
महात्मा गांधी 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथील बिर्ला हाऊस मधील प्रार्थना सभेला संबोधित करत असताना नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेवटचे शब्द ‛ हे राम ’ होते.
महात्मा गांधी 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथील बिर्ला हाऊस मधील प्रार्थना सभेला संबोधित करत असताना नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेवटचे शब्द ‛ हे राम ’ होते.
अशा या राष्ट्रपित्यास विनम्र अभिवादन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो
जय हिंद!
★★★
★★★
आदरणीय मुख्याध्यापक आणि आदरणीय शिक्षकवृंद तसेच इथं जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र- मैत्रिणींनो. आज आपण इथे जमलो आहोत ते म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यानिमित्ताने मी त्यांच्या विषयी जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.
तर आज 2 ऑक्टोबर म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बापूंचा जन्म दिवस. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1889 साली ब्रिटिश भारतातील गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट तर महाविद्यालयिन शिक्षण अहमदाबादमध्ये झाले. ते पुढे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला 1888 मध्ये गेले. तिथून ते शिक्षण पूर्ण करून 1891 मध्ये भारतात परत आले. त्यांनी काही दिवस मुंबई मधील कोर्टात वकिली केली आणि नंतर ते एका खटल्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले. द.आफ्रिकेत कमालीचा वंश भेद त्यांना पहायला मिळाला तसेच भारतीय लोकांवर होत असलेला अन्याया विरुद्ध ते पेटून उठले. एकदा रेल्वेने प्रवास करत असताना युरोपियन व्यक्तीला त्यांनी फस्ट क्लासमध्ये जागा नाकारली आणि त्यामुळे त्यांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. याच घटणेमुळे त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आग पेटली. द.आफ्रिकेत त्यांनी इंग्रजां विरुद्ध तब्बल आठ वर्षे लढा दिला आणि 1914 मध्ये ते भारतात परत आले.
भारतात त्यावेळी स्वातंत्र्य लढा सुरू होताच त्याच लढ्यात गांधींनी उडी घेतली. त्यांनी 19 एप्रिल 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. तिथून पुढे त्यांनी अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार या मार्गांनी अनेक आंदोलने केली. सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, विदेशिवर बहिष्कार अशा अनेक आंदोलनांनी त्यांनी ब्रिटिशां विरुद्ध लढा दिला. त्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगात देखील जावे लागले पण ते मागे हटले नाहीत. या सगळ्यात शेवटचे आणि खूप महत्त्वाचे आंदोलन ठरले ते म्हणजे 9 ऑगस्ट 1942चे भारत छोडो आंदोलन! या आंदोलनात सगळ्या भारतीय जनतेने सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे संकेत दिले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात महात्मा गांधीचा मोलाचा वाटा होता.त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा देखील करण्याचा प्रयत्न केला. देशात अस्पृश्यता आणि जातीवाद खूप होता. गांधीजींनी त्याचा प्रखर विरोध केला आणि या लोकांना ‛हरिजन’ संबोधले. त्यांनी कायम विदेशीवर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यांनी खादी कपड्याला प्राधान्य दिले.
30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी पाच वाजता दिल्ली येथे बिर्ला हाऊसमधील प्रार्थना सभेला संबोधित करत असताना महात्मा गांधींवर नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेवटचे शब्द ‛ हे राम ’ असे होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद!